Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
द हेल्प - कमाल मूव्ही आहे.
द हेल्प - कमाल मूव्ही आहे. थँक यू फा…. छान सिनेमा रेकमेंड केलास.
अगं पूर्वी वेळ नसे ,
अगं पूर्वी वेळ नसे , इन्टरेस्ट नसे. आता घरातले सर्व सिनेमे बघुन घेते आहे
सामोला ‘disclosure’ पण सजेस्ट
सामोला ‘disclosure’ पण सजेस्ट करा
इकडे की मराठी चित्रपट बीबीवर सजेस्ट केला लाईक आणि सब्स्क्राईब बघायचा प्रयत्न केला. सुमार आहे.
मी बराच वेळ मराठी चित्रपट
मी बराच वेळ मराठी चित्रपट बीबीवर disclosure कोणी सजेस्ट केले असेल असा विचार करत होतो
लाईक आणि सब्स्क्राईब बघायचा
लाईक आणि सब्स्क्राईब बघायचा प्रयत्न केला.
>> कश्यावर आहे? आय मीन कोणता OTT प्लॅटफॉर्म?
सामो तुमच्याकडे थंडी एकदम
सामो तुमच्याकडे थंडी एकदम वाढलीये का?
एके ठिकाणी "SHAH RUKH KHAN: A
एके ठिकाणी "SHAH RUKH KHAN: A GLOBAL ICON" हा Anupama Chopra ह्यांचा लेख वाचनात आला. त्यात "कुच कुच होता है"
बद्दल बरेच विवेचन होते. म्हणून मग मुद्दामहून काल तो सिनेमा पुन्हा बघितला. Mixed Bag. नंतर सविस्तर लिहीन. आज रुमाल टाकून ठेवतो.
>>>>
केशवकूल, शक्य झाल्यास वेगळा धागा काढा. इथे फार पोस्ट येतात त्या गर्दीत अश्या पोस्ट हरवतात. मीच बरेचदा वेळ नसला की हा धागा वाचायचे सोडतो.
ओके सर.
ओके सर.
विषय अत्यंत रोचक आहे. वेळ मिळाला कि स्वतंत्र धागा काढीन!
हा लेख Extracted from "King of Bollywood: Shah Rukh Khan and the Seductive World of Indian Cinema."
आधी हे पुस्तक मिळवतो.
भारतात "द हेल्प" सोनी च्या
भारतात "द हेल्प" सोनी च्या ओटीटी वर ( सोनी लिव्ह वर)होता. गेल्या वर्षी बघितला होता तिथे.
केशव कूल जरूर...
केशव कूल जरूर...
काल लकी भास्कर पाहिला. नेटफलिक्स.
छान होता. आवडला. या शेअर मार्केट बँक घोटाळा थीमचे चित्रपट आधी सुद्धा पाहिलेले. मजा येते बघायला. काही गोष्टी जितक्या सहज घडताना दाखवले तितक्या प्रत्यक्ष आयुष्यात घडत नसतील. पण हा पिक्चर आहे आणि तो असाच असायला हवा. मस्त मांडणी आहे चित्रपटाची. मध्ये ब्रेक घ्यावासा वाटला नाही.
डूलकर सल्लू सुद्धा फार आवडतो. सहज सुंदर नैसर्गिक अभिनय करतो. त्यामुळे आपणच आहोत त्या जागी असे वाटते.
बाई दवे, दक्षिण मुंबईचा समुद्रकिनारा दिसला की एका वेगळेच नाते तयार होते सिनेमाशी
सायो डिसक्लोजर पाहीलाय पूर्वी
सायो डिसक्लोजर पाहीलाय पूर्वी. आत्ता शोधला पण घरच्या लायब्ररीत नाहीये. घ्यावा लागेल. नॅह!! तो हिरो काही इतका खास नाही. पण हो स्टोरी फार मस्त आहे. शेवटी त्यांचं तुटतं ना? आपल्या गर्ल्फ्रेन्डला तो एक रात्र जाऊ देतो ना? मग तुटणारच. काय उपयोग त्या मिलिअन्सचा
>>>>सामो तुमच्याकडे थंडी एकदम
>>>>सामो तुमच्याकडे थंडी एकदम वाढलीये का?
होय बेसिकली मी बेरोजगार आहे सध्या.
तो हिरो काही इतका खास नाही.
तो हिरो काही इतका खास नाही. पण हो स्टोरी फार मस्त आहे.
>>
मग 'सौदा' बघ...
त्यात सुमित सेहगल अन् विकास भल्ला आहेत...
सामो, तू कोणत्यातरी वेगळ्या
सामो, तू कोणत्यातरी वेगळ्या डिस्क्लोजरबद्दल बोलते आहेस. मी मायकल डग्लस, डेमी मूरच्या पिक्चरबद्दल बोलतेय.
सामो, Indecent Proposal बद्दल
सामो, Indecent Proposal बद्दल बोलतेय.
इनडिसेंट प्रपोजल व
इनडिसेंट प्रपोजल व डिस्क्लोजरमधे गल्लत होतेय का?
मग 'सौदा' बघ...
मग 'सौदा' बघ...
या दोन नावांवरच "सोल्ड"!
त्यात सुमित सेहगल अन् विकास भल्ला आहेत... >>>
अँकी, आणि डिस्क्लोजरऐवजी नवीन "इन्कार" ना?
https://en.wikipedia.org/wiki/Inkaar_(2013_film)
हा सुधीर मिश्राचा आहे. इस रात की सुबह नही, हजारो ख्वाईशे ऐसी वगैरेच्या पटकथा त्याने लिहील्या आहेत. त्यामुळे रिमेक असला तरी सौदा व प्यार का सायाचा दर्जा नाही
“ त्यात सुमित सेहगल अन् विकास
“ त्यात सुमित सेहगल अन् विकास भल्ला आहेत” - ह्यातला सुमित सेहगल पुसटसा आठवतोय तरी. विकास भल्ला गूगल केल्याशिवाय आठवणं अशक्य आहे.
अँकी, आणि डिस्क्लोजरऐवजी नवीन
अँकी, आणि डिस्क्लोजरऐवजी नवीन "इन्कार" ना?
>>
ऐतराज रे, अक्षय, करीना, प्रियांका वाला...
हो ऐतराज आठवला. पण इन्कारची
हो ऐतराज आठवला. पण इन्कारची कथाही तशीच दिसत आहे.
विकास भल्ला गूगल केल्याशिवाय
विकास भल्ला गूगल केल्याशिवाय आठवणं अशक्य आहे.
>>>>
विकास भल्ला मला चांगलाच आठवतो.. कारण त्याचे है धुवा है धुवा गाणे..
पॉप गाण्यांची तेव्हा वेगळीच क्रेझ होती. सगळेच आठवते
.हॅशटॅग नाईंटीज किड मेमरीज
विकासचे गाणे फेमस झालेलं. तो
विकासचे गाणं फेमस झालेलं. तो एका हिंदी सिरियलमध्येही होता. दुसरी सिरियल बघताना त्याचे प्रोमोज बघितले जायचे.
झोपा हो लोक्स.
होय गल्लत झाली. मी indecent
होय गल्लत झाली. मी indecent proposal बद्दल बोलले. डिसक्लोजर म्हणजे ज्यात ती त्याला ऑफिसमध्ये सेक्श्युअली हॅरॅस करते तो बहुतेक. पाहीलाय.
"बघीरा" - नेफि. कन्नड पिक्चर
"बघीरा" - नेफि. कन्नड पिक्चर आहे. नेफिवर त्याचा प्रिव्यू आहे त्यात हिंदी संवाद आहेत त्यामुळे मला वाटले हिंदीतही असेल, म्हणून लावला होता. पण तो पर्याय दिसला नाही.
"सिंघम"चीच सुपरहीरो आवृत्ती आहे. एण्ट्रीला तसेच संगीत, संस्कृत श्लोक वगैरे. गॉगल घालून पूर्णवेळ स्नायू फुगवून स्वॅग दाखवत करारी मुद्रेने फिरणारा हीरो. साउथ स्टाइल फाइट्स, अक्राळविक्राळ व्हिलन्स सगळा मालमसाला आहे. पण सिंघम मधे जो विनोद आहे तो यात फार नाही. उलट केजीएफ चा डार्क टच आहे. सुपरहीरो आवृत्ती अशासाठी की येथे "शहेनशाह" प्रमाणे हीरो नॉर्मल वागताना फार काही करत नाही. पण नंतर "बघीरा" होऊन येतो आणि वाईट लोकांना मारतो (याउलट सिंघम मधे तो नायक मूळ रोल मधेच लोकांना मारतो). इथे वेषपालट फार नाही. फक्त त्या ब्लॅक पँथर "बघीरा" चे चित्र असलेला रूमाल नाकाखाली लावून तो जातो व त्याला कोणीही ओळखत नाही. डिस्ने किंवा किमान रूडयार्ड किपलिंग चे कॅरेक्टर बिनधास्त तसेच वापरले आहे असे दिसते.
पिक्चर वेगवान आहे, त्यामुळे जर साउथ फायटिंग वाले पिक्चर चालत असतील तर हाही चालेल. कन्नड असले तरी थोडेफार समजणारे शब्द व सबटायटल्स यावर समजते काय चालू आहे. मी अर्ध्यापेक्षा थोडा जास्त पाहिला आहे - पिक्चरमधे "चॅप्टर्स" आहेत. त्यातले तीन की चार पाहिलेत (यांनी "चॅप्टर" नाव दिल्याने उलट शालेय पुस्तकांप्रमाणे वाचलेले नीट आठवत नसेल
) अगदी आवर्जून उरलेला पाहण्याइतकी उत्सुकता नाही. काहीच दुसरे मिळाले नाही तर बघेन. "रेको" वगैरे नक्कीच नाही.
पिक्चर कन्नड आहे पण हीरोचे नाव टायटलमधे झळकताना त्याला एक उपाधी देण्याची तेलुगू पद्धत इथेही वापरली आहे. हा म्हणे रोअरिंग स्टार आहे.
गॉगल घालून पूर्णवेळ स्नायू
गॉगल घालून पूर्णवेळ स्नायू फुगवून स्वॅग दाखवत करारी मुद्रेने फिरणारा हीरो
रूमाल नाकाखाली लावून तो जातो व त्याला कोणीही ओळखत नाही. >>>
हीरो नॉर्मल वागताना फार काही करत नाही.
यांनी "चॅप्टर" नाव दिल्याने उलट शालेय पुस्तकांप्रमाणे वाचलेले नीट आठवत नसेल
हा म्हणे रोअरिंग स्टार आहे.
>>>>>>
मला कुणीतरी 'देवारा' सजेस्ट केला आहे पण 'नो वे होजे.'
हो तो "देवारा" पण दिसतोय
श्री श्री श्रीच्या खाली कुणी यायलाच तयार नसतात. >>>
ज्यु एण्टीआर बहुतेक. >>>
ज्यु एण्टीआर बहुतेक. >>> अजिबात आवडत नाही तो. मंद चेहरा आहे. रागच येतो म्हटलं तरी चालेल.
अर्थात. ते स्वयंघोषित 'उच्च' आहेत, राकुं चे अनुयायी. /\ 
सगळे जागतिक दर्जाचे फायटर, हॅकर वगैरे टाइप दिसत आहेत प्रिव्यूज मधे.>>>
----------
'8 Mile' नेटफ्लिक्सवर बघितला. Eminem, Brittany Murphy
एमिनेम नावाचा प्रसिद्ध अमेरिकन रॅपर आहे, त्याचे हे 'गली बॉय' व्हर्जन आहे. प्रचंड फकफकाट आहे, गॅन्ग वॉर आहे. मारामारी आहे. रॅपच्या स्पर्धा (Battle Raps) आहेत. आईचा अब्युजिव्ह बॉयफ्रेंड आहे. ब्रिटनी मर्फी गर्लफ्रेंड आहे पण कमिटेड वाटली नाही. मी येताजाता बघितला. गली बॉय सरस आहे यापेक्षा, यात ड्रामा कमी शिवीगाळ-मारामारी जास्त आहे. एमिनेम चे रॅप ऐकले आहे रेडिओवर आणि आवडलेलेही आहे. काहीकाही खरेच छान आहेत पण पिक्चर विशेष वाटला नाही. त्याच्याच आयुष्यावर बेतलेली कथा आहे म्हणे.
पिक्चर कन्नड आहे पण हीरोचे
पिक्चर कन्नड आहे पण हीरोचे नाव टायटलमधे झळकताना त्याला एक उपाधी देण्याची तेलुगू पद्धत इथेही वापरली आहे
>>
कर्नाटक च्या सँडलवुड मधेही ही पद्धत आहे...
https://www.thehansindia.com/cinema/sandalwood/from-power-star-crazy-sta...
ओह! कन्नडमधेही आहे हे माहीत
ओह! कन्नडमधेही आहे हे माहीत नव्हते. बघीराच्या आधी केजीएफ व कांतारा सोडले तर इतर कानडी पिक्चर पाहिलेले नाहीत.
एमिनेम हा रॅपर आहे इतकेच माहीत आहे. मी त्याची गाणी ऐकलेली नाहीत. 8 Miles रिलीज झाला तेव्हा चर्चेत होता इतके लक्षात आहे.
ते स्वयंघोषित 'उच्च' आहेत, राकुं चे अनुयायी >>>
टोटली.
Pages