बिग बॅास मराठी - ५

Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47

२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डिपी पण गेला तर बरे

याला अजून कसे काय सेफ करणे सुरु आहे. अभिजित, पंढरीनाथ, निक्की, सुरज आणि वर्षा आजी यांनाच काय ते आधी ओळखायचो. उरलेल्या ११ लोकांची नावे माहिती नव्हती. संग्राम चे नाव हि आधी ऐकले होते. धनंजय चे एवढे फॅन आहेत आणि एवढे वोटिंग आहे कि तो शेवटच्या ६ मध्ये जावा. घरातली भरीव कामगिरी म्हणजे बाथरूम मध्ये झोप काढणे यापेक्षा वेगळे काही नाही, तरीही इथवर आला, चांगले आहे. यावेळी बिबॉ हुकले आहेत, त्यांनाच कळत नाहीये काय करावे ते.

अरे काय ती एडिटिंग टिम गांजा फुंकून एडिटिंग करते का Biggrin
तो टिंपाट डीजे आला, वर्षा एलिमिनेट झाली, मग सगळे झोपले, दुसर्‍या दिवशी सकाळच्या सीन मधे अभिजीत -अन्किता भांडणाच्या वेळी वर्षा एकदम पुन्हा प्रकट झाली .. भूत पाहिल्यागत दचकले ना मी Rofl
मग पुन्हा आदल्या रात्रीची डीजे नाइट कंटिन्युड.. काय मुद्दाम करतायेत कि काय ?
आज अभिजीतला टॉप व्होट्स मिळालेली दाखवली आणि सूरज नंतर सेव्ह झाला, त्यात फायल ४ दिवस फक्तं आणि फक्तं अभिजीत अन्किता भांडाभांडी हा एकच विषय आहे घरात.. मला वेगळीच शंका येतेय !
सूरजला मनी बॅग कन्व्हिन्स करून अभिजीत आणि अन्किताने लाइट बन्द करावा असा प्लॅन आहे का मेकर्सचा ? मेघा पुष्की सारखं दोस्त बने दुश्मन ?हे असच असेल का रँकिंग लेटेस्ट प्रोमो पोस्टर सारखं ?
IMG_1804.jpeg

अंकिता आणि धनंजय यांना पेशन्स नाही. पंढरीनाथ कसं समोरच्याला सावकाश आणि पूर्ण बोलायला लावून त्यांच्याकडूनच वदवून घ्यायचे आणि त्याला कळायचं ही नाही. हे मध्येच अंगावर जातात .
अंकिताला आपण काय ऐकलं, काय बोललो याबद्दल खात्री नसते. हो का? मग तसं असेल. माझी चूक झाली असेल, हे किती वेळा झालं? कसा कैसा चलेगा?

दीपांजली, मला अभिजीत आधीहीआवडत नव्हता. तुमच्या हॅमरिंगमुळे तो ठार नावडता झाला. त्यांचा आवाज, टोन काही काही आवडत नाही.
वर तो निक्कीच्या तालावर नाचतोय. इतकं तर अरबाझही करत नव्हता.

भरत Happy
बरोबर , अरबाझ डबल ढोलकी नव्हता अभिजीत सारखा.
अभिजीत उर्फ फॅक्चर बन्ड्याला माकड म्हणतात पण नंदीबैल झालाय, बुगुबुगु निकीचा Proud

अखेर.भाऊ आले एकदाचे फिनँलेच्या धक्क्यावर.
फिनँले सहा वाजताच चालू होत आहे,म्हणजे हिंदीच्या प्रिमियर आधी गुंडाळायला बरं
आजच ठेवायचा ना मग.तसही आज एक एव्हिक्शन आहेच.

मी कालच म्हणाले ना, सुरजने मनी बॅग घ्यावी असं मेकर्सच्या मनात आहे, ठाम रहावं त्याने. अतिमुर्खपणा ठरेल त्याचा.

अभिजीत तर आता काय, गगनाला हात पोचलयासारखा वागतोय.

बाप रे,बाहेर आल्यावर ती वर्षा काय नॉर्मल वागत आहे,बोलत आहे.म्हणजे आतमध्ये बेअरिंग पकडल होत मराठी भाषा विदुषीच,नाटकी बोलण्याच.
किती तो कॉन्फिडन्स असतो ,कुठून येतो.काय तर म्हणे,मी फायनलिस्ट असायला हवे होते.मी जिंकायच्याच इराद्याने गेले होते.
हिने अजूनपर्यंत सोमिवरच्या स्वत:च्या कमेंट्स वाचलेल्या दिसत नाहीत.
जान्हवीच कोडकौतुक आहे मात्र.
धनंजय आणि अंकिता मात्र अजूनही हिटलिस्टमध्येच आहेत.

सुरजला तुफान वोटिंग आहे.

मी एक वोट सुरज, एक अंकिता द्यायचा विचार करतेय, नवरा अंकिताला देणार आहे. 99 नाही देणार आम्ही, वेळ लागतो.

अभिजीतचा गेम उतरला त्याच्या मनातून असं वाटतंय.

डीपी ला अंकितापेक्षा खूप वोटिंग आहे, अंकिता खाली गेली. सुरजची बात न्यारी, त्याला अतिप्रचंड वोटिंग आणि बाकीचे उरलेल्यात असं आहे. कोणीही पोचू शकणार नाही आसपास, मनी बॅग घेऊ नकोस रे हेच कळकळीने सांगावंस वाटतं त्याला.

जान्हवी, निक्की, अंकिता बॉटम 3, आहेत. सुरज, अभिजीत, डीपी टॉप 3 आहेत.

मनी बँग सूरजला ऑफर करतील अस का वाटत आहे,उलट मला तर वाटत निक्कीला ऑफर करतील आणि ती घेऊन जाईल.ती हुशार आहे,आतापर्यंत कळून चुकल.असेल तिला की ती विनर नाही होणार.
अभिजित अगदीण मनातून उतरला.डीपीला आणतील खाली.आजच्या भागात सुध्दा झोपण्यावरून त्याला बोलल गेलच .त्याला नाही आणणार तीनात.

आजही एडिटिंग टीम डोक्यावर पडली आहे, की बघणारे डोक्यावर पडलेत.

नवरा म्हणतोय मुद्दाम करत असतील.

युपी मनी बॅग सर्वांना ऑफर करतात ना, त्यातला एकजण घेतो.

युपी मनी बॅग सर्वांना ऑफर करतात ना, त्यातला एकजण घेतो......
माझ्यामते सिझन वन मध्ये आणि दोन मध्येटॉप तीन असताना ऑफर केली होती.
लास्ट सिझनला राखी ऑलरेडी बाहेरून ठरवून आल्याने सगळे असताना ऑफर केली होती.
यावेळी जर निक्की आली टॉप तीन मध्ये तर करतील,पण ती घेईल,सूरज नाही घेणार.हे आतापर्यंत ठरलही असेल.यावेळी सगळच ठरवून झाल आहे.

कारण गेले तीन चार दिवस पूर्ण एपिसोड्स पाहुण्यांसोबत असतो , म्हणून नंतर अर्धा तास दिवसभरातला मालमसाला दाखवत असतील.
टॉप ५ ची हूल दिली आपल्याला.
१६ मधले टॉप ६ फिनालेला जास्त होतात. खरं तर तीनच हवेत. मला वाटतं पहिल्या हिंदी बिग बॉसमध्ये असं होतं.

बिग बॉसमध्ये आपली मानसिकता बदलली आहे. आधी शांत, सुस्वभावी, नीतीवान, प्रामाणिक लोक चांगले वाटायचे ; आता बावळट वाटू लागले. कचाकचा भांडता येणं हा गुण वाटू लागला. तसंच आधी बदनाम असलेल्या लोकांना व्हाइटवॉश करून घ्यायची सोय बिग बॉसमुळे मिळू लागली.

निक्कीचा रोल आज एकदा अरबाजबरोबर शेवटचा कंटेंट दिला कि संपेल.
त्यामुळे तिला कुठल्याही नंबरवर काढू शकतात.
त्यामुळे मनी बँग घेऊन जाण्याचे चान्सेस तिचे जास्त आहेत.
विनर अजूनही कोणी तसा वाटतही नाही आणि कळतही नाही.
कारण या वेळी बिबॉसला च कळत नाही आहे की काय करायच.
यावेळी प्रमोशनसाठी च बिबॉस होत का हा प्रश्न आहे.अक्षय कुमारचा पिक्चर,नवरा माझा नवसाचा 2 ,इमर्जन्सी,कालचा अमेयणा पिक्चर,फुलवंती अश्या कितीतरी पिक्चर्सची प्रमोशन झाली असतील.मालिका तर वेगळ्याच.

बिग बॉसमध्ये आपली मानसिकता बदलली आहे. आधी शांत, सुस्वभावी, नीतीवान, प्रामाणिक लोक चांगले वाटायचे ; आता बावळट वाटू लागले. कचाकचा भांडता येणं हा गुण वाटू लागला.

>> इथे फार अवांतर होईल पण खरं सांगू का भरत? ऑलरेडी बाहेरच्या जगात तसेच आहे. चांगल्या माणसाला कमकुवत आणि बावळट समजले जाते. स्क्रीन वर बघताना आपल्याला जे प्रत्यक्षात मिळत नाही (चांगल्याला बक्षीस, वाईटाला शिक्षा) ते बघावेसे वाटते. पण हा रिॲलिटी शो आहे. बाहेर जग जसे आहे त्याचे प्रतिबिंब आत दिसणार.

आणि अगदी प्रामाणिकपणे विचार केला तर यातील सो कॉल्ड नितीवान लोक कितपत नीतीवान होते याविषयी आपल्या - आपल्यात पण मतमतांतरे आहेतच (पंढरीनाथ, योगिता, वारकरी सोडता). शिवाय काही ठिकाणी जिथे अनितीमान लोकांचे नाक ठेचायचे होते तिथे हे कमी पडलेच ना. एक इमेज मेन्टेन करायच्या नादात काहीही सहन करत गेले. उदा. निक्की, जान्हवी, अभिजित आणि वर्षाने अंकीताला मुद्दाम टार्गेट केले आणि टास्क असताना स्वतः नट्टापट्टा करून तिला मात्र पोळ्या करायला उभे केले. सगळ्यांच्या मनात होतं की अंकिताने विरोध करायला हवा होता. पण नाही झालं तसं. प्लस, तिला तिने न बोललेली वाक्य निकी तिनेच म्हटली आहेत हे पटवून देण्यात यशस्वी झाली. सूरज सगळ्यांना नितिवान वाटतो.. पण तो बावळट आहे ही फॅक्ट नाकारता येत नाही.

निक्की जेव्हा red carpet वर पहिली finalist म्हणून गेली तेव्हा तिने पहिली finalist बनण्याचा करार झाला होता वगैरे या अर्थाचं ती काही बोलली का? मी ते पहिलं नाही पण कुठेतरी वाचलं..

कचाकचा भांडता येणं हा गुण वाटू लागला. >>> बिग बॉसला तो गुण वाटतो. मला पॅडीदादा न भांडता, ठामपणे मुद्दे मांडायचे, मस्त टोमणे मारायचे ते आवडायचं. बिग बॉसला खटकलं ते, उगाचच काढलं त्यांना, कचकच केली असती तर ठेवलं असतं. ते एविक्ट झाले तेव्हा मला प्रचंड वाईट वाटलं.

आम्ही दोघांनी आपलं थोडंसं वोटींग केलं. मी सुरज, अंकीता दोघांना विभागून केलं वोटिंग. नवऱ्याने फक्त अंकिताला केलं. अंकिता चार नंबरवर आहे. तिला आणि सुरजला टॉप 2 करावं असं वाटतेय.

निक्की जेव्हा red carpet वर पहिली finalist म्हणून गेली तेव्हा तिने पहिली finalist बनण्याचा करार झाला होता वगैरे या अर्थाचं ती काही बोलली का? मी ते पहिलं नाही पण कुठेतरी वाचलं.. >>> असं करार वगैरे खरंच म्हणाली असेल तर ती सहाव्या किंवा पाचव्या नंबरवर बाहेर.

तिने न सांगताही वाटत होतं की कारण जर दोन हिंदी शो करून आली असेल तर फायनलचा करार असणारच.

अंकिता हुशार, विचारी आणी बुद्धी असूनही कधीच ती निक्की अरबाज जान्हवीच्या विरोधात बोलली नाही. प्रचंड बॅकफुटला गेली. अभिजीत वर विनाकारण जळत राहिली. नव्हता विश्वास तर स्पष्ट बोलून त्याला ग्रुप मधून बाहेर जायला सांगायचे. त्याने तर कधीच तिला नॉमिनेट केले नाही. डीपी ला तर नेहमी पाठिशी घातले. तो जणू कधीच चुकला नाही. त्याच्या रिल्स मधून काय शिकण्यासारखे आहे ??????,,तो काय समाजा देतोय म्हणून त्याला घेतले बीगबॉस मध्ये. हीन विचार आहेत त्याचे..

मला अंकिता प्रभावी वाटलेली पण तिचा काहीच चमकदार खेळ दिसला नाही. माणूस म्हणून ठीक आहे पण तिने त्यात अजून प्रगती करावी वाटते. डीपी पेक्षा पॅडीदादा बरोबर ती जास्त छान वाटायची.

तिने न सांगताही वाटत होतं की कारण जर दोन हिंदी शो करून आली असेल तर फायनलचा करार असणारच.>>>करार असणं ठीकच आहे...हा show बर्‍यापैकी managed असतो हे accept केलंय आता...पण निक्की स्वतः तसं बोलली का? हे जाणून घ्यायचंय मला....

अंकिता हुशार, विचारी आणी बुद्धी असूनही कधीच ती निक्की अरबाज जान्हवीच्या विरोधात बोलली नाही. >>>काही ठिकाणी मस्त बोलली आहे ती निक्कीला...पण काही जण एक मर्यादा जपून असतात...अर्थात अंकिताने जोरात आवाज उठवला असता तर ती hero ठरली असती खरी...पण त्या मूर्ख निक्कीशी भांडणे आणि bigg boss चा तिला असलेला आंधळा support असताना तिच्याशी भांडणे म्हणजे दगडावर डोके आपटण्यासारखेच आहे हे जाणून होती अंकिता...म्हणून तर निक्की साठी coffee पाठवल्यावर सूरजला भाकरी बद्दल विचारून तिने bigg boss लाच शालजोडीतला हाणला...खरंतर बोलण्यात अंकिताचा हात कोणीच धरू शकत नाही...भारी बोलते ती....

कदाचित घरातल्या सदस्यांना हळूहळू जाणीव झाली असेल की निक्की काही जाणार नाही.बिबॉस बरोबर असेल सेटिंग. मग कशाला उगाच वाकड्यात जा.कारण तिच्याकडून काही चुकीच झाल तर तिला बिबॉस सपोर्ट करणार पण आपल्याला नाही.म्हणून फार ताणल नसेल.

अभिजीत आज फार एकटा एकटा वाटला. खूप वाईट वाटले. आपल्डीया बाजूने कोणीच नाही आणि कुणाला फारसे आवडत नाहीशह्पीयासारखी दुखःद भावना म्हणाला की त्राने फायदा घेतला व पुढे आला. मला नाही वाटत तसे. तुझे विचार तपास पहिल्यांदा डीपी.तो चांगलाच खेळलाय. निक्कीचा मित्र म्हणून वाईट नाही ठरवायचे.

अभिजीतला आज reality check मिळाला...B group शी प्रामाणिक राहिला असता तर जिवाभावाची माणसं तरी कामावली असती...पण त्याच्या diplomatic वागण्यामुळे अगदीच मनातून उतरलाय...आज B group चा उदोउदो ऐकून जबरदस्तीने जात होता त्यांच्यात...अगदीच लाचार वाटला...and he deserves this...वैभव आवडला आज...त्याने perfect analysis केलंय आणि स्वतः मध्ये change केलाय...बाहेरच्या hate मुळे nervous आहे बिचारा...
विजेता अभिजित>>>हे खरं असेल तर पंधरा लोकांसोबत असूनही एकटं वाटत असेल...तर जिंकूनही हरल्यासारखं आहे...

डीपी आपण ग्रेट, बरोबर आणि पॅडीदादा, अंकिता, अभिजीत कसे चुकीचे असं बऱ्याच जणांना सांगत होता, असं कोणाला वाटलं नाही का.

आज जरा तो मी असा, मी तसा. मी नाही grp बरोबर असं जास्त म्हणत होता असं मला वाटलं.

वैभवला कानी कपाळी ओरडून पहिल्या आठवड्यापासून बिग बॉस सांगत होते, अरबाझ 2 होऊ नकोस, दुसरा grp लीड कर, आतमध्ये मठ्ठ तो मठ्ठच राहिला, आता पश्चातबुद्धी काय उपयोग. तो टास्कमध्येही लॉयल फक्त अरबाझशी होता.

अरबाझने सोडलं का gf ला. अगदी नतमस्तक निक्कीपुढे.

वर्षाताईचे जाणं फक्त तिला shocking होतं, लोकं बाहेर वाट बघत होते, हे बाहेर जाऊनही समजलं नाही तिला.

आज योगिता निखिल खरंतर चांगलं सांगत होते अभिजीतला, तू आणि अंकिता एका चांगल्या नोटवर एकमेकांना निरोप द्या.

B ग्रुपने कधीच अभिजीत ला मनापासून स्विकारले नव्हते. विश्वास नाही तर सांगायचं ना. हे अगोदरच त्याला कळाले असते तर एकटा खेळला असता. अंकीताही प्रचंड डॉमिनेटींग आहे. मनात अढी ठेवते. शांतपणे दुसर्मयाचे मुद्दे समजूनच घेत नाही. सतत रागीट भाव असतात चेहर्यावर जणू बळंबळ हा शो करायला कोणी भाग पाडतंय. ती आवडत असेल माणूस म्नाहणून मुलींमध्ये पण आवडणार नाहीती जिंकलेली. डीपी खरंच फायनल मध्ये जायचा लायकीचे नव्हते.डीपी पण बोलतो की निक्की शी मग अभिजीत बोलला तर काय बिघडले.अभिजीतला कळूच चुकले शेवटी की B ग्रुप कधीच स्विकारणार नाही म्हणून निक्की कडे गेला. मग त्यानने एकटं एकटं बसावे का आख्खा आठवडा.

Pages