तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच माझी आणि माझ्या एका ऑर्कुट मैत्रिणीची पाकिस्तानी संगीतावर नूरजहा, रेशमा, नुसरत फतेहअली खान पासून राहत आणि आतिफपर्यंत चर्चा झाली.
निमित्त असे झाले होते की तिने फेसबूकवर पाकिस्तानी गायकांचे आणि कोक स्टुडिओचे कौतुक केले आणि कोणीतरी तुम्हाला आपल्या अभंगाचे कौतुक नाही म्हणत तलवार घेऊन तिच्या मागे आले. ते बघून मी मध्ये उडी मारली होती. आणि मग त्यानंतर आमच्याच व्हाट्सअपवर गप्पा सुरू झाल्या. त्यांनतर काल बरीच नवी जुनी पाकिस्तानी गायकांची गाणी ऐकूनच मी झोपलो.

>>निमित्त असे झाले होते की तिने फेसबूकवर पाकिस्तानी गायकांचे आणि कोक स्टुडिओचे कौतुक केले आणि कोणीतरी तुम्हाला आपल्या अभंगाचे कौतुक नाही म्हणत तलवार घेऊन तिच्या मागे आले>>
Happy

हे चोहीकडे बोकाळलेले ऑनलाईन योद्धे ही आजच्या काळाची उपज आहे. त्यांचं काही होऊ शकत नाही. अशावेळी आपण आपलं नुसरत फतेह अली खान नी गायलेलं मीराबाईंचं भजन ऐकावं. (झोपण्यापूर्वी बरं असतं) :
"सासों की माला पे सिमरूं मैं, पी का नाम"
https://youtu.be/d7AqPH-LgmI?feature=shared

हे माझं फार लाडकं रोमॅण्टिक गोड गाणं आहे. अनेकांनी गायलेले आहे. पण ग्लोरिआ गेनॉरचे व्हर्शन सर्वाधिक आवडते.
ग्लोरिआ गेनॉरचे व्हर्शन

https://youtu.be/_XBVWlI8TsQ?si=IL_LHL0bzUUO3N-L

कहाणी सूनो.. हे सध्याचे आवडणारे आणि भिडणारे गाणे.

गेल्या वर्षी एक प्रेमभंग झाला होता. तेव्हा बरेच दुखदर्द भरे गाणी ऐकायचो.. नंतर त्यातून बाहेर पडल्यावर पुन्हा फिरून ती गाणी ऐकली नाहीत. पण नुकतेच हे गाणे ऐकले आणि आवडले. म्हणून मुद्दाम जुना प्रेमभंग आठवून हे गाणे ऐकतोय जेणेकरून आणखी मजा येईल Proud

लिओ ट्विन्स म्हणून पाकिस्तानी म्युझिशिअन आहेत.एक भाऊ स्ट्रिंग्ज वाजवतो आणि एक गिटार + इतर काही इंस्ट्रुमेंट्स वाजवतो. त्यांचे अभी मुझ में कहीं चे व्हायलिन व गिटार कव्हर .
बरेचदा व्हायलिनिस्ट गाण्याचे म्युझिक वाजवतात किंवा शब्द. इथे शब्द आणि इंटरल्यूड दोन्ही वाजवले आहेत. हे गाणे गळ्यातून उतरायलाच कठीण असताना व्हायोलिनवर वाजवणे, वरून त्याने शब्दांवर ऍडिशनल हरकती घेतल्या आहेत. अफाट आहे.

सामो मस्तच आहे ते, एव्हरग्रीन. शशी कपूर काय दिसतो त्यात.

आज कुठूनतरी सुर ऐकू आले आणि तेच डोक्यात बसलंय गाणं 'आताच अमृताची बरसून रात्र गेली' .

होय अन्जू शशी कपूर आणि राखी आहाहा तारुण्याची नव्हाळी आहे त्या गाण्यात. मला एक लेखच लिहावासा वाटतो फक्त त्या गाण्याला डेडिकेट केलेला. पण सुचतच नाही.

>>>आताच अमृताची बरसून रात्र गेली
आहाहा ऐकते!!!

मस्त चॉइस आहे तुमचा.

पेहला नशा पेहला खुमार
जो जिता वोही सिकंदर उदित नारायण साधना सरगम
फरहा खान ची पेहली कोरिओग्राफी!
सरोज खानला ऐनवेळी मुंबईला जावे लागले म्हणून फराला चान्स मिळाला. आहा काय composition आहे!
https://www.youtube.com/watch?v=SBfPs-PMGTA

होय केकू एव्व्हर एव्व्हर ग्रीन आहे ते गाणे.

केकू असच एजुन एक एव्हरग्रीन गाणं ऐका - साथिया ये तूने क्या किया .... बेलिया ये तूने क्या किया - https://www.youtube.com/watch?v=MZKZsYk2jJg

"ये जो हल्का हल्का स सूरुर है" नुसरत जी. काय शब्द, तोबा..

ये मेरे जूनून का है मोजिझा,
जहा अपने सर को झुका लिया, वहा मैने काबा बना दिया|

मला एक लेखच लिहावासा वाटतो फक्त त्या गाण्याला डेडिकेट केलेला. पण सुचतच नाही. >>> सुचेल नक्की.

मस्त चॉइस आहे तुमचा. >>> थँक यु. आहो जाहो नको प्लीज.

गाणी ऐकणं हल्ली फार कमी झालंय. कोविड काळात स्काईपवर सासरचे बरेच जण एकत्र येऊन दर शनिवारी गाण्याचा प्रोग्रॅम करायचे. सासरचे बरेच जण गात्या गळ्याचे आहेत, माझा नवराही चांगला गातो. मी कानसेन आहे. तेव्हा वेगवेगळ्या थीमस असायच्या आणि त्यावर गाणी असायची. दीड वर्ष झालं काही ना काही कारणाने ते एकत्र येणं बंद पडले. तीन वर्ष छान पार पडले. त्यामुळे असंख्य जुनी नवी गाणी ऐकली जायची. सत्तरीच्या पुढची माझी मोठी नणंद ते चौथीत शिकणारा माझा एक भाचा, कॉलेजात जाणारा नातू अशी रेंज होती.

झीलोंके होठोंपर मेघोंका राझ है
फूलोंके सीनेमे ठंडी ठंडी आग है!!

माझेही हेच रीपीटवरती. अन्जू तुझे आभार Happy
-------------
>>> तीन वर्ष छान पार पडले. त्यामुळे असंख्य जुनी नवी गाणी ऐकली जायची.
आहाहा! मस्तच गं.

सामो, तू लेख लिहून बघ या गाण्यावर. तुला रोमॅन्स छान लिहिता येतो. हे गाणे माझेही आवडते. Happy

तीन वर्ष छान पार पडले. त्यामुळे असंख्य जुनी नवी गाणी ऐकली जायची. >>> छान आठवण. Happy

अस्मिता नाही सुचत गं प्लीज प्लीज तूच लिही ना. मी खूपदा प्रयत्न केलेला आहे. Happy नाही जमत. जस्टिसच होत नाही.

Happy तू हे बीज मनामधे कुठेतरी पेरून ठेव, हळूहळू ते रुंजी घालत मोठे झाड होईल, तेव्हा त्याचे चित्र रंगव. बघ जमते का. नक्की जमेल असे मला वाटते.

https://youtu.be/qxO1MN67Vtg?si=tUgfZX-I7OWKOG_a

हे रुदाली सिनेमातलं .. फिमेल व्हर्जनही ऐकतेय पण हे जास्त . सिनेमा पाहायचा प्रयत्न केला , कदाचित नंतर कधीतरी आवडेल . ठाकूर हे कॅरॅक्टर नुसतं गाणं पाहिलं असता डिसेंट आणि अट्रॅक्टिव वाटलं होतं पण सिनेमातले दोन डायलॉग ऐकल्यावर गावठी , इम्मॉरलं वाटलं , लव्हस्टोरी गाण्यात जेवढी ग्रेट वाटते तेवढी सिनेमात वाटत नाही , फारच उथळ वाटते .

फक्त गाणं स्वतंत्र असं पाहिलं , ऐकलं तर आर्ट पीस वाटतो ...

कभी नाम बातों में आया जो मेरा
तो बेचैन हो हो के दिल थाम लोगे
तो बेचैन हो हो के दिल थाम लोगे
निगाहों में छायेगा ग़म का अँधेरा
किसी ने जो पूछा सबब आंसुओं का
बताना भी चाहो बता न सकोगे
मुझे तुम नज़र से गिरा तो रहे हो
मुझे तुम कभी भी भुला न सकोगे

खरंच तिला जेव्हा आठवण येत असेल, ती कसे मॅनेज करत असेल?
फारशी काही स्टोरी नसली तरी ह्या ओळी ऐकून माझाच कंठ दाटतो...

Pages