बिग बॅास मराठी - ५

Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47

२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Act rider मंदार सुरजच्या गावात जाऊन आला, त्याचा पहिला भाग बघितला, आवडला मला, काही क्षण touching एकदम. दुसरा भाग नंतर बघेन.

अभिजीत किती मूर्ख, पुचाट डबल ढोलकी !! माकडच झालं त्याचं पार. इतकी चिड चिड झाली की पूर्ण पाहू शकले नाही आज.
निकी फुल्ल कोळून प्यायली आहे गेम. शेवटच्या आठवड्यात काय होणार शिक्षा बिक्षा. तिने कामेच करायची सोडली. तिचा न्यूसन्स इतका की इतर कोणी काही करू शकले नाही. आपल्यातच भांडत बसले. तेही तू काम करत नाहीस आम्ही तुला जेवण देत नाही असे का म्हणत नाहीत मला समजत नाही. तीच उलट त्यांना धमकी देते, आता तुम्ही जेवणावर येणार का म्हणून!! मलाच बघताना इरिटेट झाले.

निक्की ला खरंच एक फटका मारायची इच्छा होते राव कधीकधी... इथे टीव्ही वर बघताना इतकी चिडचिड होते तर घरातल्यांचं काय होत असेल..
अभिजीत एकदम कणा नसलेला माणुस... अंकिताची काल दया आली.... डायनिंग टेबल पुसणे हे काय काम असु शकतं...
अंकिता 'जेवण बनवणार नाही' असं का नाही म्हणत ? किंवा माझ्यापुरतं मी बनवेन तुमचं तुम्ही बघा असं म्हणुन हात झटकुन टाकायचे...
निक्की बाकीच्यांत भांडणं लावुन मस्त मज्जा बघत हसत बसली..
आरामात टिकिट टु फिनाले ची उमेदवार झाली... आणि टास्क पण असा दिला की जिंकली पण आरामात... काल का नाही शक्ती चा टास्क दिला ? सुरज जिंकु शकेल असा टास्क का नाही आणला ? निक्की चं काय साटंलोटं आहे कोण जाणे बिबॉ सोबत...
सुरज ला १ ही शब्द न बोलता ६ लाख मिळाले.. सगळे लोक खरंच मठ्ठ आहेत.. कोणत्याही निकषात न बसता सगळ्यांनी एकमताने सुरज ला ६ लाख कसे काय दिले ? अभिजीत, अंकिता, जान्हवी कोणीही ६ लाखांसाठी भांडले नाहीत ? इथे जर निक्की असती तर भांडुन भुस्कट पाडलं असतं घरात की मीच कशी ६ लाखांसाठी योग्य आहे. सुरज जिंकणार असंच वाटतंय आता मला...

सुरज ला १ ही शब्द न बोलता ६ लाख मिळाले
सूरज ला नाही, विजेत्याला ही रक्कम मिळणार, सूरज ला फक्त टास्क पुरती किंमत ठरली.

सगळ्यांनी एकमताने सुरज ला ६ लाख कसे काय दिले ? अभिजीत, अंकिता, जान्हवी कोणीही ६ लाखांसाठी भांडले नाहीत

म्हणून तर बी टीम बावळट टीम आहे, कॅप्टनशिप टास्क मध्ये माघार, नॉमिनेशन मध्ये स्वतच्या टीम मेंबर ला नोमिनेट करणे यामुळे निक्की सगळ्यात उठून दिसते. भलेही तिला विजेती करणार नाहीत पण शो फक्त आणि फक्त तिच्यामुळेच चालला. तिला कितीही नाव ठेवा ती या शो ची स्टार परफॉर्मर आहे. कदाचित यामुळे तिला पाहिले तिकीट मिळाले.

निक्की अरबाझमुळे पहिली फायनलिस्ट ठरली. त्यांच्या किटीतले पैसे त्याने निक्कीला दिले. तो‌ दोनदा कॅप्टन झाला. त्यालाही आणखी कोणी दिले असतील. ते सगळे पैसे मिळाल्याने निक्की श्रीमंत झाली.

हे लोक सूरजला handle with kid gloves. आता फायनलला तरी त्याला equal treatment करा की.

या सर्वात टॉप ७ मधे येण्याची अज्जिबात लायकी नसलेला सर्वात पुचाट , फट्टु माणुस म्हणजे अभिजीत.. इथपर्यन्त का आणि कोणाच्या कृपेने आलाय बिबॉच जाणे , अरबाझच्या जागी या माकडाने बाहेर जायला हवे होते Uhoh
सध्या अन्किता बेस्ट खेळतेय आणि मुद्देही बरोब्बर मांडतेय , मला ती आवडेल टॉप २ मधे सूरज बरोबर पण बिबॉ तिला जाऊ देणार नाहीत पुढे Sad
आज ६ किंबा ४ लाखा साठी अन्किता /जान्हवी/अभिजीत्/डीपी कोणीच नाही अडून बसले, मेघाचा टास्क आठवला, ती १० लाख सोडून एक शब्दही ऐकून घ्यायला तयार नव्हती !
बाकी निकी तर जाणारच होती फिनालेत, बिबॉने थाली मे सजाके अरबाजह्च्या जीवावर तिला फेवर दिला आणि ती जिंकेल असा टास्क दिला, युट्युअबवर ऐकल कि हा टास्क ती खतरोंके खिलाडी मधे खेळली आहे !

निक्कीला शो स्वत:भोवती ठेवता आला कारण अरे ला का रे करणार तिच्यासमोर कोणी आल नाही किंवा बिबॉसने आणल नाही किंवा आणलेल्यांपैकी कोणी तस खेळल नाही,एकूण बिबॉसच आपटला सदस्य निवडण्यात ,पर्यायाने सिझन पण आपटला.निक्कीला काढताही येईना,नाहीतर मग पाच आठवड्यांंचाच करावा.लागला असता.
त्यामुळे सेटिंगप्रमाणे निक्की ही फिनँलेमध्ये असमारच होती,त्या हिशोबाने सगळ सेट केल.गेल.
नाहीतर फिनँलेचा उमेदवार ठरवताना कॉईन्सचा निकषच हास्यास्पद आहे.नंतर ती टास्क छान खेळली,सूरज कसाही खेळत होता.
काल मला वाटत अभिजितने ट्रॉफी घालवली ,ड्युटी विषयात निक्कीसमोर लाचार वाटला,आणि फ्लँगमध्ये त्याने काय केल आणि का केल कळलच नाही,आरामात आणता आले असते ,पण नाही आणले.नंतर टिकिट टू फिनँले टास्क मख्खासारखा बघत होता,मला हा कधीच आवडला नाही,पण आयडॉलची क्रुपा कामी आली तर सांगता येत नाही,पण मला नाही वाटत हा नशविनर होईल.
अंकिता मुद्दे छान मांडते,टास्कही खेळली.पण विनर नाही करणार,पँडी हवे होते रेसमध्ये ,पण त्यांनाही काढल.
आता कोणाला विनर करतात.हे बघायच.
बाकी,अंकिताला बाहेर मराठीत तरी छान स्कोप आहे,अँक्टिग फिल्ड मध्ये.येतील तिला ऑफर्स.

निक्की चं काय साटंलोटं आहे कोण जाणे बिबॉ सोबत... >>> हिंदी फायनल पाचमधे आलेली, तिला फायनलमधे नेण्याची गॅरेंटी देऊनच आणलं असणार इथे. एक कोणीतरी या शोत असंच असतं की, ट्रेंड झालाय आणि तो स्पर्धक फायनलला जातोच. त्यालाही माहीती असतं की तो विनर नाही होणार पण शेवटपर्यंत पैसे मिळणार. अर्थात निक्की टास्क चांगलाच खेळली शेवटचा त्यामुळे क्रेडीट जातं तिला, तो कठीण होता तसा.

निक्की अरबाझमुळे पहिली फायनलिस्ट ठरली. >>> हो हेच मी सारखं म्हणत होते काल. मी तिचा शॉट नाही बघितला, ही कशी पोचली फिनालेत तेव्हा नवरा सांगत होता की तिच्याकडे जास्त म्युचअल फंड पॉइंटस होते. ते अरबाझ मुळे होते म्हणून ते देऊन फिनालेत जाऊ शकली.

अभिजीत टॉप ३ तही येऊ नये खरंतर पण तिसरा असेल. सुरजने पैसे घेऊ नयेत, ट्रॉफी त्याचीच आहे.

सध्या अन्किता बेस्ट खेळतेय आणि मुद्देही बरोब्बर मांडतेय , मला ती आवडेल टॉप २ मधे सूरज बरोबर पण बिबॉ तिला जाऊ देणार नाहीत पुढे >>> अगदी अगदी. मुलींना देणार असाल आणि सुरजने पैसे घेतले तर तिला विनर करा असं वाटू लागलं आहे. त्या अभिजीतला तीनात ठेऊ नका.

आज ६ किंबा ४ लाखा साठी अन्किता /जान्हवी/अभिजीत्/डीपी कोणीच नाही अडून बसले >>> बावळट आहेत एक नं. तरी निक्की सांगत होती अभिजीत तू सहा लाख घेशील वाटलेलं. तिथे सुरज मस्त अडून बसला, तो नंतरचा टास्कही मस्त खेळला. त्यामुळे योग्यच केलं. जान्हवीचा स्टॅंड योग्य होता पण पाटी फाडून देणं चुक होतं.

हा टास्क ती खतरोंके खिलाडी मधे खेळली आहे >>> या बाईसाहेब तिथेही जाऊन आल्यात. ही हिंदी चॅनेलची लाडकी दिसतेय.

एक.नोटिस केल.का,जान्हवीच्या एव्हीचा प्रोमो नाही,म्हणजे उद्या तिला काढणार का?पण वोटिंग उद्यापर्यंत आहे,आणि एव्ही आधीच शूट करतात,म्हणजे यांना आधीच माहित असत हे क्लिअर झाल,
हे आधीपासूनच ठरवतात.

बिबॉने निकीची जर्नी सर्वात मन लाऊन बनवली होती, आर्याकडून कानाखाली खाल्ली हा सीन मस्ट होता तो नाही घेतला.
अन्किताचीही जर्नी मला आबडली, तरी अजुन मोठी हवी होती.
वर्षाच्या जर्नीत कितीतरी गोष्टी टाकल्याच नाहीत, मदमस्तं माजोर्डी , घोरपड, ब्रम्हांड आठवले, शरीरसौष्ठव, असे अनेक शब्दं असलेले सीन्स दाखवलेच नाहीत, आर्या बरोबर बॉन्डींग दाखवले नाही.
अभिजीतची जर्नी मी पाहिली नाही, अस्ला फालतु पुचाट माणुस फिनालेत उभा आहे हे मान्यं नाही मला, आज अरबाझ असता तर त्याची जर्नी जास्तं इन्टरेस्टींग झाली असती.
जे ऐकल त्यावरून अभिजीतची जर्नी ही सर्वात मोठी १४ मिनिटांपेक्षा जास्तं होती म्हणे, आन्किताची फक्तं ८ मिनिटे Uhoh
निकीची १३ आणि वर्षाची ११ मिनिटं.

उद्याचा प्रोमो नीट बघितला नाही, नव्हतं का तिचं.......
आजच्या प्रोमोमध्ये सूरज आणि डीपीची जर्नी दाखवली,पण जान्हवीची नाही दाखवली.
सोमिवर काही ठिकाणी जान्हवी एक्झिट झाल्याची न्यूज आहे.अफवाही असेल पण वर्षा आणि जान्हवी बॉटम टू मध्ये आहेत,वर्षाचे दहा वीक्स रविवारी च संपत
आहेत ज्या दिवशी फिनँले आहे.
त्यामुळे तिला ठेवतात की काय?
दुसरी पण एक न्यूज आहे की रितेशची फिनँलेमधून पण एक्झिट.
हे पण खर असेल तर कुठल्या बेसवर हा सिझन एवढा हिट आहे,रेकॉर्ड ब्रेकिंग आहे अस म्हणत आहेत.
निक्की आणि सूरज टॉप टू मध्ये जातील अस वाटत आहे कारण या आठवड्यातल्या खेळावरून खुद्द अभिजितचे काही चाहतेच त्याच्यावर नाराज आहेत.
सूरज आणि निक्कीमध्ये जर बिबॉसच्या संपूर्ण खेळाचे निकष लावले तर मग ट्रॉफी निक्कीकडेच जायला हवी कारण सिझन जो काही हिट गेला तो तिच्याचमुळे. मग ती निगेटिव्ह का ठरेना.काल पण अभिजितच्या जर्नीमध्येही ती होतीच.

पण सूरजलाच करतील जर पुढचा सिझन आणायचा असेल तर प्रेक्षकांचा कौल.बघावाच लागेल.

लोकं रीतेशला जाम नावं ठेवतायेत, म मां कॅन्सर पेशंट असूनही कामात कसूर करत नव्हते आणि हा पळाला.

सूरज आणि निक्कीमध्ये जळ बिबॉसच्या संपूर्ण खेळाचे निकष लावले तर मग ट्रॉफी निक्कीकडेच जायला हवी >>> निक्की म्हणाली आहे ना, ए टीमच्या कोणालाही मी ट्रॉफी उचलू देणार नाही, मला नाही मिळाली तरी चालेल मग तिला कशाला ट्रॉफी. एनिवे निक्कीने सिझन गाजवला हे खरं पण ट्रॉफी सुरज किंवा अंकीताला मिळावी, सुरजलाच मिळावी असं वाटतंय मला पण त्याने मनी बॅग उचलली तर अंकीताला मिळावी. त्याने मनी बॅग अजिबात उचलू नये. परवा कसं सहा लाख पाटी द्यायला तयार नव्हता अभिजीतला तसंच ट्रॉफी कोणालाही देऊ नये.

नेक्स्ट सिझन पन्नास दिवसांचा ठेवा, नाहीतर ठेऊ नका.

ए टीमच्या कोणालाही मी ट्रॉफी उचलू देणार नाही, मला नाही मिळाली तरी चालेल मग तिला कशाला ट्रॉफी.
<<<
स्पिकिंग ऑफ दॅट हे वाक्यही हवे होते निकीच्या जर्नीत , याशिवाय जान्हवी निकीची आधी मैत्री मग कडाक्याची भांडणं आणि निकीने तिला इग्नोअर करणे हवे हिती.

अच्छा.पण प्रोमोत दाखवली नव्हती.म्हणून वाटल तस.पण एकंदरीत जान्हवी एकदम बँकफूटला गेली किंवा बिबॉसने नेल अस वाटत नाही आहे का?

जान्हवीचे निक्की साठी प्रेम पुन्हा उफाळून आलेय आणि निक्की आता पुन्हा एकदा जान्हवीची सख्खी मैत्रीण झाली आहे. लोकांना येडे बनवण्याचे काम आहे सगळे. निक्कीला गेम पूर्ण कळतो, ती तर जान्हवीला पण गेम समजवते.

वर्षा आजी, अभिजित, अंकिता आणि निक्की अश्या क्रमाने स्पर्धकांना जर्नी दाखवली आपल्याला दाखवतांना वर्षा आजी, निक्की, अंकिता आणि अभिजित असे दाखवले. असे का केले असेल, त्यातही अभिजित आणि निक्कीची जर्नी बऱ्यापैकी कॉमन फुटेज असलेली होती. ओव्हरऑल एपिसोड फारच बोर होता. जर्नी दाखवली ती जागा (रेड बल्ब स्टुडिओ - https://maps.app.goo.gl/g6osJ5R5AE46ocME8) ते फिल्म सिटी असा स्टुडिओ बाहेरचा प्रवास स्पर्धकांना करावा लागला हे या वेळचे नावीन्य. आजही उरलेल्या तिघांची जर्नी दाखवणार, उद्या एक एलिमिनेशन होणार आणि टॉप ६ फिनालेला जातील. फिनालेमध्ये MF कॉईन्सचे काही पैसे मिळतील आणि १४ लाखात काही भर पडेल.

मला कोणाचीच जर्नी चांगली बनवली होती असे वाटले नाही. पाट्या टाकल्या होत्या. निकीची पण अजून चांगली होऊ शकली असती. सगळ्यांचेच महत्त्वाचे मोमेन्ट्स मिस केलेत. क्रिएटिव्ज कोण आहेत ते बोअर आहेत यावेळी.
आणि मुख्य म्हणजे अजूनही हिस्टॉरिक, रेकॉर्डब्रेकिंग असे कशाला सतत प्रमोट करताहेत ? यासगळ्या फियास्को नंतर तसे म्हणणे हेच पथेटिक वाटतेय. ७० दिवसात अचानक गुंडाळावा लागणे, होस्ट चे पळून जाणे यावर पांघरुण घालतायत का बिबॉ?!!

७० दिवसात अचानक गुंडाळावा लागणे

हे हिंदी बिबॉ साठी, टीआरपी चांगला आहे म्हणून हिंदी शो चालणार नाही याची भीती आणि हिंदी समोर मराठीने मान झुकवली.

जान्हवीची जर्नी चांगली दाखवली, सर्व रंग दाखवले.

सुरजच्या जर्नीने डोळ्यातून पाणी आणलं, बरंच त्यातलं हुकलेलं, हाच जिंकावा असं वाटतंय, गणपतीबाप्पा मोरया.

सुरज जिंकावा असं मला म्हणावसं वाटेल असं कधी वाटलं नव्हतं पण आजची त्याची फिल्म बघून आता मनापासून वाटतेय कि पूर्ण सिझन साधा सरळ राहिलेला, कधीच कोणाला दुरुत्तरे किंवा कट न करणारा पण टास्क मध्ये 100% देणारा सुरज च आता जिंकूदेत

अन्किता गेली असे दिसतय ट्विटर वर , आता मात्र टाटाबायबाय या सिझनला , कोण जिंकतय काही फरक पडत नाही.
इतके सपोर्टर्स असून अन्किताला प्रॉपर ट्रॅप रचून कुचकी कपटी विशेषणं देऊन काढता आणि जगातली सर्वात फेक जान्हवी, शून्य सपोर्ट असलेली वर्षा आणि वर्थलेस स्पाइनलेस अभिजीत यांना हिरो बनवता, आय डोन्ट थिंक यांनी पुढचा सिझन काढावा !
शेम ऑन केदार शिन्दे अ‍ॅन्ड मेकर्स फॉर स्पॉयलिंग सिझन ५ !
Btw अन्जुच्या लाडक्या जनहवीची जर्नी सर्वात मोठी तब्बल १८ मिनिटं दाखवली म्हणे Uhoh

Lol , दाखवा पण ट्रॉफी देऊ नका. टॉप 3 ही नको. ती चॅनेलची लाडकी आहे, तिला फायनलला नेणार, इमेज क्लिन करणार हे मी ती जेलमध्ये असल्यापासून सांगत होते.

अंकिता का गेली, टॉप 3 मध्ये हवी होती. तिच्याविरोधात ह्या विकमध्ये दोन व्हिलन बाया एकत्र आल्या आणि टार्गेट करत राहिल्या Sad .

अंकिता सुरजवर मात्र कधी कधी उगाचच आगपाखड करायची. अभिजित मात्र ठाम म्हणत होता तो सहा लाख डीझर्व्ह करतो. ह्या गोष्टी सुरज फॅन्स बघत आहेत, ते नावं ठेवायला येतात अंकिताला. तरी अंकिता टॉप 3 मध्ये हवी आहे मला आणि त्या अभिजीतला काढा पाचव्या नंबरवर, तो तीन आठवडे injured बसून आहे.

अंकिता एव्हिक्ट झाली ही कन्फर्म न्यूज असेल तर नक्कीच गंडला हा सिझन.
अगदीच होपलेस सिझन.
हा बहुधा शेवटचा सिझन असावा.
आजचा भाग पाहिल्र्यावर अभिजितला जाऊन दोन द्याव्याश्या वाटत होत.
मला वाटत ,निक्की मनी बँग घेईल,सूरज
आणि अभिजित लाईट्स ऑफ करतील
आणि आयडॉलला ट्रॉफी देतील.
अभिजितलाच विनर करायच ठरल असाव.म्हणून इंज्युरी असूनही टास्क न खेळताही बिबॉसने घरात ठेवल.
रविवारी 9वाजता हिंदी बिबॉसचा प्रिमियर आहे कम्हणून हा बहुतेक सातला चालू करून दोन तासातच गुंडाळतील
रितेशला कदाचित हे सगळ पटल नसाव म्हणूनही माघार घेतली असेल काय माहित?
अभिजितपेक्षा मग मला निक्की चालेल विनर पण हा नकोच.

शेवटी तरी वोटिंग बघा. सुरज, अभिजीत पाठोपाठ अंकिताला वोटिंग असायचं, असं कसं काढता तिला.

अभिजित नकोच टॉप 3 त. त्याला तर फायनलला नेऊन पहिलं काढा, ह्या आठवड्यात नवऱ्यालाही तो आवडला नाही, आधी आवडायचा.

यावेळी मी वोटिंग केलं नाही कोणालाच. एकदा योगिताला केलेलं, ती फायटर नव्हती.

Pages