तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१.अंग्रेजी मे कहते है कि आई लव यू

२. मन्नूभाय मोटर चली पम पम पम

३. आ जा मेरी गाडी मे बैठ जा

४. मै डिस्को, तू डिस्को, दुनिया सारी डिस्को ८२, डिस्को ८२ आ आ आ आ आ

५. कसम पैदा करने वाली की

६. खईके पान बनारस वाला..

जिस दिन से मैंने तुमको देखा है, दिल में इक सपना सा जागा है.

कैफी आझमी, मदन मोहन यांचं तुलनेनं हलकंफुलकं साधं गाणं. पण काय छान लय आहे. प्रेमात पडल्यावर माणूस तरंगायला लागतो, तसं वाटतं.

आज ऐकावंसं वाटलं तेव्हा कळलं की परवाना चित्रपटातलं आहे आणि त्यात अमिताभ, शत्रुघ्न आणि योगिता बाली आहेत. मग फक्त ऐकलं.

युवा दिलोंकी धडकन डॉक्टर कुमार विश्वास ह्यांच्या ह्या अजरामर ओळी
कोई दीवाना कहता है, कोई पागल समझता है !
मगर धरती की बेचैनी को बस बादल समझता है !!
मैं तुझसे दूर कैसा हूँ , तू मुझसे दूर कैसी है !
ये तेरा दिल समझता है या मेरा दिल समझता है !!

मोहब्बत एक अहसासों की पावन सी कहानी है !
कभी कबिरा दीवाना था कभी मीरा दीवानी है !!
यहाँ सब लोग कहते हैं, मेरी आंखों में आँसू हैं !
जो तू समझे तो मोती है, जो ना समझे तो पानी है !!

समंदर पीर का अन्दर है, लेकिन रो नही सकता !
यह आँसू प्यार का मोती है, इसको खो नही सकता !!
मेरी चाहत को दुल्हन तू बना लेना, मगर सुन ले !
जो मेरा हो नही पाया, वो तेरा हो नही सकता !!

भ्रमर कोई कुमुदुनी पर मचल बैठा तो हंगामा!
हमारे दिल में कोई ख्वाब पल बैठा तो हंगामा!!
अभी तक डूब कर सुनते थे सब किस्सा मोहब्बत का!
मैं किस्से को हकीक़त में बदल बैठा तो हंगामा!!
तुम्ही लकी असाल तर मुनव्वर राणा ह्यांच्या कवी संमेलनात कवीने ही रचना गायली आहे त्याचा आस्वाद घ्या.

अधूरी सी राहें मिलायी अधूरी हवाएँ चलायी अधूरी सी बातें बनायी,
इश्क के सिलसिले बन गये रे
तेरे दिल से दिल तक मेरे मेरे

उई अम्मा उई अम्मा, मुश्किल ये क्या हो गयी - हे हवाई साडी रागातले गाणे रिपीट मोडवर आहे.

झोपडी मे चारपाई - शुद्ध हंगामा तोडी राग
यात झ आणि च कोमल लागतो.

https://youtu.be/p2zMXSXhZ9M?si=LEaaJDIhYNQEThPE
Interstellar चे नुसतेच संगीत Ambient version/ melancholic आहे पण आवडते. गूढ आहे. असे शब्द नसलेले संगीत आवडते, कुठल्यातरी वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते.

सामो
ग्रेट गॅम्बलरचे गाणे ऐकले. छान मूड बनवणारे आहे. त्या सुरवातीच्या ओळींचा काय अर्थ आहे?
अस्मिता आता ऐकतो.

केकू बहुतेक हाच अर्थ आहे की दो लफ्जोंकी है दिल की कहानी या है मुहोब्बत या है जवानी.

म्हणजे एकतर तारुण्याचा उन्माद तरी आयुष्य सोपं करतो नाहीतर मग लॉन्ग लिव्ह लव्ह - प्रेम झिंदाबाद.

कुठून कशा मनात आलेल्या ओळी, रिपीट मोडवर गुणगुणत आहे

माना जुदाई का मौसम बुरा था
उसका भी लेकिन अपना मज़ा था
मजबूर तुम लाचार हम
बस आहें भरा करते थे
तुमको ही माँगा करते थे ...

https://youtu.be/D3EjhxLlHxg?si=6nA1SkzZ55gH3QPw
बऱ्याचदा रुदाली सोडलं भुपेनदांना कुणी ऐकलेलं नसतं. आज त्यांचं 'आमी एक जाजबोर, चे हिंदी version 'आवारा हूं' ऐकतोय . इथे भुपेनदांचे किती चाहते आहेत माहित नाही .. पण नक्की ऐकून बघा

हजारीका आवडत असतील तर हे नक्की ऐका. भन्नाट झिंग आणणारी चाल आहे. (मी फक्त ऐकायला सांगतोय, बघायचं झाल्यास जबाबदारी तुमची)

https://youtu.be/OcP0NLJcyCs?si=jqznQIuo90tSHrMW

जेव्हां गाणं म्हणायचं असेल तेव्हां ते रिपीट मोड वर असतं. दिवसभर रिपीट मोड वर मुद्दामून गाणी ऐकून होत नाहीत.
कधी कधी लताच्या गाण्यातले बारकावे, तिची आवाज लावण्याची तर्‍हा हे काळजीपूर्वक ऐकण्यासाठी लूप मधे टाकलं जातं. पुरूष गायकात रफी.

खरं तर मी शक्यतो गाणी रिपीट मोडवर ऐकत नाही , पण काही गाण्यातील कडवी मनात रिपीट मोडवर गायली जातात . सध्या लल्लाटी भांडार चालू आहे .

सोनू आणि केवळ सोनू! भूल भुलैय्या ३ चं हे गाणं बेफाट आवडलंय -
https://www.youtube.com/watch?v=WpA8vg5PmuQ

आवाजात उतरलेला दर्द, आलाप, सरगम ... कशाकशाबद्दल लिहू? केवळ सुंदर.
पिक्चरमधे या गाण्याला न्याय मिळाला आहे की नाही याची कल्पना नाही. ऐकायला खूप आवडलं आहे.

हमको मन कि शक्ति देना
आलं रे आलं कमळ आलं

बुलंद महाराष्ट्रासाठी मर्द मराठ्यांची सेना
शिवसेना शिवसेना

र आ Rofl
‘एकनाथ…. एकनाथ’ नाही ऐकलं का तुम्ही? फोन उचलला की डायरेक्ट सुरूच होतं. २ मिनीट सुधरतच नाही. कॉलर ट्युन वाट्टे. फारच संगीतप्रेम उफाळून आलंय लोकांचं.

फार पूर्वी अवधूत गुप्तेने केलेलं ‘जात, गोत्र अन धर्म आमुचा शिवसेना, शिवसेना’ आठवतंय. चाल बिल तरी बरी होती.

मी कालपासून 'जाग दिल ए दिवाना' ऐकतेय.

रमड 'मेरे ढोलना' ऐकले. सोनूने अप्रतिम गायलेय पण त्याचा आवाज मध्येच जाड/पसरट का वाटतो? ओळखूच येत नाही मध्ये. सोनूचा आवाज एज होतोय का? नहीं...................

Pages