बिग बॅास मराठी - ५

Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47

२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंतर अरबाज गेल्यवर खूप वाईट वाटले. तो आवडत होता म्हणून नाही पण एवढी मेहनत करून पण त्याचे फळ त्याला मिळाले नाही. तो टास्क तर चांगले खेळायचा पणतशी कुणाची खिल्ली उडवायचा नाही. उगाच कुणावर फार जळत नव्हता की स्वतः खूपच भारी दाखवत नव्हता. निक्की निक्की मात्र करायचा. त्याच्या मनाला खूप लागले ते दिसले. खोटारडी जान्हवी , स्वतःला अतीशहाणी समजणारी निक्की, गेम न खेळणारी व उगाचच दुसर्यावर जळणारी पण आपण भारी समजणारी अंकिता, गेम आजिबातच न समजता पिकनिकल्या आलेल्या वर्षाताई त्याच्यापेक्षा तो नकाचीच चांगला व मजबूत खेळाडू होता.मनापासंन वाईट वाटले. निक्की गेली तर योग्य झाले असते. तिला तिची जागा खरोखरच समजली असती.

अभिजीत, पॅडीदादा व सुरज खरंच चांगले माणूस आहेत. खरे वाटतात.अवांतर सांगायचे तर डीपी चांगलाय पण विचाराने आजीबात पुढे नाही. मी तर त्याची तक्रार केली होती व सुनावलेले instagram वर त्याला. मेसेज पण पाठवलेला. पण त्याने मला ब्लॉक केले की तुम्ही आमच्या जोडीवर जळता मी म्हणालेले बायको बरोबर असे व्हिडीओ का करता. तुम्ही इन्फ्लुएन्सर ना मग समाजात योग्य मेसेज जायला हवा ना. चुकीचा मेसेज जातोय .मला नाही आवडत त्याचे व्हिडिओ. सतत बायकोला कमी लेखायचे. खिल्माली उडवायची.माझा नवरा ते व्हिडिओ पाहून खूष व्हायचा कारण तो तसेच वागायचा मग त्याला वटायचे आपण जे वाईट वागतो बायको शी ते बरोबरच आहे. खूपच चिडलेले. मला तर पोलिस कंम्लेंट कराविशी वाटलेली त्याची. मग राग आवरून स्वतःवर काम केले व करतेय.पण अशी माणसे म्हणजे समाजाला कीड आहे. माणूस म्हणून विचाराने कधी पुढे जाणार. कधी awarwness येणार त्याला देव जाणे

वृंदा अरे बापरे. डीपिचे काही बघत नाही पण काही रीलस बघितले त्यात असं नव्हतं. मला मोठे vlogs असतील तर कंटाळा येतो.

अरबाज गेला इथे आपल्याला खरोखर वाईट वाटतंय. सोशल मीडियावर लोकं आनंद व्यक्त करत आहेत. त्यांना समजत नाहीये की तो चांगला खेळायचा.

बाकी जान्हवीला ठेवणारच ही लोकं, ट्रॉफी देऊ नका म्हणजे झालं. ती निक्कीपेक्षाही डोक्यात जाते.

शो खरच 70दिवसांचा असेल तर इंटरेस्ट नाही राहिला.फँमिली वीक नाही,तिकिट टु फिनँले तरी असेल का?
आज नॉमिनेशन टास्क असेल ,पण आता काय ,बिबॉसने ठरवलेले लोक फिनँलेत जाणार,त्यामुळे त्यांना नको असलेले नॉमिनेट होतीलच.या वीकमध्ये पण दोन काढतील.त्यातली आतातरी एक वर्षा असू देत.
अरबाजला सत्तर दिवसात शो संपणारच होता तर काढण्याची घाई का केली,तो काय लगेच जाणार नाही हिंदीत,तो वाईल्ड कार्ड म्हणूनच जाणार आहे,मग घाई का?खेळत छान होता.आता काय मजाच नाही.केवळ औपचारिकता.

अरबाझ लगेच जाणार नाहीये हिंदीत तर ठेवायचं होतं की, वर्षामुळे काढलं. खरंतर संग्रामला पाठवल्यावर, वर्षाला ठेवायचं होतं तर, एविक्शन नको होतं

शेवटी आज बिबॉसने ऑफिशियली अनाउन्स केल की शो सत्तर दिवसांचा आहे.
पण या लोकांना रिझल्ट्स आधीपासूनच माहित आहेत का?.तो सूरज चक्क निक्कीशी बोलताना म्हणाला की पँडी दादा जाताना मी पण रडणार आहे,म्हणजे या आठवड्यात पँडी जाणार हे निश्चित. आणि त्यानंतर हाईट म्हणजे सत्तर दिवसांची घोषणा झाल्यावर काही सदस्यांना धक्का बसला,वर्षा निर्विकार होती,अभिजित समजावत होता अंकिताला की राहिलेले दिवस एंजॉय करू या,तर अंकिता नकळत असाव पण बोलून गेली की तू विनर आहेस ,आमच काय?
म्हणजे हे सुध्दा माहित आहे?
सगळेच नॉमिनेट झाले आणि तो रटाळ टास्क सुरू झाल्यावर टीव्ही बंदच केला.तेच तेच ऐकवत नाही आता.
पण मराठी बिबॉसच भवितव्य धोक्यात आल्यासारख वाटत आहे.हिंदीबरोबर स्पर्धी नको तर मग एप्रिल मध्ये सुरू करा.काही फरक पडत नाही आय पी एल ने.सिझन 1 तेव्हाच सुरू झाला होता,आणि हिटही गेला होता.

चला, आज बिग बॉसनीच ७० दिवसांत गुंडाळणार म्हणून सांगून टाकलं. त्या आधी रेकॉर्ड टी आर पी आहे असं गुर्‍हाळ लावलं. मग ७० ऐवजी १२० दिवस करायचे होते की?
शिवाय यांच्या सगळ्या बातम्या फुटतात. की हेच फोडतात?

सगळे जण नॉमिनेटेड बाय बिग बॉस. भांडायला टीम्स पाडून दिल्या.

आज अभिजीत अरबाझची जागा भरुन काढायला फारच उत्सुक दिसत होता. निक्कीने त्याला पेट डॉगसारखं वागवलं तेही त्याला खटकलं नाही. कॉफीचं निमित्त.

तो बावळट अभिजीत निक्की पाठीमागे कॉफीसाठी का जात होता, बिग बॉसही मूर्ख, कॉफी डेट केली. नशीब जास्त दाखवलं नाही.

या वीकमध्ये दोन जणांना घरी पाठवतील का, डीपि आणि दुसरे कोण.

बिग बॉस दिवस कमी करायचे काहीही कारण देत होते, पिकनिक gang काही करत नाही म्हणून आम्ही बंद करतोय सांगायचं सरळ, हाहाहा.

तसेही निकी सोडून कुणाला गेम काही समजलेलाच नाही. आता निदान पब्लिक च्या म्हणण्याचा मान ठेवून सूरजलाच करून टाका विनर. तुका म्हणे त्यातल्या त्यात ....

अंकिता का नेहमी सूरज ला टार्गेट करते. तिला सूरज वीक वाटतो पण बाहेर तुफान सपोर्ट आहे.वर्षाताईंनी पॅडीदादाला केलं ते पटले नाही. आभिजीत खरा हुशार जान्हवीला टार्गेट केलं ते. तशीही वाईट वागून सेफ कशी राहिली नॉमिनेशन पासून आश्चर्यच आहे.

अंकिता याबाबतीत हरिश्चन्द्राची आई आहे. बिबॉ ने क्रायटेरिया सांगितल्याप्रमाणे कोणी का असेना मग ती करते नॉमिनेट. पार ती स्वतः त्या निकषात बसत असेल तर स्वतःला पण नॉमिनेट करायला कमी करणार नाही ती Happy बिबॉ गेम खेळायला मॅच च नाहीत असे लोक खर तर.

मराठी बिगबॉसची सगळी अनसेड गुपितं या सीझनला फार उघडपणे फुटत आहेत.... म्हणजे प्रेक्षकांना माहित नव्हते असे नाही पण आता त्यांच्या क्रेडिबिलिटीला चांगलेच भगदाड पडत चालले आहे!!
पुढचा सीझन न आणतील तरच बरे!!

काल आणि परवा random दोन episodes पाहिले. त्या सगळ्यात दोनच गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. 1. जान्हवी कायम आकाशात बघुन बोलत असते. आणि तिच्यात एका actress चां grace/ नजाकत अजिबात नाही. तिचं चालणं खुप विचित्र आहे आणि शरीराच्या फार वेड्यावाकड्या हालचाली करते त्यामुळे ती सुंदर असुन ही मला attractive वाटत नाही. चेहरा ( mouth) पण विचित्र दुमडते. पण ड्रेस up केल्यावर बऱ्याचदा फार छान दिसते. अगदी निकी पेक्षा.
2. उसगावकर बाई फार fake/ annoying आणि स्वार्थी वाटतात. सगळ्यात irritating त्यांची पुस्तकी भाषा आणि नाटकी टोन. त्यांना ऐकणं अगदीच आवडत नाही. गटणेची वंशज असाव्यात असा भास होतो. अरबाज कितीही आवडत नसला तरी उसगावकरबैपेक्षा deserving होता. खरं तर यांनी आधीच कधी तरी बाहेर जायला हवं होतं.

बाई काय हा प्रकार, दुसऱ्या सुरू न झालेल्या शो साठी यांच्या म्हणण्यानुसार पॉप्युलर असलेला शो बंद करणार. तेलगू, कन्नड, इत्यादी भाषेत सुरू असलेले शो सुरूच आहेत/असतात. फक्त मराठी शो बंद करणार. देवा कुठे नेऊन ठेवली मराठी अस्मिता

कालचे ते टीआरपीचे पालुपद फारच हास्यास्पद होते. 4 आणि 4.5 चा टीआरपी आहे (जो की त्यांच्या नुसार खूप चांगला आहे) तरी शो कमी दिवसात संपवणार. या सगळ्यात धनंजयला टीआरपी चांगला की वाईट हे कळत नव्हते पण सूरजला मात्र सगळे कळत होते, बढिया है.

बरं ते T20 चे लॉजिक दिले ते किती चुकले होते, या वेळी बिबॉ मराठीचे सगळेच प्लॅन चुकत आहेत. आता 14 दिवसात फॅमिली विक, बिबॉचा वाढदिवस, तो शाळा असलेला टास्क, हे सगळे कसे करणार. त्यात त्यांना मिड विक इविक्शन सुद्धा घ्यावे लागणार. टॉप 5 घ्यायचे असल्यास 3 लोकांना घराबाहेर काढायचे आहे, टॉप 6 असतील तर 2 आणि वीकेंड एक

निकी एक नंबरची स्वार्थी बाई आहे . नॉमिनेशन मध्ये दोघांचे नाव आले तर ती अर्बाजैवजी स्वतःचे नाव घेईल हे स्पष्ट बोलली . तिचा हा नाटकीपणा अरबाज ला अजिबात दिसला नसेल का ?
तरीही तिच्यामागे मागे शेपूट हलवत . ..
आणि निकीचे ऍटिट्यूड म्हणजे सूंभ जळला पीळ उरला प्रकारातला आहे . काहीही झालं तरी स्वतःच्या सोयीचे ऐकते .
ना जाने उसकी माँ ने क्या खाके इसको पैदा किया है .

फॅमिली वीक, शाळा, खुर्ची केलंच पाहिजे असं रूलबुक आहे का? आणि आपण कशाला आपल्या डोक्याला ताप द्या?
टीआरपी असेल, पण लोकांना आवडत नव्हता हेही आहे.
आता अरबाज गेला तरी फोकस निक्कीवरच आहे.

मला तर वाटतं बहुतांश मराठी प्रेक्षकांना पिकनिक गॅंगमधली (जेन्यूईन) छोटी छोटी भांडणं, धूसफूस पुरेशी असतील. तेवढा ड्रामा पुरेल त्यांना. खोटी लफडी, अपशब्द, मारामाऱ्या नाही आवडत.

सूरजबद्दल सहानुभूती असली तरी त्यांच्या घरातल्या कामगिरीवर तो विनर व्हावा असं वाटतं नाही. अभिजीत बिग नो नो. जान्हवी फेक आहे. रूपाली आठवलु.
धनंजय फार लाउड आहे.
राहिले पंढरीनाथ आणि अंकिता.

वर्षा उसगावकर इतकी फेक पाताळयंत्री बाई पाहिली नाही. त्यांनी दिवसेंदिवस स्वतः च्या खोटारडेपणामुळे निकी, जान्हवी आणि इतरांवर जळणाऱ्या अंकीताला सुद्धा मागे टाकले आहे.

रुल नाहीत आणि हे खेळ व्हावे असा आग्रह नाही, पण या खेळांनी मजा येते जसा गेल्या आठवड्यातील प्राणी ओळखा होता तसे. हलके फुलके मजेशीर खेळ असतात हे. घरातील सगळे लोक बघू शकतात, नाहीतर भांडण बघण्यात त्यांना इंटरेस्ट नसतो.

अंकिता विजेती आणि अभिजित उपविजेता किंवा उलट असे काही होईल असे वाटते.

या वेळेचा पूर्ण सिझन वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या लेव्हलवर गंडला आहे. वर कोणितरी म्हटल्याप्रमाणे जवळपास बिबॉच्या सगळ्याच बातम्या आधीच बाहेर येत होत्या. खेळाडू गडबडलेले होते. सगळ्यांना बिग बॉस आणि भाऊच्या धक्क्यावर पुन्हा पुन्हा समजावून सांगावे लागत होते. बिनडोकपणा करून नॉमिनेशन केल्यामुळे व्होटिंग लाईन्स बंद ठेवण्यापासून ते पूर्ण नॉमिनेशन strategy कशी असावी ते उलगडून दाखवण्यापर्यंत सर्व काही करावे लागले. संग्रामने कॉन्ट्रॅक्टचे उघड केले. ते (त्याची चर्चा) दाखवणे टाळता आले असते तरी एडिटिंग टीमने गांजा मारून ते दाखवले. अंकिताने काल अभिजितला तो विनर आहे असे डायरेक्ट म्हटले. तेही दाखवले. हा पूर्ण एपिसोड प्रेक्षकांपेक्षा बिग बॉस टीम साठी जास्त सरप्रायजिंग होता Lol प्रेक्षकांनी मजा घेतली बिग बॉस तोंडावर आपटत असताना !!

आणि एवढं करून टीआरपी जास्त असताना (म्हणे !!) सिझन गुंडाळत आहेत.

तो act रायडर त्याचा ३० दिवसाचा धंदा बुडाला म्हणून "मराठी बिग बॉस वर अन्याय होत आहे" असे गळे काढताना ऐकले. गंमतच झाली सगळी !!

अंकिताने काल अभिजितला तो विनर आहे असे डायरेक्ट म्हटले.>> अभिजीत विनर आहे असं अंकिता कधी म्हणाली??

या खेळांनी मजा येते जसा गेल्या आठवड्यातील प्राणी ओळखा होता तसे. हलके फुलके मजेशीर खेळ असतात हे. घरातील सगळे लोक बघू शकतात, नाहीतर भांडण बघण्यात त्यांना इंटरेस्ट नसतो.>> +१

ह्या वेळेच्या बिग बॉस मध्ये काहीच राम नव्हता खरतर.
निकी, अरबाज सोडले तर कोणाला खेळ कळत नव्हता, आता अरबाज गेल्यामुळे दाखवणार तरी काय?
खर तर सोशल मीडियावर निकी आणि अरबाज ल इतके निगेटिव्ह बोलतात की लोक विचारू नका..त्यांच्यासाठीच अरबाज ल काढला असे वाटते नाहीतर तो विनिग प्लेअर होता. उगाच भांडणे करायचं नाही, खेळ तर अप्रतिम होता त्याचा, शिवाय तो छान लीडर पण होता. मला तर आश्चर्य वाटतंय वर्षा , जान्हवी किंवा सूरज ह्यांनी अरबाज पेक्षा काय मोठे तिर मारलेत की त्यांना ठेवलंय.... असो
आता सूरज किंवा निकी ने जिंकावं अस मनापासून वाटत कारण हे लोक निदान मनापासून खेळतात तरी....
जनव्ही तर अजिबात आवडत नाही जिंकायचे मटेरियल तिच्यात नाही ती सगळ्यांपेक्षा सुंदर असून पण vhamp दिसते..कधीच स्वतःच डोकं लावत नाही.
पंढरी, डीपी आणि अभिजित सारखेच आहेत घोळक्यात खेळणारे ह्यांचाही स्वतःचा गेम नाही दिसून येत. त्यात पंढरी आधी आवडला पण आता तो उगाचच कावेबाज वाटायला लागला आहे.
वर्षा आज्जी तर पहिल्या आठवड्यातच जायला पाहिजे होत्या निकी आणि जन्व्ही कडून अपमान करून घ्यायला त्यांना इकडे आणलाय का असाच वाटलं कारण त्यानंतर त्यांचा खेळ काही दिसला नाही तेव्हा पण त्यांनी निषेघ वैगेरे पुस्तकी वाक्ये फेकून अजूनच स्वतःच हसू करून घेतला...एवढं त्यांच्या पुरस्काराचा मजक उडवला तरी त्या भडकल्या नाहीत खूप आश्चर्य वाटल...

आणि अंकिता ती आहे का हाच प्रश्न आहे जेव्हा बघावं तेव्हा झोपेतच दिसते आणि कोकणी बोलते जेव्हा बेबी चया टास्कमधे कोकणी बद्दल बोलले गेले त्याच्या आधी कधी कोकणी नाही बोलायची...

ह्यावेळी पण लोक खरंच बघत होते शो....आता नक्की तीस दिवस करायचं काय म्हणून बंद करत आहेत शो...ह्या सगळ्यांना तर अंताक्षरी जरी खेळायला दिले तरी खुश होतील आणि जनता पण...

पोटाचा प्रश्न. Lol
जान्हवी आणि अंकिता किचन सांभाळतात , त्यामुळे त्यांना काढू शकत नाहीत. अरबाझ कुकिंग करायचा हा त्याचा आणखी एक गुण.

अरबाजचा गेम म्हणजे निकी सांगेल ते करायचे. सोमी वर निकी कोणालाच आवडत नाही. त्यामुळे अरबाज कितीही चांगला वागला तरी निकीमुळे बाद. ती त्याला किती वापरून घेत होती तेही त्याला कळत नव्हते. त्याला सतत सांगून पण तो तसाच. निकीने त्याला फसवल्यावर चिडून तो तिच्या विरोधात गेला असता तर लोकांना बघायला मजा आली असती. सगळा गेम बदलला असता.
निकी भांडायला लागली कि मला राखीच आठवते. त्या दोघींची तिकडे भांडणे व्हायची तेव्हा राखी भारी पडायची तिला. मी भांडी घासणार नाही हा ड्रामा निकीने हिंदी मधेही केला होता. राखीने तेव्हा तिला बरोबर सुनावले होते. ईथे ती राखीसारखीच भांडते.

त्या निक्कीला जान्हवी, पिकनिक gang शिव्या देत मोठं करतेय, येता जाता नावं ठेवत का होईना तिचा विषय म्हणजे फुटेज कोणाला मिळतं शेवटी, निक्कीलाच. निक्की कशीही असो, यंदाचा बिग बॉस तिच्या अवतीभवती हे नक्की. सर्वात जास्त पैसेही तिलाच मिळतायेत यातून.

पियू तो मंदार म्हणाला, लोकांना वाटतंय माझा बिझनेस बुडेल म्हणून मी मराठीचे उमाळे काढतोय पण माझे मराठी bb आणि हिंदी bb सबस्क्राईबर चेक करा, हिंदीत चौपट आहेत आणि मी हिंदी करणार आहे, तिथे माझा बिझनेस मराठीपेक्षा उत्तम आहे, मराठी प्रेमापोटी मला वाईट वाटतंय. अगदी शब्द न शब्द लक्षात नाही माझ्या पण आशय हा होता. मी बिग बॉस youtubers चे दोन ते पाच मिनिटं बघते, मग बोअर होतं.

मला जान्हवी निक्कीपेक्षा फेक वाटते, तिला माहितेय कलर्स मराठी कृपेने ती फायनलमध्ये नक्की असणार.

Lol , ती सिरीयलपासूनच जाम लाडकी, डोक्यात जाणारी.

एनिवे तिला किंवा निक्कीला ट्रॉफी मिळाली तर मला हा सिझन बघणं म्हणजे दगडावर डोकं आपटून घेणं वाटेल.

अभिजितने पॅडीदादाला टार्गेट केलं ते आवडले नाही, ते top 5 लायकीचे वाटतात मला.

आधीच हा सिझन टीआरपी असूनही फ्लॉप म्हणावा लागेल.त्यात अजूनही अस कोणी विनर अस वाटत नाही.
त्यात काहीही न करणार्या सूरजला जर विनर केले तर बघायलाच नको.
झापुक झुपुकच फक्त केल त्याने.
बाकी,या सिझनमध्ये खुर्चीसम्राट टास्क,चोर पोलिस टास्क,खुनाचा टास्क, उशयि किंवा कपडे शिवण्याचा टास्क असे काही टास्कच आले नाहीत.

अरबाजच्या जाण्याला फक्त तो आणि निक्की जबाबदार आहेत. निक्कीच्या आहारी नसता गेला तर विनर झाला असता. एकहाती सगळे टास्कस फिरवायचा आणि निक्की-जान्हवीपासून त्याला वेगळा पाहिला तर निगेटीव्हही वाटायचा नाही एवढा. निक्की आपला वेळोवेळी उपयोग करुन घेत आहे हे सांगूनही परत परत तिचं शेपूट बनून राहण्यात त्याने धन्यता मानली नसती तर मजा आली असती अजून. तरीही त्याच्यापेक्षा वर्षा, डीपी आणि सूरज जास्त नॉन-डिजर्विंग आहेत.
माझे टॉप ५ - पॅडी, अभिजीत, अंकीता, निक्की आणि जान्हवी. पॅडी किंवा अभिजीत जिंकला तरी चालेल.

Pages