Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47
२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला तर वाटतं बहुतांश मराठी
मला तर वाटतं बहुतांश मराठी प्रेक्षकांना पिकनिक गॅंगमधली (जेन्यूईन) छोटी छोटी भांडणं, धूसफूस पुरेशी असतील. तेवढा ड्रामा पुरेल त्यांना. खोटी लफडी, अपशब्द, मारामाऱ्या नाही आवडत. >> +१
कितीही म्हणलं तरी मलाही नाही वाटत खोटी लफडी, अपशब्द, मारामाऱ्या बघण्यात बहुतांश मराठी लोकांना रस आहे. त्यातून निक्की-अरबाजच्यात जे काही होतं ते गेममधे दिसत रहाण्यासाठी होतं हेच जाणवत होतं. बरं अपशब्द, वाद नॉर्मली होत असले तर जेन्युईनही वाटतात पण बर्याचदा निक्की करते ते उकरुन काढलेले असतात. अपवाद कोथिंबिर.
निक्किमुळे अरबाज माणूस म्हणून
निक्किमुळे अरबाज माणूस म्हणून कसा आहे हे शेवटपर्यंत कळलंच नाही. त्याचा गेम तिच्याच अवती भवती राहिला अगदी शेवटपर्यंत. टास्कमध्ये तो प्रमाणापेक्षा जास्त आक्रमक होऊन खेळायचा, हरत असल्यास मोठ्या आवाजात आकांड तांडव करायचा पण शेवटी काही करून टास्क मात्र जिंकायचा. त्या अभिजीतला विनाकारणच जोरात ढकलल होतं त्यानं एकदा. योगिताने देखील काही आरोप केले होते तो जे काही वागला होता एका टास्कमध्ये त्याबद्दल. जिंकल्यावर विचित्र हावभाव करून उन्माद देखील करायचा कधी कधी.
तिसऱ्या सिझनमध्ये जयसमोर विशाल उभा असायचा नेहमी टास्कमध्ये पण यावेळी अरबाज समोर त्याच्या ताकदीचा कोणीच नव्हतं समोरच्या टीममध्ये. वैभवला खूप हिंट्स दिल्या रितेशने आणि बिग बॉसने विरुद्ध टीममध्ये टाकून अनेक संधी देखील दिल्या पण त्याने सर्व वाया घालवल्या.
काय सोया सोया लावलंय
काय सोया सोया लावलंय तेज्यायला
आदर ला आधार काय!
मराठी बिग बॉस मध्ये किमान नीट मराठी बोलणारे लोक तरी आणा राव.
मालक नोकर टास्कसाठी दोन
मालक नोकर टास्कसाठी दोन टीममध्ये चुरस लावण्याऐवजी दोन दिवस हे मालक आणि दोन दिवस ते करायचे. लागून वगैरे कोणी बाहेर जाण्यापेक्षा वोटिंग नुसार काढा.
तसाही आता इंटरेस्ट फार नाही राहिला, voting पुढच्या आठवड्यात करेन.
निकीने आता नवीन टूम काढली आहे
निकीने आता नवीन टूम काढली आहे , कोणी काही विरुद्ध बोलायला लागलं कि "तू हे मला बाहेर वाईट दाखवायला बोलतो आहेस वगैरे . कालच्याच एपिसोडमध्ये मी २ वेळेला एकच वाक्य ऐकलं . तरी मी १ ० पर्यंतच पहिला एपिसोड .
बीच आहे निकी . अजिबात आवडत नाही मला . पडलं तरी नाक वर , आणि नाक कापलं तरी भोकं आहेत म्हणणाऱ्यांची जात आहे तिची .
अंकिता भारी खेळली आज, उद्या
अंकिता भारी खेळली आज, उद्या वर्षालाही लोळवणार आहे बहुतेक
उद्याचा प्रोमो पाहिला उद्याचा, अर्थात ए टिम टास्क जिंकली आहे आणि बी टिम सगळी कामं करत आहे !
बिगबॉस मुद्दाम अशा टिम बनवते जिथे निकीला काहीही काम करायला लागणार नाही, इन फॅक्ट तिला हतात सगळे खायला मिळेल याची सोय करतात , कॉफी डेट अरेन्ज करतात !
टिम बी पण ऐकतायेत कामं मूर्खा सारखे, करायचा कि ड्रामा काम करत नाही म्हणून , नाही तर डिले करायचा मुद्दाम त्रास द्यायचा जरा निकीला , वर्षाआज्जी पाय दाबून घेत आहे, चांगला पाय ट्विस्ट करून मुरगाळून क नाही टाकला तिचा अन्किताने !
डीपी भारी खेळला काल, अंकीताने
डीपी भारी खेळला काल. अंकीताने आणि टीमने शेवटच्या क्षणी निक्कीला बोलण्यात गुंगवून तो पिवळ्या रंगाचा चौकोन काढून घेतला ते मला जास्त भारी वाटलं. बाकी अंकीता निक्की दोघी जोमात होत्या.
खरंतर बी टीममधे टास्क खेळणारे चांगले होते ए पेक्षा पण काल डीपी पॅडीपेक्षा टास्क जोमात खेळला. बी जिंकायला हवी आहे, स्वयंघोषित क्वीनला दासी झालेलं बघायला मजा येईल. मी नवीन प्रोमोज पाहीले नाहीत अजून.
मला एक गंमत वाटते मात्र निक्कीचं नाव, विषय काढल्याशिवाय घरातल्या एकाही स्पर्धकाला जेवण जात नाही का. सतत निक्की निक्की निक्की. अरे नाव टाका तिचं.
बी टीम गुलाम झाली असेल तर सिंपथी वोटस त्यांना मिळतील हे मात्र नक्की.
सिरियसली निकी ला पूर्ण इग्नोर
सिरियसली निकी ला पूर्ण इग्नोर मारायला हवं होतं . मी घरात असते तर ती अरबाज च्या घराबाहेर जाण्याच्या प्रसंगात ज्या पद्धतीने रडत होती तिथे मी तिला तशीच टाकून आत जेवायला निघून गेले असते .
बी टीम बावळट आहे हे जगजाहिर
बी टीम बावळट आहे हे जगजाहिर आहेच. झाले सांगकाम्या तरी कितीतरी प्रकार आहेत ना तंगवण्याचे. नाही म्हणणे, जमत नाही म्हणून कांगावा करणे, नीट काम न करणे, उशीर करणे, काम बिघडवणे वगैरे. नाहीतर काय मजा त्या टास्क मधे?!!
बाकी ए टीम जिंकणार माहितच होते. बिबॉ ने टीम्स च तशा निवडल्या होत्या. तसेही टॉर्चर करायला निकीशिवाय कुणाला छान जमणार. वर्षाही चांगला करते आहे हा टास्क असे दिसतेय.
आज जान्हवी जबरदस्त खेळली, फुल
आज जान्हवी जबरदस्त खेळली, फुल मार्क्स आणि रिस्पेक्ट तिला, लागलं तिला. हरली असली तरी टाळ्या माझ्याकडून. सुरजही छान खेळला, त्याला डीपी योग्य मार्गदर्शन करत होता. जान्हवी सुरजपेक्षा बेस्ट होती. निक्कीने खूप कौतुक केलं जान्हवीचं. जान्हवी बाजीगर एकदम, हिरो.
वर्षाताई छान खेळली अंकीतापेक्षा किंवा अंकीता समोर वर्षाताई म्हणून ग्रेसफुली खेळली. शेवटचा टास्क लवकर संपवला की एडीट केला. इतक्या लवकर कशी काय ती फेरी संपली.
सूरज जान्हवीची फेरी खूप वेळ
सूरज जान्हवीची फेरी खूप वेळ चालली.
वर्षा अंकिता लवकर गुंडाळली.
त्यामुळे दोन्ही निकाल बी च्या विरोधात गेले.
बिग बॉस की सेटिंग
अजून काही वेळ चालली असती फेरी
अजून काही वेळ चालली असती फेरी,तर टाय झाला असता,जे बिबॉसला नको होत ,तसच वर्षाला सांगकाम्या करण आणि टीम बी ने काम सांगण हे ही कठीण गेल असत ,तसच टीम बी मालक झाले असते तर परत सगळा फोकस निक्कीवर आला असता कारण तिने नक्कीच काम केली नसती,परत तेच झाल असत.त्यामुळे टीम ए जिंकण्यातच बिबॉसच भल होत.
जान्हवी जबरदस्तच खेळली.
सूरज चांगला खेळला पण आज तो ही काही वेळा अँग्रेसिव्ह होत होता,या ठिकाणी अरबाज असता तर निक्की सोडून अख्ख घर पेटल असत.
माझ्या मते इथेच आपल्या मराठी ऑडियन्सला अनबायस व्हाव लागेल तरच खर्या अर्थाने टास्क खेळणारे व्हिलन ठरणार नाहीत.
सूरजला आज सोमि डोक्यावर घेईल,पण आजही सूरजला डीपीला सांगाव लागत होत हा टाक,तो टाक.त्याला समजत नव्हत,निक्कीने जान्हवीच कौतुक करताना नेमक हेच सांगितल जान्हवीला,की तो ताकद लावत होता ,तू डोक वापरायला हव होतस,तो गोंधळत होता त्याचा फायदा घ्यायला हवा होता.
अरबाज असता सूरज ऐवजी तर आज सोमिवर त्याची लक्तरच टांगली असती.
चक्रव्यूहात अंकिता अभिजित छान खेळले.
वर्षा गोंधळली नाहीतर निक्कीने आणले असते पैसे.पण ऩतर निक्कीने तिचा मुळ शोबाजीपणा दाखवलाच.म्हणूनच डोक्यात जाते ती.
अंकिता मात्र आज सपशेल.खोट बोलत होती,निक्की अंकिता जे सांगत आहे तस कधीच म्हणाली नाही.खरच ते फुटेज दाखवल पाहिजे धक्कयावर ,तोंडावर आपटेल अंकिता.
अभिजित तरी बिनडोक कसा,निक्कीने सांगितल ,गेला लगेच शहानिशा करायल अंकिताकडे.
चक्रव्यूहात निक्कीचा खोकाकुवा
चक्रव्यूहात निक्कीचा खोकाकुवा झाला
आता एक आठवडा उरलाय तर निक्की
आता एक आठवडा उरलाय तर निक्की आणि वर्षाताईला काढा. बाकीचे राहूदेत. त्या दोघींना फायनलमध्ये नेणार असतील तर उगाच कोणाला काढतील जास्त करून डीपी आणि पॅडीदादा जातील यांच्यामुळे.
जान्हवी मस्तच खेळली सुरज समोर
जान्हवी मस्तच खेळली सुरज समोर . आणि वर्ष उसगावकर कितीही आवडत असली तारीही अन्नाच्या बाबतीत इतका हलगर्जीपणा अगदीच निंदनीय आहे .
अन्नाच्या बाबतीत इतका
अन्नाच्या बाबतीत इतका हलगर्जीपणा अगदीच निंदनीय आहे . >>> अगदी अगदी. खाऊन माजावं, टाकून माजू नये हे अगदी आठवत रहातं.
जान्हवी छान जिद्दीने खेळली ,
जान्हवी छान जिद्दीने खेळली , स्ट्राँग आहे ती पण सूरज आहेच वरचढ , शब्दशः बुक्कीत टेंगुळ मिळालं जान्हवीला
वर्षा अजिबात चांगली खेळली नाही, फुसकी आहे, अन्किता अगदी सहज जिंकत होती पण बिगबॉसने मुद्दाम बझर वाजवला , त्यांना टिम ए जिंकायला हवी होती !
अभिजीत सर्वात अनॉयिंग आहे , चुगलखोर चाची झालाय , निकीच्या मागे करत फ्लर्ट करताना पुष्कि सारखा वाटायला लागलाय, हा कसला यांचा फिक्स्ड विनर ? जाताजाता इज्जत का फालुदा करून जाणार !
सूरजने शर्ट का काढलं?
सूरजने शर्ट का काढलं?
वर्षा वि जान्हवी आणि सूरज वि अभिजीत अशा जोड्या का नव्हत्या?
स्वतःला फार शहाण्या समजणार्या वर्षा आणि निक्कीने पैसे कमवण्यात घोळ घातलेला पाहून मज्जा आली. त्यातून निक्कीला वर्षाला काही बोलताही येईना.
वर्षाचा चित्रपटांतला अभिनय कसा होता ?, होता का? ते आठवतोय.
मला त्यांच्या एकपण चित्रपट
मला त्यांच्या एकपण चित्रपट चटकन आठवत नाही.
निक्कीने ती ५०,००० ची वीट न उचलता आपल्या हातात लाकडाचा बॉक्स आलाय हे त्या बॉक्सच्या फिलिंग वरून तिच्या लक्षात आले नाही? एवढी हुशार आहे ना ती, तरीही कळले नाही तिला. बरं वर्षा आजी आणि घरातील लोकांना पण कळू नये हे. वर्षा आजी आत जाताना पंढरीनाथने कसला तरी कुजका जोक केला. आता कुठे गेला यांचा रिस्पेक्ट. निक्की आणि टीम सांगकामे झाले असते तर यांनी घरातील असतील नसतील ती भांडी धुवायला काढली असती. तिला वाटेल ते काम द्यायचे हा यांचा प्लॅन फसला. निक्कीला भांडे घासायची शिक्षा तेव्हाचे जान्हवी, अंकिता, पंढरीनाथ यांचे सुविचार ऐकण्यासारखे होते.
धनंजय आणि जान्हवी सुद्धा फुसके बार निघाले. नुसतेच बोलायला पुढे, काम शून्य. पंढरीनाथ आणि पिकनिक ग्रुपला २५ लाख किरकोळ रक्कम वाटते का, इतक्या सहजसजी त्यावर पाणी सोडत आहेत. फक्त शेवटची २,२५,००० ची उचलायची हा कुठला प्लॅन. सगळे मिळून १० लाख तरी उचलतील का? खेळलेच नाहीत म्हणा तर पैसे काय कमवणार.
आता एकच आठवडा उरला असताना
आता एकच आठवडा उरला असताना कशाला तो फॅमिली वि़
प्रोमो मधे अभिजीतची फॅमिली आलेली दिसतेय, काय फालतुपणा आहे , उगीच रडारड..असे किती दिवस आहेत हे लोक घराबाहेर ?
लग्गेच रडायला तयार !
तेच ना आता फॅमिली वीक कशाला.
तेच ना आता फॅमिली वीक कशाला. लगेच भेटणार की सगळे.
बिग बॉसच कंटाळलेत tp करतायेत. पुढच्या वेळेपासून पन्नास दिवस आणि ह्यापेक्षा अर्धे स्पर्धक ठेवा.
वर्षाताई मला सिनेमापेक्षा सिरियलमध्ये आवडली, माई म्हणून चांगला अभिनय केलेला आणि ग्रेसफुल दिसलेली. तशी ती मला फार आवडत नाही. सिनेमात काही अभिनय वगैरे लक्षात नाही, दोन गाणी आठवतात. एक मी आले, निघाले आणि दुसरे चोरीचा मामला, मामाही थांबला. त्याच पिक्चरमध्ये चारुशिला साबळे होती का, तिने उत्तम अभिनय आणि छान केरसुणी डान्स केलेला ( अश्विनी ये ना ), ती आवडलेली जास्त. आम्ही कॉलेजात असताना प्रशांत दामले बरोबर नाटक गाजलेले तिचे, ते बघितलं नव्हतं. नाटकाचे काही शॉटस टीव्ही वर बघितले त्यातलं गाणं म्हणजे यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया, का लाजता (मीनाक्षी शिरोडकर आणि मास्टर विनायक यांचा जुना ब्रह्मचारी चित्रपट होता त्यावरून नाटक होतं) .
निक्कीने ती ५०,००० ची वीट न उचलता आपल्या हातात लाकडाचा बॉक्स आलाय हे त्या बॉक्सच्या फिलिंग वरून तिच्या लक्षात आले नाही? एवढी हुशार आहे ना ती, तरीही कळले नाही तिला. बरं वर्षा आजी आणि घरातील लोकांना पण कळू नये हे. >>> हो ना.
आता मला votes वर सुरजला विनर करा असं वाटू लागलं आहे. ह्याला बझर टास्क समजेल की नाही शंका आहे , समजायला हवा कारण इतक्या जणांचे बघितलं आहे.
बझर टास्क अभिजीत अंकिता उत्तम खेळले.
या सगळ्या वीक प्लेअरसाठी
या सगळ्या वीक प्लेअरसाठी फॅमिली वीक न करता फॅमिली डे केलेला दिसतोय. नॉमिनेशन टास्क, प्राईझ मनी, फॅमिली डे, कॅप्टनशिप टास्क यात हा आठवडा संपवणार, शनिवारी धक्का आणि रविवारी १ एलिमिनेशन. पुढील आठवड्यात त्यांच्या मर्जीनुसार १ किंवा २ मिडविक एलिमिनेशन, शेवटचा कॅप्टनशिप टास्क आणि फिनाले करून हिंदी बिबॉसाठी मराठी सिझन संपवणार.
या आठवड्यात किमान ticket to
या आठवड्यात किमान ticket to finale तरी घ्यायला हवा होता...जय विशालच्या वेळी किती भारी झाला होता ticket to finale
सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे
सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मराठी प्रेक्षकच महा बोरींग आहेत. मारामाऱ्या, खून, शिवीगाळ म्हणजे या तत्सम रिऍलिटी शोचा आत्मा असतो आणि मराठी प्रेक्षक यालाच कंटाळतात. मग आता दाखवणार काय? बिग बॉस तुम्हाला सगळ्यांना कंटाळलंय म्हणून शो लवकर बंद करतोय. सुधरा लेकांनो. शो बंद पाडलात सत्तर दिवसात.
बोकलत तुम्ही पुढच्या वर्षी
बोकलत तुम्ही पुढच्या वर्षी भाग घ्या शोत, तुमच्यासाठी नक्की बघू.
फॅमिली आली की आपल्यालाही
फॅमिली आली की आपल्यालाही इमोशनल वाटतं.
अभिजीतची धाकटी कसली आहे, भारीच. कॉफीवेळी निक्कीच्या मागे मागे करत होता ते बोलून दाखवलं. अभिजीत ची बायको योग्य वागली, सर्वांसमोर नवऱ्याचा रिस्पेकट ठेवला, माझा विश्वास आहे सांगितलं आणि आतमध्ये त्याला कॉफी जास्त पिऊ नकोस सांगितलं, प्लस तू त्या बाजूला जास्त दिसतोस (म्हणजे निक्कीबरोबर) हे सांगितलं. सहीच एकदम.
जान्हवीचा मुलगा कसला गोड आहे, वडलांसारखा कमी बोलतो, शांत आहे, सुरजबरोबर छान रमला. त्याचा एक किस्सा त्याच्या बाबांनी सांगितला की शनिवारी एविक्शन वेळी जान्हवीच्या घरचे निक्की जाईल का बाहेर म्हणत होते, तेव्हा म्हणाला ती कशी जाईल बाहेर, मग बघणार कोण बिग बॉस, तेव्हा जान्हवीचा चेहेरा बघायला मजा आली.
डीपिचे बाबा त्याचे भाऊ वाटतात. आई बायको छान आहेत दोघी. बायकोला खूप बोलायचं होतं, बोलकी आहे. ह्या फॅमिलीचे तसं कमी दाखवलं. सर्वात जास्त अभिजीतचे दाखवलं.
वर्षाची बहीण मनीषा उसगांवकर आलेली. तिला शिकायला मुंबईत आणलेलं वर्षाने असं काहीतरी आठवतंय, मुंबईत कुठल्यातरी फेमस कॉलेजमध्ये होती, तीही येणार होती का पिक्चरमध्ये, का केलाय एखादा. आमच्या वेळी कॉलेजियन मुलींत चर्चा असायची ते आठवलं. गोव्याचे कोंकणी समजतं की सर्वाना, मराठीच्या जवळ जाणारी भाषा आहे, बिग बॉसने मराठीत बोला सांगितलं. अर्थात राज्य वेगळं म्हणून असेल. वर्षा नवऱ्याची वाट बघत होती, यायला हवा होता, तो सिंगापुरला गेला आहे म्हणे.
वर्षा आणि तिची बहीण काय बोलत
वर्षा आणि तिची बहीण काय बोलत होत्या ते पटकन कळत नव्हत ,म्हणून कदाचित बिबॉसने सांगितल असेल मराठीत बोला म्हणून सांगितल असाव.वर्षाने निक्कीची व्हँम्प म्हणून करून दिलेली ओळख अजिबात पटली नाही.तिथे कुजक बोलण्याची काही गरज नव्हती.काल वर्षा पार मनातून उतरली,त्याएवजी एरिना पण चालली असती.पण निक्कीने फँमिली वीक म्हणून छान सांभाळून घेतल.
निक्की साडीत गोड दिसत होती.
मला उलट वर्षाची बहीणच तिच्यापेक्षा बरी वाटली.टिपिकल गोवेकर वाटली.
अभिजितची बायको एकदम कॉन्फिडण्ट आणि डॉमिनेटिंग वाटली.अगदी रोखठोक
उत्तर दिली.अभिजितच शेंडेफळ गोड आहे.आणि बिनधास्त आहे.
जान्हवी एरवी जेवढी फेक असते तशी नवरा आणि मुलगा आलेला असताना नव्हती.एकदम खरी वाटली.मुलगा गोड
आहे.
डीपी खरच अभिजितच्या बायकोला म्हणाला की बायकोचा कंटाळा आला आहे,बिबॉसने तो मुद्दा लगेच उचलला.तेव्हा मजेने बोललो असही सांगता आल असत ,पण तेवढ्यात बायकोने सांवरून घेतल.
मला डीपी तसा फार आवडत नाही,पण बायको फार साधी वाटली.डॉमिनेटिंग नेचरचा वाटला.
आज आता बाकीच्यांच्या घरचे मेंबर्स येतील.सोमिवर सूरजच्याच घरच्यांना बघण्याची उत्सुकता आहे.
पण अर्थात हे माझ मत आहे,सूरज आता मला जसा भोळा वाटला होता,तसा वाटत नाही,शेवट जवळ आला आहे तसे खरे रंग दाखवत आहे का,की गेम कळायला लागला.
म्हणजे अरबाज गेल्यावर निक्कीला मी आहे हे सांगण,मालक झाल्यावर काही खास काम न सांगण.
मला आता त्याचा गेम वाटत आहे.
तो गरीब आहे,मेहनती आहे,पण भोळा नाही अस वाटत आहे ,कालही मोठ्यांच्या पाया वगैरे पडला.
पण खर सांगू का,शिव मला जेवढा नँचरल वाटला तेवढा हा नाही वाटत.
मला नाही आवडणार याला विनर म्हणून बघायला.
काल खरतर पहिल्यांदाच मला निक्की रियल वाटली.एकतर मुद्दाम पुढेपुढे करत नव्हती.उगाचच माफी वगैरे मागायला गेली नाही.काल डिग्निटी सांभाळून होती.अशी राहिली असती तर खरच विनर झाली असती.
आता आज तिची आई आल्यावर कस रिअँक्ट करते ते बघू.
काल चक्रव्युहात सुरज आणि पॅडी
काल चक्रव्युहात सुरज आणि पॅडी दादा चांगले खेळले. पॅडी दादा नीट गाईड करत होते. एखादा झेंडा सोडला असता तर कदाचित शेवटची वीट मिळवली असती. हार्ड लक.
.. पुढच्या वेळीपासुन बिबॉ ने प्रत्येकाच्या घरच्यांपैकी एकाला आठवडाभर रहायला बोलावलं पाहिजे. मजा येइल 
आई गप्प गप्प होती.
वर्षा ची बहिण आल्या आल्या एकदम गोंधळली होती. तिला फ्रीज्/अन्फ्रीज चा गेम माहिती नव्हता बहुतेक.. दोघी कोकणी बोलताना गोड वाटत होतं ऐकायला. वर्षा कोकणी बोलताना नाटकातल्या सारखी बोलत नाही. नॉमल बोलते. मराठी बोलताना एकदम नाटकात शिरते.
निक्की ला घरातली व्हॅम्प म्हणलेलं आवडलं नाही. खटकलं. निक्की ने शांतपणे सांभाळुन घेतलं. जर तिचा खरा स्वभाव असा समजुतदार असेल तर इथे घरात ती इतके दिवस नाटक करतेय का ?
अभिजीत च्या पोरी मस्तच. मला आवडली त्याची फॅमिली आणि बाँडींग. बायको एकदम खमकी आहे अभिजीत ची. माझा नवरा काहीच चुकीचं वागत नाहिये असं ठणकावुन सांगितलं घरच्यांना
जान्हवी चा नवरा किती साधा आहे आणि मुलगा थोडा लाजाळु आहे. छान वागत होती जान्हवी त्यांच्यासोबत.
डीपी काल निक्की ला काहीतरी चुकिचं बोलला का ? साडी मधे किडा टाकला असं काहीतरी ती म्हणत होती आणि पॅडी, अंकिता पण चर्चा करत होते. मला कळला नाही मुद्दा नक्की काय झाला ते.
डीपी चे बाबा आणी डीपी मधला प्रसंग बघुन भरुन आलं. बाबा लोक रडायला लागले की अगदीच कसंतरी होतं. आयांना रडताना बघायची सवय असते पण बाबा लोक व्यक्त होत नाहीत त्यामुळे त्या दोघांमधलं बाँडींग आवडलं. डीपी ची आई आणि बायको रील्स मुळे ओळखिचे आहेत. त्याची बायको रील्स मधे पण आवडते मला. काल तिने आल्या आल्या नवर्याच्या पायावर डोकं ठेवलं. टिपीकल पती परमेश्वर बायको
बायकोचा कंटाळा आलाय हे वाक्य डीपी चेष्टेत म्हणाला होत. त्याची स्टाईल माहिती आहे आता. पण बिबॉ ने उगीच खोडी काढली.
मला पॅडी ची फॅमिली बघायची आहे. मागे एकदा त्याला जान्हवी जोकर म्हणाली तेव्हा त्याच्या मुलीची इंस्टा स्टोरी पाहिली होती. मस्त बोलत होती ती.
सुरज काल सगळ्या लहान मुलांशी मस्त वागत होता. अभिजीत च्या मुली, जान्हवी चा मुलगा त्याच्यासोबत फिरत होते.
मलाही निकीचा स्टँड बरोबर
मलाही निकीचा स्टँड बरोबर वाटला, काय फाल्तुपणा करतो डीपी , बायकांशी वागताना नेहेमीच बाउंड्री क्रॉस करतोय असं दिसतय.. मागेही वर्षाला तिच्या मेकप किट मधे घुसून उचका पाचक करत होता ते आवडले नव्हते.
डीपीची बायको त्याला पाहून ‘परमेश्वर भेटला ‘ म्हणत धावत जाऊन पाया पडली हे बाघून मी चाटच पडले, कुठल्या जमान्यात रहातात हे लोक ?
कोण असं वागतं आजकाल , अशा बायका अजुन असतात ? ते ही शहरात ? कमाल आहे, बिबीने का दाखवले हे ? काय मागासलेल्या प्रथा प्रमोट करतायेत
अभिजीतची बायको आणि पोरी अभिजीत पेक्षा स्मार्ट आहेत, छोटी तर फारच क्युट आणि चुरुचुरु बोलणारी !
सूरज किती छान वागला लहान मुलांशी, त्याची छोटी छोटी जेस्चर्स बघून ऑडियन्सला आवडतोय तो तोच जिंकायला हवा हा शो !
डीपी अंकिताला शिंकण्यावरून
डीपी अंकिताला शिंकण्यावरून काही तरी बो लला असावा. पॅडीच्या तोंडी उत्सर्जन वगैरे शब्द ऐकून मी टीव्ही म्यूट केला. (मी जेवत होतो). तेच पुढे नेऊन डीपी काहीतरी बोलला असावा, जे चार चौघात बोलू नये, असं अंकिता नंतर म्हणाली.
त्याने निक्कीच्या साडीत कीटक सोडला असा तिला संशय होता. पण अंकिता इ. नी त्याने फक्त तशी हूल दिली असं सांगितली.
अंकिता, डीपी , पॅडी यांना अभिजीत बायकोला घाबरून असावा असे वाटले किंवा माहीत असावे, म्हणून शाळेतले शिक्षक पाल्याची पालकाकडे तक्रार करतात तसं त्याच्याबद्दल तिच्याशी बोलताना वाटले.
वर्षा फेक.
जान्हवी पापाचं परिमार्जन म्हणून वर्षाची सेवा करते का? मग पॅडीची का नाही करत? की वर्षा त्याच्यापेक्षा स्टेटसने मोठी म्हणून फक्त ती?
पाय दाबतात की चेपतात?
टास्क रात्री किती उशिरापर्यंत चालतात ! यांचं झोपेचं सायकल बिघडलं असेल.
Pages