Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
My old a** बघितला. प्राईमवर
My old a** बघितला. प्राईमवर आहे.
अहो आश्चर्यम, चक्क 'बघणेबल' निघाला.
हलकाफुलका टीन ड्रामा आहे. सेक्शुॲलिटी एक्स्प्लोर करणे, कुटुंबातील लोकांना वेळ देणे, पुढच्या आयुष्याबद्दलची स्वप्नं बघणे, मैत्रिणींसोबत उनाडक्या करणे ई आहे. सगळं एका टीनेजर मुलीच्या दृष्टिकोनातून दाखवलेय. तिने खूप सहज अभिनय केला आहे. त्यात दाखविलेले क्रॅनबेरीजचा फार्म, तळे, लोकेशन्स वगैरे रमणीय आहेत. मशरूम घेऊन आलेल्या अनुभावरची कथा आहे. पण काहीही घडतच नाही, दीड तासांची पिकनिक बघितल्यासारखे वाटते. फारच साधा आहे सिनेमा. टीन ड्रामा वाटला. इमोशन्स, कॉमेडी, नाट्य सगळेच बेताचे वाटले. अजून चालले असते.
स्वाती
स्वाती
किलरचा मोटिव्ह एका सीनमध्ये त्याच्या तोंडून २-४ वाक्यांत उरकला आहे. ते आपण "ओह्ह! बाप रे!" वगैरे मानून घ्यायचं. (पेट्रोल पंप सीननंतर ते संवाद आहेत बहुधा)
रावसाहेब ... अगदी! तिचा मूक शोक आणखी थोडा लांबवला असता तर मी सिनेमा बघणं सोडून देणार होते.
दो पत्ती पाहिला काल.
दो पत्ती पाहिला काल.
आवडला.
सोमिवर बरेच ठिकाणी जो रिव्ह्यू वाचला तो फार काही छान नव्हता. पण मला चित्रपट छान वाटला. स्पेशली शेवट आवडला..
शेवटचं ट्विस्ट काही डोके भांजाळून टाकणारा नव्हता. पण तो चित्रपटाचा हेतू सुद्धा नसावा. घरगुती हिंसाचारबद्दल जे पोहोचवायचे होते ते त्यातून व्यवस्थित पोहचले.
काल 'बेसिक इन्स्टिन्क्ट' परत
काल 'बेसिक इन्स्टिन्क्ट' परत पाहीला. केवढे भयानक एक्स्प्लिसिट सेक्स सीन्स आहेत बाप रे!!! पण मायकल डग्लस आवडत नसल्याने, खास वाटले नाहीत. जेव्हा शॅरन स्टोन क्रॉसेस हर लेग्ज तेव्हा 'कै च्या कै वाटतं. म्हणजे 'आवरा!' अशा टाईप्स. रहस्य छान राखले आहे.
'बोहेमिअन र्हाप्सोडी' function at() { [native code] }इशय आवडता सिनेमा, परत पाहीला. तो हिरो दहाच्या स्केलवरती ७ इतका आवडतो. सिनेमा मस्तच आहे. गाणि अफाट.
बघितलास का अस्मिता? मला कळलं
बघितलास का अस्मिता? मला कळलं नाही चॅड ला मोठी एलियट कशी दिसली? तिच्या मैत्रिणीला दिसलेली नसते ना?
हिडन फिगर्स (पीकॉक) - मस्त
हिडन फिगर्स (पीकॉक) - मस्त पिक्चर आहे. बर्याच दिवसांपासून पाहायचा होता. केविन कोस्टनर व तिन्ही मुख्य लीडिंग लेडीज ची कामे मस्त आहेत. जिम पार्सन्सला (बिग बँग थिअरीतला "शेल्डन कूपर") त्यामानाने फार काम नाही. केविन कोस्टनर त्याच्या एरव्हीच्या तुलनेने सपोर्टिंग रोल मधे मस्त आहे. ऑक्टेविया स्पेन्सर यातही आहे पण इथे "द हेल्प" च्या मानाने बराच रिस्ट्रेण्ड रोल आहे. ग्लेन पॉवेल आजकाल सगळीकडे दिसू लागला आहे. यातही त्याचा छोटा पण महत्त्वाचा रोल आहे.
फुल रेको
इथे नवीन रेटिंग सिस्टीम चालू
इथे नवीन रेटिंग सिस्टीम चालू करता येईल..
बघणेबल
फुल रेको
पीसफुल (पिसं काढायला फुल स्कोप)
दो पत्ती
दो पत्ती
अतिबकवास सिनेमा.. काजोल कुठल्याही अँगलने पोलीस वाटत नाही.. शेजारची गॉसिपींग करायला आलेली काकू वाटते..
दोघी क्रिती बहिणी पक्क्या रोबोट.. कुठू कहाणी सुरू होते मधेच कुठं जाते काही लिंक लागत नाही.. आता तरी पकड येयील म्हणता म्हणता संपतो सिनेमा पण हाती काही लागत नाही... गाणी पण अशीच कुठूनही सुरू होतात... कायच्या कै सिनेमा...
वर अंजली_१२ ने लिहिलेले वाचून पण मी सिनेमा बघितला
दो पत्ती : काजोलची संवादफेक
दो पत्ती : काजोलची संवादफेक ऐकून सरळ कभी खुशी कभी गम मधून इथे आल्यासारखी वाटते. तिने दहाडमधल्या सोनाक्षीकडून लेडी इन्स्पेक्टरच्या रोलसाठी टीप्स घ्याव्यात. सिनेमाचा विषय आवडला पण मांडणी एकदम ढीसाळ. हिरो अचानक काजोल ला घाबरतो काय , ती एकदम वकिल म्हणून काय उभी राहते , क्रीतीचे अचानक मतपरीवर्तन काय होते , सगळेच अगम्य. पण क्रीति आवडते मला.
काजोलची संवादफेक ऐकून सरळ कभी
काजोलची संवादफेक ऐकून सरळ कभी खुशी कभी गम मधून इथे आल्यासारखी वाटते>>> +११
मर्दानी मधल्या राणी आणि द्रुश्यम मधल्या तब्बू कडून पण थोड्या टिप्स घ्याव्यात.
रजनीकांत अमिताभ बच्चनचा नाव
रजनीकांत अमिताभ बच्चनचा नाव घेता न येण्यासारखा चित्रपट पाहिला.
विषय चांगला पण चोथा करून टाकला. अलिकडे रजनीच्या सिनेमात अॅक्शन पेक्षा अधून मधून चक्क स्टोरी असते.
पण मधेच ती सुपरस्टार लिहीलेली अक्षरे झळकतात, त्याचा फॉण्ट , कलर ठरलेला आहे. ती प्रकाशमानच असायला लागतात.
जेलर मधे चांगला दिसत होता. आता ते केस लावून पण चेहरा वाईट दिसतो. अमिताभ बघवत नाही.
वेट्टायन मी पण बघितला..
वेट्टायन मी पण बघितला..
र आ >>+ १
रजनीकांत,अजीतकुमार वगैरेंच्या सिनेमात लिहिण्यासारखे काही नसते ते सिनेमे तसेच असतात.
वेट्टायन असा उच्चार आहे होय !
वेट्टायन असा उच्चार आहे होय !
काय काय करून पाहिलं.
'ग्रॅज्युएट' सिनेमा परत
'ग्रॅज्युएट' सिनेमा परत पाहीला. काय सुंदर सिनेमा आहे. शेवट तर फारच मस्त आहे. डस्टिन हॉफमनने काय मस्त काम केलय.
My old a** बघितला. आवडला.
My old a** बघितला. आवडला. तारुण आणि मध्यम वयातला माणूस यांच्यातल्या दृष्टीकोनातला फरक खूप मस्त दाखवला आहे.
मला कळलं नाही चॅड ला मोठी एलियट कशी दिसली? >>> आधी एक मैत्रीण झिंगून झोपी जाते आणि एक कुठेतरी निघून गेलेली असते त्यामुळे मोठ्या एलियटला बघायला इतर कुणीच हजर नसते.
पण सिनेमा / कादंबरीतून इतके ओरडून सांगितले जाते की ओरीएंटेशन बदलता येत नाही. तर मग एलियट चॅडच्या प्रेमात कशी पडते ते नाही समजले.
होय माय ओल्ड अॅस मस्त सिनेमा
होय माय ओल्ड अॅस मस्त सिनेमा आहे. मी ही पाहीला. खूप आवडला. विशेषतः मिडवेस्ट खेड्यासारखा परिसर, कंट्री साईड समर होम वगैरे. अहो ओरिएन्टेशन म्हणजे ती बायसेक्श्युअल असते.
फारेन्ड, “द हेल्प”
फारेन्ड, “द हेल्प” सुचवल्याबद्दल खूप आभार. फारच सुंदर सिनेमा. प्राईमवरुन जातोय ५-७ दिवसात. नसेल पाहिला तर पहा. (अस्मिता, तुझा प्रतिसाद पण छान पण स्पॉयलर होते म्हणुन वाचायचा टाळला होता, आज वाचला).
डेडपूल विरुद्ध वोल्व्हरीन बघा
डेडपूल विरुद्ध वोल्व्हरीन बघा लोकहो. Ryan Renolds ने धमाल उडवली आहे. MCU मधील पहिला R Rated त्यामुळे योग्य ती काळजी घ्या.
लाजणे किंवा न लाजणे हे
लाजणे किंवा न लाजणे हे क्वालिफिकेशन आहे का?
भाजपची बाजू मांडणारे पण लाजत नाहीत कारण ते नेत्यांचे भ्रष्ट नसणे हायलाईट करतात. ते त्यांचे सुप्त हेतू उघड करायला लाजतात.
मविआ शुभ्र विचारसरणीच्या मागे दडते. ती विचारसरणी उजळ माथ्याने मांडणे शक्य आहे. पण यांचे नातेवाईक भाजपतून उभे आहेत हे न लाजता मांडता येते का? श्रीकृष्ण आयोगाने ठपका ठेवला आहे तो न लाजता सांगता येईल का? इक्बाल मिरची, दाऊद कनेक्शन असे अनेक विषय आहेत ज्याच्या फाईली पुन्हा उघडल्या जातील म्हणून हे गप्प बसतील.
सत्तेचा फायदा घेऊन मेनस्ट्रीम मधे रहायचे आपली ग्लॉस इमेज पेंट करायची आणि परस्पर उत्तर द्यायला भाट नेमामचे. अशांची बाजू मांडायला लाज वाटण्याचा प्रश्न येत नाही. उलट छोटे गट अशांच्या मागे दडतात पण ज्यांची या धैंडांच्या काळ्या कृत्यांची सहमती नसते. यांच्या कडे आजही बदनामीची प्रचंड यंत्रणा आहे. असो.
भेटू.
पाच वर्षे वेळ आहे.
भुलभुलैया 3 बघितला सुरुवात
भुलभुलैया 3 बघितला सुरुवात अगदी बाळबोध आहे शेवटची 20 मिनिटं बघितला तरी चालेल. माधुरी आणि विद्या चं गाणंही ठीकठाकच आहे पाहिलं भुभु मधलं जास्त चांगलं होतं .माधुरी आता फार कृत्रिम वाटते. विद्या तरी बरी .शेवटपर्यंत सस्पेंस टिकवला आहे पण शेवट अगदी फूस्स होतो . टीव्हीवर पळवत पहिला तरी चालेल. पहिल्या दिवशी 500 रुपये तिकिटात पाहण्यापेक्षा 150 पाहिला हेच समाधान.
फारेन्ड, “द हेल्प”
फारेन्ड, “द हेल्प” सुचवल्याबद्दल खूप आभार. फारच सुंदर सिनेमा. प्राईमवरुन जातोय ५-७ दिवसात. नसेल पाहिला तर पहा. (अस्मिता, तुझा प्रतिसाद पण छान पण स्पॉयलर होते म्हणुन वाचायचा टाळला होता, आज वाचला).
>>>> धन्यवाद सुनिधी.
Predestination - (Sci Fi time
Predestination -
(Sci Fi time travel) नेटफ्लिक्स - थोडे स्पॉयलर्स असतील.
Ethan Hawk, Sarah Snooke
या मी पाहिलेला सगळ्यात विचित्र सिनेमा आहे. विशेष आवडला नाही. यात एक तरुणी जिला पुरुष आणि स्त्री यांच्या दोन्ही अवयवांचे सेट असतात. ती पुढे पुरूष होऊन काळप्रवास करून मागे येते. योगायोगाने त्या दिवशीच सकाळी ती प्रजनन क्षम वीर्यासकट पूर्ण पुरुष झालेली असते. त्यामुळे ती काळात मागे जाऊन स्वतः स्त्री असतानाच्या शरीराला प्रेमात पाडून प्रेग्नंट करते. त्या दोघींना(?) जे बाळ होतं ते कुणीतरी अनाथाश्रमात नेऊन देते. जे बाळ मोठे होऊन तीच तरुणी होते असा काही तरी विचित्र 'लूप' आहे. एकच व्यक्ती स्वतःची पार्टनर आणि स्वतःचे बाळ आणि स्वतः आहे, फक्त काळ वेगवगळा. दिमागका दही...!
Catch me if you can (Prime)
Leonardo de Caprio, Tom Hanks, Amy Adams
धमाल आहे, जुनाच आहे. लिओ हा एक टीनेजर कॉनमॅन आहे, जो पॅनॲम एअरलाईन्सचा खोटा पायलट बनून , नकली चेक्स बनवतो. (Forgery, counterfeiting) यात तरबेज असतो, हे सगळे बाबांकडून शिकलेला असतो. हळूहळू मिलियन डॉलर्सची फसवाफसवी करायला लागतो. टॉम हॅन्क्स त्याच्या मागावर असलेला FBI ऑफिसर असतो. तो त्यालाही एकदा फसवतो. शेवट खूप छान आणि सकारात्मक आहे. ही खऱ्या व्यक्तीवर बेतलेली (प्रेरित) कथा आहे. Frank Abangale Jr नावाच्या फसवाफसवी करणाऱ्या जेमतेम विशीच्या तरुणाची कथा आहे. नक्की बघा. वेगवान चित्रपट आहे.
मीचि मज व्यालों । पोटा
मीचि मज व्यालों । पोटा आपुलिया आलों||
#आम्हालासगळंमाहितआहे!
दिमागका दहीची प्रंप्रा आपलीच
Catch me if you can मस्त आहे.
Catch me if you can मस्त आहे. आला त्यावेळी थिएटरला पाहिला होता.
Predestination -
Predestination -
****** स्पॉयलर अॅलर्ट ***************
टाईमट्रॅव्हलमधला एक महत्त्वाचा नियम इथे मोडून तोडून पिळून वितळवून टाकलाय. आई-बाप, बाळ, बाळाला चोरणारा तरुण व्हिलन, म्हातारा व्हिलन सर्व काही एकच व्यक्ती. त्यामुळे साहजिकच या सर्व व्यक्तीरेखा एकमेकींना वर्तमान, भूत, भविष्य काळात भेटत राहतात जे टाट्रॅमध्ये एकदम टॅबू आहे.
अहं ब्रह्मास्मि म्हणजे हेच ते असं झालं. पण एक संकल्पना किती ताणता येते याचं एक उत्तम उदाहरण म्हणून मी त्याकडे पाहिलं.
पहिल्या परिच्छेदासाठी अनुमोदन
पहिल्या परिच्छेदासाठी अनुमोदन पण एकुणात

तुम्हाला 'अहं ब्रह्मास्मि' तर मला 'लुनावाले ब्रह्मे' सापडले.
नाय बाय. सिनेमा पाहून माझ्या
नाय बाय. सिनेमा पाहून माझ्या घरीही हंडाभर दही बनलं होतं. अहं ब्रह्मास्मि म्हणजे मीच माझा क्रिएटर या अर्थी.
"कॅच मी..." मस्त आहे. कथा,
"कॅच मी..." मस्त आहे. कथा, सादरीकरण वगैरे चांगले आहेच, पण ते नसते तरी तो बहुधा लिओनार्डो च्या चार्म वरसुद्धा तेव्हा चालला असता
अजिबात विनोद न करता येणारा टॉम हँक्स मजेदार आहे यातला.
प्रीडेस्टिनेश - फारच गुंतातुंतीची कथा दिसते
जास्तीत जास्त तीन डायमेन्शन पर्यंत मला झेपते. त्यानंतर जर पिक्चर भारी असेल तर ठीक. नाहीतर बोअर होते.
यात शीला की जवानी गाणे फिट्ट होईल एकदम. किसी और की मुझको जरूरत क्या मै तो....
किंवा निरूपा रॉय जर अशा पिक्चर मधे असेल तर तिची हरवलेली मुले म्हणजे तीच स्वतः होती असे पिक्चरच्या शेवटी निष्पन्न होईल. निरूपा रॉय = (विनोद, ऋषी, अमिताभ)
माझ्या घरीही हंडाभर दही बनलं
माझ्या घरीही हंडाभर दही बनलं होतं. >>>
यात शीला की जवानी गाणे फिट्ट होईल एकदम. किसी और की मुझको जरूरत क्या मै तो....>>>
हे नुसतेच आगाऊ नसून अगदी चपखलही आहे ह्याची नोंद घेतली आहे. 
लिओनार्डो च्या चार्म वरसुद्धा तेव्हा चालला असता >>> अगदी. अतिशय चार्मिंग, विटी आणि अवखळ भूमिका आहे. टॉमला वरचढ वाटला आहे.
Pages