चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

गेल्या वर्षात ओटीटीवर पंधराच्या आतच सिनेमे पाहिले.
या वर्षी ७३० पहायचा संकल्प आहे. पैसे वाया जातात.

नेफ्लिवर जोकर बघितला. काहीतरीच सॅड, डिस्टर्बिंग वाटला. वाईट पण वाटलं त्या कॅरेक्टरचं. नाव माहित नाही पण त्याने काम जबरी च केलंय.

हॉटस्टारवर केट विन्स्लेटचा mountain between us बघितला. प्रेडिक्टेबल लव स्टोरी, थोडे अ त र्क्य वाटणारे सिन्स पण आहेत. तरी बघितला.
अख्खा पिक्चरभर नुसता बर्फच बर्फ आणि थंडी.

प्राईमवर Ben is back बघितला ज्युलिया रॉबर्ट्सचा. एक आई आणि ड्रग अ‍ॅडिक्शन मधून नुकत्याच बाहेर आलेल्या मुलाचे भावबंध, खूप सुरेख काम केलंय ज्युलिया रॉबर्ट्स ने.

अंजली, तू 'गुड पर्सन'वर फार छान लिहिले होतेस. तो नोंदवला आहे.
कॉमी, 'मिडसॉमर' (एकदाचा) बघितला, फारच जबरदस्त आहे. काम अप्रतिम आहे फ्लॉरेन्सचं. अंगावर येतं.

हर्पा, सजनी शिंदे वर मला बरोबर खाली हसायचं होतं. Happy आता हसताच येत नाहीये. मस्त पोस्ट . सुभानल्ला फारच धमाल. Lol

सिनेमा विशेष नाही पण अगदीच पॅ नाही.
सुभा तुपारेतल्या सारखा वाटला. निम्रत कौरला झेंडे सारखं बोलत होता आणि व्याहीविहिणीला इशा सारखं. सजनी नाव मलाही झेपलं नाही आणि स्पष्टिकरण तर एकदम लेम वाटलं. सुभा राजकारणात असल्यासारखं वागत होता पण प्रत्यक्षात नट होता. कोण विचारतं मराठी नाटकात काम करणाऱ्या नटाला..पण उगाच रुबाब. भाग्यश्री मेणचट आहे, दिसतेही मेणचट आणि काम तर यूट्यूबवर रेसिपी दाखवणाऱ्या बाईपेक्षाही साधारण. हिलाच गच्चीवरून ढकलून द्यायला हवे होते. रहस्य आणि उकल फारच बोअर. सजनी तर बोलण्यापेक्षा रडली जास्त. कायम वॅ वॅ केल्यानं तिचं दुःख पराकोटीचं वगैरे कधीच झालं नाही किंवा मला वाटलं नाही. मला सिनेमात कोण आहे वगैरे काही माहिती नव्हते, एकदम मराठी सिनेमा बघितल्यासारखं झालं. निम्रत आणि चिन्मय एका हॉटेलात जेवतात तेव्हा मेनू वर 'सूपशास्त्र' लिहिलेलं वाचून माबोकर 'चिनूक्स' यांची आठवण झाली. Happy

निम्रत कौरला झेंडे सारखं बोलत होता >> Lol

जेवतात तेव्हा मेनू वर 'सूपशास्त्र' लिहिलेलं वाचून माबोकर 'चिनूक्स' यांची आठवण झाली. >> हो हो, अगदी! हे डोक्यात आलं होतं आणि नंतर निसटून गेलं

नेफ्लिवर जोकर बघितला. काहीतरीच सॅड, डिस्टर्बिंग वाटला. वाईट पण वाटलं त्या कॅरेक्टरचं. नाव माहित नाही पण त्याने काम जबरी च केलंय.

>>

अक्शय कुमार

हिंदी नाही हो.. इंग्लिश जोकर

नेटफ्लिक्सवर leave the world behind बघितला. सस्पेन्स चांगला ठेवलाय पण संथ वाटला फार. बर्‍याचदा बोला बाबा आता एकदाचे लवकर काय ते असं वाटलं. सायबर अ‍ॅटेक्स, हॅकिंग विषय जरा डोक्यावरून जातात माझ्या.

सजनी शिंदे अज्जिबात आव्वडला नाही. ती सजनीच किती एकसूरी आणि तोंडाची विचित्र हालचाल करून इरिटेटींग बोलते. काहीच्या काही विषय, काहीच्या काही मांडणी. सगळे चांगले मराठी कलाकार वाया घालवलेत.
वरती परफेक्ट लिहिलंय सुभा राजकारणी जास्त नट कमी वाटतोय. नक्की काय करायचंय त्याचाच घोळ झालाय. निम्रतचं काम आवडलं फक्त.

नेटफ्लिक्सवर leave the world behind बघितला. सस्पेन्स चांगला ठेवलाय पण संथ वाटला फार. बर्‍याचदा बोला बाबा आता एकदाचे लवकर काय ते असं वाटलं.>>>>> +100
मी पण बघितला पण काय लिहावा रिव्ह्यू कळलं नाही..

सजनी बद्दल पूर्ण सहमत. हल्ली सुभाच्या सगळ्या भूमिकांमध्ये एकतर लोकमान्य टिळकांचा किंवा विक्रांत सरंजामेचा आवेश असतो.
सजनीच्या नटीत आणि गोष्टीत काही दम नाही, हे लक्षात आल्यामुळे कदाचित ह्या सगळया फौजेला घेतले असावे. निदान त्या नावांमुळे मुळे का होईना आपल्यासारख्या थोड्या लोकांनी सिनेमा पाहिला. मांडलेकरला पण वाया घालवले आहे. निमरत कौरला का घेतले असावे, ते ही कळले नाही. उलट तिच्या हिंदी मुळे ह्यांची पुणेरी हिंदी ठळक उठून दिसली.

इन्वेजन ऑफ बॉडी स्नॅचर्स बघितला. हा १९७८ सालचा सिनेमा आहे, मूळ १९५६ सालच्या ह्याच नावाच्या सिनेमाचा रिमेक. हेल्थ डिपार्टमेंट मध्ये काम करणाऱ्या एका बाईंना अचानक आपला नवरा वेगळाच वागतो आहे असे वाटू लागते. इतका वेगळा की हा आपला नवरा नाहीच ह्याची तिला खात्री पटते. ती हेल्थ डिपार्टमेंट मधल्या तिच्या मित्राला ह्याबद्दल सांगते, आणि तो तिला एका सायकॉलॉजिस्टकडे घेऊन जातो. तिथे तिला समजते की अशी इतरही लोकं असतात ज्यांना आपल्या जवळचे एकदम विचित्र झालेत असे वाटत असते. आणि ही सगळी "वेगळी" लोकं अगदी संशयास्पद असतात. ही खरेतर अनोळखी असलेली लोकं एकमेकांशी बोलत असतात, त्यांचे काहीतरी संगनमत चालले असते. प्राईम व्हिडिओ वर आहे.

भारी सिनेमा आहे. सुरुवातीच्या भागात पॅरानॉइया मस्त दाखवला आहे. रोजमेरिज बेबी हा सुद्धा असाच सिनेमा होता ज्यात मुख्य पात्राला काहीतरी भयंकर कट चालला आहे असा सुगावा लागला असतो पण इतरांच्या वागणुकीमुळे ते पात्र आणि प्रेक्षक म्हणून आपणही शेवटपर्यंत शंकाग्रस्त राहतो की हा अतार्किक पॅरानॉइया आहे की खरेच काही गंभीर कारस्थान आहे.

Dirty Rotten Scoundrals त्या वेळी विनोदी वाटला होता. बघितला नसेल तर हा आहे.

Minal murali मल्याळम हिंदीत उपलब्ध नेटफ्लिक्स वर..मस्त सिनेमा..चार वेळा बघितला..
Maaviran तमिळ हिंदीत उपलब्ध प्राईम.. दोन वेळा पाहिला..
Trishanku मल्याळम सबटायटल्स नेटफ्लिक्स.. मस्त आहे हा पण..
Njan prakashan मल्याळम नेटफ्लिक्स सबटायटल्स
अजून देते थांब

किल्ली
मुलांसोबत बघायचे असतील तर खूप अनिमेटेड आहेत.
स्टुअर्ट लिटल 2 ते 3 असतील,
कुत्रा मांजर ह्यावर आधारित देखील खूप पण आता नावं आठवत नाहीयेत.
हिंदीत डब असतात, आणि फंनी डायलॉग, जरा हिरोगीरी , थोडे फॅमिली बॉंडिंग वै
मजा येते
स्टुअर्ट लिटल आम्हा मोठ्यानाही आवडलेला

आताच एक पाहिला.जुन्या खजिन्यातला.
ह्या प्रकारातले सगळे आवडलेले आहेत.. गोलमाल पासून छोटी सी बात पर्यंत.
...
किसी से ना कहना
नितांत सुंदर चित्रपट

किसी से ना कहना >> आवड कळल्याशिवाय चित्रपट सुचवता येत नाही.
हा जॉनर आवडत असेल तर खाली काही सुचवत आहे. पाहिलेले नसतील तर ..

१. झूठी
२. खूबसूरत (रेखा)
३. बीवी और मकान
४. दामाद
५. छोटीसी बात
६. पती , पत्नी और वो
७. नौकर
८. कथा
९. चष्मेबद्दूर
१०. रंगबिरंगी
११. शौकीन
१२. नर्म गरम
१३. खेल

आचार्यांच्या यादीत भर - गोलमाल Happy
-------------------------
बालिका बधू,
जिस देशमे गंगा बहती है,
मुझे जीने दो
आन
गाईड

वरचे सगळे मस्त आहेत पाहिले आहेत, repeat value आहे ह्या list ला.
कथा नाही पाहिला फक्त.
गोविंदा चे सिनेमे पण आवडतात मला. No १ वाले, तेही खूप वेळा पाहिले

कोणी तो 'सलार' नावाचा चित्रपट पाहिला का?
गेल्या आठवड्यात कर्णावतीला (अहमदाबाद) मित्राकडे गेलो होतो. तिथे Sunset Drive-In Cinema नावाचे open theatre आहे. याआधी मी कधी open theatre पाहिले नसल्याने त्या संकल्पनेचा अनुभव घेण्यासाठी तिथे जो चित्रपट असेल तो पाहायचे आधीच ठरवले होते (अगदी गुजराती असेल तरी!). नेमका तिथे हा 'सलार' लागला होता. ठरल्याप्रमाणे बघितला पण हिंदीत असूनही काहीही कळला नाही! मध्यांतरानंतर अर्धवट सोडून आलो!

सलार मी बघितला थिएटरमध्ये तेलुगू वीथ सबटायटल्स..
मला जरा जरा कळला पण शेवट वीस मिनिटे डोक्यावरून गेला...कंटिन्यु बैकग्राऊंड म्युझिक, सस्पेन्स, स्क्रीन प्ले आवडलं...केजीएफ ला स्टोरी अशी नव्हती.. सलार ला गुंतागुंतीची स्टोरी आहे..
बाहुबली नंतर यात प्रभास मस्त दिसलाय...

आन, मुझे जीने दो या साठी स्पेशल +1 Happy माझेही खूप आवडते चित्रपट आहेत. आणि फारसे याबद्दल कोणी बोलताना मला आढळत नाही.

१२वी फेल फार सुंदर आहे. बघण्यापूर्वी बॅकग्राऊंड अजिबात माहित नसल्ताने जास्त एन्जॉय केला.

Submitted by सायो on 2 January, 2024 - 14:36 >>>>>>
मलाही बॅकग्राऊंड माहित नव्हते आणि सुपर ३० बरोबर तुलना केल्याची कुठे तरी वाचले होते .
सावकाश बघावा म्हणून पेंडींग ठेवलेला , शेवटी आज बघितला !
सुंदर सिनेमा तो ही सत्यकथेवर .
खूप कमी सिनेमे आहेत जे डोळ्यात पाणी आणू शकतात , त्यातील हा एक 12 th fail .....
या सिनेमाला राष्ट्रीय पातळीवरील एखादे बक्षीस मिळायला हरकत नाहीं

काल पाहिला १२ वी फेल.
फार सुंदर. सगळ्यांचीच कामं छान आहेत. विक्रांत मेस्सीला तर बॉडी लँग्वेज, एक्स्प्रेशन्स, डोळ्यातून हावभाव व्यक्त करणे यासाठी पैकी च्या पैकी मार्क्स!

हॉटस्टार

आणि सुपर ३० च्या उपर आहे हा.. तुलना नको.

सुपर ३० शेवटाकडे जाता जाता ना इथला ना तिथला झाला आहे. जेव्हा तुम्ही अश्या चित्रपटात हृतिक घेता तेव्हा असा गोंधळ उडायची शक्यता असतेच. अर्थात पिक्चर छान आहे. मला आवडला होता. त्याला कमी लेखत नाहीये.
पण १२ वी नापासची तुलना त्याच्यासोबत नको. कारण हा फारच उत्तम आणि वरच्या दर्जाचा चित्रपट आहे.

वरची यादी आणि मेघना आणि श्रवूची भर भारी आहे.

12th Fail सुरेख जमलाय. खूप आवडला.

विक्रांत मेस्सी ह्रितिक एवढा ग्लॅमरस नाही म्हणून त्याला टॅन करून जे तांबडं केलं आहे ते फार खटकत नाही. ह्रतिक साक्षात रोमन देवता आहे, त्याला सर्वसाधारण दाखवणं अशक्य आहे. सुपर ३० आवडला होता. बघताना तुलना केली गेली नाही.

त्याचं शरीरही किरकोळ आहे, त्यामुळे तो गिरणीत काम करताना ज्या हालचाली करतो त्या एकदम आदर्श वाटल्या आहेत. पांढरपेशे एवढे चपळ नसतात, हालचालीत चिवटपणा नसतो. आपल्याला त्यांच्या सारखं तासनतास उकिडवं बसता येत नाही, आपण मागच्या मागे पडतो. ते फार काटक असतात... ते त्याने फारच छान दाखवले आहे. पटकन भोरगं टाकून कुठंही अंग टाकतात. त्याने बाबा आल्यावर कसं झटकले तसं, मैत्रिणीलाही किती प्रेमाने स्टूल स्वच्छ करून दिला.

मला त्या दोघांचे प्रेम फारच आवडले, त्या वयात जसं उच्छृंखल प्रेम असतं, त्याचा लवलेशही नव्हता. अतिशय पोक्त आणि समजदार नातं होतं. इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही त्याने जी जिद्द, चिकाटी आणि तत्त्वनिष्ठता दाखवली त्यानं भरूनच आलं. त्याच्या मित्रांनी दिलेला सपोर्टही कौतुकास्पद, 'आपल्या सगळ्यांची लढाई आहे ही' म्हणतो. हे कळणं किती प्रगल्भ आहे.

आज्जी, बाबा, आई, शिक्षक, मित्र सगळेच आवडले. आज्जी 'बा बहू और बेबी' मधली बा - सरिता जोशी आहे, आता थकल्यासारखी दिसते. 'टूरिझम' ऐवजी चुकून 'टेररिझम'वर निबंध लिहितो तेव्हा आपलाच जीव तळमळतो. त्यामुळे त्याला जेव्हा यश मिळतं आपल्यालाच सुटल्यासारखं होतं. तो ताण, तगमग आणि समर्पण अतिशय खरं वाटलं आहे. एरवी निबर होत गेल्याने अशा गोष्टी कथेतच असाव्यात अशी आपली अपेक्षा असते पण हे खरं असल्याने ते सकारात्मक झालं आहे.

इथं रेको देणाऱ्या सर्वांना धन्यवाद, ते वाचूनच बघितला. Happy

आपण मागच्या मागे पडतो >>> Lol

बघायचा आहे. इथे डिस्ने वर आहे का? हॉटस्टार आता स्वतंत्र सर्विस नाही ना?

नक्की बघा आचार्य आणि त्यावर लिहाही, वाचायला आवडेल. Happy
उथळ, सवंग आणि अतिरंजित सिनेमांच्या लाटेत एखाद्या मृद्गंधासारखा वाटला. व्यावसायिक सिनेमापेक्षा समांतर सिनेमाची आठवण करून देतो.

बघा ! बघा!!!!
नक्की सगळ्यांनी बघा.
आपण स्वतः upsc पस करण्याचा प्रयत्न करत असल्याचा फील येईल . सिनेमात दाखवलेला इंग्लिश चा भयगंड बऱ्याच जणांना असतो त्यामुळे हिंदी मीडियम चा स्टुडंट् upsc पास करील की नाही हे पाहणे खूप उत्कंठावर्धक ठरते .

उथळ, सवंग आणि अतिरंजित सिनेमांच्या लाटेत >>> खरंय. पूर्वी ज्या सिनेमांना आपण हसायचो, ते आता नॉर्मल आणि "मानवी" वाटतात.

>>>>>ह्रतिक साक्षात रोमन देवता आहे
मला हृतिकचं लांबलचक पिनाकिओ सारखं नाक अज्जिबात आवडत नाही. त्या शिल्पा शेट्टीचे नाकही फेंदारलेले वाटते. तेव्हा माझ्याच डोळ्यात काहीतरी दोष असावा Sad

Migration पाहिला. निवांत संथ, सेफ आयुष्य असताना jamaica च्या adventure ट्रिप ला गेलेल्या डक फॅमिली ची ऍनिमेटेड गोष्ट. छान आहे पण फारच लहान आहे मूवी कसा बसा दीड तास, एकदम उरकल्या सारखा वाटला अजून छान करता आला असता. ऐनवेळी जायचं ठरल्या मुळे तिथं असलेल्या dunki, animal आणि migration अशा तिनं option पैकी सेफ option निवडला Happy

Pages