क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बुमरा ५ सामने सलग नाहि खेळला तर ? उगाच आपले काहितरी गावस्करचे पण. रो येतोय ना परत दोन सामन्यांनंतर.

गावस्कर हा अनुभव आणि ज्ञानाचे भांडार आहे. पण सध्या त्याचे वय ७५ झाले आहे. (आपल्या दुप्पट वयाच्या क्रिकेटपटूचा एकेरी उल्लेख करतो तोच खरा क्रिकेटप्रेमी)
त्याचे खेळणे कैक वर्षांपूर्वी थांबले आहे. आणि आपल्याकडचे ज्ञान गेले कित्येक वर्षे वाटून आता त्यातही त्याला मजा येत नसेल. त्यामुळे आता तो फारसा विचार न करता बोलतो. बरेचदा वाद सुद्धा उत्पन्न करतो. कधी त्याचे बोलणे फार भारी वाटते तर कधी अनावश्यक. त्यामुळे त्याचे फार मनावर घ्यायचे नसते.

सचिन नावे हा किस्सा आहे पण हे सचिन, दादा, झहीर, आगरकर चौघांनी केले होते.

The gentleman named Sachin Tendulkar Sachin Tendulkar in 2007, when workload management wasn't in vogue, played:

January 21, 24, 27, 31 ., 4 ODIs in 4 different cities vs. WI.

February 1 ---- Flew from Vadodara to Mumbai.
Played Ranji final (Mumbai vs. Bengal) from February 2 to 6.

February 7 reported to Kolkata for the ODI series vs. SL starting February 8..

#Sach'Inspiration

IMG_20241107_015938.jpg

भाउ, १९४९ मधे आतासारखे लक्षावधी रुपये क्रिकेट खेळणार्‍यांना मिळत नव्हते. शिवाय क्रिकेट खेळणारे लोकहि खूप कमी होते, त्यामुळे निंबाळकरांसारखा सापडला तर त्याला टेस्ट मधे खेळवणे यात नवल नाही.

अहो, आमच्या कॉलेजमधे नाईलाजाने मला पण टीममधे घेतले होते, तेंव्हा मी नेटमधे पॅड, ग्लोव्ह्ज घलून उभा राहिलो नि बॅटिंगला जाईस्तवर पायात पाय अडकून पडलो, तरी पण मी संघात आहेच.
पुढे बंगलोरमधे सुद्धा इतर कुणि नाही म्हणून मला घेण्यात आले होते. मला गोलंदाजी सुद्धा दिली होती. माझा एक ऑफ ब्रेक वळला पण दुसरा नाही, त्यामुळे एकजण आउट झाला.

हे सगळ१९६५-६७ च्या काळातले.

आजकाल भारताचे कसोटी किंवा कुठल्याहि प्रकारच्या क्रिकेटमधे दोन तुल्यबळ संघ होऊ शकतील.
पंड्या, सूर्यकुमार हे का खेळले नाहीत न्यू झिलंडविरुद्ध? वर्ल्डकप मधले बरेच जण नव्हते न्यू झीलंडविरुद्ध.

*भाउ, १९४९ मधे आतासारखे लक्षावधी रुपये क्रिकेट खेळणार्‍यांना मिळत .* - सगळीच परिस्थिती त्यावेळी वेगळी होती, म्हणूनच 1949 मधलं तें उदाहरण उकरून काढून आजच्या परिस्थितीतल्या एका छान, वैशिष्टयपूर्ण , शैलीदार व उपयुक्त खेळाच्या दीर्घ सफल कारकिर्दीला व ती सादर करणाऱ्या उमद्या खेळाडूला कमी लेखण्यासाठी कां वापरावं हाच तर खरा मला पडलेला प्रश्न आहे ! Wink

कोणी कुणाला कमी लेखत नाहीये. पुन्हा एकदा सांगतो. कितीवेळा सांगायचे. तुमच्या "उमद्या" खेळाडूला किती कसे का आणि कोणी चान्सेस दिले? पद्माकर शिवलकरची आठवण करून उत्तर द्या. उगाच straw man आर्ग्युमेंट कशापायी?

*खेळाडूला किती कसे का आणि कोणी चान्सेस दिले? * - जे खुल्या मैदानात खेळाडू निर्विवादपणे सिद्ध करतोय, त्याकडे दुर्लक्ष करून, असलं संशोधन करत मी कां बसावं ? व, मी शिवलकरना खेळताना अगदी जवळून खूप पाहिलंय व त्या गुणी खेळाडूला कसोटीत संधी मिळाली नाही याबद्दल मलाही खूप वाईट वाटत राहिलं. पण तिथेही बिशन बेदी व शिवलकर एकाच प्रकारचे व क्षमतेचे गोलंदाज एकाच वेळी स्पर्धेत येणं हा दुर्दैवाचा भाग होताच. ( कदाचित, त्यावेळी निवड समितीचे अध्यक्ष लाला अमरनाथ नसते व मुंबईचा कुणी असता, तर बेदी दुर्दैवी ठरला असता !! )
*उगाच straw man आर्ग्युमेंट कशापायी?* मला रोहित शर्मा फलंदाज, खेळाडू व कर्णधार म्हणून आवडतो व हे सर्व खुल्या मैदानातल्या त्याच्या कामगिरीमुळे व वर्तनामुळे ! बाकी, कुणाला काय म्हणायचंय ते खुशाल म्हणावं.

जे खुल्या मैदानात खेळाडू निर्विवादपणे सिद्ध करतोय, त्याकडे दुर्लक्ष करून, असलं संशोधन करत मी कां बसावं ?>> अहो हे सिद्ध व्हायच्या आधिच्या गोष्टी करतोय आपण. जाऊ द्या. झोपी गेलेल्याला जाग करण सोप्प पण...

केशवकूल, तुम्ही आता ज्या खेळाडूंना पुरेशी संधी मिळाली नाही म्हणून नाराजी व्यक्त करता आहात त्यांना अधिक संधी देऊन ते चमकले असते तर तेव्हा यांना अधिक संधी मिळाल्याने हे चमकले आणि अजून तिसऱ्या खेळाडूवर अन्याय झाला असा सूर लावला असता Happy

अजाझ पटेल. slow left-arm orthodox spin bowler.
Santner slow left-arm orthodox spin bowler.
दोघेही एकाच वेळी NZ कडून खेळले. दोघांनी मिळून इंडीआची वाट लावली.
नाही पण बेदी आणि शिवलकर... ते नाही खेळू शकणार.

के एल राहुल 53 टेस्ट नंतर 7 ओवरसीज शतक जमेची बाजू पण फक्त 33.88 सरासरी म्हणजे फार फार कमी आहे..

याला अजून संधी मिळायला हवी की नको - यावर तुमचे मत सांगा.

सर हे वाचा
There Are Three Kinds of Lies: Lies, Damned Lies, and Statistics.
पाण्याची सरासरी खोली फक्त सहा इंच होती तरीही एक माणूस पाण्यात बुडून मेला.

दोघेही एकाच वेळी NZ कडून खेळले.
>>>
जर त्यांच्याकडे चांगले ऑफ स्पिनर, लेग स्पिनर व्हरायटी असती तर हे दोघे एकत्र खेळवले असते का?

*..?झोपी गेलेल्याला जाग करण सोप्प पण...* - 2024 मधल्या रोहितला बदनाम करायला 1949 च निंबालकरांच उदाहरणं उकरून काढायचं आणि 50 वर्षांपूर्वी शिवलकरवर अन्याय झाला हे सिद्ध करायला 2024च्या न्युझीलंड संघाचं उदाहरण द्यायचं ! त्या त्या वेळची परिस्थिती काय होती याला कांहीं अर्थ आहे की नाहीं ? जावूंदे, यापेक्षा आपण झोपलेलंच बरं ! Wink

११-४ इथे सोडून दिलं होतं.
ईश्वरन ०
राहुल ४
साई सुदर्शन ०
गायकवाड ४
असा धावफलक होता.

*नंतर जुरेल ८० करुन गेला हे बघितलं होतं.

पैकी ईश्वरनला पहिल्या सामन्यात खेळवायचा विचार चालू आहे असे ऐकतो आहे.

IMG_20241107_214926.jpg

इश्वरन गेल्या काही सिरीजमधे बॅकप ओपनर म्हणून इअरमार्क/सिलेक्ट झालाय पण त्याला खेळवण्याइतपत कॉन्फिडन्स टीम मॅनेजमेंट मधे दिसला नाहीये. पर्थला यशस्वी बरोबर इश्वरन/राहूल पैकी कुणी ओपन करेल का शुभमन ला परत ओपनर म्हणून स्लॉट केलं जाईल (होपफुली जुरेल ला नाही ढकलणार)??

. पर्थला यशस्वी बरोबर इश्वरन/राहूल पैकी कुणी ओपन करेल का शुभमन ला परत ओपनर म्हणून स्लॉट केलं जाईल (होपफुली जुरेल ला नाही ढकलणार)?? >> ईश्वरनच योग्य आहे असे माझे मत. तो आयुष्यभर ओपन करत आला आहे. तो फेल जाऊ शकतो का ? हो जरुर जाऊ शकतो पण बाकीचे पर्याय मिडल ऑर्डर भक्कम ठेवण्यासाठी जरुरी आहेत विशेषतः कोहलीचा सध्या फॉर्म नि सर्फराज चा बाहेरच अन्प्रोव्हन रेकॉर्ड बघता. पहिल्या दोन-तीन विकेट्स तशाही देवाला वाहलेल्या आहेत मी माझ्यापुरत्या. थोडक्यात काय गाजराची पुंगी ! अगदीच नवी ट्राय करायची असेल तर सुंदर ला घेऊन पाठवा ओपन करायला.

तिसरा पेस कोण असेल ह्याची अधिक उत्सुकता आहे मला प्रसिद्ध कि आकश दीप्/सिराज पैकी जो उरलेला असेल तो ? आठवतय रोहित ने प्रसिद्ध सारखा लॅम्की हिट द डेक टाईप बॉलर ऑस्ट्रेलिया मधे हवा असे म्हटले होते.

रणजीमधे ६००० धावा ४०० बळी घेणारा एकच खेळाडू आहे पण तो भारताकडून कधीच खेळला नाही . माहित आहे का ? असो .
तुलनेने कमी संधी मिळालेले अनेक खेळाडू आहेत . कांबळी जाफर नायर
साळगावकर शिवलकर राजिंदर गोयल . आता विहारी जुरेल . नशिब नाहीतर काय .

जाफरला बरेपैकी संधी मिळाली म्हणू शकतो. पण तितके सातत्य त्याला दाखवता आले नाही.
त्यामानाने मुरली विजयने एके काळी छान सातत्य दाखवले होते.
अन्यथा आकाश चोप्रा, शिवासुंदर दास, सदगोपन रमेश यांनाही पुरेशी संधी मिळाली नाही असे म्हणू शकतो.
सगळ्यांना मनसोक्त संधी द्यायला भारताने दोन टीम बनवून दुप्पट सामने खेळावे लागतील.

बाकी कांबळीला संधी मिळाली नाही हे तर मला कधीच पटत नाही. साधारणपणे सचिनवर जळणारे कांबळीबाबत असे बोलताना आढळतात.
त्याचे मैदानाबाहेरचे वर्तन सोडा पण मैदानावरचा परफॉर्मन्स सुद्धा कमालीचा खालावला होता. कारकिर्दीच्या चांगल्या सुरुवातीनंतर तो बेकार फ्लॉप जाऊ लागला होता.

रणजीमधे ६००० धावा ४०० बळी घेणारा एकच खेळाडू आहे पण तो भारताकडून कधीच खेळला नाही
>>>>

जलाज सक्सेनाला मी कधीच लाईव्ह खेळताना पाहिले नाही पण त्याला संधी मिळायला हवी होती असे माझ्या ओळखीच्या बरेच जणांचे मत होते.
मुझुमदार सोबत शंतनु सुगवेकरची देखील लोकं आवर्जून आठवण काढतात या लिस्टमध्ये..
मी रणजी खेळाडू कधी लाईव्ह बघायला जात नाही त्यामुळे कधी यावर मत व्यक्त नाही करत.
राजकारण असू शकते निवडीमागे.. कुठल्यातरी सिलेक्टरला नको त्या अवस्थेत पाहिले हे कारण तर हमखास असते अश्या स्टोरीमध्ये.. पण पुरावे नाहीत तर आपण काही बोलू शकत नाही.

जलाज सक्सेनाला मी कधीच लाईव्ह खेळताना पाहिले नाही पण त्याला संधी मिळायला हवी होती असे माझ्या ओळखीच्या बरेच जणांचे मत होते. >> मग त्याने किती सिलेक्टर्सना नको त्या अवस्थेत पाहिले होते म्हणून मिळाली नाही ?

तुलनेने कमी संधी मिळालेले अनेक खेळाडू .... आता विहारी जुरेल . नशिब नाहीतर काय . >> विक्रम एकदम चपखल बोललात. त्यात अजून एक नाव अ‍ॅड करा - साहा.

अजून नावे नका जोडू.
मग तीन संघ बनवून तिप्पट सामने खेळावे लागतील Lol

Pages