बिग बॅास मराठी - ५

Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47

२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिजीत फार इरिटेट करतो आहे खरंच . टॉप ३ मधे लायकी नाही अजिबात. आजच एक व्हिडिओ पाहिला त्यात निकी म्हणते आपण दोघे सर्वात कन्सिस्टन्ट आहोत आणि आपला दोन्ही ग्रुप नी फायदा घेतला , आपल्या प्रसिद्धीचा फायदा घेतला, आपल्यामुळे त्यांना फुटेज मिळत राहिले. आणि अभिजीत हो हो म्हणत होता.
अंकिता खरंच गेली असेल तर मेकर्स च्या एकूण नीयत वर शंका घ्यायला लागेल. Uhoh फारच फालतूपणा लावलाय सगळा.

खरोखर अंकिता बाहेर गेली?....finale पर्यंत अजून कितीदा माती खाणार हा bigg boss...आजही अभिजीत किती चुकीचं वागला ...निक्की किती fair परीक्षक होती? आणि अंकिताने आजही पैशांचं विश्लेषण किती योग्य दिलं..त्याहीपेक्षा वेळेवर सगळ्यांचा कल लक्षात घेऊन तिने आणि DP ने एकाहाती game फिरवला...इतक्या intelligent contestant ला निक्कीच्या आधी काढलं हे काही पटलं नाही...top 2 मध्ये mostly एक मुलगा आणि एक मुलगी ठेवतात (exception season 3) म्हणजे त्या useless निक्कीला नक्कीच top 2 मध्ये ठेवतील...आता फक्त सूरजला जिंकवा....तशी अपेक्षा करणं पण चूकच आहे म्हणा..कारण माती खाण्याची एकही संधी bigg boss सोडत नाहिये यावेळी...बरं झालं show 70 दिवसांचा केला...नाहीतर अजून 30 दिवस त्या निक्कीचं थोबाड बघावं लागलं असतं...

कोणाच्याही एव्ही पाहिल्या नाहीत. कालची जान्हवीच्या एव्हीची इंट्रो पाहिली.

शिवला पाहून छान वाटलं. त्याच्याकडूनही टीआरपीची पोपटपंची करवून घेतली.

शेवटी अभिजीत निक्कीच्या ओंजळीने पाणी पितानाचा भाग पाहिला.

आधीच्या एका प्रतिसादात निक्कीच्या विरोधात कोणी उभं राहिलं नाही, त्यामुळे हा सीझन फसला अशी एक प्रतिक्रिया वाचली. टीम बी मधले सगळे कधी ना कधी निक्कीच्या विरोधात उभे राहिले. पण ते प्रभावी वाटले नाहीत कारण ते मराठी मध्यमवर्गीय पापभीरू , भिडस्त, नैतिकतेला चिकटून रहा, अशी मानसिकता घेऊन आले. त्यातून बाहेर पडत होते (संग्राम आल्यावरचं अंकिताचं अ‍ॅनालिसिस) पण पूर्ण बाहेर पडू शकले नाहीत. निक्कीला जेवण देऊ नका, तिची कामं करू नका असा स्टँड कोणी घेतला तर सगळे त्याच्याशी सहमत होत नसत. उलट आपसातच भांडत बसत. त्यातून अभिजीत डबल एजंट. दोन्हीकडे फायद्यात. जान्हवी निक्कीच्या विरोधात गेली तेव्हा त्यांनी तिला आपल्यात सामावून घेतलं नाही.

निक्की फक्त आणि फक्त गेम खेळण्यासाठी आली होती. आपली टीम आपल्याविरोधात गॉसिप करतेय म्हटल्यावर तिने यातल्या एकालाही जिंकू देणार नाही, असं म्हटलं. तेच पंढरीनाथला टीममेट्सचं गॉसिप ऐकल्यावर त्याने त्यावर न बोलणं पसंत केलं.

सूरजची जर्नी अजुन खूप भारी बनवता आली असती, नुसतीच गुंडाळली हिती Uhoh
बाकी जान्हवीचे उदात्तीकरण हा फालतुपणा बघावासा नाही वाटला, ही कसली आलीये घाय॑ळ शेरनी, फेक थ्रुआउट !!
एडिटिंगचा तर काय झोल आहे, सुरवातीला जर्नीज मग मधेच कुकिंग टास्क, मग परत जर्नी कन्टिन्युड काय बिनडोक आहेत क्रिएटिव्ह्ज , पार गंडलाय सगळाच सिझन !

सूरजची जर्नी अजुन खूप भारी बनवता आली असती, नुसतीच गुंडाळली हिती Uhoh
बाकी जान्हवीचे उदात्तीकरण हा फालतुपणा बघावासा नाही वाटला, ही कसली आलीये घाय॑ळ शेरनी, फेक थ्रुआउट !!
एडिटिंगचा तर काय झोल आहे, सुरवातीला जर्नीज मग मधेच कुकिंग टास्क, मग परत जर्नी कन्टिन्युड काय बिनडोक आहेत क्रिएटिव्ह्ज , पार गंडलाय सगळाच सिझन !

अंकिता सुरज आणि स्वत: साठी पोळ्या बनवत होती, डीपी दादांना पण तिने विचारले की खाणार का एखादी या गोष्टीचा निक्कीने केवढा ईश्यु केला. काय तर म्हणे तु आम्हाला का नाही विचारले, ब्रेकफास्ट ची तुझी ड्युटी आहे.. कुठुन येतो हा माज ? स्वत: नुसते टेबल पुसणार आणि लोकांना त्यांच्या ड्युटीवरुन ओरडणार... आणि अंकीता तरी काय मुग गिळुन गप्प बसलेली. नाही करत जा असं का नाही म्हणाली ? काय हे असले पुचाट लोक कशाला पाठवलेत बीबॉ मधे ? शेवटच्या आठवड्यात तरी जरा कणा दाखवा की त्या निक्की समोर...
माझी मर्जी मी कोणाला पोळ्या करुन देणार, तुझं तु बघ.. असं सांगायला काय धाड भरते कोण जाणे.
जेमिनी च्या खेळात पण निक्की ने जाता जाता पार्शलिटी केली बहुतेक...

अंकीता तरी काय मुग गिळुन गप्प बसलेली. नाही करत जा असं का नाही म्हणाली ?>> म्हणाली ती...अशी order सोडणार असशील तर मी नाही करणार...मग निक्कीचा अजूनच ड्रामा सुरू झाला आणि अंकिता सोबत किचन duty मध्ये असलेली जानव्ही सुद्धा निक्कीच्याच बाजूने बोलत होती...म्हणुन बिचारी अंकिता गप्प बसली...

आता वर्षा गेल्याची न्यूज आहे.रेकॉर्ड ब्रेक टीआरपी म्हणून ओरडत असलेल्या बिगबॉसला आता टीआरपी कमी झाल्याच लक्षात आल असेल.पँडीनंतर खूप लोकांनी शो बघण सोडल आहे.आतातर शो पण साडेनऊचा केला आहे,मग कोण बघणार?म्हणून काहीतरी कांड्या पिकवल्या आहेत,अंकिता एव्हिक्ट झाल्याच्या ,अस एकंदरीत वाटत आहे.
आता.नक्की कोण बाहेर गेल हे बघायला आजचा भाग लोक बघणारच.अस असेल तर बिबॉस अगदीच खालच्या पातळीवर घसरला आहे.

अंकिता आणि B team अभिजीत वर पूर्ण विश्वास ठेवत नव्हते ह्याला कारण तो वागतच तसा होता. रितेश धक्क्यावर त्यांना पिकनिक ग्रुप म्हणाला त्यानंतर एकदा बिगबॉस त्यांना म्हणाला कि पिकनिक चालू आहे का? आणि जान्हवी फळांचं बास्केट घेऊन आली तेव्हा हा पटकन उठून जाऊन सोफ्यावर बसला होता. तेव्हाही अंकिता म्हणालीच होती कि जहाज बुडायला लागला कि उंदीर जसे आधी पळून जातात तस्साच हा उठून गेला. त्यानंर रितेश ने धक्क्यावर सगळ्यांना उठवून तिथेच जाऊन बसा म्हंटल्यावर हाच अभिजीत आणि ती वर्षा आजी किती अडखळली होती. जाताच नव्हते दोघे. इथेच जाणवला कि ते फक्त B टीमची मतं हवीत म्हणून तिथे आहेत.
खुर्चीच्या टास्क मध्ये निकीला जेव्हा प्रश्न विचारला कि तू चुकल्यावर माफी मागतोस ती खरी असते का खोटी.. तेव्हाही हा आधी ती खोटी माफी मागते हे म्हणाला आणि तिला बाद केलं पण kitchen मध्ये निकी विचारायला आल्यावर म्हणाला कि तू तर खरी माफी मागते पण हा team चा decision होता. तेव्हाही अंकिता आणि पॅडी त्याला तेच म्हणाले कि तुला जर का तस्स वाटत होत तर सांगायचं ना तिथेच. आणि हाच त्यांना सांगायचं कि तू बोल निक्कीशी, तू भीड.. अंकिताचं हेच म्हणणं होता कि तू सगळीकडे गोड राहणार आणि आम्हीच का भांडायचं? म्हणून ती खूप वेळा बोललीये त्याला कि तू stand घे.
ह्याला दोन्हीकडे safe राहायचं. सगळ्यांच्या goodbooks मध्ये. आणि आता निक्कीला सांगत फिरतोय कि मला कोणी काय वाटतं ते विचारताच नव्हते तिथे. मी एकटाच लॉयल होतो. पॅडी नी बाहेर आल्यावर बरोबर म्हटलंय कि हा मुखवटा घालून फिरतोय तिथे. अंकिता ते उघड करेल.
पॅडी गेल्यावर पुन्हा duties वाटतानाही तेच. तू निक्कीला दे कि बाथरूम ची ड्युटी. तू टेबले पूस किंवा दुसया कोणालाही कर मदत. कोणीच काही बोलल नसतं. डूटीएस वाटताना निक्कीचा attitude हा काही ह्याच्यासाठी नवीन प्रकार नाहीये. प्रत्येक आठवड्यात तेच आहे. तर तिला का बाहेर काढायच बाथरूमच्या ड्युटी मधून? पण मी safe होतो आणि बाकीच्यांनी भांडा तिच्याशी.. वरून अंकितालाच टार्गेट करतोय कि तू निक्कीला बोलायला घाबरतेस.
ती BB रक्कमेची पाटी वाटतानाही निक्कीने सुरवात ४० हजारांची अंकिता पासून केली. ह्याला चान्स होता ६ लाख घ्यायचा पण घेतले नाहीत. ह्याच्याच मताने ४ लाख वर्षाला गेले पण तरीही काही बोलला नाही. अरे बी टीम ची मेजॉरिटी आहे तिथे. तुम्ही चौघे जास्त रकमेच्या पाट्या घेऊ शकतात पण गप्प बसला. शेवटी dp आणि अंकिता ने game फिरवला म्हणून. तर त्यानंतरही निकी आणि जान्हवीला सांगत फिरतोय कि माझा नाईलाज होता. वाचनात अडकवल मला. अंकिता ने ते ऐकलं आणि दोन दगडांवर पाय ठेवून पुढे जाण्याचा game expose केला.
त्यानंतरही निक्कीच ऐकून हा अंकिता कडे आला, तिच्यामते रक्कमेचा क्रम विचारून घेतला. तिने ६ लाखासाठी ह्याचे नाव घेतले त्यात आनंद मानण्याचा सोडून सुरज ला २ लाख कसे ह्यावरून वाद घालत बसला आणि हेच जाऊन निक्कीलाही सांगितले. तिच्या टार्गेट करण्याच्या यादीत तर अंकिता पहिल्या नंबर वर आहेच.
आता हाच निक्की, जान्हवी आणि वर्षा ह्याच्या बरोबर राहून अंकिताला टार्गेट करतोय. असले लोक कुठेही असले ऑफिस मध्ये किंवा friend circle मध्ये तरी खूपच घातक.
आणि मला एक गोष्ट काळत नाहीये कि हे लोक आपला game खेळायला आलेत कि सुरज ला जिकवायला?
त्याला नॉमिनेटे करायचा नाही. त्याला कमी रक्कमेची पाटी द्यायची नाही. अरे तो निकषात बसतच नसेल तर काय? बाहेरील vote मूळे तो जिंकणार असेल तर जिंकेल. पण त्याच्या बद्दल काही बोलायचंच नाही हे किती चूक आहे. आता काल अभिजित पण अंकिताला म्हणाला कि आपल्या बुद्धीची तुलना त्याच्याशी करू नकोस. अरे पण का? हा game च तसा आहे. त्याच्यासाठी BB काय वेगळे निकष देतात का? सगळ्यांना सारखेच आहेत.

सुरज बद्दल बोलायचं झालं तर मान्य आहे तो गरीब आहे. खूप वाईट काळ पाहीला आहे. त्याला मदतीची गरज आहे. पण म्हणून ट्रॉफी द्या हे पटत नाही.
त्याचे reels म्हणे lockdown मध्ये famous झाले होते. त्याचा कन्टेन्ट आवडू शकेल ह्या वर्गात मी मोडत नाही. तो बिगबॉस मध्ये आल्यावर उत्सुकता म्हणून search केलं तर हा तोच होता ज्याचा कन्टेन्ट चुकून suggestion मध्ये आल्यावरही पाहायच मी टाळल होत. १-२ रील्स पाहिले आणि पुढचे पाहावेसेच वाटले नाहीत.
त्याचा घरातला वावर पहिला. तो कसा प्रसिद्ध झाला आणि कस त्याला लोकांनी लुबाडलं हे ऐकलं. पण त्याच्यात शिक्षणाबद्दल ची कळकळ कुठेच दिसली नाही. हळू हळू पुढे मला लग्न करायचंय .. मला प्रेमात कसा धोका मिळाला हे ऐकलं. अंकिता आणि पॅडी ने काही चांगल्या गोष्टी त्याला शिकवण्याचा प्रयत्न केला पण त्याची नाराजीच दिसली. dj समोर नाचायला मिळाला नाही म्हणून जेव्हा तो चिडला ना तेव्हा तर अगदी रानू मंडल ची आठवण आली.
त्याच्या घरचे आले होते तेव्हा कळले कि त्याच्या बहिणी शिकल्या आहेत पण हाच शिकला नाही कारण ह्यालाच शिकायचं नव्हत. त्यावेळेस मात्र खरंच कीव करावीशी वाटली त्याच्या विचाराची.
त्याला आई वडील नाहीत हे खूप दुःखद आहे. पण मुळात पायाच चुकलाय. असे रील्स करून प्रसिद्ध व्हायचं आणि तेच बरोबर आहे हा त्याचा attitude वाटतो. आताही त्याला basic शिक्षण घ्याव, व्यवहार ज्ञान शिकावं अस काही दिसत नाही. माणूस कितीही साधा भोळा असला तरी शिक्षणाची जोड असल्याशिवाय प्रगती कशी होईल? उपजीविकेच साधन काय? आणि ते जर reels असावं असं त्याचा मत असेल तर त्यातही क्रीटीव्हिटी लागतेच. त्याला खरी गरज ट्रॉफी ची नसून शिक्षणाची आहे. कारण मिळालेले पैसेही असेच लुबाडले जातील जसे आधी झाले आहे. भले कोणी कितीही मदत केली तरी आपण किती काळ कोणावर अवलंबून राहू शकतो? स्वतःच्या पायावर उभा राहणं त्यालाच म्हणतात ना. लोक त्याच्यावर दया दाखवत आहेत. त्याचे अनुभव ऐकले वाईट वाटतच पण म्हणून ट्रॉफी द्यायची हे पटत नाही. आणि सहानुभूती म्हणून ट्रॉफी म्हणजे हा बाकीच्या स्पर्धकांवर अन्याय आहे. त्याच्याच भाषेत सांगायचं झाल तर गुलिगत धोखा...

दिप्ती-30....
पूर्णपणे सहमत.अगदी मार्मिक विश्लेषण आहे.
पण हे फक्त याच शोपुरत मर्यादित नाही.मी अनेक सिंगिग, डान्स किंवा अन्य शो पाहते त्यामध्येही असे एक किंवा दोन स्पर्धक असतातच.त्यांच्यात टँँलेंट नसत अस अजिबात नाही,पण त्यांना गायडन्स नसतो,आर्थिक परिस्थिती बेताची असते.पण शोमध्ये एकदा स्पर्धक म्हणून आल्यावर ते इतरांसारखेच असायला हवेत.
पण तस होत नाही,बरेच वेळा त्यांना फेवर केल जात.त्यांच्यासाठी एखाद्या चांगल्या स्पर्धकाला बाहेर काढल जात.हे आता कॉमन आहे.
त्यांना पुढेच आणायच असेल तर त्यांना मोफत मार्गदर्शन द्या पण म्हणून त्याच्यापेक्षा दुसरा एखादा चांगला स्पर्धक असेल तर त्याच्यावर अन्याय होता कामा नये.
हव तर,सूरज सारखेच दहा स्पर्धक आणा आणि खेळवा त्यांच्यात पुढचा सिझन आणि चालवून दाखवा 14आठवडे.
मला तर तो कुठल्याही अँगलने कधीच विनर वाटला नाही.टास्क सगळेच खेळले आहेत,मग त्याचच एवढ कौतुक का?आणि इथे बाकीच्यांच्या चांगल्या गोष्टी दाखवल्याही जात नसतील ,बिबॉसला हव तस ते सदस्यांना फ्रेम करतात.
शेवटी काय,आपण बोलून काय उपयोग नाही,ते त्यांना हव त्यांनाच विनर करणार.

दीप्ती छान लिहिताय. सुरजने शिक्षणाला महत्व दयायला हवं आणि बिग बॉसने मदत करायला हवी.

अंकिताला ट्रॉफी देणार असतील तर वेगळी गोष्ट, ती सोफ्यावर बसून शांतपणे मुद्दे मांडायची, हा आठवडा तिने जोरात वाद घालून बिग बॉसला हवी तशी आरडाओरडा करून मतं मांडली आहेत, काही टास्कस उत्तम खेळली, फेअर होती पण ती जिंकणार नसेल तर सुरजलाच मिळावी ट्रॉफी. बाकी कोणी योग्य वाटत नाही मला.

सुरज कोण माहिती नव्हतं, रिल्स आवडत नाहीत पण हा सिझन नंतर एवढा खाली गेला की तोच योग्य वाटू लागला मला.

बंडल सुरू आहे, सुरजला डेंजर झोन मध्ये ठेवलं म्हणजे प्रेशरमध्ये तो नंतर मनी बॅग घेईल आणि हे अभिजीतला विनर करायला मोकळे. जान्हवीला आजही डोक्यावर चढवलं.

निक्की नंतर आभिजीत फायनलला पोचला, सुरज डेंजर झोन. डीपी अंकिता मध्ये डीपी पोचला फायनलला, अंकिता डेंजर झोन. आता जान्हवी पोचेल फायनलला.

सुरज कोण माहिती नव्हतं, रिल्स आवडत नाहीत पण हा सिझन नंतर एवढा खाली गेला की तोच योग्य वाटू लागला मला.>>+111...bigg boss मध्ये फक्त tasks खेळणे महत्त्वाचे नाही तर winner माणूस म्हणून कसा आहे हे जास्त महत्त्वाचं वाटतं....अर्थात makers चे calculations काय असतात माहीत नाही...पण यावेळी कोणीच deserving वाटत नाहिये...निक्की,जान्हवी,अभिजीत अजिबात जिंकू नयेत असे वाटतं..मग राहिले अंकिता आणि सूरज...अंकिताला जिंकवणार असतील तर ok...नाहीतर सूरज जिंकावा असे वाटते...

मोक्षू सेम वाटतंय, अंकिता किंवा सुरज. बाकी लायक वाटत नाहीत.

एकंदरीत निक्की, अभिजीत, जान्हवी बिग बॉसचं लाडके त्रिकुट. डीपीही त्यानंतर लाडका. पॅडीच्याही आधी वर्षाताई आणि डीपी जायला हवे होते.

नशीब वर्षाताई मिडविक एव्हिक्ट झाली.

बिग बॉस चा एडिटर पण बहुतेक शो सोडून पळाला आहे. काहीही उलटसुलट दाखवत बसलेत. आपण संदर्भ लावून जोडून घ्यायचं. वर्षा एव्हिक्ट झाली आणि मग अभिजीत अंकिता भांडणात परत दिसायला लागली.
आता तर परत तो डीजे दिसायला लागलाय ..
बाई ... काय प्रकार... पागल झालेत सगळे

अगदी अगदी. काही समजेना.

वर्षाताई, सुरज कोणाच्या अध्यातमध्यात नव्हते. बिग बॉसचं लाडके त्रिकुट एकत्र झालंय, ते एकीकडे आणि डीपी अंकिता दुसरीकडे. वर्षाताई कशी आत्ता इथे, मी विचार करत राहिले.

उद्या आणखी एक एव्हिक्शन आहे.बहुतेक डीपीला काढतील,खरतर जान्हवी किंवा अभिजितला काढायला हव.पण कलर्स फेस हवा म्हणून आणि आयडॉल पाहिजे म्हणून ठेवतील.आणि आता एव्हिक्शन कस करणार.टॉप 6डिक्लेअर केलेत ना,वोटिंग कुठे सुरू झाल.
अरे काय भांग वगैरे पिऊन बसले आहेत का बिबॉसची टीम.कशाचा कशाला ताळमेळ नाही.
आजतर भाग संपला की नाही तेच कळल नाही.
कुणाला उचलून.आणल होत,काय ती पार्टी.सगळेच फालतू.
यापेक्षा मग खरच सिझन दोन आणि चार जे फ्लॉप होते ते नक्कीच चांगले होते.

काहीही उलटसुलट दाखवत बसलेत. >>हो ना...मी आज सुरवातीचे 15-20 min बघितलं नव्हतं...मला तर वाटलं repeat लागलं..म्हणून मी TV च बंद केला. Lol इथल्या comments वाचून पुन्हा लावला मग...एकतर 2 दिवसांसाठीच वेळ बदलली त्यातही हा गलथान कारभार...

निक्की नेहमी अंकिताला कुचकी म्हणते...पण वर्षा जाताना तिने अख्ख्या महाराष्ट्रासमोर कुचकेपणा दाखवला...
जसे पहिल्या season ला स्मिताच्या आधी सई, तिसर्‍या season ला मीनलच्या आधी मीरा जावी अशी इच्छा होती तशीच यावेळी अंकिताच्या आधी निक्की जावी अशी तीव्र इच्छा आहे...म्हणजे दुसर्यांना कमी लेखणं काय असतं ते कळेल तिला...
इतर season मध्ये शेवटी शेवटी छान रहायचे सगळे जण...इथे तर तीनच दिवस राहिलेत तरी कुचाळक्या संपत नाहियेत यांच्या... आणि आगीत तेल ओतायला आहेच महाराणी निक्की

आता पुढच्या आठवड्यात वर्षाताई माईचं भूत म्हणून स्टार प्रवाहच्या सिरीयलमध्ये येतीलही Lol

तिथे मरून b b त गेल्या आता तिथून बाहेर पडून इथे येतील, नाहीतर डबल रोल म्हणून येतील.

वर्षाताई माईचं भूत म्हणून >>> Lol
वर्षाने शेवटपर्यन्त जान्हवीकडुन सेवा करून घेतली. फुकटात मिळतं म्हणून किती तो फायदा घ्यायचा!
बरं झालं गेली आता. डिपी पण गेला तर बरे . त्यानेही काही केलेल नाहीये फारसे. कदाचित गेम समजण्याचे पोटेन्शियल असावे त्याच्यात पण आळशी आणि उनाड माणूस आहे तो.

अभिजीतला रितेशने टीम बीचा लीडर म्हणून संबोधले होते आणि आता हा माझं मत तिथं विचारत नव्हते असं म्हणतोय. म्हणजे Narrative Set करतोय काय प्रेक्षकांसाठी आणि त्याच्या फॅन्ससाठी? म्हणजे प्रेक्षकांना वाटावं टीम बीने याचा वापर करून घेतला आणि फॅन्स तर आहेतच टीम बीला Troll करायला.

Pages