तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोनूचा आवाज एज होतोय का >>> होप नॉट! मला वाटतं त्याने कार्तिक आर्यन ला सूट होईल असा आवाज काढला आहे. त्यामुळे ती जाड पसरट variations होत असतील.

रमड >>> परत नीट ऐकल्यावर एवढाही पसरट वाटत नाही. पण वेगळा आहे. कदाचित गाण्याच्या मूडसाठी वेगळा आवाज लावलाय का? शेवटची सरगम मस्तच आहे. हे गाणं ऑटोट्युन सिंगर्ससाठी नाही हे नक्की.

हे गाणं ऑटोट्युन सिंगर्ससाठी नाही हे नक्की >>> एक्झॅक्टली! ओरिजिनल आमी जे तोमार पेक्षा या गाण्याची ट्रीटमेंट टोटली वेगळी आहे आणि ती सोनूने समर्थपणे पेलली आहे. भुभू२ मधलं आमी जे तोमार मला नव्हतं आवडलं. अरिजित कमी पडला असंच वाटलं. या प्रकारच्या गाण्याला तयार गळा पाहिजे. सोनूने अगदीच सोनं केलंय. Happy

सोनू निगम नाईंटीज किड साठी गायकीचा सचिन तेंडुलकर आणि शाहरूख खान आहे. त्याची चित्रपटातील गाणी सोडा, तो जे लाईव्ह गातो ती खरी मेजवानी असते.

तो जे लाईव्ह गातो ती खरी मेजवानी असते >>> लाईव्ह ऑर नॉट, सोनूची गाणी मेजवानीच असते Happy पण कॉन्सर्ट मधे तो भारून टाकतो फुल्लॉन हे खरंच.

Happy सोनूवरच्या सगळ्या पोस्टी आवडल्या. मीही सध्या (अग्निपथ) 'अभि मुझमें कहीं बाकी थोडीसी है जिंदगी' आणि (ओम शांती ओम) 'मै अगर कहूं तुमसा हंसी कायनातमें नहीं है कहीं' ही गाणी ऐकतेय. ताकदीचा आणि व्हर्साटाईल गायक आहे. भावनांचे रंग झरझर बदलू शकतो. अरिजित फार फ्लॅट वाटतो, हे गाणे ऐकेन आता. अरिजितने भूलभुलैया २ मधे गायलेले 'मेरे ढोलना सुन' (जे ओरिजनल श्रेयाचे होते.) व त्या गाण्यावर कार्तिकचा नाच हा 'भंगार योगायोगाचा' उत्कृष्ट नमुना आहे. Happy

Happy बायदवे, सोनू आवडणाऱ्या मुलामुलींनो त्याची बियर बायसेप्सवरील मुलाखत बघा. तो इतका प्रतिभावान आहे कायम पूर्ण तयारीने कुठलेही गाणे अगदी सहजतेने गाऊ शकतो. गाणं त्याच्यासाठी श्वास घेण्याइतके सहज आणि नैसर्गिक आहे.

त्या गाण्यावर कार्तिकचा नाच हा 'भंगार योगायोगाचा' उत्कृष्ट नमुना आहे >>> वेल सेड, अस्मिता! Happy

अभि मुझमें कहीं बाकी थोडीसी है जिंदगी >>> हे ही माझं प्रचंड फेवरिट आहे. पुष्कळदा हे पण रिपीटवर चालू असतं.

अभि मुझमें कहीं बाकी थोडीसी है जिंदगी >>> हे ही माझं प्रचंड फेवरिट आहे
>>>> माझं पण. ब्रदर्समधलं ‘सपना जहां दस्तक न दे‘ हेही

अरिजीत सुद्धा उत्तम गायक आहे. त्याची गाणी मात्र एकसूरी वाटतात.
काही काही गाणी ही ठराविक काळानंतर कानावर पडून पडून आवडू लागतात. नवीन गायकांमधे राहत फतेह अली खानची गाणी उठून दिसतात.
बाकिच्या गायकातला फरक मला आधी समजायचाच नाही. आत्ता मुलीमुळे ओळख झाली.

आयत ऐकले तेव्हां ते अरिजीत सिंगने गायलेय यावर विश्वासच बसला नाही. लाल इश्क, फिर ले आया दिल अशी गाणी त्याला जास्त मिळत नाहीत का ?

एव्हढं वाचलं असेल तर बोनस म्हणून माझी आवडती हिरॉईन पहा.
https://www.youtube.com/watch?v=r1w9xONdD10&list=RDMM&start_radio=1&rv=s...

अस्मिता तू ऐकत असलेली दोन्ही गाणी माझ्यासाठी स्पेशल आहेत.

अभि मुझमें कहीं बाकी थोडीसी है जिंदगी
>>>
रात्री झोपताना आम्ही मूडनुसार काही गाणी ऐकून झोपतो. माझ्यात आणि लेकीत कुठले गाणे यावरून बरेचदा वाद होतो. या गाण्याबाबत मात्र बिलकुल वाद होत नाही. नवी जुनी गाणी बदलत राहतात, पण हे कायम असल्याने सर्वाधिक वेळा हेच ऐकले गेले आहे.
अरे हो, शेवटचे परवा रात्री म्हणजे साधारण तीस तासापूर्वी ऐकले गेले आहे Happy

ओम शांती ओम) 'मै अगर कहूं तुमसा हंसी कायनातमें नहीं है कहीं' ही गाणी ऐकतेय.
>>>>>

या गाण्याच्या सुरुवातीला वाजणारी रिंगटोन माझ्या पहिल्या मोबाईलची जवळपास दोनेक वर्षे न बदललेली रिंगटोन होती. अवीट गाणे आहे Happy

जसे वरचे गाणे लेकीसोबत फेवरेट होते तसे हे आईसोबत फेवरेट होते. ती नेहमी म्हणायची, की हे गाणे तिला जुन्या गाण्यांसारखे वाटते.

सोनूवरच्या सगळ्या पोस्टी आवडल्या + १

मीही सध्या (अग्निपथ) 'अभि मुझमें कहीं बाकी थोडीसी है जिंदगी' आणि (ओम शांती ओम) 'मै अगर कहूं तुमसा हंसी कायनातमें नहीं है कहीं' ही गाणी ऐकतेय
यात "किसका है ये तुमको इंतझार मैं हू ना" हे ऍड करा. गाण्याचे शब्द, सोबतीला सोनू आणि बोनस म्हणून श्रेया.
रिपीट मोड सध्या "बदमाश दिल तो ठग है बडा" सुरु आहे. (यात श्रेया सोबत "अभि मुझमें कहीं" वाले अजय-अतुल बोनस म्हणून)

बदमाश दिल तो ठग है बडा" सुरु आहे.
>>> मी आज जिममधे ऐकले. Happy

ऋ, तू लिहिलेले वाचून मलाही जाणवले की ते आहे खरे जुन्या गाण्यासारखे मेलोडियस. कथेतील काळ जुना असल्याने गाण्याची चाल आणि संगीत असेल तसे. निरीक्षण चपखल आहे. Happy

'लाल इश्क' मलाही आवडते आचार्य पण हे 'आमी जे तोमार' रमड व मी दोघींनीही लिहिले तसेच बंडल आहे.

'अभी मुझमें कहीं' इतक्या जणांना आवडते बघून मस्त वाटले. आहेच ते छान. Happy

माझ्यात आणि लेकीत कुठले गाणे यावरून बरेचदा वाद होतो. या गाण्याबाबत मात्र बिलकुल वाद होत नाही.
>>>> परीताईची टेस्ट चांगली आहे ऋ. Happy कान तयार होतोय.

आमी जे तोमार' रमड व मी दोघींनीही लिहिले तसेच बंडल आहे >>> प्रश्नच नाही. आता आयत पुन्हा ऐकले. साऊंड ब्युटीफिकेशनमुळे छान वाटते. पण अगदी इंडीयन आयडॉल मधे जे शास्त्रीय शिकलेले स्पर्धक येतात, त्यांच्या पैकी एखाद्याला गायला सांगितले असते तर यापेक्षा चांगले वाटले असते असे आता वाटले. पहिल्यांदा अरिजित आणि आयत या धक्क्यामुळे ते आवडले होते.

अभय जोधपुरकरची गाणी आवडतात. काही व्हेरिएशन्स थोडी ज्यादा वाटतात कधी कधी.
पूर्वी रात्रीची गाणी लागायची विविध भारती वर. जयमाला, भूले बिसरे गीत, चित्रलोक, छायागीत , हवामहल आणि आणखी बेला के फूल मधे.
तसं वाटतं.

धन्यवाद आचार्य, रमड. रमड ऐक नक्की Happy
रमड, अभय जोधपुरकर यांचे - अभी ना जाओ छोडकर ऐकच. त्यात त्यांनी घेतलेला 'नही-नही-नही-नही' हा शेवटाचा आलाप कातिल आहे गं. म्हणजे
असे आर्त जर कोणी जाऊ नकोस म्हणत असेल तर कोणत्या प्रेयसीचे पाय उचलतील? निव्वळ व्याकुळ , आग्रही आलाप आहे. टोटल फिदा!!

इथे आहे बघ - https://www.youtube.com/watch?v=e3VHvtU1Azg

आलाप नाही , तान म्हणतात बहुतेक.

नही-नही-नही-नही' हा शेवटाचा आलाप कातिल आहे >>> टोटली! कसला गोड गळा आहे या माणसाचा!! कमालीची फिरत आहे आवाजाला. ही अशी माणसं हल्ली जास्त गात नाहीत का? अर्थात हल्ली अश्या आवाजांची गरज असलेली गाणी तरी कुठे बनतात म्हणा?

ये मोह मोह के धागे,
'तेरी उंगलीयोसे जा उलझे

हे गाणे जितक्या वेळेस ऐकतो त्या प्रत्येक वेळी मनात विचार येतो, अनु मलिक सारख्या चोर माणसाला हे संगीत/धून सुचले कसे असेल. पण सोबतीलाच वरुण ग्रोव्हरचे शब्द आणि मोनाली ठाकूरच्या आवाजाची जादू या गाण्याला वेगळ्याच उंचीवर नेतात.

अभी मुझ में, मोह मोह के धागे, माझे ही फेव्ह्रीट!
सपना जहां पण. कसलं तलम रेश्मी गायलय सोनू ने Happy
अजून १ मला खूप खूप आवडतं ते म्हणजे- ओ साथी रे, दिन डुबे ना. किती गोड गायलय, मेल फीमेल दोघांनीही. ते कडवं- हरी हरी कायी पे पांव पडा तो फिसलेगा.. तेरी मेरी अंगनी मंगनी मस्त मस्तं.

किती छान प्रेम दाखवलं दोघांचं आणि शेवटाला शॉकींग. Sad

ओ साथी रे, दिन डुबे ना...
आणि नैनो की मत सूनियो.. नैना ठग लेंगे..
ही दोन्ही गाणी समाधीत जाऊन ऐकायची आहेत. जेव्हा ती लावता येईल असे वाटते तेव्हाच ऐकतो.

>>>>नैनो की मत सूनियो.. नैना ठग लेंगे..
छान आहे हे.
दुसरे ऐकले नाहीये.

>>>ये मोह मोह के धागे,
'तेरी उंगलीयोसे जा उलझे.

अन्जू, या गाण्याने तर धुंदीच चढते. एक ड्रीमी स्टेट येते.

>>>>>>> ही अशी माणसं हल्ली जास्त गात नाहीत का? अर्थात हल्ली अश्या आवाजांची गरज असलेली गाणी तरी कुठे बनतात म्हणा?
रमड अजुन एक ऐक अभयचेच 'इशारो इशारोंमे दिल लेनेवाले...'
अहाहा!!!
https://www.youtube.com/watch?v=YeV4QrHlgCg

"मुहब्बत करते है जो, मुहब्बत जताते नही
धडकने अपने दिलकी कभी किसिको सुनाते नही"

क्या बात है!

Pages