तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शैलेंद्रच्या मर्यादा जाणवल्या त्या आशा भोसले सोबत "जयपूर से निकली गाडी" या गाण्यात. >> तेव्हा शैलेन्द्र बॉलिवूड मधुन बाहेर फेकलाच गेला होता. आरडी ने म्हणुन त्याला ह्या गाण्यासाठी घेतला . बॉबी आल्यावर मुकेशला म्हणे कोणि विचारले की शैलेन्द्रचा आवाज कसा वाटला? मुकेशचे उत्तर होते , मेरी तरह वो भी कभी कभी बेसुरा हो जाता है!

>>>>>सामो, आज परत सलोनासा सजन गुणगुणतेय.
क्या बात है!!
आय हॅव्ह अ स्पेश्शल प्लेस इन माय हार्ट फॉर इट. टोटली हेड ओव्हर हील्स!

>>>>>>येस बॉसचे मै कोई ऐसा गीत गाऊ मध्ये शाखा आणि जुही, दोघेही किती गोड दिसतात आणि अभिजितचा आवाज, वाह फक्त वाह
जूही व शाहरुख मला फारसे नाही आवडत पण ते गाणे, आवाज आहाहा!

जानेमन जानेमन
खूप आवडतं गाणं आहे. लूप वर ऐकतोय.
खेळकर, खट्याळ. बघायलाही आणि ऐकायलाही.
आशा भोसले फुल्ल फॉर्म मधे. येशुदास चा आवाज कसला लागलाय.
https://www.youtube.com/watch?v=yzzAmatCQ44

उनको भी हमसे मुहब्बत हो जरुरी तो नही ...

जिसको कहते है मुहोब्बत है खुदाकी नेमत
सबकी किस्मत मे ये दौलत हो जरुरी तो नही

ज्यानी कोणी एकतर्फी प्रेम केलेले आहे. त्यांनाच कळू शकेल. फार सुंदर गाणे आहे.
------------------------
या गाण्याच्याच जाहीरातीत 'सलोना सा सजन है ...' कोणी टाकलं - का टाकलं - फ्रीकी माईंड रीडर्स - कुफेहेपा? Happy

आज वोही गीतोकी रानी,
आज वोही है जाने गझल.

चलते चलते राहमे जिसका,
साथ हुआ था पल दो पल.

पंकज उधासने गायलंय. माझा नवराही ही गझल छान म्हणतो.

रमड नव्वदीमधल्या गाण्यांनंतर मेलडी हरवली हे तू म्हणावेस Wink

सोनूचे माझ सर्वात आवडते गाणे 'खामोशियां गुनगुनाने लगी' मेहबूबचे प्रेमात पडलेल्यांना जग कसे वाटते ह्याचे परफेक्ट वर्णन सोनूच्या मखमली आवाजात ऐकणे ही चैनीची परमावधी आहे.

"खामोशियां गुनगुनाने लगी, तनहाईयां मुस्कुराने लगी " - बीट धिस !
लताच्या कडव्यातल्या 'रात दिन मेरी आंखो मे कोई परछाई लहराने लगी' ह्यानंतर सोनू 'खामोशियां गुनगुनाने लगी' हे एव्हढे तरलपणे उचलतो कि जे बात. त्याचा 'मुस्कुराने लगी' मधला मुस्कुराने शब्दाचा उच्चार कसला कतिल आहे. तीच गोष्ट ' दिल का येह कारवां, यूं ही था रवा-दवां, मंझिल ना हमसफर , लेकीन ए मेहरबान' मधे रवा, हमसफर नि ए-मेहरबान उच्चरताना तो एक हलक्याशा पटकन जाणवणार पण नाहित अशा पॉजेस घेतो त्यामूळे जो फ्रेश तलमपणा उतरलाय कि बस्स . नि शेवटचा 'दुनिया संवर जाने लगी' वर आपणच प्रेमात पडतो Happy रेहमनचे हे दुसरे गाणे जिथे संगीत गायन नि शब्द ह्यात बॅक्स्टेप घेतेय (पहिले दिल से). लता ला अजून १०-१२ वर्षे आधी हे गाणे मिळाले असते तर ....... प्रेमात पडलेले दोघे जसे एकमेकांच्याच जगात हरवलेले असतात ती फिलिंग लता नि सोनूच्या एकमेकांना पूरक अशा गायकीने येते नि गुरफटून टाकते.

असामी फार उत्कट शब्दात व्यक्त केलय. आज ऐकते ते गाणे. इथे गाण्यांच्या एकोळी, चारओळी लिस्टस देण्यापेक्षा, त्या गाण्याची, आपल्यावर काय जादू होते ते लिहीलेले, वाचायला फार आवडते.

रमड नव्वदीमधल्या गाण्यांनंतर मेलडी हरवली हे तू म्हणावेस >>> मग अजून कोण म्हणणार? Proud त्यानंतरची काही काहीच गाणी चांगली होती. सगळी नाही.

मला अस सरधोपट कॅटेगरायझेशन नाही करता येत. नव्वदीमधे पण किती तरी ऑर्केस्ट्रा असलेली गाणी होती. सगळी सोड तर पन्नास टक्क्याहून अधिक मेलोडीयस होती असे म्हणायला माझी हिम्मत होत नाही. असो.

मेलोडीयस होती बर्‍यापैकी. आणि अगदी पट्टी लावून ९०ज असं नाही - २०१० पर्यंत होती असं म्हणूया. त्यानंतर मात्र मला मेलडी वगैरे अभावानेच सापडते आहे.
मला इतकंच माहितीये की ९०ज ची गाणी ( आणि थोडी पुढची ) आजही मी तासंतास ऐकू शकते. तेच अलिकडची गाणी मात्र अजिबात ऐकवत नाहीत.

मला इतकंच माहितीये की ९०ज ची गाणी ( आणि थोडी पुढची ) आजही मी तासंतास ऐकू शकते. तेच अलिकडची गाणी मात्र अजिबात ऐकवत नाहीत. >> मेलडीपेक्षा आपल्या वयाचा भाग ग त्यात Wink हीच वाक्ये मी वडलांकडून ऐकली आहेत जेंव्हा मी नव्वदीतल्या गाण्यांवर ग्रूव्ह करत असे Wink साठ सत्तर मधली नि नव्व्वदी मधली बघितली तर नव्वदीमधली गोंगाट वाटायला लागतात.

आपल्या वयाचा भाग ग त्यात >>> Wink
आता नाही आवडत मला अरिजित काळातली गाणी त्याला काय करायचं? Proud तरी नवीन आलेल्यातली ( अरिजितची नसलेली ) गाणी आवडत राहतात अधूनमधून. अगदी रिपीट मोडला सुद्धा. तेवढंच त्यातल्या त्यात! Happy काही काही अरिजितने गायलेली गाणी मेलोडीयस वाटतात पण सिंगर दुसरा हवा होता असं वाटत राहतं आणि मग ती गाणी नाही ऐकली जात.

काही काही अरिजितने गायलेली गाणी मेलोडीयस वाटतात पण सिंगर दुसरा हवा होता असं वाटत राहतं >> अगदी अगदी !

त्या गेरुवा ची काय माती केली आहे त्याने. सोनू किंवा केके ने अगदी सोने केले असते त्या गाण्याचे.

असम्याला खामोशिया करता +१००
कसला आवाज लागला आहे सोनूचा त्यात. रेहमान आणि त्याची बासरी कल्ला करते.

माझा नव्वदीच्या गाण्याचा धागा अजून बाकी आहे. येत्या थंडीच्या महिन्यात काढेन. तो काढल्याशिवाय त्यात किती मेलोडीयस पसारा होता हे समजणार नाही. विशेष म्हणजे ८० च्या दशकातील बंडल गाण्यांच्या पार्श्वभूमीवर हे अधिक जाणवते.

नव्वदीची मेलोडी नंतर हरवली हे मी जिथे तिथे म्हणत असतो कारण नाईटीज किड असल्याने तो काळ हृदयाच्या तितकाच जवळ आहे. अर्थात २०००-२०१० या दशकात होती काही गाणी तशी. पण प्रमाण कमी होत गेले. जे साहजिकच आहे. बदल सावकाशच होणार.. आणि त्यानंतर तर एकेकाळी शाहरूखचा पिक्चर म्हटला की याची गाणी छान असणार हा जो विश्वास होता तो सुद्धा हरवला... Happy

काही काही अरिजितने गायलेली गाणी मेलोडीयस वाटतात >> मान्य . गम्मत म्हणजे हे फक्त अरिजित बद्दलच खरे थोडे आहे ? अगदी नव्वईमधल्या गाण्यांबद्दल पण हे म्हणून शकतो. Happy

असो , आता रिपीट मोडवर हे हेलारो मधले भूमी त्रिवेदीचे ' वाग्यो रे ढोल' ऐक आता. धनि सुरूवातीचा ढोल एंजॉय कर.

सोनूचे माझ सर्वात आवडते गाणे 'खामोशियां गुनगुनाने लगी' मेहबूबचे प्रेमात पडलेल्यांना जग कसे वाटते ह्याचे परफेक्ट वर्णन सोनूच्या मखमली आवाजात ऐकणे ही चैनीची परमावधी आहे. >>> असामी, मस्त पोस्ट.

९० च्या दशकातील गाणी म्हणजे त्या आधी आलेल्या पायरसीत सापडलेल्या दिशाहीन चित्रपटसृष्टीतील शब्बीर, मुन्ना अजीज यांच्या आवाजातल्या कै च्या कै गाण्यांनंतर टाकलेली कात होती. हा बदल तेव्हां कानाला चांगला वाटला होता. गोल्डन एरा इतकी आशयघन नसली तरी मेलडी पुन्हा आली याचंच कौतुक होतं.

आताच्या काळात खूप प्रयोग होत आहेत, ते कानाला लगेच चांगले वाटतील असं नाही. कानावर पडून पडून एखादं गाणं काही वर्षांनी आवडू लागतं. ताबडतोब लक्षात राहतील अशी गाणी कमी आहेत.
मेरे रश्के कमर्,मोह मोह के धागे, गेरूआं, कौन तुझे, जानू ना जानू ना अशी काही उदाहरणे. यातली बहुतेक गाणी फिमेल सिंगर्स किंवा राहत फतेह अली खान ची आहेत.

Pages