Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42
दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
है जमालो - https://www
है जमालो - https://www.youtube.com/watch?v=mRFfPmRARUg
जाम आवडलंय हे गाणं
तारों को तोरी, न छेड़ूँगी अब
तारों को तोरी, न छेड़ूँगी अब से
बादल न तोरे, उधेड़ूँगी अब से
खोलूँगी न, तोरी किवड़िया
फेरो ना नजर से नजरिया
हॅट्स ऑफ अमित त्रिवेदी !
माझ्या you tube च्या डाउनलोड
माझ्या you tube च्या डाउनलोड मध्ये ' आजा नचले ' मधला शेवटचा लैला मजनू play आहे.
मी तो कितीही वेळा एकु शकते आणि बघू शकते.
Masterpiece आहे तो त्या मूव्ही चा.
परवाच सापडलं तेव्हापासून 15 -
परवाच सापडलं तेव्हापासून 15 - 20 वेळा ऐकलं .. रामजन्मासारखं कृष्ण जन्माचं एखादं मिळावं असं खूप दिवस वाटत होतं पण आहे की नाही माहीत नव्हतं .. हे सापडलं आणि आवडलं पण खूप .. गीतगोपाल मधली बाकी काही रेकॉर्ड झाली आहेत का पाहणार आहे आता .
https://youtu.be/Lmu5QFRyEU4?si=KxBAkFi4OV4CYTiT
हॅट्स ऑफ अमित त्रिवेदी !>>+१
हॅट्स ऑफ अमित त्रिवेदी !>>+१
माया नीलकन्ठन - चेन्नई
माया नीलकन्ठन - चेन्नई
America's got Talent - audition
https://www.youtube.com/watch?v=GfVnVCaFg4c
छू कर मेरे मन को किया तूने
छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा
माउली माउली रूप तुझे
माउली माउली रूप तुझे
वक़्त ने किया क्या हसीं सितम
वक़्त ने किया क्या हसीं सितम
तुम रहे ना तुम, हम रहे ना हम....
सध्या बरेचसे वॉल्ट्झ आलटून
सध्या बरेचसे वॉल्ट्झ आलटून पालटून
बार बार यह दिन आये
बार बार यह दिन आये
बार बार देखो
देख तेरे संसार की हालत क्या
देख तेरे संसार की हालत क्या हो गयी भगवान
https://youtu.be/1_5LLtxAB4I?si=4Q8XBZhQTpAE_HAY
हल्ली हल्ली असं लक्षात आलं आहे की मला मेल गायकांच्या आवाजांमध्ये गोड आवाजांपेक्षा असे गोड नसलेले आवाज किंचित जास्त आवडतात .. गाण्यापेक्षा आवाजासाठी गाणं पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतं .
तसेच गायिकांचेही गोड आवाज ऐकून कधी कधी अगोड किंवा एवढे ठराविक फिमेल गोड नसलेले आवाज मिळाले तर बरं होईल असं वाटतं ... मिळतात तसे कधीकधी , अशांची आता ठरवून ऐकण्याचा प्रयत्न चालू आहे ... बाकी गोड आवाजांच्याही गायक गायिकांची नवीन ऐकत आहे आधी न ऐकलेली ... चांदण्यात फिरताना अजून ऐकलं नव्हतं , इतके दिवस आपण केलं तरी काय असं वाटलं ऐकून , हे राहून कसं गेलं ऐकायचं .. तेही सध्या रिपीट चालू आहे ..
तसेच गायिकांचेही गोड आवाज
तसेच गायिकांचेही गोड आवाज ऐकून कधी कधी अगोड किंवा एवढे ठराविक फिमेल गोड नसलेले आवाज मिळाले तर बरं होईल असं वाटतं >>> +१ मला असं पुष्कळदा वाटतं. सुनिधी माझी फेव गायिका आहे.
मलाही किरटे का किनरे आवाज
मलाही किरटे का किनरे आवाज अजिबात आवडत नाही.
आज एक असं गाणं की जे खूप
आज एक असं गाणं की जे खूप सुंदर आहे आणि खूप आवडतं आहे - पण ते कधीच रिपीट मोडवर ऐकलं जात नाही माझ्याकडून. रिपीट वर ऐकायला ते गाणं आणि आपण यात काहीतरी sync व्हायला लागतं. तो आवाज, ती चाल इतरांसमोर नाही, बाथरुममध्ये पण नाही तरी निदान मनातल्या मनात तरी गुणगुणता येणं गरजेचं असतं.
पण या गाण्याची चाल सज्जादने इतकी अवघड आणि चाकोरीबाहेरची बांधली आहे की ती कळणंच कठीण - गुणगुणणं अशक्यच. धड ताल नाहीये. म्हणजे काही तालवाद्य वाजत राहतं पण त्याचा वापर करून समेवर येणं असला प्रकार नाहीच. ना धड भारतीय ना धड अरेबीक. कधी आवाज खूप वरती जातो तर दुसर्याच क्षणाला अगदी खालची पट्टी.
इतकी कठीण चाल पेलणारी लता. आवाजातला तो कंप कसा आणला असेल? तिच्या आवाजात एकच कमतरता असावी - खर्जाची. या गाण्याइतका तिचा आवाज क्वचीतच खाली आलेला ऐकायला मिळतो. आणि ते खालती येणंही पॅराशूटसारखं उरात धडकी भरवणारं. आवाज खूप वर गेलेला असतो आणि तो फ्री फॉल सुरू होतो. पॅराशूट उघडेल ना? तिचा आवाज बेसुरा नाही होणार ना ? पण मोक्याच्या क्षणी तो आवाज परत वरती उसळी घेतो अणि परत सुरू होतो तो जीवघेणा कंप. इतकी घालमेल करणारं गाणं कसं रिपीट मोडवर ऐकलं जाणार? पण ते आवडतं मात्र खूपच.
लताचा आवाज बेसूरा नाही होणार ना - अशी काळजी वाटायला लावणारी चाल बांधणं हे सज्जादचं कसब. आणि कीतीही कठीण चाल असली तरी जराही बेसूर न होणं ही लताची नेहमीची खासीयत!
ए दिलरुबा नज़रे मिला
ए दिलरुबा नज़रे मिला >> आवडलं
ए दिलरुबा नज़रे मिला >> आवडलं
देवा तुझा मी सोनार, तुझे
देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार. हे सतत गुणगुणत आहे.
माधव ऐ दिलरुबा निवांत ऐकते.
माधव ऐ दिलरुबा निवांत ऐकते.
सज्जादची गाणी आवडत असताल तर फिर तुम्हारी याद आयी ऐ सनम ऐकलंय का? त्यात पण तुम्ही म्हणता तसे इंडोअरेबिक सुर आहेत. फार ऍडिक्टिव आहे ते गाणं.
माधव, आत्ता ऐकलं ते गाणं..
माधव, आत्ता ऐकलं ते गाणं.. पहिल्यांदाच.
खूपच वेगळी, संथ चाल आहे. इंडो अरेबिक ट्यून्स. तुम्ही म्हणता तसं लताचा कापणारा स्वर.
मात्र ती कोण हिरॉईन आहे ती किती मख्ख , दगडी चेहेर्याने गाते आहे! समोर दिलरुबा असो की आणि कुणी ..तिला काहीच फरक पडत नाही!
लेडी भारत भूषण आहे!
एज बहुतेक मिस्टर & मिसेस ५५
एज बहुतेक मिस्टर & मिसेस ५५ मधली असावी.
फिर तुम्हारी याद आयी ऐ सनम
फिर तुम्हारी याद आयी ऐ सनम ऐकलंय का? >>> हो ते पण खूप आवडीचं आहे. तशी रुस्तम सोहराब मधली सगळीच गाणी (एक आशाचं वगळता) खूप आवडतात.
सुरय्याचं ये कैसी अजब दास्तां हे सगळ्यात पहिलं ऐकलेलं त्या सिनेमातलं गाणं. तेंव्हा सज्जाद हुसैन एवढ नावच माहित होतं - त्याची जादू कळायला बरीच वर्ष जावी लागली. एक दिवस वो तो चले गये ए दिल ऐकलं आणि मग त्याच्या चालींच्या प्रेमात पडलो.
ती कोण हिरॉईन आहे ती किती मख्ख >>> ती हिरॉईन नसावी. सुरय्या आणि मुमताज होत्या त्यात हिरवीणी. तसेही जुनी हिंदी गाणी पाहणे ही खूप मोठी रिस्क असते. गाणं न आवडण्याचेच चान्सेस जास्त असतात.
एक परदेसी मेरा दिल ले गया सारखं सुंदर गाणं, पडद्यावर मधुबाला - गाणं आवडायला पाहिजे ना ? पण तसं बिलकुल होत नाही.
ऐ दिलरुबा ऐकलं. समेवर न
ऐ दिलरुबा ऐकलं. समेवर न येणारी गाणी मला जनरली आवडत नाहीत. पण हे काहीतरी वेगळंच आहे. एखाद्या मर्सियासारखं वाटतं आहे. त्या काळात अशी चाल बांधणे विरळाच. सज्जाद हुसैनला संगीतकारांचा संगीतकार का म्हणायचे हे कळतंय आत्ता.
आभा हंजुराची गाणी
आभा हंजुराची गाणी
हक्कूस बक्कूस इथे मागे असेल. हे आणखी एक.
https://www.youtube.com/watch?v=6p8tPr9Sy_Q
खूपदा ऐकलं कि उच्चार समजतात. मग लिहून काढून अर्थ शोधले कि अजून आवडतं.
सध्या सई टेंभेकरची मराठी
सध्या सई टेंभेकरची मराठी unplugged ऐकतोय!!
आवडलीयत
ओ रे माझी ... हिंदी गाणी
ओ रे माझी ... हिंदी गाणी ऐकताना मला काही शब्दांचे अर्थ शोधून बघावे लागतात शुद्ध हिंदी भाषा फार माहीत नसल्यामुळे .. पण अर्थ नाही समजले तरी फार अडत नाही , अंदाजाने अर्थ समजतो किंवा नाही समजला तरी गाण्याच्या गोडव्यात काही उणं आल्यासारखं वाटत नाही .
https://youtu.be/2oH0m-qhIK0?si=H8yUF-Btya-IHHkS
लम्हा नावाच्या पिक्चरमधले
लम्हा नावाच्या पिक्चरमधले क्षितिज तारे आणि चिन्मयीने (श्रीपदा?) गायलेले 'मदनो'. हा पिक्चर कधी आला नी गेला कुणाला माहित नाही त्यामुळे हे गाणे फारसे ऐकले गेले नाही. आवाज सुपरइम्पोझ करणे, प्रत्येक लाईन सेपरेट गाणे वगैरे अलीकडचे सगळे प्रकार याही गाण्यात आहेत. तरी लिरिक्स, क्षितिज व चिन्मयीचा आवाज आणि मिथुनचे संगीत सुदींग आहे. क्षितिजची दोनच फिल्मी गाणी माहिती आहेत आणि दोन्ही आवडतात. त्याची अजून गाणी ऐकायला आवडतील.
रसिक बलमा
रसिक बलमा
सारखं ऐकतोय. लताने कायच्या काय गायलेय.
काल पुणेरी पुणेकर या धाग्यावर
काल पुणेरी पुणेकर या धाग्यावर अमिताभ आणि किशोर यांच्या गाण्यांवर चर्चा झाली होती. तेथे वाहून जाईल म्हणून येथे आणत आहे.
--------------
सुदेश भोसलेनी गायलेली अमिताभची गाणी आर्त नसून लाऊड किंवा कर्कश वाटायची किंचित. जुम्माचुम्मा पुरते ठीक वाटले. गाणे नसून पाच मिनिटांची मिमिक्री वाटायची.
किशोर कुमार आणि अमिताभची अप्रतिम गाणी - दोघांनीही आपापले बेस्ट दिले आणि ते एकदम जुळून आले. दोघेही विरघळून वेगवेगळे उरले नाहीत. गाण्यापेक्षा जास्त उरायचा अमिताभ, तसे राजेश खन्नाला क्वचित जमायचे. अमरप्रेम मधली गाणीही सुंदर होती, पण राजेश खन्ना फारसा उरला नसता किशोरशिवाय.
फक्त 'ओ साथी रे' गाणे च नाहीतर पूर्णपणेे वेगळ्या धाटणीचे के 'पग घुंगरू बांध मीरा नाची' सुद्धा वेगळेच अफाट वाटते. तेथेही भट्टी जमली आहे. दोघेही जॉन्रात अडकलेले नव्हते आणि वेगवेगळ्या उंचीवर एकत्रपणे त्यांना हे क्रेझी(?) पर्फॉमन्सेस नेता यायचे. हे फार दुर्मिळ आहे. प्रेक्षकांचे अहोभाग्य म्हणावे वाटते.
https://youtu.be/cTvUrpSr9ck?si=rVBHzol0EPEaUjh2
पग घुंगरू
वर उल्लेख केलेल्या गाण्यांशिवाय मला त्या दोघांचे 'देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए' भयंकर आवडते.
वहमों गुमान से दूर दूर , यकीन की हदके आसपास
दिलको भरम ये होगया है उनको हमसे प्यारहै
https://www.youtube.com/watch?v=7dO_MS9tZ5E
इतकं सुरेख म्हटलं आहे की मन त्या डोंगरमाथ्यावर जावे त्याच. भरम का असेना हा रोमँस रमणीय होऊन गेला. नंतर किशोरचे 'हुं हुं' करून एकदम ब्लेंड ईन होऊन जाणे, त्यांचे आपसात कितपत जमत होते माहिती नाही पण ही दोन कलाकारांमधली ही camaraderie जगावेगळी आहे. मी जन्मले सुद्धा नसावे तेव्हाचे गाणी आहेत बरीच, पण झिरपलीच.
मला हा कवी अमिताभ भारीच आवडायचा. 'कभी कभी' मधला राखीसोबतचा प्रेयसीच्या केसांत हात घालून बटा सावरल्या सारखा करणारा जणू 'लट उलझी सुलझा जा बालम' ही बंदीशच आठवावी. त्याच्यातली अफाट एनर्जी किती हळुवार करू शकतो तो एकदम. प्रेमभंग झाल्यावर हाच राग 'बोल्टेड अँगर' प्रमाणे गोठलेल्या हृदयात घेऊन एकलकोंडा होत आतल्याआत धुमसणारा. हे अँग्री यंग मॅनच्या (आज खुश तो बहोत होंगे तुम, फेके हुए पैसे नहीं उठाता) व्यक्त धुमसण्यापेक्षा खूप वेगळे आहे. मोठी रेंज आहे ही, रागाच्या दोन छटा (सूक्ष्म व विस्तारीत) आहेत.
कवी अमिताला अँग्री यंग मॅनने पर्यायाने प्रेक्षकांनीच मागे टाकले. पुलंचे वैचारिक लेखनाऐवजी लोकांनी विनोदालाच डोक्यावर घेतले हे एक दुसरं उदाहरण. एखाद्या कलाकारात एकापेक्षा जास्त गुण असावेत पण त्या-त्या काळातील प्रेक्षकांना/ वाचकांना त्यांच्या भावनांना तात्पुरता विसावा/ सुकून/ solace / न्याय देणारे काहीतरी मिळावे आणि त्यांनी तेच उचलून धरावे.
असो.
वहावतच गेले मी टाईपता टाईपता.
काय गाणे आहे! त्यातले नुसते
रसिक बलमा >>>
काय गाणे आहे! त्यातले नुसते 'हाए' आणि 'नेहा लगा के हारी'नंतरचा आलापसुद्धा मनाचा ठाव घेतो.
रसिक बलमा, आजा रे अब दिल पुकारा आणि यह शाम कि तन्हाईयाँ ही सगळीच आवडतात.
ही चर्चा इथे शेअर केल्याबद्दल थँक्स अस्मिता. अमिताभ व किशोरची काही गाणी जबरदस्त आहेत. माझे एक आवडते 'मंज़िले अपनी जगह है' डोळ्यातून अश्रू घरंगळण्याच्या बेतात असावा, गळ्यात आवंढा फुटत असावा आणि हे सगळे रोखून आपबिती सांगावी अशा स्वरातले हे गाणे.. छू कर मेरे मनको हे दुसरे. यात किशोरने अगदी हलका पिसासारखा आवाज लावलाय. 'आये तुम याद मुझे'मधला अमिताभच्या रिकाम्या घरासारखा एकाकी वाटणारा किशोरचा आवाज, सलाम-ए-इश्क मध्ये रेखाच्या मैफिलीचा मूड बदलणारा किशोर फारच आवडतो.
>>>>>>.काय गाणे आहे! त्यातले
>>>>>>.काय गाणे आहे! त्यातले नुसते 'हाए' आणि 'नेहा लगा के हारी'नंतरचा आलापसुद्धा मनाचा ठाव घेतो.
रसिक बलमा, आजा रे अब दिल पुकारा आणि यह शाम कि तन्हाईयाँ ही सगळीच आवडतात.
अगदी अगदी!!!
>>>>सारखं ऐकतोय. लताने कायच्या काय गायलेय.
रआ फार चांगली टेस्ट आहे तुमची. माझेमन तुमचीही.
बरं हे एक आर्त गाणं माझे फेव्ह - https://www.youtube.com/watch?v=PB5c7ICzfO8 - निर्दयी प्रीतम.
Pages