तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मा़झे मन, अगदीच पटले. या गाण्यावर स्वतंत्र लिहा कि.

सामो - असं काही नाही हो. झ झ झोपडी मे च च च चारपाई, माणूस बिना हम्मो... हे सुद्धा त्याच तन्मयतेने ऐकतो Proud

अस्मिता - सुंदर पोस्ट. वरवर पाहिली तरी आवडली.
फ्रेश मूड मधे वाचेन नंतर.

रसिक बलमा >>> गाणे तर चांगले आहेच पण जैसे रोग लगाया म्हंटल्यानंतर शंकर-जयकिशनने जो संगीताचा तुकडा (वाद्य माहीत नाही) वाजवला आहे प्रत्येक वेळेस, तो ही सुंदर आहे.

बच्चन-किशोर पोस्टी भारी आहेतच.

झुम झुम ढलती रात
झपाटले आहे या गाण्याने. पूर्वी चमत्कार दाखवताना पियानोची आठ दहा बटणं एकत्र दाबून जलतरंग चा किंवा काकाकुवा इफेक्ट आणायचे, त्या आवाजाला घुमाव दिल्याने वेगळाच बाज चढलाय गाण्याला. लताने आवाज टीपेला न नेता त्यातून व्याकुळता व्यक्त केली आहे. म्हणून इतर झपटगीतांपेक्षा हे खूप वेगळे आहे.

याचे जर मेल वर्शन करायचे झाले तर फक्त हेमंतकुमारच्या आवाजात बनू शकते.

लताने गाण्याला इतके स्त्रैण बनवले आहे कि तिच्या या शिक्क्यानंतर हे गाणे दस्तुरखुद्द रफी , किशोर, मन्ना डे आदि पुरुष गायकांनी कितीही आपल्या शैलीत न्याय देण्याचा प्रयत्न केला असता तरी ते कानवले नसते. आशाच्या आवाजातही नाही.

यांना एकच संधी होती. लताच्या आधी.

माझेमन - मादनो हे गाणं चिन्मयी श्रीप्रदा आणि मिका सिन्ग ने सुद्धा गायलेलं आहे, ते मला जास्त आवडतं.

ठहरिये होश मे आ लूं तो चले जाईयेगा
आपको दिल मे बिठा लूं तो चले जाईयेगा
.
कबतक रहियेगा युं दूरकी चाहत बनके
दिलमे आ जाईये इकरार-ए- मुहब्बत बनके.

आहाहा काय लाडीक गाणं आहे. खय्याम यांनी दिलय संगीत. अतिसुंदर. नंदा गोडच आहे. आणि देखणा शशीकपूर.

बरं हे एक आर्त गाणं माझे फेव्ह -
निर्दयी प्रीतम.
>>
मला आधी वाटलं की फेव्ह गाण्याचं प्रीतम नी रीमिक्स वगैरे केल्याची लिंक आहे... आणि म्हणून निर्दयी प्रीतम

खय्यामच्या गाण्यात orchestration फारसं नसतं. पण चाल अशी बांधलेली असते की क्या बात!

>>>>पण चाल अशी बांधलेली असते की क्या बात!
होय!
उमराव जान काय सुंदर चाली आहेत.

>>>>>>आणि म्हणून निर्दयी प्रीतम
Happy

ऋशी नित्यप्रग्यांनी गायलेले हे गाणे मला वेड्या-वेड्यासारखे आवडते.

https://www.youtube.com/watch?v=b3P-EAR10ug&list=PLPMB_AjaOHWGp2z5pUfdyy...

तुम गगन के चंद्रमा हो
मैं धरा की धूल हूँ,

तुम प्रणय के देवता हो
मै तुम्हारी रागिनी

तुम महासागर की सीमा, मैं किनारे की लहर
तुम महासंगीत के स्वर, मैं अधूरी साज़ हूं

तुम हो काया, मैं हूँ छाया
तुम क्षमा, मैं भूल हूँ

तुम उषा की लालिमा हो, भोर का सिंदूर हो
मेरे प्राणों की हो गुंजन, मेरे मन की मयूर हो

तुम हो पूजा, मैं पुजारी
तुम सुधा, मैं प्यास हूँ

अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती

इथे सुरु होण्याआधी, संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते, डोळ्यांतील पाणी
जखम उरी होते ज्यांच्या, तेच गीत गाती

सवर् बंध तोडूनी जेव्हा नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे, हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती

गंध दूर ज्याचा, आणिक जवळ मात्र काटे
असे फुल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे
तरी गंध धुंडीत धावे जीव तुझ्यासाठी

आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला ह्या स्वरांनी
डोळ्यांतून माझ्यासाठी लाव दोन ज्योती

गीतकार :मंगेश पाडगांवकर
गायक :अरुण दाते
संगीतकार :यशवंत देव

https://www.youtube.com/watch?v=u3kVwJXqZ3E

सामो
आभार.
फार आर्त आहे.
अगदी. शब्द, सूर आवाज ह्यांचा अवीट त्रिवेणी संगम.

फार आर्त आहे. +100

भातुकलीच्या खेळामधली पण. सनई हे खरं तर मंगल प्रसंगी वाजवलं जाणारं वाद्य. पण ह्या करुण गाण्यात त्याचा वापर खटकत नाही.

मला आधी वाटलं की फेव्ह गाण्याचं प्रीतम नी रीमिक्स वगैरे केल्याची लिंक आहे... आणि म्हणून निर्दयी प्रीतम >>> Lol

माझं आवडतं. साधं व सरळ. गायकाचा इतका गोड आवाज मी आधी ऐकला नाहिये. आपल्या कपिल शर्माचा पहिलावहिला सिनेमा, त्यातलं हे गाणं ‘समंदर में‘. हे आज ऐकत नाहिये पण जेव्हा ऐकते तेव्हा बर्‍याचदा पुन्हापुन्हा ऐकते.

https://youtu.be/M6hbHHkcfoY?si=xlM0x51uFROUScNp

गोट लाईफ मधलं पेरिओने रहमाने आणि दुसरं कुराण आयत असलेलं गाणं istifagaar.पेरिओने खूप आर्त आहे.
https://youtu.be/KLKFevtRLYo?feature=shared
https://youtu.be/vX3KbnWWFmE?feature=shared
पसुरी पण सारखं ऐकतेय.

या सगळ्यांने उदास छटा आली मनावर की यशराज मुखाते चं बिंग बिंग बू.

https://youtu.be/h-ile9tMNM0?feature=shared

इथेच कुठल्या तरी धाग्यावर कोक स्टुडिओ पाकिस्तानच्या 'पार चना दे'विषयी वाचले होते. अप्रतिम लिरिक्स. सध्या तेच ऐकतेय.
कच्ची मेरी मिटटी, कच्चा मेरा नाम नी
हाँ मैं नाकाम नी
कच्चेयां दा होंदा कच्चा अंजाम नी
है गल आम नी
कच्चेयां ते रखिये ना उम्मीद पार नी

@सामो >>> 'तुम गगन के चंद्रमा' जुन्या सतीसावित्री पिक्चरमधले आहे. ऐकले आहे का? त्या पिक्चरमधले 'जीवन डोर तुम्हीं संग बांधी' मला आवडते.

>>>>>>>@सामो >>> 'तुम गगन के चंद्रमा' जुन्या सतीसावित्री पिक्चरमधले आहे. ऐकले आहे का? त्या पिक्चरमधले 'जीवन डोर तुम्हीं संग बांधी' मला आवडते.
होय माझे मन मी तुम गगन के ऐकलेले आहे.
आता जीवन डोर ऐकते. Happy

https://www.youtube.com/watch?v=lkOg15y3uqk
सलोना सा सजन है और मै हूं
तुम्हारी रुप की छाया मे साजन
बडी ठंडी अगन है और मै हूं|

या फॉलमधली पहीली पंपकिन स्पाईस लाटे.

ही दोन गाणी मूड आला कि ऐकायची
Jumbalakka Jumbalakka
https://www.youtube.com/watch?v=_OC9neMwIpE
Chikku Bukku Video Song
https://www.youtube.com/watch?v=CG-I7aNLh04
गाण्याचा अर्थ माहित नाही. आता ही रेहमानची जादू म्हणायची कि तामिळ भाषेचा महिमा?

Pages