बिग बॅास मराठी - ५

Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47

२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चक्रव्यूह मध्ये सुरज आणि पंढरीनाथ यांनी करायचा तो घोळ केलाच. सगळ्यात जास्त कमाई अंकिता-अभिजित आणि वर्षा-निक्की यांनी केली. सगळे मिळून फक्त ८ लाख आणि ६० हजार कमावले. यात आता बिबॉ टीम ने काही भर नाही घातली आणि शेवटी बॅग उचलून निक्की (हि विजेता होत नसते) बाहेर पडली तर अभिजितला (हा ठरलेला विजेता) काय मिळणार.

इथेच वाचले कि धनंजय किती रूड आहे, त्यामुळे बायकोने पायावर डोके ठेवणे, पती परमेश्वर इत्यादी म्हणणे नवे वाटले नाही. खऱ्या आयुष्यात हे तसेच असतील का माहिती नाही पण यांच्या रील लाईफ मध्ये असे पात्र करायचे ठरवले असेल त्यामुळे ते पुढे नेत असतील.
==================================================================================================
अभिजीत, पॅडीदादा व सुरज खरंच चांगले माणूस आहेत. खरे वाटतात.अवांतर सांगायचे तर डीपी चांगलाय पण विचाराने आजीबात पुढे नाही. मी तर त्याची तक्रार केली होती व सुनावलेले instagram वर त्याला. मेसेज पण पाठवलेला. पण त्याने मला ब्लॉक केले की तुम्ही आमच्या जोडीवर जळता मी म्हणालेले बायको बरोबर असे व्हिडीओ का करता. तुम्ही इन्फ्लुएन्सर ना मग समाजात योग्य मेसेज जायला हवा ना. चुकीचा मेसेज जातोय .मला नाही आवडत त्याचे व्हिडिओ. सतत बायकोला कमी लेखायचे. खिल्माली उडवायची.माझा नवरा ते व्हिडिओ पाहून खूष व्हायचा कारण तो तसेच वागायचा मग त्याला वटायचे आपण जे वाईट वागतो बायको शी ते बरोबरच आहे. खूपच चिडलेले. मला तर पोलिस कंम्लेंट कराविशी वाटलेली त्याची. मग राग आवरून स्वतःवर काम केले व करतेय.पण अशी माणसे म्हणजे समाजाला कीड आहे. माणूस म्हणून विचाराने कधी पुढे जाणार. कधी awarwness येणार त्याला देव जाणे

Submitted by वृंदा on 23 September, 2024 - 06:41 (https://www.maayboli.com/node/85403?page=28)
===================================================================================================
अंकिता शिंकली तेव्हा पंढरीनाथ ने सल्ला दिला कि मोकळ्यापणे शिंक नाही तर त्रास होईल. यावर धनंजयने मोकळ्यापणे "हवा सोड" वगैरे सल्ला दिला. अंकिता आणि सगळ्यांनीच त्यावर आक्षेप घेतला. निक्कीच्या म्हणण्यानुसार धनंजय ने तिच्या साडीत किडा टाकला (पावसामुळे घरात आलेली फकडी/मॉथ/फुलपाखरू तुपे काही होते. एक दोन सीन मध्ये अभिजित ची बायको बेडरूम मध्ये आली तेव्हा कॅमेरा वर हि दिसले). निक्की बोलली कि कॉन्फेशन रूम मध्ये जाऊन तक्रार करणार पण तिने धनंजय ला ताकीद दिली आणि तक्रार नाही केली. हेच तिने बाहेर येऊन अंकिताला सांगितले, अजून हि बरीच चर्चा झाली यावर.

कालच्या एपिसोड मधील सगळ्यात बेस्ट मोमेन्ट अभिजित ची छोटी पिल्लू होती. मस्त बोलत होती आणि अभिजित ला चांगले हिंट देत होती. तुला काही लागले तर लगेच सांग, हिंसा झाली तर लगेच सांग नाही तर तुला घराबाहेर यावे लागू शकते वगैरे सांगितले. शेवटी तिला तिथे राहायचे होते. सो क्युट. बिबॉ ला जेव्हा तिने "हो, बिग बॉस" असे उत्तर दिले तेव्हा अंकिता चे एक्स्प्रेशन बघण्यासारखे होते. फॅमिली डे आणला हे छान केले यांनी. शोचा USP आहे हा.

हा बक्षीसाची रक्कम कमवण्याचा टास्क आधीच्या सीझनमध्येही होता. विशाल - विकासचा सीझन आठवतोय. प्रत्यक्षात हीच रक्कम देतात का? की आधी ठरलेले २५ लाख?

फेसबुकवर एक पोस्ट दिसली की हे सगळं सेट आहे. त्यात अभिजीत विनर, अंकिता रनर अप आणि सूरजने ब्रीफकेस घेतली असं म्हटलं आहे.

आता रक्कम अजून जिंकायला टास्क देतील किंवा दिवस कमी केले म्हणून एवढीच ठेवतील.

शिव वीणा सिझनवेळी शिवानीमुळे पैसे कमी झालेले विनरचे. शिवला तेवढे कमी मिळाले. शिवने हल्ली स्वतःचे घर घेतले मुंबईत, पैसे चांगले कमवतोय पण मराठी बिग बॉसनंतर शो कुठला जिंकला मात्र नाही. वीणाला छोटे मोठे रोल मिळालेले, आता निगेटीव्ह भुमिकेत मोठा रोल मिळालाय झी मराठी वर आणि त्याच सिरीयलमधे मेघाही व्हिलन आहे, आता दोघींच्यात चांगली मैत्री झालीय, वीणाचा परवा एक व्लॉग बघितला, त्यात होतं सर्व. शिवानीला स्टार प्रवाहवर मेन रोल मिळाला आहे, नेहा वगैरे कुठे दिसली नाही.

मागच्या सिझनच्या वेळी चक्रव्युह टास्क प्रसाद जवांदे आणि अक्षय केळकर छान खेळलेले, मोठी रक्कम जमवली त्यांनी.

आता मला सुरज विनर व्हावा असं वाटतंय.

अभिजीत विनर, अंकिता रनर अप आणि सूरजने ब्रीफकेस घेतली असं म्हटलं आहे.

बेस्ट, निक्की तसेही या शो साठी सगळ्यात जास्त पैसे घेणारी सदस्य आहे. तिने 70 दिवस राहून जेवढी कमाई केली आणि नाव कमवले, तेवढे विजेत्याला पैसे मिळणार नाही. विजेता होणे म्हणजे काम मिळतेच असेही नाही ते वर अन्जु यांनी लिहिलेच आहे.

ते अभिजीत विनर, अंकिता रनर अप आणि सूरजने ब्रीफकेस असे पेज फिरतेय सोमि मधे पण त्यात तथ्य नसावे. कळेलच. १ आठवडा राहिला फक्त.
मलाही केवळ पब्लिक चॉइस आणि लाइकेबल पर्सनॅलिटी यावर सूरज जिंकावा असेच वाटतेय. खेळ दिसला नाही तर नाही, कारण तसा तर निकी अरबाज सोडून तो कुणाचाच फार दिसत नाही. आणि आता कमी दिवस उरलेत.
काल सूरज चे सगळ्या मुलांना खाऊ देणे. त्यांच्याशी आवर्जून बोलणे, "शिका, अभ्यास करा" असे सांगणे फार गोड वाटले. ते किंवा मोठ्यांना नमस्कार करणे वगैरेही अजिबात नाटकी नाही वाटले मला. तो तसाच दिसला आणि वागला आहे घरात.
वर्षाचे निकीला व्हिलन म्हणणे आवडले नाही. डिपीचे बायका मुलींसोबत लाइन क्रॉस करणे किंवा त्यांना अनकंफर्टेबल करणे हे आधीही बघितले आहे त्यामुळे मला तो एकूणच आवडत नाही. काल निकीने सांगितले ते साडी मधे नसेल पण साडीवर किडा टाकला असे असेल तरी ते अनकंफर्टेबल करणेच आहे.
त्याची बायको धावत त्याच्याकडे गेली तेव्हा मला वाटले आता मिठीच मारते आहे पण तिने पार पायावर लोळण घेतली एकदम! परमेश्वर भेटला?
बाईई! काय हा प्रकार !! Proud काय एकेक नमुने!
सध्या लोक मस्त लाइट एन्टरटेनमेन्ट मोड मधे आहेत. गाणी, नकला वगैरे. मजा येते आहे.

सुरजने मनी बॅग नको घ्यायला, फॅन्स वैतागतील त्याचे.

दोन तीनदा तो म्हणाला मी विनर होईन. एकदा मी शेवटी आलो घरात, शेवटी ट्रॉफी घेऊन जाईन म्हणालेला, तेव्हा अभिजीत म्हणाला तसं झालं तर आवडेल मला.

सुरजच्या फॅमिलीला बघून डोळे पाणावले, त्यांनी आल्या आल्या चपला काढल्या ते फार आपलं वाटलं. त्याच्या जन्माची कथा फार ट्चिंग. सर्व अगदी मातीतले साधे वाटले. त्यांच्यासमोर सुरज मीच विनर होणार म्हणत होता. बाहेर खूप वोटींग होतंय हे त्याला माहीतेय का. आत्या, बहीणी गोड आहेत. लहान बहीण जास्त आवडली मला.

पॅडीदादांच्या मुली छान आहेत. मोठी मॅच्युअर आहे, धाकटी सुरज म्हणाला तशी गुड्डी आहे.

निक्कीचे आई बाबा आलेले त्यात आई अखंड बोलत होती, बाहेर मुलीवर काय संस्कार केलेत असं वाचून आलेली त्यामुळे मुलीला सारखं, मी तुला असं शिकवलं का करत होती. अरबाजची आई काय म्हणते ते सांगितलं, तो बाहेर एंगेज आहे सांगितलं, तो असा वागतो त्यामुळे त्याची आई आजारी पडली सांगितलं, फार फार अजून सांगायचं होतं, पण बिग बॉसनी अडवलं. वडील मितभाषी आहेत, कमी पण छान बोलले. रहायला अपटूडेट आहेत.

अंकीताच्या बहीणी मस्त बडबड्या, त्या मालवणीत बोलत नव्हत्या, बिग बॉसची इच्छा होती त्यामुळे बिग बॉसने मालवणी सुरु केलं. बाबा मितभाषी, एकदम साधे. एकंदर पुरुष कमी बोलले, त्यातल्यात्यात डीपिचे बाबा बोलले. ते एरवी बोलत नाही फार, आई खूप बोलते असं डीपी म्हणत होते.

राखी आणि बिचुकलेला आता शेवटी का आणतायेत.

जान्हवीला संतूर गिफ्ट मिळालं, ती चांगली नाचली, प्रश्नाचं उत्तर चांगलं दिलं. मला अंकीताही आवडली त्यात.

आजचा दिवस निकी आणि सूरजच्या फॅमिलीने गाजवला !
निकी मराठी नाही असा जर कोणाला डाउट असेल त्यांचा क्लिअर झाला असेल आज, एकदम टिपिकल मराठी काका काकूं सारखेच होते तिचे आईबाबा.
निकी सुद्धा आई बाबांशी बोलताना बर्‍यापैकी फ्लॉलेस मराठी बोलत होती.
तिची आई टिपिकल रिअ‍ॅलिटी शो आई आहे , फुल ऑन निकीच्या इमेज क्लिनिंगचे प्रयत्नं सुरु केले तिनी आल्या आल्या लग्गेच, वर्षा उसगावकरची माफी मागितली, पब्लिकचे शक्य होतील तेवढे सगळे फिडबॅक पोचवले तिने निकीला आणि उरलेले काही दिवस कन्टेन्ट मिळावं म्हणून अरबाजह्च्या फॅमिली रिअ‍ॅक्शस्न्स सांगून काड्याही टाक्॑ल्या Proud
तिची आई इतके दिवस अरब॑झचे कौतुक करत होती, आता अभिजतचे गुण गात होती !
वडिल मात्र किती सिंपल, नो शो ऑफ कॅटॅगरी होते , बोलण्याचा व्हॉल्युम कमी कर म्हणाले Proud
सगळ्यात जेन्युइन सूरज आणि त्याची फॅमिली, ना खोटे रडणे ना खोटे वागणे, फक्तं आनंदी आनंद आणि अभिमान !
मिरर वॉल्सच्या बाथरूम मधे सूरज कुठे चुकला होता पहिल्या दिवशी ते बघायला गेल्या आणि त्याही बिचार्‍या गोंधळून चुकल्या, सो क्युट !
सूरजने पण फॅमिली येणार म्हंटल्यावर रडारड न करता फक्तं टाळ्या वाजवल्या , हे एकच फॅमिली रियुनियन खूप खरे, जेन्युइन वाटले, मनाला भावले !

राखी निक्कीला घ्यायला येतेय का.

काल निक्कीने वर्षाताईला तोंडावर सांगितलं ते आवडलं, वर्षाताईनेही चूक कबूल करून सॉरी म्हटलं, ते ही आवडलं.

अन्जु आणि दीपांजली यांच्या पोस्टला मम.

त्यांनी चप्पल काढली येथेच खुश झालो. पुढे तर कुठलाच मेलोड्रामा नाही की कुठली टीप देणे नाही की कसला आविर्भाव नाही. पूर्ण वेळ भारावलेल्या होत्या तिघी.

घरात टीव्ही असणे ते टीव्हीतल्या घरात असणे हा खूप मोठा प्रवास सूरज ने केलाय, त्या साठी त्याचे कौतुक आणि अभिनंदन.

वर्षा आजी यांची बहीण आली तेव्हा फक्त निक्कीच्या डोळ्यात पाणी होते, जान्हवी, पंढरीनाथ, अंकिता तर जळत होते, मग थोड्या वेळाने त्यांना उपरती झाली आणि चेहरा पडल्याचे/रडण्याचे भाव दिसले. दाखवायला या तिघांचे दात वेगळे आहेत आणि खाण्याचे वेगळे. अभिजित ची छोटी मुलगी आणि जान्हवीचा मुलगा यांच्या सोबत सूरज अगदी मिसळून गेला होता पण तेच पंढरीनाथच्या मुलीसोबत अंतर ठेऊन होता. त्याला सगळे कळते फक्त कदाचित यांच्या सारखा तो सो कॉल्ड सोफास्तिकॅटेड नाही म्हणून त्याला चालीरीती कळत नाही असे नाही. थोडे पैसे हाताशी आले म्हणून आकाश ठेंगणे होत नाही हे त्याला माहिती आहे. अंकिता त्या बाबतीत माज असलेली वाटते. फॅमिली डे ने मजा आणली.

आज धक्का होणार नाही का? श्री बिचुकले आणि राखी घरात येणार आहेत, दोघेही धमाल आणतील. एलिमिनेशन यांच्या मार्फत करवतील. दोघे बाहेर येताना दोन लोकांना बाहेर आणतील.

निकी च्या आईबाबांनी मस्त सिक्सर मारले. वर्षाताईंना तू ओळखत नाहीस पण आम्ही ओळखतो म्हणाल्या. बाबा म्हणाले किती मोठ्यांदा बोलतेस जरा हळू बोलत जा. मस्त आहेत बाबा तिचे. अरबाज चॅप्टर घराच्या बाहेर जायच्या आत बंद करून टाकला निक्कीने. बीबॉ ने बहुतेक मुद्दाम हे सांगायला सांगितलं असेल का ? निकी अरबाज स्टोरी स्क्रिप्टेड होती नक्कीच आणि आता संपवली.
सुरज अचानक नीट आणि भरपुर बोलायला लागलाय. गावाकडची साधीसुधी फॅमिली मस्तच. त्यांच्यासाठी हे सगळं स्वप्नच असणार.
पॅडी दादांची मोठी आवडली. मोठी मुलगी मस्तच. अंकिताच्या बहिणी गोड आहेत.

https://www.facebook.com/marathiiWorld/videos/3855311478059669/?mibextid...

अरबांच्या मते अंकिता, पॅडी , जान्हवी कन्फ्यूज्ड आहेत, धक्का मारून इथवर आलेत, तर वर्षा स्मार्ट आहे Lol

हाही खोटं बोलतोय की अंकिताला एक चान्स मिळाला ( फसवं एव्हिक्शन).

हिंदी बिग बॉसच्या रील्स दिसतात, त्यात निक्की ओळखता येऊ नये इतकी वेगळी दिसतेय. आवाजही सौम्य आहे.

राखी शो सुरू झाला तेव्हा आजारी होती,हॉस्पिटलमध्ये होती,म्हणून वाईल्ड कार्ड म्हणून लोकांची डिमांड असताना आणल नसेल.
आता बरी झाली असेल,बिचुकले तसे कधीही तयार असतात यायला.म्हणून आणत असतील.
रितेश लंडन का कुठेतरी शूटींग मध्ये बिझी आहे म्हणून आजही धक्का नसावा.शूटिंग च्याच कारणाने ममांनी होस्टिंगला नकार दिला होता ना,मग हा तर बिझी असतोच ना,शुटिंग अचानक ठरत नाहीत,मग याला माहित नाही का?
असो.
फँमिली वीक संपला,आणि आता गेस्ट म्हणून राखी आणि बिचुकले.पब्लिकला इंटरेस्ट राखी विरोधात निक्की यामध्येच असेल.
पण सिझन संपता संपता एकंदरीत मराठी बिबॉसच्या भवितव्यावरच गदा आली आहे.
सिझन फोर मध्ये व्हिलन लोकांना आणल,वोटिंग ट्रेंड फॉलो नाही केला म्हणून प्रेक्षक संतापले
यावेळी वोटिंग ट्रेंड फॉलो केला,धक्का गाजला ,टीआरपी मिळाला तर शोच बंद होत आहे सत्तर दिवसात.
म्हणजे नक्की मराठी बिबॉस कस आणि कुठल्या क्रायटेरियावर चालवायच ह्याचा अभ्यास आधी करावा लागेल मेकर्सना.
हिंदीची कॉपी करायची की नाही.कारण तिथे संस्कृती वगैरे मोजपट्टी नाही.मारहाण केलेलेही घरात राहतात.ते इथे चालत नाही.
दुसर,सिनियर सिटिझनला आणून तो काहीच करणार नसेल तर त्याला मिनिमम गँरेंटी किती आठवड्यांची द्यायची.
मराठी बिबॉस असताना मुळात मराठी नसणार्या एरिनासारख्या कंटेस्टंटला किंवा अरबाजसारख्या कंटेस्टंटला आणायच का,निक्कीसारख्या शो चा फोकस
स्वत:भोवती ठेवणार्या कंटेस्टंटला केवळ टीआरपी साठी आणून प्रत्तक्षात विनर करताना संस्कृती ची मोजमाप लावून भलत्यालाच विनर करायच यावर शो चालेल का,जो आता चालला नाही, निक्की नसती तर पिकनिक गँग आणि
सूरजसाठी शो कोणी पाहिला असता का,
या सगळ्यांचा विचार करून मगच पुढच्या सिझनचा विचार करावा लागेल,तसच हिंदीला क्लँश करायच की नाही की आयपीएल बरोबर चालू करायच इथपासून तयारी करावी लागेल.
जर हे काहीच जमणार नसेल तर बंदच केलेला बरा.

अभिजीत बिचुकले + राखी सावंत = अभिजीत सावंत Happy
काय योगायोग आहे.
बिगबॉसचा सांकेतीक इशारा - विनर बहुतेक अभिजीत असावा Wink

हल्ली इतकं सोपं झालंय आणि रितेश फॉरेनला गेलाय असा राग आळवतात, अरे तो तिथून अर्धा तास, तासभर काढून स्काईप वगैरेवरुन विकेंड वारात सामील होऊ शकत नाही का.

बिग बॉस संपतंय हे एक प्रकारे बरंच वाटू लागलंय. वाईट फक्त बॅकस्टेज कामगार स्टाफसाठी वाटतं, त्यांचं काम एक महीना आधी संपणार. भाग घेतलेल्यांना कुठेना कुठे काम मिळत राहील, त्यांना इन्कम मिळत राहील.

वाईट फक्त बॅकस्टेज कामगार स्टाफसाठी वाटतं, त्यांचं काम एक महीना आधी संपणार.

शंभर टक्के योग्य मत, पण निर्माते हा विचार करत नाहीत, त्यांना फक्त हिंदी बकवास बॉस च्या मागे मागे फिरायचे आहे. आणि मग याच लोकांच्या मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळाल्या नाही की गळे काढायचे.

रितेशचा पळपुटा बाजीराव झालाय Biggrin सुपरफ्लॉप होस्ट , पुन्हा असल्या फुसक्या होस्टला आणु नये बिबॉने !
कमिटमेन्ट करता येत नाही तर ठेवला कशाला असला होस्ट !
शो लवकर संपतोय म्हणून पळाला असणार लंडनला शूटींगसाठी, शेवटचा विकेन्डचा वार खरं तर धुमधडाक्यात झाला पाहिजे पण हा विकेन्ड पण होस्टलेस .. कम्प्लिट फेल झालाय हा सिझन , शेम ऑन कलर्स, केदार शिन्दे अ‍ॅन्ड टिम !

बिचुकलेने जाम बोअर केलं. राखीने मजा आणली.

थत्तेही बोअर, गोड गोड गुडी गुडी चाललेले.

बिचुकले आमच्या इथून उभा होता, आम्हाला लक्षातही नव्हतं, पॅडीदादा योग्य विचारत होते, तर कसला चिडला, उगाच बडबडत बसला त्यांना. डॉक्टरेट ह्याला कोणी दिली हे मी म्हणत होतेच, तो प्रश्न विचारला दादांनी तर दिल्लीहुन मिळाली, कुठली युनिव्हर्सिटी तर सांगता येईना.

धन्य ह्याला मानद डॉक्टरेट देणारे आणि अति भाव देणारे बिग बॉसही धन्य.

डॉ बिचुकले ला घरच्यांची शाळा घ्यायला पढवून पाठवलेलं तर पॅडी दादांनी त्यांचीच शाळा घेतली हा हा हा हा...
मज्जा आली मला बघायला.
बिचुकले डॉक्टर ? याला काय अर्थय... मला पण व्हायचंय डॉक्टर ... कुठे मिळेल म्हणे पदवी Wink
6 पर्यंत तरी कशाला ताणायचं ? उद्याच संपवायचं ना बीबॉ . अगदीच बोअर झालं आज. राखी 2-4 दिवस राहायला अली असे वाटले होते पण उगीच रितेश ची जागा भरायला लोक आणतायत. पुढचा मराठी सिझन येणार नाही हे नक्की

राखीने धमाल आणली आणि पॅडीने बिचुकले आल्यावर !
सगळ्यांनी येऊन अभिजीत, निक्की आणि सुरजची स्तुति केली त्यावरून दिसतच आहे टॉप ३ कोण ते !
पुन्हा एकदा , मला निकी जिंकली तरी चालेल पण अभिजीत नको , चॅनलचा लाडका Uhoh

राखीने अपेक्षेप्रमाणे धमाल आणली. बिचुकले पण वेगळ्याप्रकारे करमणूक करून गेला. पॅडी ने त्याला सारकॅजम ने मारले.
२ आठवडे तेही फिनाले आधीचे भाऊचा धक्काच नाही, एकूण एंड ला सगळा फारच फियास्को झाला

मला अरबाझ बाहेर म्हणाला तसं व्हावं असं वाटतेय. निक्की, सुरज top 2 असतील आणि सुरज जिंकेल.

मला निक्की जान्हवी सोडून कोणी जिंकले तरी चालेल.

अभिजितपेक्षा सुरज जिंकला तर आवडेल, दोन आठवडे सावंत थंड थंड दुखापतीमुळे, सुरज चांगला खेळला.

अभिजीत तिसरा येईल बहुतेक.

निक्कीचं बाईई हा काय प्रकार आणि सुरजचं झापुक झुपुक बाहेर खूप गाजले.

मला अभिजीत सर्व मेकर्सचा लाडका आणि जान्हवी चॅनेलची लाडकी वाटते, अगेन मी आले परत जान्हवीवर Lol

मला तर काल पण बोअर झाल.टेस्ट मँच कशी ड्रॉ होणारच असेल तर दोन्ही टीम्सच्या कँप्टन्सना विचारून संगनमताने लवकर संपवतात.तसच ह्या सिझनलाही अजून एक आठवडा कशाला खेचत आहेत.तसाही फ्लॉप आहेच.दोन दिवसांसाठी वेळ बदलत आहेत.कशाला आजच करून टाकायचा ना फिनँले.
कशाला हवा तो रितेश,अनप्रोफेशनल नुसता,त्यापेक्षा ममां परवडले.
साबळे कामचलाऊ म्हणून करेल फिनँले हँडल.
निक्कीने ऑलरेडी पुढल्या आठवड्यात बाहेर गेलेले सदस्य आत आल्यावर माझ ब्रेकडाऊन होईल अस सांगून बिबॉसला पुढची स्क्रिप्ट दिलेली आहेच.त्याच्यावर परत अरबाज निक्कीचा ड्युएट परफॉर्मन्स बिबॉस दाखवणारच.आर्या येईल की नाही शंकाच आहे ,आणि बाकीच्यांमध्ये काही अर्थच नाही.
विनर अजूनही मला कोणीही वाटत नाही.कारण मराठी बिबॉस आहे म्हणून.हिंदी असत तर ट्रॉफी सरळ निक्कीच्या हातात गेली असती,जो काही टीआरपी मिळाला तो केवळ तिच्याचमुळे मिळाला ,निक्की नसेल तर बिबॉस बघणार कोण हे जर जान्हवीच्या लहान मुलाला कळत,आणि तरीही ट्रॉफी सूरज आणि अभिजितला,, एकालागरीब घरातून आल्याने,साधा कसल्याने,संस्क्रुती जपत असल्याने आणि दुसर्याला पहिला आयडॉल म्हणून देणार असतील,तर मग अगदी वर्षाला ट्रॉफी द्यायला हरकत नाही,कारण मग तस बघायला गेल तर थोडाफार गेम आणि कंटेंट तिने दिलाच की.
पण या दोघांपैकी च विनर होणार.
बाकी,एरिना कलर्सवरच्या इंद्रायणी या मालिकेत कँमिओ म्हणून झळकत आहे.
मला निक्कीला पण बघायला आवडेल मालिकेत.बघू तिला मराठीत काही स्कोप मिळतो का?

रितेशला इतकं डोक्यावर का घेतात मराठीत काय माहिती.. unprofessional, bb चा host होऊन उपकार केल्यासारखे त्याने

Pages