चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

The Buckingham Murders>>>>> ठिक आहे. करीना आवडते अशा टाईप्स सिनेमा मधे. रिअल वाटते. ब्रार इज सर्प्रायजिंग फॅक्टर. चांगलं काम केलंय त्याने. हल्ली मर्डर मिस्ट्रीमधे ही एक ट्रेंड आलीये बहुतेक. केस सॉल्व्ह झाली असं सगळ्यांना वाटत असताना मुख्य पोलिस किंवा डिटॅक्टिव्ह पात्राला तरी पण काहीतरी जुळत नाहीये टाईप फिलिंग येतं आणि एकदम युरेका मोमेंट येते. (आठवा काजोल इन दो पत्ती)

आशुचॅम्प, मला विजय ६९ बद्दल लिहितानाच वाटले होते की स्पोर्ट्स मूवी असा बनवला म्हणून तुम्ही इथे येऊन सेम असाच कल्ला करणार Proud

काल शेखर कपूरची डेब्यू फिल्म "मासूम" कितव्यांदातरी बघितला. यू ट्यूबवर आहे. पण काल सिनेमा संपल्यावर एक चर्चा बघितली. राजा सेन मुख्य अतिथी होता. फार उद्बोधक वाटली. त्याची लिंक https://www.youtube.com/watch?v=3_aPizn8ox8
Masoom | Has It Aged Well? ft. Raja Sen
मासूम लिंक https://www.youtube.com/watch?v=lSgO9D7XhOk
पण चर्चेत कुठेही "जब प्यार किसीसे होता है." दोनी सिनेमांचा गाभा एकच आहे. आता आज रात्री तो ही बघतो.

मासूम आवडतोच. वाचले नसेल तर एरीक सीगलचं 'मॅन, वुमन अँड चाईल्ड' वाचा. मासूम त्याच्यावरच आधारित आहे. एक परदेशी गोष्ट ऍडॉप्ट करत लोकप्रिय भारतीय चित्रपट कसा बनवता येऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आहे. शेखर कपूरची दिग्दर्शकीय समजही जाणवते.
बाय द वे शेखर कपूर हा देव आनंदचा भाचा (बहिणीचा मुलगा) हे अलीकडेच कुठे तरी वाचले. या कुटुंबाला सौन्दर्याचे दैवी वरदान आहे.

जब प्यार किसीसे होता है >> हा म्हणजे तोच ना, ज्यात माला सिन्हा दुडूदुडू धावत येते आणि इंजिन मधलं उकळत पाणी घागरीच्या घागरी भरून घेते?

मियाळगा पाहतांना, त्या बैलाच्या स्टोरीमध्ये तो जिंकत असतांना केवळ एका गावात जायला मना करतो असा ट्रॅक आला. मला वाटलं त्या बैलाचं मुळगाव ते असेल, त्याच्याही काही कटू आठवणी असतील, म्हणुन त्याने नकार दिला. अन् मग नंतर झालं गेलं विसरून जाऊन, भुतकाळ स्विकारून ते ही गाव जिंकलं अशी काही लिंक लावतात की काय अशी एक शंका आली होती.

हपा,माझी काही चूक झाली का?
तो नाही .ह्यात Salman Khan, Twinkle Khanna, Anupam Kher, Saeed Jaffrey, Aditya Narayan, Namrata Shirodkar
आहेत. Aditya Narayan आता केव्हढा मोठा झाला आहे. त्यात बाल कलाकार होता! Saeed Jaffrey दोनी पिक्चर मध्ये आहे!
मासूम ८३ चा आहे आणि हा ९८ चा आहे.
देवानंद वाला पिक्चर होता तो वायला.

माझेमन
चर्चेत 'मॅन, वुमन अँड चाईल्ड' ह्याचा उल्लेख झालाच. पण त्या कथेचा शेवट निराळा आहे. शेखर कपूरने शेवट असा का केला असेल? हा विषय होता. मी जास्त लिहित नाही. वर मी चर्चेची लिंक दिली आहे. जरूर पहा अशी जोरदार शिफारस करतोय.

माला सिन्हा दुडूदुडू धावत येते आणि इंजिन मधलं उकळत पाणी घागरीच्या घागरी भरून घेते
>>>
व्वा हर्पा! कणेकरांना पण त्या पिक्चरचं नाव लक्षात राहिलं नसेल.

जरूर पहा अशी जोरदार शिफारस करतोय.
>>>
चर्चा मी संध्याकाळी निवांत ऐकणार आहे केकू.

हर्पा! कणेकरांना पण त्या पिक्चरचं नाव लक्षात राहिलं नसेल. >> Oh सॉरी. तो पिक्चर - जब याद किसीकी आती है

घरकुल पाहिलेला नाही. पण 'कोन्यात झोपली सतार' हे गाणं शंभरदा ऐकलं असेल. गदिमांचे शब्द, फैयाजचा आवाज सगळंच फार आवडतं.

इथलं सगळ्यांचं वाचून शेवटी मैयाळगन पाहिला.
मला तर अजूनही तो उच्चार जमत नाहीये. अगदी स्पीड 0.5 x ठेवला तरी मला तो मिssयळडगा असच ऐकू आला.
गाणी सोडून बाकी सगळं आवडल. संथ आहे जरा.
बाकी संपूर्ण चित्रपटात खूप बारकावे आहेत, त्यामुळे तो जास्त जवळचा वाटला.
इथे ते सर्वांनी लिहिलं आहेच पण माझे दोन पैसे...
लग्नात त्या गुलाबपाणीच्या स्प्रे जवळ शर्ट काढून ते अंगावर घेणे.
घरी आलेल्या (खास) पाहुण्यांसाठी टिपिकल नवा टर्किश टॉवेल आणि नवा खट्ट मार्गो साबण ठेवणे.
हल्ली मी मडक्यातून बीअर प्यायला सुरुवात केली आहे.>>>> हे भारी आहे Lol

डोन्ट मूव्ह - आईचं काम अ‍ॅन हेशनं केलंय. मला खूप ओव्हरअ‍ॅक्टिंग वाटलं तिचं.
थीम चांगली आहे, पण पोलीस तपास अगदीच बालवाडी दाखवलाय. शेवट कळल्यावर प्रेक्षक अधलंमधलं विसरून जातील असं गृहित धरलंय, ते काही अंशी खरंही आहे, तरी पोलीस इतके ढीले नसतात.

अ‍ॅन हेश? हा कुठला डोन्ट मूव्ह?

मी इथेच वाचून नेट्फ्लिक्सवरचा पाहिला - ओके वाटला. व्हिलनचा मोटिव्ह काही नीटसा कळला नाही.

(स्पॉइलर वॉर्निंग)
तो सायकोपाथ आहे आणि हे त्याने आधीही केलेलं आहे असं दाखवलंय - पण केबिनमध्ये नेऊन करायचं काय काही समजलं नाही. नंतर मारतो म्हणावं तर आधीच्या खुनांच्या तपासाचा काही संदर्भ येत नाही.

व्हिलनचा मोटिव्ह काही नीटसा कळला नाही. >> निर्मात्याला सिनेमा काढायला द्यायचा सोडून इतर काही मोटीव्ह असावा असे वाटले नाही. "Thank You !" (हे फक्त सिनेमा बघितलेल्यांनाच कळेल) Wink

विजय ६९ पाहिला. (नाव वाचून कोण जोक मारतात रे Lol )

हलका फुलका पिक्चर आहे. कथा साधी सरळ एका ६९ वर्षाच्या माणसाला ट्रायथलॉन करायची आहे आणि तो ती करतो अशी आहे. त्यात मग त्याला येणाऱ्या अडचणी, लोकांचे विविध शंकायुक्त अडथळे. असे सगळे येते. मध्येच थोडे नाट्य टाकलेले आहे. खूप जीव नसला तरी अनुपम खेर, चंकी पांडे, आणि गुड्डी मारुती ने चांगले काम करून प्रेक्षणीय केला आहे. आर्चीज मध्ये जगहेड झालेला पण आहे यात. तो तिथेही चांगला वाटला होता इथेही चांगले काम करतो.

एकंदरीत सगळ्या ट्रू क्राईमच्या गोंधळातून सुटका हवी असेल तर नक्की पहा. खूप काही हाती लागणार नाही पण निराशाही होणार नाही. कधी कधी आपण वयस्क लोकांना हे तुम्हाला जमणार नाही, हे नका करू, ते नका करू असे जास्तीच बोलतो की काय असा विचार मात्र करायला लावतो.

अ‍ॅन हेश? हा कुठला डोन्ट मूव्ह? >>> हो हा दुसराच कोणतातरी आहे Happy

व्हिलनचा मोटिव्ह काही नीटसा कळला नाही. >>> मलाही कळला नाही.

हा मला हल्लीच फा ने रेको केला होता >>> अगदी रेको नाही पण बघणेबल आहे असे. पहिली १५ मिनिटे अगदी अंगावर येणारा इंटेन्स आहे - त्या लीड हिरॉइनची पार्श्वभूमी व मानसिक अवस्था. पण पुढचा भाग आउटडोअर सर्व्हायवल सारखा आहे तो बघणेबल आहे. मोटिव्ह कळत नाही वगैरे बरोबर. आणि शेवटही त्या पहिल्या भागाशी कनेक्ट केलेला नाही, त्यामुळे त्या पहिल्या भागाचा बाकीच्या कथेशी संबंध जुळत नाही. तो पुढचा सर्व्हायव्हलचा भाग स्वतंत्र वाटतो.

ओके Happy

>>> अगदी रेको नाही पण बघणेबल आहे असे
बघते आहेस ना अस्मिता? काहीही करकचून न लिहिताही ही अवस्था! Proud

असामी Proud

काहीही करकचून न लिहिताही ही अवस्था! >>> Lol मी त्याने लिहिलेल्या पोस्टीचा स्क्रीन शॉट घेतला होता. तो येथे टाकून पंचाईत करणार होते पण नेमके त्यातही 'बघणेबल'च लिहिले आहे. म्हणून गोड बोलावे लागले.‌ सगळी मजाच गेली. Proud

तुम्ही अजून नावे ठेवा मग दोन गट पडतील. मग मी फक्त एका गटात जाण्यासाठी बघेन.

असामी Happy

मी त्याने लिहिलेल्या पोस्टीचा स्क्रीन शॉट घेतला होता. तो येथे टाकून पंचाईत करणार होते पण नेमके त्यातही 'बघणेबल'च लिहिले आहे. >>> एक्झॅक्टली. मला तेच लक्षात होते. त्यामुळे "रेको" कोठून आला मी विचार करत होतो Happy त्याच पोस्ट मधे मी झ्विगाटो आणि द हेल्प ला रेको दिले होते. ते नक्कीच आहे.

म्हणून गोड बोलावे लागले.‌ सगळी मजाच गेली. >>> Lol

आणि मुळात ललिता-प्रीतिने उल्लेख केलेला डोण्ट मूव्ह वेगळाच आहे. अनलेस आता नेफि वगैरे इतके कस्टमाइज करू लागले आहेत की तुमच्या आधीच्या ब्राउज हिस्टरीवरून दाखवलेला पिक्चरही कस्टमाइज करतात Happy म्हणजे स्वाती "गुंडा" बघू लागली तरी त्यात चाचांचे गाणे दाखवतील Happy

Pages