तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.
.
.
.

खडा हु आज भी वही..
https://youtu.be/6YUoqa9o7y4?si=L-IgEmxNtGrrYn7c

आज हे आहे रिपीटवर..
आधी हे sad song वाटायचे.. कारण इंडिया वर्ल्डकप हरली की वाजायचे.. पण 20-20 वर्ल्डकप जिंकल्यापासून अचानक vibes बदलल्या. हर रात के बाद सवेरा है म्हणत हे गाणे आशादायी वाटू लागले आहे Happy

https://www.youtube.com/watch?v=cSkSnRSMJAc

माये नी माये
मैं इक शिकरा यार बनाया
ओदे सिर ते कलगी
ओदे पैरीं झांजर
ते ओ चोग चुगेंदा आया

(शिकरा हा पक्षी मांसाहारी असतो. पक्ष्याचे उदाहरण देत, कवि शिव म्हणतायत - त्यांची प्रेयसी शिकरा पक्ष्यासारखी होती. मस्तकी डौलदार तुरा आणि पायी पैंजण. हा पक्षी दाणे टिपायला म्हणुन आला.)

इक ओदे रूप दी धुप तिखेरी
दुजा महकां दा तिरहाया
तीजा ओदा रंग गुलाबी
किसे गोरी मां दा जाया

(एक तर ती सुंदर होतीच दुसरे म्हणजे सुगंधी आहे, गोरी-गुलाबी, गोंडस आहे. कोण्या गोर्‍यापान आईची पोर आहे असे वाटते.)

इश्के दा इक पलंग नवारी,
असां चानन्नियां विच डाया
तन दी चादर हो गई मैली
उस पैर जां पलंगे पाया

(तिच्याकरता कविने प्रेमाचा पलंग तयात केला जो की चंद्रप्रकाशात सज्ज केला. ज्या क्षणि तिने सुकुमार पावलांनी या पलंगाला स्पर्श केला त्या क्ष्णी तिची काया मलिन झाली, मळली, कलंकित झाली)

दुखण मेरे नैनां दे कोये
विच हाड़ हंजुआं दा आईया
सारी रात गई विच सोचां
उस ए कि जुल्म कमाया

(आता दु:खामुळे माझे डोळे रडून रडून लाल लाल झाले आहेत. अश्रूंचा पूर लोटला आहे. हाय रे दैवा हे कोणतं दु:ख मी मोले घेतले.)

सुबह सवेरे लै नी वटणा
असां मल मल ओस नव्हाया
देही दे विचों निकलण चींगां
ते साडा हाथ गया कुम्हलाया

(मी सकाळ-संध्याकाळ उटणं लावून स्वतःला स्वच्छ केले, आंघोळ केली आणि इतके होउनही माझे हात मळलेलेच राहीले.)

चूरी कुट्टां तां ओ खांदा नाही
ओन्हुं दिल दा मांस खवाया
इक उडारी ऐसी मारी
ओ मुड़ वतनी ना आया

(तो शिकरा तर काही खात नसे म्हणुन माझ्या हृदयाचे मांस त्याला खायला घातले. पण त्याने एकदा अशी झेप घेतली की परत वळून तो काही माझ्याकडे फिरकला नाही.)

ओ माये नीं
मैं इक शिकरा यार बनाया
ओदे सिर ते कलगी
ओदे पैरीं झांजर
ते ओ चोग चुगेंदा आया

सामो, मी नसेल सांगितली. एका माबो दिवाळी अंकात अल्पना यांनी शिवकुमार बटालवी यांच्यावर लेख लिहिला होता, त्याची लिंक दिली असेल. तुम्ही मराठीत फार छान आणलं आहे.

कभी कभीतलं खय्यामचं लाईट मुडचं गाणं
तेरे चेहरसे नज़र नही हटती,
नज़ारे हम क्या देखे

पण साहिर आला की लाईट मुड सिझलिंग हॉट होऊ शकतो.
पिघले बदन तेरी तपती निगाहों से
शोलों की आंच आए बर्फिली राहों से
लगे कदमों से आग लिपटती
नज़ारे हम क्या देखे

खय्याम + साहिर + किशोर + लता + ऋषी + नितू + बर्फातलं काश्मिर = और क्या चाहिए?

भरत, मीना कुमारीची शायरी मी पूर्वी ऐकलेली आहे. पण आता सीझन बदलते वेळी , त्या शायरीला, हात लावण्याचा चान्सच नाही. मूड एकदम मेलो होउन जातो. नकोच ते आत्ता.

>>>>>>>>>>>>खय्याम + साहिर + किशोर + लता + ऋषी + नितू + बर्फातलं काश्मिर = और क्या चाहिए?
वाह! Happy
>>>>पिघले बदन तेरी तपती निगाहों से
हाय!!!

'क्यू मै जागू' >>>> वा वा! छान गाणं, आवाज, आणि पिक्चरायझेशन, कॉंटेक्स्टमध्ये परफेक्ट

रात अकेली थी तो
हां हम मिले है, सौ सौ दफा मैं धूल हुं तू कारवां
ईक दुसरे में हम युं लापता, मैं धूल हुं तू कारवां

बरेचदा ऐकून पण मन भरत नाही.. ह्या गाण्यामुळेच भारल्या सारखे चित्रपट पाहिला. पण तो ओके होता.

तुमपे हम तो मरे जा रहे है, मीट्ने की जिद किये जा रहे है- ज्योतिका तांग्री आवाज. नवोदित असावी, खूप वेगळा मस्त आवाज आहे. शिल्पा राव सारखी जादू आहे.

हे गाणं इतक्यात कुठेही न ऐकता दिवसभर डोक्यात वाजतंय

मेरी आँखों से कोई नींद लिये जाता है
दूर से प्यार का पैगाम दिये जाता है

बात जो उन से चली, वो इधर आ के रुकी
नाम जब उनका लिया, एक खुशबू सी उड़ी
एक तसव्वुर है जो मदहोश किये जाता है

लेजा लेजा रे ( श्रेया गोशाल आणि उस्ताद सुलतान खान)>>> हे गाणे मी कालच खूप दिवसांनी पुन्हा ऐकले. छानच आहे. पण भारावून टाकणारे असे वाटले नाही.

मेरी आँखों से कोई नींद लिये जाता है
आता हे माझ्या डोक्यात वाजतेय ! रात्री बाराला अभ्यासाचा आभास संपल्यावर इराणी हॉटेल मध्ये चहा /सिगरेट साठी गेल्यावर अशी जुनी गाणी लागलेली असत. तो एक वेगळाच माहोल असे.

धीमे-धीमे गाऊँ, धीरे-धीरे गाऊँ, हौले-हौले गाऊँ
तेरे लिये पिया..
('झुबैदा', करिष्मा- मनोज वाजपेयी, कविता कृष्णमूर्ती, ए आर रहमान, जावेद अख्तर)

विकु
अहाहा, काय आठवणी.
आमच्या वेळी एक ज्युक बॉक्स होती. त्यात एक रुपया टाकून मस्त गाणी ऐकायची आणि चहा ढोसायाचा. अशाच एका अंट शंट हॉटेलमध्ये गाणी लावली होती. मी पक्याला बोललो. "कोण रे ही? काय गातेय!" पक्याने मला एक पुणेरी शिवी दिली आणि म्हणाला ,"हळू बोल. मार खाशील. ही नूरजहॉं."
तेव्हापासून तिच्या प्रेमात पडलो आहे.

अवांतर
नूरजहॉंचा विषय निघाला म्हणून. दत्ता कोरगावकर नावाचे (के दत्ता) एक संगीत दिग्दर्शक होते. नूरजहॉं त्यांची फेवरीट होती. ती पाकीस्तानात गेल्यावर त्यांच्या मनावर मोठा आघात झाला, द्वारकानाथ संझगिरींनी त्यावर लिहिलेला लेखाची ही लिंक. शौकीनांनी अवश्य वाचावा.
https://www.esakal.com/saptarang/dwarkanath-sanzgiri-writes-n-datta-and-...

Pages