Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47
२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी पावणेदहानंतर बघितलं,
मी पावणेदहानंतर बघितलं, त्यामुळे आत्ता रिपीट बघतेय.
अरबाझ स्वतः म्हणाला जान्हवीबद्दल आणि बी टीमवर का ढकललं, अतिशय चुकीचं वाटलं ते. जान्हवीने डायरेक्ट विचारायला हवं आणि खरं खोटं करायला हवं.
निक्कीने आज चांगली उत्तरं दिली. अभिजीत कुल आहे. अरबाझ स्वतः जिंकणार हे गृहीत धरून बसलाय.
अरबाझ एविक्ट झाला, असं एके
अरबाझ एविक्ट झाला, असं एके ठीकाणी सांगतायेत. सत्तर दिवसांत संपवणार असतील तर असूही शकेल. यावेळी तो चांगला खेळलेला पण वर्षाताई एम जी घेऊन आल्या असतील तर काढू शकतात अरबाझला. तो गेला असेल तर मात्र सहा ऑक्टोबरला फिनाले असू शकेल.
बाई काय हा प्रकार, इतर वेळी
बाई काय हा प्रकार, इतर वेळी रडारड करतात की मराठी चित्रपटांना शो मिळत नाही, मराठी लोकांना व्यासपीठ मिळत नाहीत आणि मग आता कलर्स मराठी यांनी बिग बॉस हिंदी पुढे सपशेल माघार घेतली का की 70 दिवसात हा सीजन गुंडाळणार. आता कुठे गेली मराठी अस्मिता इत्यादी इत्यादी?
अंकिता ला किती हिंट देतात तरी
अंकिताला किती हिंट देतात तरी तिच्यात विजेता गुण दिसत नाही, सूरज काही कामाचा नाही, निक्की/अरबाज यांना विजेता करणार नाही, जान्हवी ची फक्त इमेज सुधारणे आणि पाप प्रक्षालन करणे सुरू आहे. पंढरीनाथ विजेता वाटत नाही, वर्षा आजी आणि धनंजय घरी जाण्याच्या मार्गावर आहेत मग उरतो फक्त अभिजित तर हा अभिजित मोहोबत्ते लुटवणार का?
What’s Varshaa doing in this
What’s Varshaa doing in this show? Seriously… remove her…
अरबाज एव्हिक्ट झाला अस
अरबाज एव्हिक्ट झाला अस कन्फ्रर्म सांगत आहेत.70दिवसात संपणार असेल तर वर्षासाठी टॉप 6पण काढतील,त्यासाठी पँडी ,डीपीचाही बळी देतील.
एकंदरीत मराठी बिबॉसमध्ये तो शो कोळून प्यायलेल्या हिंदी सदस्यांना आणू नये हे मराठी बिबॉस मेकर्सना एव्हाना कळल असेल.
पण तो अँक्ट राईडर्सवाला मंदार सांगत होता की दोन्ही शोचे मेकर्स एकच आहेत,मग ज्या शोने ऑलरेडी टीआरपी चे रेकॉर्ड मोडले आहेत,असा शो अचानक बंद करून जो शो अजून चालूच झालेला नाही, आणि कसा चालेल याची गँरेंटी नाही,अस मेकर्स करणार नाहीत कारण त्यांचही आर्थिक नुकसान होत.
हा शो बंद झाला सत्तर दिवसात ,तर मराठी बिबॉस शरच गदा येईल असही तो म्हणाला.असा शो बंद होणार नाही,पूर्ण शंभरी गाठेल अस त्याच म्हणण आहे.
काय माहित खर काय ते.
अरबाझ बाहेर गेला तर शो
अरबाझ बाहेर गेला तर शो इंटरेस्टिंग होऊ शकतो. निक्की एकटी पडेल. अंकिता तर तसं गृहीत धरूनच अभिजीतला काय काय सांगत होती.
टास्कस मध्ये दोन टीम्स समान बलाच्या होतील.
सूरजला काल दादा कोंडकेंची हेअर स्टाइल दिली होती. तो दाखवतो तितका साधा वाटत नाही. किंवा तो जरा जास्तच साधा असल्याचं दाखवतोय. अर्थात मी अशा पार्श्वभूमीच्या कोणाला प्रत्यक्षात जवळून पाहिलेलं नाही, त्यामुळे माझं मत चुकीचं असू शकेल.
सोमिवर अशीही चर्चा आहे की
सोमिवर अशीही चर्चा आहे की हिंदी सिझनमध्ये जाण्यासाठी अरबाजला एव्हिक्ट केल आहे.
अरबाज हिंदी मध्येच जायला हवा
अरबाज हिंदी मध्येच जायला हवा होता, मराठीत त्याने येयलाच नको होतं.
अरबाज गेला की निक्की गेली.
अरबाज गेला की निक्की गेली. अरबाझ गेला असेल तर हिंदी शो नक्कीच लवकर सुरु होतोय. मराठीचा उत्तम टी आर पी असताना असा निर्णय कसा घेतला काय माहीती. आर्या गेल्यावर आम्ही बघणार नाही म्हणणारे बरेच जण बघत होते आणि टी आर पी चांगला होता. अरबाझ जाईल हिंदीत पुढे. जान्हवीवरचा अरबाझने लावलेला कलंक पुसला जाईल, वर्षाताई राहील्या तर.
मेकर्सचा निर्णय चुकीचा वाटतोय. अर्थात प्रेक्षकांसाठी चांगलं आहे .
हिंदीसाठी मराठी बंद करत आहेत
हिंदीसाठी मराठी बंद करत आहेत टीआरपी असताना ,हेच मला पटत नाही.मला नाही वाटत तस.
एकतर अरबाजलाच हिंदीत जायच असेल म्हणून काढल असेल किंवा आर्या गेल्यानंतर टीआरपी घसरला असेल.
मला तर आता टीआरपीवर च शंका येत आहे,कशावरून खरे असतील?
सिझन दोन आणि चार फ्लॉप असताना शंभर दिवस शो खेचला आणि याला जर टीआरपी आहे तरसत्तर दिवसात बंद.
रितेशच वाजल वगैरे नाही ना.
हिंदी शो अकरि वाजता पण चालू करतात आणि लोक बघतात ,म्हणजे टाईमचा पण प्रॉब्लेम नाही.कारण काहीतरी वेगळच असाव.
कुछ तो गडबड है.
शो लवकर बंद होणार याबद्दल जरा
शो लवकर बंद होणार याबद्दल जरा शंका वाटते मला तरी. रितेश ने शो सोडला हे तर साफ खोटेच आहे. कारण कालच्या शो च्या आधी रितेश चा मेसेज दाखवला व्यवस्थित की तो आज कुठेतरी बाहेर असल्यामुळे येणार नाही त्यामुळे पत्रकार येतील वगैरे. ते शूट मागच्या आठवड्यच्या कपड्यात केले होते त्याने. सो काल तो नसणे हे प्लान मधे होते.
ती मला विनर तर सोडाच पण टॉप ५ मधेही नको आहे. प्रचंड फेक आहे. काल निकीने तिचे मस्त भांडे फोडले, ती निकीला म्हणत होती माझ्याशी भांड प्लीज, मी नॉमिनेटेड आहे वगैरे. तिचे बिबॉ बद्दल आणि फुटेज बद्दल असे समज आहेत की भांडले तरच आपण पुढे जाणर आणि दिसणार. काल पत्रकार परिषदे मधे ती स्वतःही तेच म्हणत होती. तिच्या नवर्यानेही मागे मुलाखतीत तेच म्हटले होते. निकी मला तिच्यापेक्षा पॉझिटिव आणि केव्हाही जास्त डिझर्विंग वाटते.
आज अरबाज बाहेर पडला अशा बातम्या येत आहेत. तो आणि निकी बॉटम २ चा प्रोमो ही आला आहे! मला वाटले होते वर्षाला काढतील !
जान्हवी आता माझ्या हेट लिस्ट वर टॉप ला आहे
निक्कीला वर्षा आणि पॅडी माहीत
निक्कीला वर्षा आणि पॅडी माहीत नव्हते. सुप्रिया, स्वप्नील आणि अशोक सराफ माहीत असतील का? तिघांनी हिंदीतही काम केलंय. अरबाझला हे
प्रश्न कोणी विचारले नाहीत. पण त्याला माहीत असतील का?
वर्षाला कोणता पदार्थ खायला दिला होता? धनंजयने मला चव कळत नाही आणि वास पण येत नाही असं म्हणत ताणलं. हे असं करोनात होतं. त्यामुळे बहुधा निलेश म्हणाला की अरे बापरे, तो परत आलाय का?
सुप्रिया कांदा भजी साठी असे काय क्लू देत होती?
माझा भाऊ आलेला, तो आणि बिग
माझा भाऊ आलेला, तो आणि बिग बॉस 36 चा आकडा म्हणून मी लावलंच नाही बिग बॉस. आत्ता मी आले निघाले, म्हणत नाचत होत्या वर्षा सुप्रिया तेव्हा लावलं.
मैत्रेयी, जान्हवी खरोखर फेक आहे, मलाही आवडत नाहीये पण कलर्स मराठी वाले नेतील तिला पाचात, ट्रॉफी देऊ नये म्हणजे मिळवलं.
आता अरबाझ गेल्यावर तिला जास्तच भाव देतील, निक्की विरोधात उभं करतील. त्यामुळे प्रेक्षक खुश होतील तिच्यावर.
शो लवकर बंद होणार याबद्दल जरा
शो लवकर बंद होणार याबद्दल जरा शंका वाटते मला.......
मलाही वाटल होत पण चार नवीन शो चालू होत आहेत,त्यातला एक रिअँलिटी शो आहे.त्यामुळे खर असू शकेल.
पण हिंदीसाठी करत आहेत,यावर माझा जराही विश्वास नाही.कारण काहीतरी वेगळेच आहे.
रितेश चित्रीकरणात व्यस्त आहे ,हे आज निलेशने सांगितले.
म्हणजे त्याने शो सोडलेला नाही.
अरबाजला काढल तर हिंदीत जाण्यासाठी असू शकेल.पण हिंदीसाठी हा शो बंद होत आहे,हे न पटण्यासारख आहे.
अरबाझ हिंदीत जाण्यासाठी
अरबाझला हिंदीत जाण्यासाठी काढलं असेल तर ओके, आदरवाईज हा पूर्ण विक तो छान खेळलेला.
काय फालतूपणा आहे राव,
काय फालतूपणा आहे राव, अरबाजलां काढले. तो सर्वात भारी खेळायचा.
सूरज, वर्षा ताई किंवा डीपी जायला हवा होता.
आज तिसर्या मालिकेचा प्रोमो
आज तिसर्या मालिकेचा प्रोमो आला.
अरबाझ निक्कीच्या आहारी गेला नसता तर आणखी पुढे गेला असता. निक्कीची आजची रडारड किती खरी होती ते एकदोन दिवसांत कळेल.
पहिल्या हिंदी बिग बॉसमध्ये राखी अशीच अगदी एकटी पडली होती. तरी फायनलिस्ट झाली.
उद्या कसली तरी महत्त्वाची घोषणा - मला पण वाटायला लागलंय लवकर गुंडाळातात की काय?
अंकिताला उपकार म्हणून परत आणलं नव्हतं, त्या आठवड्यात व्होटिंगच झालं नव्हतं. रितेशने हे सांगितलं होतं ना? निक्कीला लक्षात नसू दे, पण अंकिताच्या तर लक्षात असायला हवं होतं हे.
आजचाही भाग दोन तासांचा
ते तर आजच कळलं...जेव्हा
निक्कीची आजची रडारड किती खरी होती ते एकदोन दिवसांत कळेल.>>>ते तर आजच कळलं...जेव्हा जान्हवीने अरबाजची बॅग उघडली तेव्हा निक्कीला वाटलं ,तो safe आहे आणि ती eliminate झालिये तेव्हा तिची जी reaction होती ती खरी वाटली बाकी सगळा नुसता ड्रामा आणि fake...अज्जिबात emotional connection नाही वाटत आहे यावेळी ...आजचा निक्कीचा drama बघून असं वाटलं हिला पण काढा बाहेर...ते दोघे पण खुश आणि आपण तर दुप्पट खुश
बाकी निक्की तिचे शब्द खरे करणार बहुतेक...टीम A मधल्या कोणालाच ट्रॉफी घेऊ देणार नाही 
केवळ आठ लोकांच्या जीवावर
केवळ आठ लोकांच्या जीवावर,ज्यातले अर्धे लोक पिकनिक ला आले आहेत,त्यांच्या जीवावर 45दिवस शो चालवता येईल का?
त्यामुळे बहुतेक लवकर गुंडाळत असावेत.
डीपीची प्रोमोमधली रिअँक्शन अशीच होती.
पण तरीही खर कारण समोर येत नाही.चँनेल आणि मेकर्सच वाजल असेल का?
बाकी,वर्षाला काढायला हव होत.अरबाज या आठवड्यात खरच खूप छान खेळला होता.
पण अंकिताच्या तर लक्षात
पण अंकिताच्या तर लक्षात असायला हवं होतं हे. >>> अगदी अगदी.
आज स्वप्निल विचित्र का दिसत होता. वेगळाच वाटला. सुप्रिया मला नेहेमीच आवडते.
<तेव्हा निक्कीला वाटलं ,तो
<तेव्हा निक्कीला वाटलं ,तो safe आहे आणि ती eliminate झालिये तेव्हा तिची जी reaction होती ती खरी वाटली> हो. खरंच की!
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=aVeOis7ZMgc
जान्हवीचं भविष्य. तिचा स्वभाव. ही विनर असेल म्हणतेय ही टॅरो कार्ड रीडर. हीचा स्वभाव नम्र आहे आणि हिचं लवकरच लग्न होणार आहे सांगतेय. हिचं लग्न होऊन हिला एक मुलगा आहे हे कार्डसवरुन कळत नाही का. विनर करु शकतात बिग बॉस पण लग्नाबद्द्ल कार्डस सांगत नाहीत का. ती रीडर इतक्या ठामपणे सांगतेय, तो विचारणारा नीट काही सांगतच नाहीये.
माझे मत , आर्या निष्कासित
माझे मत , आर्या निष्कासित झाली त्या प्रकरणात महाराष्ट्रातील जनतेने सर्वात जास्त कलर्स मराठी वाहिनीला ट्रोल केले , आता कलर्स मराठी वहिनीला ग्रोथसाठी मराठी जनता महत्वाची आहे , तसे काही बिग बॉस किंवा त्यांची एंडमॉलशाईन याना काही घेणे देणे नाही , म्हणून कदाचित कलर्स मराठी आताच वाढतेय ती मराठी जनतेच्या मनातून उतरू नये म्हणून हा शो संगनमताने ७० दिवसात गुंडाळण्याची तयारी चालू आहे. म्हणजे उद्या सांगता येईल जे जनतेला आवडत नाही आम्ही दाखवत नाही , शिवाय ५-६ नवीन मालिका आणून TRP वाढवू शकतात , त्यासाठी बिग बॉस पाहिजे असेही काही नाही
अरबाझ सारखा स्ट्राँग, अ
अरबाझ सारखा स्ट्राँग, अॅक्टिव्ह, हुषार मुलगा फक्तं निकीच्या संगतीमुळे गेला म्हणून वाईट वाटलं , फिनाले मधे जाणे नक्कीच डिझर्व करत होता .
जान्हवी सारखी बिनडोक, फेक, खोटारडी , निकीची कॉपीकॅट बाई अजुन शो मधे आहे , वर्षा सारखी कोणाल्॒ही न आवडणारी कॉन्टेस्टन्टही अजुनही आहे
पहिले जान्हवीला टार्गेट करून काढा आता !
काहिहि असो..पण कलर्स मराठीचे
काहिहि असो..पण कलर्स मराठीचे सगळेच प्रोग्राम खुप छान असतात...
अरबाजला बाहेर काढले, शो लवकर
अरबाजला बाहेर काढले, शो लवकर बंद करण्याच्या विचार दिसणे म्हणजे याना बिबॉ मराठी शो नको आहे. OTT आणि हिंदीत असणारा शो फॅमिली सोबत बघू शकत नाही. मराठी शो बद्दल बऱ्याच लोकांची हीच धारणा असते. त्यामुळे प्रेक्षकवाढ कमी. त्यापेक्षा रेग्युलर सिरीयल दाखवायच्या आणि बिबॉ सारखा कॉन्टेन्ट OTT वर चालवायचा असा लॉन्ग टर्मप्लॅन असेल. हिंदी शो साठी आता अरबाजला बाहेर काढले असेल आणि हिंदी शो साठी मराठी बिबॉ आटोपता घेणार असतील तर हि मराठीची गळचेपी आहे. यासाठी कोणी बोलतांना दिसत नाहीये.
या आठवड्यात दोन एलिमिनेशन केले तर घरात ६ स्पर्धक राहतील आणि यांच्या सोबत ६ ऑक्टोबरला फिनाले घेतील.
निक्कीची कालची रडारडी बघुन...
निक्कीची कालची रडारडी बघुन... "बाई...काय प्रकार... पागल झाली का ?" असं म्हणावंस वाटलं...
आरबाज सेफ आहे असं समजुन आलेली रीअॅक्शन जास्त खरी होती...नंतर ड्रामा कशाला... आता अभिजीत च काही खरं नाही. त्यालाच चिकटणार ही जाउन .
काल बाकीचा काही एपिसोड पाहिला नाही. थेट शेवटचे एलिमिनेशन पाहिले...
काल बाकीचा काही एपिसोड पाहिला
काल बाकीचा काही एपिसोड पाहिला नाही. थेट शेवटचे एलिमिनेशन पाहिले...>>>same here...निकिमुळे show पाहणंच सोडून दिलं...काल फक्त elimination part पाहिला तर त्यात तिचा drama पाहून दोन थोबाडीत द्याव्यात असं वाटलं....आपल्याला फक्त 1 तास एपिसोड बघून तिची इतकी चीड येते तर आर्याने तिला मारले हे काहीच चूक नाही...कमालीची irritating पर्सनॅलिटी आहे निक्की...पण वाईट याचं वाटतंय की मराठी bigg boss बघायला आवडतं...आणि हा season आणायला तसाच किती वेळ लावला होता...त्यात यावेळी अजूनच बोगसपणा तर next season आणतात की नाही कुणास ठाऊक?
अरे यार अरबाज कसा काय गेला
अरे यार अरबाज कसा काय गेला म्हंजे बी टीम ल खेळता येत नाही म्हणून अरबाज ल घालवला का?
पण काहीही म्हणा गड्यात दम होता एकटा अख्खे टास्क ओढून आणायचा वर्षा ने मागच्या वेळी कबूल पण केले की तो खूप छान समजाऊन सांगतो. अरबाज स्वतः एक चांगला प्लेअर होता आणि स्वतः खेळत नसताना बाकीच्यांनी पण कसा खेळायचा हे मस्त सांगायचा.
असो पण मला वाटतं तो परत येईल किंबहुना तो यावा असेच वाटते.
आता अरबाज नसेल तर निक्की खूप काही करू शकणार नाही म्हंजे शाळा शाळा खेळून बिग बॉस साजरे करावे लागणार असे दिसतंय थोडक्यात.
Pages