Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
>>> "गुंडा" बघू लागली तरी
>>> "गुंडा" बघू लागली तरी त्यात चाचांचे गाणे दाखवतील


हो, मूड सेन्स करून वगैरे. अलेक्साला तुम्ही लॉन्ड्री फोल्ड करताहात अशी शंका आली की 'शायनिंग' लावलात तरी 'डोन्ट मूव्ह'च दिसेल - साबणांच्या जाहिरातींसकट.
अलेक्साला तुम्ही लॉन्ड्री
अलेक्साला तुम्ही लॉन्ड्री फोल्ड करताहात अशी शंका आली की 'शायनिंग' लावलात तरी 'डोन्ट मूव्ह'च दिसेल - साबणांच्या जाहिरातींसकट. >>>
खरे म्हणजे टेक्नॉलॉजी आहे त्यांच्याकडे. प्रायव्हसी वगैरेचे प्रचंड इश्यू आहेत. पण तंत्रज्ञान इथपर्यंत आलेले असावे. तुमच्या लॉण्ड्रीमधे त्या टाइड ऐवजी हा ब्रॅण्ड वापरा म्हणून सांगतील. किंवा भारतात तुम्ही वापरत आहात त्या "आम टिकिया" ऐवजी ट्रिपल सुपर पॉवर वगैरे वाढत गेलेली विशेषणे असलेले साबण 
हायड्रो (इलेक्ट्रिक) कंपनी
हायड्रो (इलेक्ट्रिक) कंपनी सांगते ना मला वॉशर दिवसा नको रात्री लाव म्हणून. तो डेटा सध्यातरी थर्डपार्टीला शेअर होत नाही, यु नेव्हर नो कधी होईल. इलेक्ट्रिक सिग्नेचर वरुन त्यांना खूप काय काय समजू शकतं असं वाचलं आहे.
शायनिंग' लावलात तरी 'डोन्ट
शायनिंग' लावलात तरी 'डोन्ट मूव्ह'च दिसेल - साबणांच्या जाहिरातींसकट. >>>
मला 'बघणेबल' आहे सांगणे आणि 'रेको' देणे एकच वाटले होते. आता कळले की रेको म्हणजे 'आवर्जून बघा', बघणेबल म्हणजे 'बघा वाटले बघा', म्हणून माझी गडबड झाली.
भारतात तुम्ही वापरत आहात त्या "आम टिकिया" ऐवजी ट्रिपल सुपर पॉवर वगैरे वाढत गेलेली विशेषणे असलेले साबण >>> 'शर्त द चॅलेंज' लेखात तुषार कपूरच्या शर्टच्या दोन्ही बाजूंची तुलना याच साबणांनी केली आहे.
आपल्याला जे नको आहे ते बोलून/ सर्च करून एआयना mislead करा.
माय ओल्ड अॅ**** >>>> मस्त
माय ओल्ड अॅ**** >>>> मस्त पिक्चर आहे. शेवटही चांगला आहे. फक्त एक त्यात उल्लेख केला आहे तो मला समजला नाही/आवडला नाही. पण स्पॉईलर होईल म्हणून बहुतेकांचा बघून झाल्यावर बोलू. पिक्चर मस्त आहे.>>>>>>>>>> बघितला. आवडला. अजून कोणी बघितला असेल तर बोलता येईल.
>>> आता कळले की रेको म्हणजे
>>> आता कळले की रेको म्हणजे 'आवर्जून बघा', बघणेबल म्हणजे 'बघा वाटले बघा'
बघणेबल म्हणजे बघण्याइतकं बल असेल तर बघा.
आज स्वाती काही सोडणार नाही
आज स्वाती काही सोडणार नाही असे दिसतेय.
मी सिनेमा बघितलाही नाही आणि तुम्ही मात्र काळा कोट घालून बसल्यासारखे करत आहात.
मी बघेन आणि 'ऑर्डर, ऑर्डर' करेन.
'शर्त द चॅलेंज' लेखात तुषार
'शर्त द चॅलेंज' लेखात तुषार कपूरच्या शर्टच्या दोन्ही बाजूंची तुलना याच साबणांनी केली आहे >>>
परफेक्ट!
अगदी अचूक व्याख्या नाही पण बघणेबल म्हंटलो ते ठीकठाक आहे, बोअर होणार नाही ई अर्थाने
अजून कोणी बघितला असेल तर बोलता येईल. >>> हो
अमित - त्यांना काही नवीन रेव्हेन्यू स्ट्रीम सापडली तर आधी बिन्धास्त शेअर करतील. मग कोणीतरी त्यावर आवाज उठवेल. काँग्रेसमधे एक अगम्य प्रश्नांचे हिअरिंग होईल (त्यावर एस एन एल एक स्किट काढेल). कॅलिफोर्निया किंवा युरोपमधले कायदे त्यांचा विस्तार वाढवतील. मग २-३ वर्षांनी "ग्राहकांची प्रायव्हसी अबाधित राहील याकरता आम्ही असे प्रयत्न करत राहू" वगैरे म्हणत थोडेफार कंट्रोल्स येतील. बहुतांश टेक कंपन्या असेच करतात.
बॅक टू चित्रपट - मला नेफि व इतर सर्विसेसने एक "रिसेट" मोड ठेवावा असे नेहमी वाटते. म्हणजे मी आधी पाहिलेल्या पिक्चर्सवरून रेकमेण्डेशन्स किंवा "तुम्हाला हे आवडतील" हे ठरवायचा प्रयत्न न करता एखाद्या नवीन मेम्बरला जसे दिसेल तसे. बहुधा अकाउंट मधली सध्याची प्रोफाइल बंद करून नवीन उघडावी लागेल, डु आयडी घेतल्यासारखे.
"गुंडा" बघू लागली तरी त्यात
"गुंडा" बघू लागली तरी त्यात चाचांचे गाणे दाखवतील >> हे कुठलं गाणं? चाचांच्या डोळ्यात पाणी आणणारं ऐ मेरे वतन के लोगो की वन टू चाचा चा?
बघणेबल म्हणजे ९८वीय असावे
बघणेबल म्हणजे ९८वीय असावे असेही म्हणता येत नाही फा असल्यामूळे
कोणी तरी फा ला काही बघणेबल सिनेमे सुचवा रे 
बघणेबल म्हणजे ९८वीय असावे
बघणेबल म्हणजे ९८वीय असावे असेही म्हणता येत नाही फा असल्यामूळे >>>
का? मला चालतील की ९८ वाले.
हपा - ती गाणी वेगळी, आणि ते चाचाही वेगळे. आज १४ नोव्हें असल्याने तो गोंधळ होणे बरोबर आहे. पण माझ्या पोस्टमधले चाचा म्हणजे गुलजार.
कोणत्याही चर्चेत नेहरू कधीतरी येतातच पण असे येतील असे कधीही वाटले नव्हते
त्या 'बघणेबल' शब्दाने मला
त्या 'बघणेबल' शब्दाने मला 'जिंदगी के हातो मजबूर' वाटायला लागले आहे. असामी आणि स्वाती, फा ला सोडू नका.
मला नेफि व इतर सर्विसेसने एक "रिसेट" मोड ठेवावा असे नेहमी वाटते. म्हणजे मी आधी पाहिलेल्या पिक्चर्सवरून रेकमेण्डेशन्स किंवा "तुम्हाला हे आवडतील" हे ठरवायचा प्रयत्न न करता एखाद्या नवीन मेम्बरला जसे दिसेल तसे. >>>
म्हणजे एका अर्थाने हिस्ट्री क्लिअर करता येईल. आणि कुणालाही कळणार नाही आपण काय बघितले.
कोणत्याही चर्चेत नेहरू कधीतरी येतातच पण असे येतील असे कधीही वाटले नव्हते >>>>

कोणत्याही चर्चेत नेहरू कधीतरी
कोणत्याही चर्चेत नेहरू कधीतरी येतातच पण असे येतील असे कधीही वाटले नव्हते >>
त्या 'बघणेबल' शब्दाने मला 'जिंदगी के हातो मजबूर' वाटायला लागले आहे. >> फा च्या ' मला चालतील की ९८ वाले.' मूळे ह्या वाक्याला भलतेच कोंदण प्राप्त झाले आहे
मला चालतील की ९८ वाले >>>
मला चालतील की ९८ वाले >>>
मला इतल्या नव्या पोस्टी
मला इतल्या नव्या पोस्टी म्हणजे कुठला तरी नवा सिनेमा आला असावा असे वाटाले पण इथे वेगळीच मज्जा आहे


हपा - ती गाणी वेगळी, आणि ते चाचाही वेगळे >>> "ती गल्लाभरू नाटकं निराळी" आठवलं
नेहरू >>>
नवीन चित्रपटाबद्दल लिहिले
नवीन चित्रपटाबद्दल लिहिले होते पण ते मागे गेले म्हणून परत टाकतो
विजय ६९ पाहिला. (नाव वाचून कोण जोक मारतात रे
)
हलका फुलका पिक्चर आहे. कथा साधी सरळ एका ६९ वर्षाच्या माणसाला ट्रायथलॉन करायची आहे आणि तो ती करतो अशी आहे. त्यात मग त्याला येणाऱ्या अडचणी, लोकांचे विविध शंकायुक्त अडथळे. असे सगळे येते. मध्येच थोडे नाट्य टाकलेले आहे. खूप जीव नसला तरी अनुपम खेर, चंकी पांडे, आणि गुड्डी मारुती ने चांगले काम करून प्रेक्षणीय केला आहे. आर्चीज मध्ये जगहेड झालेला पण आहे यात. तो तिथेही चांगला वाटला होता इथेही चांगले काम करतो.
एकंदरीत सगळ्या ट्रू क्राईमच्या गोंधळातून सुटका हवी असेल तर नक्की पहा. खूप काही हाती लागणार नाही पण निराशाही होणार नाही. कधी कधी आपण वयस्क लोकांना हे तुम्हाला जमणार नाही, हे नका करू, ते नका करू असे जास्तीच बोलतो की काय असा विचार मात्र करायला लावतो.
सध्या माबो वरील लोक फिटनेस विषयी जागरूक झाले आहेत त्यांनी नक्की बघा.
Hi we get tide here. Powder
Hi we get tide in india Powder liquid both
कोणत्याही चर्चेत नेहरू कधीतरी
कोणत्याही चर्चेत नेहरू कधीतरी येतातच पण असे येतील असे कधीही वाटले नव्हते >>
सगळ्या पोस्टी
अॅन हेश? हा कुठला डोन्ट मूव्ह? >>> अरारा! म्या गोंधळ घातला. एकाच दिवशी दोन सिनेमे बघितले. डोन्ट मूव्ह आणि द व्हॅनिश्ड. त्यामुळे कन्फ्युजन झालं माझं.
द व्हॅनिश्ड - यात अॅन हेश आहे.
डोन्ट मूव्ह - ओके वाटला. बघणेबलच्या खालची ही ग्रेड मानायची काय?
>>> डोन्ट मूव्ह - ओके वाटला.
>>> डोन्ट मूव्ह - ओके वाटला. बघणेबलच्या खालची ही ग्रेड मानायची काय?
हो, बघणेबल आहे असं सांगणार्यांच्या (ते आपल्या कंपूत असतील तर) भावना न दुखावता 'हॅ, कैत्तरीच आहे' हे कन्वे करायची एक पद्धत.
एकूण 'बघणेबल' हे 'एडिबल'सारखं वाटतंय. खाऊन फूड पॉइझनिंग होणार नाही इतकंच.
माबोकरांची ग्रेडींग स्केल वर
माबोकरांची ग्रेडींग स्केल वर एक ललित होऊन जाऊ द्या.
एकूण 'बघणेबल' हे 'एडिबल'सारखं
एकूण 'बघणेबल' हे 'एडिबल'सारखं वाटतंय. खाऊन फूड पॉइझनिंग होणार नाही इतकंच. >>>>
तुमचे हे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. /\ 
Mr.& Mrs. 55.
Mr.& Mrs. 55.
नसरीन मुन्नी कबीर बरोबर ह्या सिनेमावर चर्चा.
https://www.youtube.com/watch?v=xeUwyWyBxWA
वीर नावाचा पिक्चर आहे ज्यात
वीर नावाचा पिक्चर आहे ज्यात ड्युप्लीकेट ऐश्वर्या राय आहे. म्हणजे बघणे आलंच.
पण मायबोलीवर एका शब्दाचाही रेको नाही ?
हे धरणीमाते पोटात घे लेकरांना... मला नाही, वीर बद्दल न लिहीणारांना.
सध्या माबो वरील लोक फिटनेस
सध्या माबो वरील लोक फिटनेस विषयी जागरूक झाले आहेत त्यांनी नक्की बघा. >>> ते कधी नव्हते ? थिअरी पूर्वीपासून पक्कीच आहे त्यांची.
प्रॅक्टीकल ला आता सुरूवात केलीय.
प्रॅक्टीकल ला आता सुरूवात
प्रॅक्टीकल ला आता सुरूवात केलीय >> त्याला उत्साह यावा याचसाठी पिक्चरचा रेको दिला आहे
एकूण 'बघणेबल' हे 'एडिबल'सारखं
एकूण 'बघणेबल' हे 'एडिबल'सारखं वाटतंय. खाऊन फूड पॉइझनिंग होणार नाही इतकंच >>>
हो, बघणेबल आहे असं सांगणार्यांच्या (ते आपल्या कंपूत असतील तर) भावना न दुखावता 'हॅ, कैत्तरीच आहे' हे कन्वे करायची एक पद्धत >>>
पण "ओके आहे" आणि "बघणेबल" हे साधारण सारखेच वाटते. अजिबात वेळ वाया घालवू नका म्हणायचे नाही पण रेकोही द्यायचा नाही म्हणून मधले एखादे विशेषण 
बाकी भावना वगैरे काही नाही. आत्ताचे उदाहरण म्हणजे सुधीर फडके पिक्चर मी थिएटर मधे पाहिला आणि गाणी मंत्रमुग्ध होउन पाहिली/ऐकली. तू इथे की दुसरीकडे तुला अजिबात आवडला नाही लिहीले आहेस. ते वाचून मलाही आठवले की ती गाणी वगळता बाकी सगळे बाळबोध होते. पण मी पाहताना त्या गाण्यांची नॉस्टॅल्जिक व्हॅल्यू इतकी होती की ते बाकी सगळे इग्नोर केले होते. एखाद्या डॉक्युमेण्टरी मधे काही लोक मधेच एखादा सीन इनॅक्ट करतात तसे मी ते पाहिले होते, केवळ गाण्यांना जोडणारे सीन्स म्हणून.
हो हो, ते असंच गमतीने लिहिलं.
हो हो, ते असंच गमतीने लिहिलं.
)
(आपला कुठे कंपू आहे?!
आपला कुठे कंपू आहे?! >>>
आपला कुठे कंपू आहे?! >>>
कोर्टात एखादा कावेबाज साक्षीदार मित्र वगैरे असला तरी "मी यांना ओळखत नाही" असे म्हणतो त्या टोन मधे वाचले मी. लिहीलेही बहुधा त्याच टोन मधे असावे 
बाय द वे तो पिक्चर किमान बघणेबल आहे का नाही याबद्दल इतरांचे काय मत आहे? ती लीड अॅक्ट्रेस यलोस्टोन सिरीज मधे लोकल नेटिव्ह ट्राइबमधली "मोनिका" आहे. अगदी लाइकेबल रोल आहे तिचा त्यात. तिथे ती आवडली आणि क्लिप्स मधे बर्यापैकी ड्रामा वाटला. म्हणून पाहिला.
विजय ६९ ची जाहिरात दिसत आहे. इंटरेस्ट आहेच.
अमा - हो टाइड मलाही पाहिल्याचे आठवते. पण साबणांची जाहिरात डोक्यात बसली आहे.
>>> लिहीलेही बहुधा त्याच टोन
>>> लिहीलेही बहुधा त्याच टोन मधे असावे
येस.
बघणेबल वाटला सुरुवातीला, तू म्हटल्याप्रमाणे तिची मनःस्थिती / त्याचं कारण, दोन मुख्य पात्रांची भेट ही नक्कीच ग्रिपिंग सुरुवात होती.
(तरी रावसाहेब म्हणाले असते, 'बायकांच्या आड्यन्सला रडवायला...' - असो. स्पॉइलर होईल!) पण नंतर त्या घटनांचं, कॅरेक्टर्सचं काही लॉजिकल प्रोग्रेशन, काही इमोशनल डेप्थ, काहीच नाही! एकदम संपलाच सिनेमा!
Pages