तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येशुदास ची बरीच गाणी आवडतात.
माना हो तुम हे गाणं लिटरली लुप मधे ऐकलेलं आहे कोणे एके काळी.

चांद जैसे मुखडे पे हे इतक्यात नाही ऐकले. आता प्ले लिस्ट बनवावी लागेल.
कुणी तरी चांगला एमपीथ्री प्लेअर सजेस्ट कराल का प्लीज ?

जब दीप जले आणि तू जो मेरे सूर मे ही दोन्ही गाणी खूपदा ऐकली आहेत.
अ‍ॅन्युअल ला म्हटली होती.

आचार्य या ३ गाण्यांनी माझा प्रत्येक दिवस सुरु होतो. भूपाळी आहे ही माझी Happy
अभी ना जाओ छोडकर

इशारो इशारोंमे दिल लेनेवाले

अजी रुठकर अब कहां जाईयेगा ..
ही ओळ तर वेडी करते मला -
नज़र की ज़ुबाँ को समझ जाइयेगा
समझ कर ज़रा गौर फ़रमाइयेगा

सामो Happy

शैलेंद्र सुद्धा काही गाण्यात खूप आवडतो.
कई दिन से मुझे (चक्क महागुरू आहेत यात)
बडे रीळवाला मधलं एक आहे ते ऋषी कपूर ट्रेनच्या टपावर बसून म्हणत असतो.

शैलेंद्रच्या मर्यादा जाणवल्या त्या आशा भोसले सोबत "जयपूर से निकली गाडी" या गाण्यात.
यात तिने शैलेंद्रला गरागरा फिरवून भिरकावून दिलेले आहे.

'नैना ठग लेंगे' चे राहुल देशपांडे, विशाल भारद्वाज लाईव्ह व्हर्जन पण ऐका.

@र आ >>> तुमच्यासाठी येसूदासचे एक नॉन फिल्मी गाणे. दूरदर्शनवर ऐकले असेल पूर्वी.
त्याच्या मुलाचा आवाजही सेम वाटतो. ब्लू कोलम्बसे यांनी शेअर केलेले विजय येसूदासचे मल्याळी गाणे. त्याला हिंदीत ऐकायला आवडेल.

हेमंतकुमार + भूपेंद्रसिंग + रविंद्र साठ्ये + शैलेंद्र अशी वेगळ्या आवाजाच्या गायकांची एक सीडी बनवलेली होती माझ्याकडे.
गाणी भरून मिळायची त्या जमान्यातली. अजून तो क्रम आठवतो.

@सामो
१. https://www.youtube.com/watch?v=gyHOm9EE6Ck
२. https://www.youtube.com/watch?v=SNpGLlU4kpY

माझ्याकडे तलतच्या गाण्यांच्या ३ सीडीज (पार्टस) होते. आहाहा तलतचा मखमली व सुसंस्कॄत (ही उपमा सन्जोपराव यांची) आवाज. टोटल मेस्मरायझिंग.

आर्या आंबेकर दिसायला गोड आहेच पण हे गाणे फार छान गायले आहे - https://www.youtube.com/watch?v=67-z9COlhVc&list=RDeSKvYwr7D54&index=3

कुटल्या तरी जन्मात मायबोलीवर लिंक दिली होती येशुदासच्या त्या गाण्याची.

हा कार्यक्रम मुंबई दूरदर्शनवर झाला होता. (अखियों के झरोखों से ?)
एका गाण्यात हेमलता खूप जास्त लाजत होती आणि येशुदास कडे चोरून बघत होती.
आमच्याकडे टिव्ही असल्याने आजूबाजूच्या बायाबापड्या यायच्या बघायला.
त्यांच्या गप्पा ऐकून त्या लहान वयातच लव्ह एज्युकेशन झाले.

>>>>>>कुटल्या तरी जन्मात
हाहाहा
>>>>.त्यांच्या गप्पा ऐकून त्या लहान वयातच लव्ह एज्युकेशन झाले.
Happy हाहाहा
येसुदास व हेमलताचे हे गाणे फार आवडते - तिस्ता नदी सी तू चंचला ...

येशुदासच्या आवाजाचं वर्णन करायला सांगितलं तर कसं कराल ?

मला त्याच्या आवाजात बूमचा इफेक्ट जाणवतो. तीनही ऑक्टेनमधे लीलया फिरणारा पण मिठ्ठास टिकवणारा, खोली असणारा पण भारदस्त. रफीच्या वाटेने जात जास्त दमदार आवाज वाटतो. सोनू त्याच्या पुढे फिक्का वाटला. तरी या कार्यक्रमात ६५ च्या पुढे वय असावं.

ऐ काश के हम होश मे अब आने न पाये ...
>>>>>>>

हा पिक्चर आला तेव्हा दिवाणा दिल दीवाना माझे फेवरेट झालेले.. अंदाज दिखलाती सौ सौ तरह के जलवे लुटाती हुई.. ही त्यातील माझी फेवरेट लाईन

कालांतराने ऐ काश के हम भिनू लागले..

पण नंतर पुन्हा कधीतरी वयाच्या एका टप्प्यावर वो तो है अलबेला गाणे जणू माझ्यासाठीच लिहिले आहे असे वाटू लागले (हे असे बऱ्याच जणांना वाटत असेल) आणि ते माझ्या ऑल टाईम फेव लिस्ट मध्ये जाऊन बसले. पण मी ते कधीच ऐकत नाही. बस्स मूड आला की वरचेवर गुणगुणतो Happy

अनुव जैन - हुस्न
>>>
हे माझ्या सुद्धा प्ले लिस्ट मध्ये असते हल्ली. असली गाणी मुलगी आणि तिच्या मैत्रिणीमुळे समजतात. छान आहे. पण मला व्हिडिओ नाही आवडत त्याचा फार.. उगाच sad फिलिंग येते. ते टाळून रोमँटिक फिलिंगने ऐकायला छान वाटते.

दीवाना दिल दीवाना मला जास्त आवडते. स्पेशली त्यातल्या या ओळी -
टूटा सितारा तो माँगा था रबसे तुझको ही जानेवफा
जो टूट जाये तारे तमाम, माँगूँ यहीं एक दुआ

दीवाना दिल दीवाना हे गाणे असे आहे की पहिल्यांदा ऐकताच आवडावे. मेलोडीयस गाण्यांची हीच खासियत असते.
त्यातले एना मेरे प्यार को गाणे सुद्धा आवडीचे. ते सुद्धा मी ऐकत नाही पण आजही गुणगुणतो. नव्वदीतली गाणी मस्तच होती. मग ती मेलोडी हरवलीच..

ही गाणी आणि शाहरूख यांच्या उल्लेखामुळे मी आता मे कोई ऐसा गीत गाऊ.. के आरझू जगाऊ.. अगर तुम कहो.. लावले आहे Happy

आणि गंमत म्हणजे सुरू व्हायच्या आधीच मुलीने पूर्ण बोलून दाखवले.. तिला कसे माहीत विचारले तर तिने इन्स्टावर ऐकले म्हणाली आणि पाहिले कडवे पूर्ण पाठ होते तिचे.. चाल छान आणि शब्द लयीत असली की सहज पाठ होतात गाणी.. मला मुखडा अंतरा सर्व पाठ आहे त्या गाण्याचा Happy

व्हिडिओ नाही आवडत त्याचा फार.. उगाच sad फिलिंग येते. >>>>>>>>>> बरं झालं मग अजून मी विडीओ नाही बघितलाय या गाण्याचा.. सॅड असलं तरी आवाजात वाटत नाही तसं.
आवडतं मला ऐकायला.

नव्वदीतली गाणी मस्तच होती. मग ती मेलोडी हरवलीच>>>> +++१११११
कालच ९०ज ची गाणी रँडमली अलेक्सा वर वाजत होती. अक्षरशः १-२ तास किचनमधे काम करता करता इतका मस्त वेळ गेला.
हल्लीची गाणी इतकी एकसलग नाही ऐकू शकत. फार मोनोटोनस वाटतात.

मी पण काल शाखांच्या सर्व गाण्यांची उजळणी करत होतो. येस बॉस, कभी हा कभी ना , बादशहा! कोई मिल गया मेरा दिल गया. काय दिवस होते ते. येस बॉसचे ते गाणे ज्यादा नही मांगता... ह्या गाण्यात त्याने मागितले आहे ते सगळे त्याला मिळाले, त्याने मिळवले.
सर, तुम्ही हे गाणे लक्षपुर्वक बघा. आता "मन्नत"जिथे उभी आहे तिथे आधी एक जुनी बिल्डींग होती, त्याच बिल्डींगचा शॉट आहे. (१.५९/२ मिनिट्स) म्हणजे तेव्हा पासून त्याच्या डोक्यात असणार. Amazing Guy.
सुदैवाने जेव्हा कार्टर रोड वर ह्या नाण्याचे शूटिंग होत होते तेव्हा मी तिथे मज्जा बघत उभा होतो. शाखाला याच देही याच डोळा बघितले.

केशवकूल,
छान पोस्ट आणि काय योगायोग.. मी सुद्धा काल चांद तारे ऐकले.. आणि बादशहाची दोन गाणी ऐकली.

ती जुनी बिल्डिंग आणि मन्नत बद्दल माहीत नव्हते. खरे आहे का ते? बाकी खरेच त्या गाण्यातले सगळे मिळवले त्याने. ते गाणे सुद्धा फार आवडीचे. महत्त्वाकांक्षा सुद्धा किती निरागस असू शकते हे जाणवते Happy

येस बॉसचे ते गाणे ज्यादा नही मांगता
येस बॉसचे मै कोई ऐसा गीत गाऊ मध्ये शाखा आणि जुही, दोघेही किती गोड दिसतात आणि अभिजितचा आवाज, वाह फक्त वाह

कभी हाँ कभी ना.. ची गाणी छानच आहेत..
केशवकूल, बरं झालं तुम्ही आठवण करून दिलीत..
आज सकाळी जीममध्ये कभी हा कभी ना .. आणि रहना है तेरे दिल में ची गाणी ऐकली..
मला प्रत्येक गाणं मनसोक्त एन्जॉय करता येतं कारण सकाळी लेडीज जीम मध्ये माझ्याशिवाय कुणीही नसतं.. .. एकटीच असते मी भुतासारखी ..

'अशी चिक मोत्याची माळ ..' जेव्हा नविन आलं होतं तेव्हा कित्ती लोकप्रिय होतं.. गावच्या गणपती उत्सवाची आठवण आली.

अशी चिक मोत्याची माळ. अजूनही अवीट आहे. हे आपल्या गाववाल्यांचे गाणे आहे. अर्बन लोकांना आवडेलच असे सांगता येणार नाही.

अशी चिक मोत्याची माळ. अजूनही अवीट आहे
+७८६
मी मागेही कुठल्या तरी धाग्यावर या गाण्याचा उल्लेख केलेला. मला गणपतीची गाणी म्हटले की सर्वात पहिले हेच गाणे आठवते. हे गाणे वाजले नाही तर घरी गणपती आलेत असे वाटतच नाही. वातावरण मंगलमय करते हे गाणे.

Pages