Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47
२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हिंदीत जे पडतात ते मराठीत
हिंदीत जे पडतात ते मराठीत स्टार होतात.
राखी सावंत, बस नाम ही काफी है
राखी सावंत, बस नाम ही काफी है. धमाल आणली तिने काल. बिबॉ साठी परफेक्ट सदस्य. कालचा उर्वरित एपिसोड महाबोर. शो लवकर संपवा आता, होस्ट (ज्याला नीट मराठी बोलता येत नाही) सुद्धा पळून गेला, फिनालेला येणार आहे म्हणे.
मी काय म्हणते,महागुरूंना
मी काय म्हणते,महागुरूंना होस्ट म्हणून ट्राय करायला काय हरकत आहे?
भाऊ तर फुस्का बार निघाला.
पण महागुरू तर डान्स रिअँलिटी हिंदी शोचे विजेते आहेत,(आता ते स्वत:ला बिरजू महाराज समजतात ,ते वेगळ),पण डान्स रिअँलिटी शो जज आणि प्रोड्युस केला आहे,सिंगिग रिअँलिटी शोचे परीक्षण करतात,अभिनयस करतात,शेरोशायरी करतात.
आता तर काय स्वत:च्या घामाच्या पैशातून पिक्चर केला आहे.
रिअँलिटी शोमधल्या कंटेस्टंटना शंभर रुपये पण देतात
असा बहुआयामी होस्ट ट्राय केला तर.आणि समजा नाही जमल ,तर काय पन्नास दिवसात पण शो बंद करू शकतात बिबॉस.
आता बिबॉसला सवय झाली आहे.
मी काय म्हणते,महागुरूंना
मी काय म्हणते,महागुरूंना होस्ट म्हणून ट्राय करायला काय हरकत आहे?>>>
जेवढे आहेत तेवढे पण प्रेक्षक नाही राहतील...
आई तुळजाभवानीच्या प्रोमोतल्या
आई तुळजाभवानीच्या प्रोमोतल्या व्हॉइस ओव्हरने केलेल्या घोडचुका- शिव आणि पार्वती मधल्या व चा अपूर्ण उच्चार.
" तुळजाची , आई तुळजाभवानी झाली ," हे " तुळजाची आई, तुळजाभवानी झाली," असं म्हटलंय.
वर्षा , अभिजीत, धनंंजय , जान्हवी सेफ. पंढरीनाथ आउट
अंकिता सेफ.
मी दहा वाजल्यापासून पाहायला सुरुवात केली. निक्की आणि सूरज आधीच सेफ झाले का?
वर्षाची मिमिक्री आवडली.
अरेरे पॅडीदादा एव्हिक्ट झाले
अरेरे पॅडीदादा एव्हिक्ट झाले का, वाईट वाटलं, ते चांगले खेळले, डोकं होतं. डीपी जायला हवा होता. वर्षा असणार शेवटी.
मी बघतेय 9 पासून पण आमच्या tv वर आत्ता दाखवलं ते बाहेर गेले ते.
निक्की सुरज सर्वात आधी सेफ झाले, नंतर वर्षा आणि अभिजीत.
अरबाज गेल्यानंतर निक्कीचा
अरबाज गेल्यानंतर निक्कीचा हुरूप वाढवताना सूरज सोमवारीच म्हणाला होता की पँडीदादा गेल्यावर मला पण रडायला येईल.
यांना रिझल्ट्स पण माहित आहेत.त्या सूरजच्या डोळ्यात पाणी होत का?
अंकिताला कालपासून टारगेट करत आहेत ,पाहुण्यांनी पण केल आणि निक्की तर करतच होती,आता अभिजितपण करणार आहे.
पण अंकिता सुरुवातीपासूनच फेअर खेळण्याच्या नादात पँडी,डीपी,सूरज यांना चक्क नॉमिनेट करत आली आहे,मग आता फिनँले जवळ आल्यावर एकदम कशाला,गेली की ती फिनँले वीक मध्ये.
पँडी एव्हिक्ट होणार हे माहित होतच.मला विनर म्हणून आवडले असते,पण होणार नव्हतेण.पण व्होटिंगमध्ये एवढे खाली नव्हते.वर्षी टॉप 5ची गँरेंटी घेऊन आली असेल तर.सत्तर दिवसात संपवण्याचा निर्णय अगदी योग्य.
आणखी एका सिरियलचा प्रोमो आला.
केदार शिंदे क्रीएटिव्ह हेड झाल्यानंतर त्यांना हा शो नको होता अस ऐकल होत
शो लवकर संपताना एवढ्या सिरियल्स एका वेळी सुरू होत आहे,हे अचानक नाही होत,म्हणजे हिंदी बिबॉस च जे कारण दिल आहे ते खोट आहे का?की
शिंदेशाहीमुळे बंद होत आहे.?
सुपर्णा श्यामने वर्षाचे chara
सुपर्णा श्यामने वर्षाचे chara आणि त्या दुसऱ्या कोणीतरी जान्हवीचं chara परफेक्ट केलं, frm my ponit of view.
वर्षा - सुपर्णा श्याम
वर्षा - सुपर्णा श्याम
जान्हवी - स्नेहल शिदम
निक्की - रोहित चव्हाण
वर्षाची मिमिक्री बेस्ट होती.
महागुरूंना होस्ट म्हणून ट्राय
महागुरूंना होस्ट म्हणून ट्राय करायला काय हरकत आहे?
चालतंय की, मग शोचा टीआरपी 4 नाही थेट 10 होईल.
पॅडीचे एलिमिनेशन पटले नाही.
पॅडीचे एलिमिनेशन पटले नाही. अनफेअर बिबॉ!
घरातल्यांना अपेक्षितच होते की काय? कुणी शॉक झाले नाही. सूरज ने पण फारसे रिएक्ट केले नाही ते नाही म्हटले तरी जरा खटकले. अभिजीत , डीपी सगळे माहित असल्यासारखे उभे होते. अपवाद फक्त अंकिताचा.
त्याची एव्ही पण इतकी लहान आणि फालतू का बनवली होती? सूरज बरोबरचे काही खास क्षण हवे होते. सारकॅजम दाखवायला हवा होता, नुसते एक-दोन टास्क दाखवले.
निकी सूरज ची बाजू घेऊन अंकिताला बोलत होती तो जोक होता मोठ्ठा! इमेज क्लीनिंग च्या टिप्स मिळालेल्या दिसत आहेत. पण या लोकांना तिला उलटून बोलता येत नाही नीट. सूरज पण गप्प बसला. अभिजीत तर युसलेस.
आज वैभव ची मुलाखत वाचली. तो
आज वैभव ची मुलाखत वाचली. तो म्हणे त्या पॅडी -जान्हवी प्रकरणात आर्याच्या आधी तो जान्हवीला बोलला होता आणि तिच्याशी भांडलाही होता तू त्यांना तसं बोलायला नको होतं म्हणून. पण ते एडीट झाले. तसंच त्या नाण्यांच्या टास्क मधे अभिजित चा पाय दुखावला होता तेव्हा बिबॉ ने विचारताच तो म्हणाला होता मी खेळतो अभिजीत च्या जागी. तेही जाऊ दिले नाही आणि हे दाखवलेच नाही. भाऊच्या धक्क्यावर पण रितेश ला त्याने ते सांगितले पण तेही एडिट केले गेले!! हे खरं असेल तर बिबॉ ने पद्धतशीरपणे त्याची इमेज बिघडवली आणि काढले असे दिसते. एकूण खेळखंडोबाच दिसतो आहे सगळा.
पॅडीचं एव्हिक्शन साफ चूक ,
पॅडीचं एव्हिक्शन साफ चूक , एव्ही पण पुअर.. निकीचा नवा माकड अभिजीत सेफ आणि पॅडी अनसेफ अजिबात नाही आवडलं ! सूरज आज अन्किता पॅडीच्या बाजुने बोलला असता तर आवडलं असतं !
निकीला नं २ वर सेफ केलं का ही ही !
मला अंकिता जिंकलेली आवडेल पण क्लिअरली मेकर्स नेक्स्ट तिलाच काढणार असं दिसतय !
सिझन इज ऑल मेस्ड अप!
सूरज आज अन्किता पॅडीच्या
सूरज आज अन्किता पॅडीच्या बाजुने बोलला असता तर आवडलं असतं
आपण फक्त एक तासाच्या एपिसोड वरून अंदाज लावतो, आत काय सुरू असेल हे फार कमी आपल्याला दिसते. सूरज दिसतो तितका भोळा नाहीये, त्याला गेम कळतो, फक्त आधी लिहिले तसे बोलण्याच्या किंवा मल्टी कॅमेरा सेट अप इश्यू असावा. कुठे काय कॅश करावे हे त्याला कळते म्हणून तो इथे बोलला नाहीये. आणि त्याच्या सोबत सगळ्यांचा अंदाज होता की पंढरीनाथ बाहेर जाईल, जो खरा ठरला. अंकिता विजेता होऊ शकते, तसे संकेत पण बिबॉने दिले आहेत. पण त्यापेक्षा जास्त कल अभिजितकडे दिसतोय.
धनंजय, वर्षा आजी यांना का ठेवले हे त्यांनाच माहिती. आता 7 लोक शिल्लक आहेत आणि 2 बाहेर काढायचे. तर त्या पेक्षा 1 मिड विक एविक्शन होईल आणि वर्षा आजी सह टॉप 6 फिनाले मध्ये जातील असे वाटते. काल सारखे सांगत होते तुम्ही पुढील आठवड्यात जाताय फिनाले मध्ये नाही. वर्षा आजीला सुद्धा हे एकदा थेट सांगितले.
रंगात आलेला हा सिझन शेवटाला येताना मेकर्सने पार फिसकटवला. यांना फक्त हिंदी बिबॉ वरती आणायचा आहे.
Dp, वर्षाताईला दादांच्या आधी
Dp, वर्षाताईला दादांच्या आधी काढायला हवं होतं.
वर्षाताई, अभि फायनलची mg घेऊन आलेत असं वाटतंय. निक्की हायेस्ट पेड आणि अभि दोन नंबर वर आहे रहाण्याचे पैसे घेण्यात.
त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट तशीच असतील फायनलची.
सुरज, निक्की, अभिजीत असे असतील बहुतेक top 3 बाकी जान्हवी अंकिता असावी.
मला तर आता १% सुद्धा फॅन्स
मला तर आता १% सुद्धा फॅन्स नसलेल्या वर्षाताईंना ट्रॉफी दिली तरी आश्चर्यं वाटणार नाही
पॅडी दादांना डीपी च्या आधी
पॅडी दादांना डीपी च्या आधी काढले ? अगदीच काहीही...
काल डीपी जाईल अशी खात्रीच होती पण तेच आधी सेफ झाले तेव्हाच पॅडी जाणार हे समजलं...
एकदम बकवास सिझन झालाय हा.. मेकर्स ना पण कळत नाहिये काय करायचं आता.. त्यामुळे बहुतेक १० २० ३० ४०.... जिंकवा म्हणावं आता..
निक्की चं काय कौतुक लावलंय सगळ्यांनी.. निक्की आणि अभिजीत लाईट बंद करतील असं वाटतंय आणि अभिजीत विनर...
खरतर आता कोणीच जिंकलं तरी काहीच फरक पडणार नाहिये...
पहिल्या सिझन ची सर कुठल्याच सिझन ला येउ शकत नाही..
बरं झालं पंढरीनाथना आताच
बरं झालं पंढरीनाथना आताच काढलं. आता फायनल विनर कोण होतो किंवा होत नाही, याचं वाईट वाटणार नाही की धक्का बसणार नाही.
सगळे म्हणतात् सेटिंग आहे , ते दिसतंय. पण दिल है के मानता नहीं असं होत होतं. आता नाही होणार. वेळ वाया गेल्याची फीलिंग आली आहे. मी पहिल्यापासून पाहत नव्हतो, हा धागा वाचून पाहायला लागलो. त्यामुळे माबो जबाबदार
तरी बरं जियो अॅप डाउनलोड करून कोणाला व्होट नाही केलं.
पंढरीनाथ सूरजची जबाबदारी वगैरे घ्यायचं कशाला म्हणतात? एव्हिक्ट झाल्यावर आपण आधी फेक नव्हतो , त्याचा आधार घेत नव्हतो हे सिद्ध करायला म्हणाले असतील. काल त्या पाहुण्यांनी सूरजच्या रॉकेटला त्यांच्या बाटलीचा आधार लागतो म्हटल्याने, थोडं फार परिमार्जन (हे लिहि ताना मला मी वर्षा असल्यासारखं वाटतंय) / रिडेम्प्शन झालं असावं.
सूरज इथल्या कोणाशीही अॅटॅच्ड वाटत नाही. हे चूक आहे असं नाही, पण सगळ्यांनी त्याला खूप सांभाळून घेतलंय. मला तो लाडावलेला, वाया जाण्याच्या मार्गावरचा , उडाणटप्पू मुलगा वाटतो. त्याची क्रेझ का आहे ते कळत नाही. ते झापुक झुपूक पण काही खास वाटत नाही.
फेसबुक फीडमध्ये बिग बॉस रील्सचा मारा वाढलाय. पहिला अरबाझ. त्याचं तयार कपड्यांचं दुकान आहे असं दिसलं. मग मॉडेलिंग. झिरझिरीत शर्ट घालून पावसात गेलं की बॉडी दिसते हे सांगितलं. माझी एंगेज मेंट झाली हे मला आताच कळलं असं म्हणाला आणि लगेच मी मागच्या काही गोष्टी तोडून टाकतोय असंही. जाऊदे मरूदे. त्याने फिनालेमध्ये आपण निक्कीचा डोरमॅट आहोत हे पुन्हा दाखवावं आणि निक्कीने त्याला तिथेही डोरमॅटसारखं वागवावं असं वाटतंय.
आर्याचे इंटरव्ह्यु दिसतात. ती भलतीच खुष आहे.
मेधा घाडेला अभिजीत जिंकावा असं वाटतंय.
मला वर्षाच्या फेक मराठीपेक्षा धनंजयचं कोल्हापुरी आवडतं. पण त्याच्या चेहर्यावरचा वाढता माज डोक्यात जातो.
अभिजीत नको विनर, तो injured
अभिजीत नको विनर, तो injured असून mg मुळे ठेवलाय, त्यापेक्षा votes आणि टास्कच्या आधारे सुरजला करा विनर.
मला कोणालाच वोटिंग करावंस वाटत नाहीये. अंकिता उगाच व्हिलन दाखवतायेत की काय, ती आवडली मला इथे पण विनर म्हणून नाही मनात.
भरत
आमच्यामुळे बघू लागलात त्यासाठी.
हा सिझन वेगळा आहे असे पहिल्या
हा सिझन वेगळा आहे असे पहिल्या दिवसांपासुन म्हणतायत तर आता कोणालाच विनर करु नका म्हणाव

एके वर्षी पुण्यात पुरुषोत्तम करंडक ला विजेता काढला नव्हता.. एकही नाटक त्यायोग्य नाही असं सांगुन... तसं काहीतरी करा म्हणावं ( हे लिहिलंय का मी आधी ? देजावु का होतंय ? )
सगळ्यात मोठा ट्विस्ट
या सिझन ला विनर नाही.. रनर अप सुरज ला करुन टाका....हाकानाका...
आता डायरेक्ट फिनाले बागणार
आता डायरेक्ट फिनाले बागणार आहे...अरबाज गेल्यापासून काहीच होत नाहीये...
यावर्षीचा बिग बॉस खूप म्हंजे खूपच गंडल...
निकी, अरबाज, वैभव आणि जान्हवी सोडले तर कोणीच बिग बॉस ल शोभत नवते.
त्यात ह्यावेळी कोणता प्रेषक वर्ग आहे काय माहित त्यांना अजिबात भांडणे आणि प्रेमाचे त्रिकोण नको आहेत..शिव च्य वेळेला पण हेच झालेले की वैताग आलेले विनी विनी इओकुन...
अरबाज खरंच चांगला प्लेअर बाहेर गेला..
अंकिता आणि जान्हवी विनर म्हणून अजिबात नकोय, निकी व्हावी असं मनापासून वाटतंय पण होणार नाही...वर्षा खरंच डोक्यात जाते फक्त लगोरी मध्ये अंकिता ल taugh दिली तेवढीच आवडली...
असो आता हिंदी बिग बॉस ची प्रतीक्षा..
प्रचंड टीआरपी असूनही फ्लॉप
प्रचंड टीआरपी असूनही फ्लॉप गेलेला आणि सत्तर दिवसात संपणारा हा सिझन बिबॉसच्या इतिहासातला पहिलाच सिझन असावा.
कोणीही विनर नसावा,या मताशी पूर्णपणे सहमत.
अरबाजला काढल तिथेच उरला सुरला सिझन गेला.
मागच्या सिझन मध्ये बोटाला इंज्युरी होऊनही खेळायला तयार असणार्या तेजूला काढल.
इथे भारताचे पहिले आयडॉल गेले अनेक दिवस कुठलाही टाक ,काम करत नाहीत.तरीही ते सेफ कसे.
सगळाच गोंधळ.
रितेशला तर खर भाव.न देता,साबळेकरूनच होस्टिंग करवून घेऊन चांगला धडा शिकवला पाहिजे .पण बिबॉस तेही करणार नाही.अगदीच लाचार.
माबो जबाबदार
माबो जबाबदार
याला बेक्कार हसलो
(ईमोजी कसे द्यायचे, याचा काही धागा आहे का, keypad मधील ईमोजी दिले तर एरर येतो)
ह्यावेळी कोणता प्रेषक वर्ग आहे काय माहित त्यांना अजिबात भांडणे आणि प्रेमाचे त्रिकोण नको आहेत
वर्षा अजीचे फॅन असतील किंवा त्या वयातील, कारण आता घरात टीव्ही तर फक्त आजी आजोबा बघतात, बाकी सगळे मोबाईल वर OTT बघतात.
निक्की - उर्मट
जान्हवी - घमंडी
अंकिता - कपटी
वर्षा आजी - सीनिअर
धनंजय - स्लो/आळशी
अभिजित - चालू
सूरज - साधा
यातील कोणालाच विजेता करू नका, हेच काय ते या सिझन चे ट्विस्ट असेल. यांना 8 लाख रुपये देणे ही जास्त होईल.
राखी सावंत ही कधीही कुठेही
राखी सावंत ही कधीही कुठेही पाहीली तर चॅनल बदलतो. तिचा सहभाग असलेला एकही बिग बॉस (हिंदी व मराठी) पाहिला नाही. काही रिल्स मात्र पाहिले होते. फारच डोक्यात जाते ही बाई. पण परवा शनिवारी पहिल्यांदा हिने केलेली धमाल आवडली. निकीसमोर ही असती तर निकीच काय पण इतर सगळेही सोडून गेले असते. बिचुकले मात्र एकदम बोअर. त्याला पॅडीने फारच घोळात घेतले. थत्ते सो सो वाटले.
रवीवारी सुपर्णा शाम हिने केलेली वर्षाची नक्कल फार आवडली. हीला (सुपर्णा) कधीच आधी पाहिले नव्हते. आता ही कोण व हीचे इतर काय योगदान आहे ते पाहणे आले.
मला सुरजचे ते गुलिगत व झापूक झुपूक कधीच आवडले नाही. तसेच बर्याच तिथे असणार्या व येणार्या लोकांनाही फारसे आवडत नसावे. उगाचच पब्लिक ट्रोल करू नये म्हणून सुरजचे हे झाझू व गुलिगतचे कौतूक लोकं करतात असे वाटते. तसेच सुरज हा तितका साधा नसावा. येडा बनून पेढा खातोय असे वाटते. त्याची फॅमिली मात्र एकदम साधी होती. त्यांनी आत आल्यावर चपला काढणे वगैरे आवडले.
मी हा सिझन फक्त मायबोलिवरच
सोमिवर कुणीतरी हा सिझन कसा फ्लॉप झाला यावर मोठा लेख लिहलाय तिथे हे सापडल. ..खखोदेजा.

रितेशच शुटिन्ग असणारच होत पण बन्डल शो मुळे म्हणे त्याची इमेज डाउन होत होती त्यामुळे त्याने शो पासुन ब्रेक घेतलाय म्हणे...
या चार्ट नुसार पॅडी सोबतच
या चार्ट नुसार पॅडी सोबतच वर्षा पण एव्हिक्ट व्हायला हवी आहे.
सोमिवरच्या न्यूजनुसार वर्षा
सोमिवरच्या न्यूजनुसार वर्षा दहा आठवड्यांची गँरेंटी घेऊन आली आहे,त्यासाठी तिने स्टार प्रवाहवरचा रनिंग शो सोडला,अर्थात हे 14आठवड्यांच्या हिशोबाने होत.पण तिच्या सुदैवाने शोच दहा आठवड्यांचा झाला,त्यामुळे राहिली आणि पँडी त्याच्या दुर्दैवाने बाहेर गेला.
आता या वीकमध्ये निक्की सोडून सगळे नॉमिनेट आहेत आणि वोटिंग बुधवरपर्यंत आहे,म्हणजे मिडनाईट एव्हिक्शन आहे,तेव्हा काढतात की तिच्यासाठी टॉप 6ठेवून डीपीचा बळी देतात ते ठरेल.
बाकी,आज तिकीट टु फिनँले निक्की मस्त खेळली.
मला एक कळत नाही ,असे टास्क का नाही ठेवत नॉमिनेशन साठी ,बहुमताने का ठरवल जात.
आजचे दोन्ही टास्क किती छान होते.अंकिताच जस्ट हुकल.निक्कीसोबत ती हवी होती टिकीट टू फिनँलेच्या टास्कमध्ये.
जान्हवीचा एक झेंडा तुटला होता त्यासाठी दिलेल.लूज स्टिकच कारण हास्यास्पद होत ,तो उचलतानाच तुटला होता ,पण निक्की तिथे अनफेअर दिसली,तसाही काही उपयोग नाहीच झाला,त्यामुळे तोंडावर आपटल्या दोघी.
किंमतीचा टास्क मला.कधीही आवडत नाही,तो प्रेक्षकांना द्यावा.
अभिजित अगदीच युसलेस आहे.
डबलढोलकीच होता.आज अंकिताच बोलण जरा पटल.
सूरज अजूनही विनर व्हावा अस वाटत नाही.
मला आजचा गाडीचा टास्क अजिबात
मला आजचा गाडीचा टास्क नाही आवडला....एखाद्याने 7 मिनिटात 20 झेंडे आणले असते तरी...तो अंकिताच्या पुढेच राहिला असता...जरी तिने 4 मिनिटात 19 झेंडे आणले असतील तरी...म्हणजे एका extra झेंड्यासाठी 3 min extra लागली असती तरी चालत होते...म्हणजे actually वेळेला नाही तर झेंड्यानाच महत्व होते...आणि त्या मूर्ख निकिची बडबड ऐकत टास्क करणे हाच टास्क होता....बाकी 'तू काहीच entertain केलं नाहीस 'असं जेव्हा निकि म्हणाली तेव्हा अंकिताने मस्त उत्तर दिलं तिला...बिचारी चूप्पच बसली....अंकिता भारी बोलते एकदम.. हुशार पण आहे...ती जिंकली तर आवडेल मला....नाहीतर सूरज जिंकावा...तेवढेच पैसे सत्कारणी तरी लागतील...तिसर्या season मधला ticket to finale टास्क भारी होता वेळ मोजायचा....असा बुद्धीचा टास्क दिला असता तर अंकिताच जिंकली असती...
सुरज, अंकिता गाडी टास्क मस्त
सुरज, अंकिता गाडी टास्क मस्त खेळले. चक्रव्यूह टास्क कठीण दिलेला, सुरजसाठी कठीण होता. निक्की छान खेळली. आज निक्कीला मॉडेलिंग करायला आणि ओरडायला, बिग बॉसने संचालक केलं. ती जान्हवीवर नाही ओरडली
जान्हवी निक्की पहिल्या विकसारख्या फ्रेंड झाल्यात, दोघींची एकमेकींना मदत झाली, आज त्यांचं दोघींचं टार्गेट अंकिता होती.
अभिजीत बेकार खेळला, हाताला लागलं म्हणत बिग बॉसने चांगलंच सांभाळून घेतलं आहे त्याला, आज जान्हवी त्याच्या बाजूने जाम बोलत होती.
सुरज walked म्हणजे पैसे घेऊन बाहेर पडणार असं का, scripted असेल तर करेल नाहीतर इतका मूर्खपणा करणार नाही तो, आज सहा लाख नाही दिले अभिजीतला, स्मार्ट खेळला.
रवीवारी सुपर्णा शाम हिने
रवीवारी सुपर्णा शाम हिने केलेली वर्षाची नक्कल फार आवडली. हीला (सुपर्णा) कधीच आधी पाहिले नव्हते. आता ही कोण व हीचे इतर काय योगदान आहे ते पाहणे आले. >>> अतिपुर्वी ई टीव्ही असताना सुपर्णा 'हे बंध रेशमाचे' सिरियलमध्ये लिड होती, तिचा हीरो अक्षर कोठारी होता. दोघेही आवडायचे पण सिरियल ताणलेली त्यामुळे बंद केली, त्यामुळे पुर्वीपासून ओळखते तिला. त्यानंतर खूप वर्षांनी ती स्टार प्रवाहवर दुहेरीमध्ये उर्मिला निंबाळकरची replacement म्हणून आली. ती ही मी नव्हते बघत. एका मैत्रिणीने सांगितलं होतं की सुपर्णा आलीय. नंतर मध्ये एकदम दुहेरीचा हीरो संकेत पाठक आणि तिने लग्न केलं ही बातमी यूट्यूबवर बघितली म्हणजे फोटो बघितले.
Pages