Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47
२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कालचा बिबॉ चा डाव चांगला होता
कालचा बिबॉ चा डाव चांगला होता, ए टीम हरली तर वर्षा आजी बाहेर जाणार, बी टीम हरली तर धनंजय बाहेर जाणार असे दोन्ही बाजूला एक एक खेळाडू दिले. आता वर्षा आजी बाहेर जातील असे दिसते.
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/explained/bigg-boss-marathi-the-psychological-t...
आजही अरबाज वि संग्राम जोडी
आजही अरबाज वि संग्राम जोडी असती तर संग्रामला कोणी उभे पण केले नसते बाहेर. >>> हाहाहा, खरं आहे. मजा आली असती मात्र.
बी टीमला वाटतंय अरबाझ बाहेर जाईल यावेळी. त्याला नाही काढणार. टास्क चांगला खेळतो.
निक्कीने आर्याला मारलं असेल तर निक्कीला काढतील बाहेर यावेळी (अर्थात ही शक्यता धुसर आहे) . बिग बॉस नियमानुसार ते जाणीवपुर्वक नसावं, टास्कमधे असावं, नाहीतर क्लिप दाखवली असती आणि आर्याला ठेवलं असतं. आर्या सांगतेय की हिंसा माझ्याकडून झाली, ती का कशी झाली हेही सांगतेय. एकीकडे मनात येतं की आर्याच्या जागी जान्हवी असती तर बिग बॉसने चान्स दिला असता का. वैभव बाहेर म्हणाला आर्याच्या जागी कोणीही मोठं असतं तरी काढलं असतं. परागच्यावेळीही क्लीप्स दाखवल्या नव्हत्या, लोकांना बघायच्या होत्या, बरेच जण परागच्या बाजूने होते. नेहाला मारलं त्याने म्हणून बाकी दोन जणांनी त्यालाही मारलेलं असं बाहेर ऐकायला आलेलं. शिवच्या वेळेच्या क्लिप्स मात्र आवर्जून दाखवल्या आणि हिंदी बिग बॉसवेळीही बाहेर काढल्या. शिवला काढू शकत नव्हते म्हणून आरोहला आमिष देऊन माफ करायला लावलं असावं.
एकीकडे मला वाटतं की हे खूप
एकीकडे मला वाटतं की हे खूप तात्पुरतं असतं अगदी तीन महिन्यांचे. लोकं त्या त्या वेळी अन्यायाच्या बाजूने उभी रहातात, बिग बॉसला काही फरक पडतो असं वाटत नाही, त्यांना करायचं तेच करतात. आर्या गेल्यावर trp खूप कमी झाला असेल तर बिग बॉसला फरक पडेल, थोडा कमी झाला असेल तर काहीही फरक पडणार नाही.
दोन तीन आठवड्यापुर्वी बिग बॉस निक्कीला सीक्रेट रूम मध्ये ठेऊन तिच्याशिवाय खेळ पुढे जाऊ शकतो का बघू शकत होतं पण केलं नाही तसं. आता त्या सीक्रेट रूमचा काही उपयोग नाही.
वैभवने स्वत: काहीच चमक दाखवली नाही आणि जान्हवी म्हणतेय या दोघांमुळे तो बाहेर गेला, अरे त्याला पहिल्या आठवड्यापासून बिग बॉसने किती स्पष्ट सांगितलं पण त्याला अरबाज 2 म्हणून राहायचं होतं. तो त्याच्या स्वगुणांनी बाहेर पडलाय.
जान्हवीला लागलं आहे खूप
जान्हवीला लागलं आहे खूप त्याचं वाईट वाटतंय, ती टास्क छान खेळते त्यामुळे यावेळी तिला फार खेळता नाही आलं. तिने अॅक्टिंग चांगली केली प्राणी पक्षी दाखवण्याची. आजचा टास्क छान होता मारामारी न होणारा.
बिग बॉसने काकाकुवा प्राणी दिलेला अजिबात आवडलं नाही (ह्याला नेहेमीच्या भाषेत काय म्हणतात). कोण कसं ओळखणार, खवले मांजरही कठीण प्राणी होता पण काकाकुवापेक्षा बरा. अभिजीत हुशार आहे प्राणी ओळखण्यात, त्याने आतून खवले मांजर लगेच ओळखलं. नवरा म्हणाला काकाकुवाही त्याने बरोबर ओळखलं (तेव्हा मी नव्हतं बघितलं). त्याचा turn आल्यावर ओळखतो का बघूया ते महत्वाच.
टीम बी फुटली आज. धनंजयने आपण
टीम बी फुटली आज. धनंजयने आपण कोणत्याच टीममध्ये नाही असं सांगितलं. वर्षा टीम ए मध्ये सामील.
संग्रामने आपण तीन आठवड्याच्या कॉन्ट्रॅक्टवर आलोय असं सांगितलं का?
यावरून प्रेक्षक बिग बॉस वर केस करू शकतील का?
संग्रामने आपण तीन आठवड्याच्या
संग्रामने आपण तीन आठवड्याच्या कॉन्ट्रॅक्टवर आलोय असं सांगितलं का? >>> बहुतेक असं वाटतंय. मी नाव घेतलेलं ऐकलं नाही.
आज खेळाडू जी चर्चा करत होते ती आपल्याला दाखवायला नको होती का, असं वाटलं. अंकिता म्हणाली की अभिजीत गृहीत धरतोय की तो, निक्की, अरबाज फायनलला असतील.
निक्की संग्रामशी छान बोलत होती, वेळ आली तर तो योग्य असेल आणि अरबाज चुकीचा तर अरबाजची बाजू घेणार नाही म्हणाली.
आजचा टास्क खास जान्हवीच्या
आजचा टास्क खास जान्हवीच्या इंज्युरीमुळे बिबॉसला डिझाइन करावा लागला.पण एकदम भारी होता
खवले मांजर आणि काकाकुवा खरच खूप कठीण होत.
पँडीने अँक्टिग छान केली आणि संग्रामने ओळखलही.तेच जान्हवीच.मजा आली.वर्षाची घोरपड गाजत आहे.
असे काहीतरी टास्क द्यायला.हवेत.आता खून करण्याचा टास्क आणायला हरकत नाही.
संग्रामने तीन आठवड्यांच्या कॉन्ट्रॅक्ट वर आल्याच सांगितलेल मी तरी नाही ऐकल,पण ते बिबॉसला दाखवायच नसत तर.एडिट केल असत.तो बोलला असेलही,कारण निक्कीचे तेवर लगेच बदलले.अगदी मार्दवतेने बोलत होती.
आर्या गेल्यानंतर निक्कीला पण काहीतरी खडै बोल सुनावले गेले असावेत कारण ही निक्की आधीची निक्की वाटतच नाही आहे.
अरबाज मात्र पूर्ण हलला आहे आतून.
डीपीने टीम सोडली ,पण मला नाही वाटत त्याचा काही उपयोग होईल,तो तसाही जाणारच आहे.
अमरावतीत आर्याच हार वगैरे घालून जंगी स्वागत केल.म्हणे,हे मात्र जरा अतीच आहे.
निक्की अरबाजसारखी बाकीच्यांबरोबर रिलेट नाही होत.
जान्हवी लवकर बरी होवो.पण जरा ओव्हर अँक्टिग करते अस वाटत.
वर्षा भालू काहीही करत होती.तरीही डीपीने ओळखल.
अंकिताच संचालन बिबॉसला आवडत फेअर असते म्हणून.
बिग बॉसने काकाकुवा प्राणी
बिग बॉसने काकाकुवा प्राणी दिलेला अजिबात आवडलं नाही >>> का नाही आवडले? उलट मस्त होता की. असेच हवेत डोके वापरायला लागणरे टास्क! शक्तीचे खेळ काय तो अरबाज वन साइडेड जिंकतो.
आणि जान्हवीने बरोबर क्लू सांगितले त्याला . अरबाज ला अजिबात ओळखता येईना, पण पॅडीनेही ओळखला होता.
हेच तर हवे आहे. शक्तीचे टास्क पेक्षा युक्तीचे टास्क हवेत. इथे मराठी भाषा आणि डोके वापरणे दोन्हीत गंडला तो
वर्षा भालू काहीही करत होती >>
वर्षा भालू काहीही करत होती >> अगदी अगदी.
काकाकुवा मध्ये कठीण काय होतं? ज्यांनी आयुष्यात dumb sheraj खेळलं आहे अश्या कोणत्याही दोन अनोळखी व्यक्तींनी सुद्धा
चार अक्षरी शब्द
चार पैकी पहिले अक्षर
मग दुसरे अक्षर सेम
मग तिसरे आणि चौथे अक्षर विहिरीची साईन
मग तेच हिंदीत
या स्टेप्स करून पटकन सांगितलं असतं.
(I think I have played too much of this game)
संग्रामने तीन आठवड्याच्या गॅरंटी विषयी सांगायला नको होते. पण आता सांगितलं आहेच तर या निमित्ताने प्रेक्षकांचे डोळे उघडतील की आपल्या व्होटिंग ने काहीच होत नाही एवढं झालं तरी पुरे.
अंकिता म्हणाली की अभिजीत गृहीत धरतोय की तो, निक्की, अरबाज फायनलला असतील. >> हे दाखवण्यात काय चुकलं? तो त्याचा कॉन्फिडन्स आहे. निदान तो असे गॅरंटी वगैरे तर नाही बोलला ना संग्राम सारखं?
त्या माठ अंकीतालाच कसलीच खात्री नाहीये. तिला बाहेर काढा. फेअर संचालन करण्याच्या नादात आज बराच गॅस तिनेच घालवला. प्राण्यांच्या पोझिशनचा फोटो किती वेळ दाखवायचा याविषयी कोणताही नियम नसताना पटकन फोटो दाखवून झटकन काढून घेतला. आमची निकुताई असती तर लूपहोल शोधून गॅस नसता हो एवढा जाऊ दिला हातातून.
उद्या सूरजने या खेळात अंकीता चार पायांचा प्राणी दाखवत असताना बदक / बेडूक म्हणून ओळखून फार मजा आणलेली आहे असे दिसते. बघुयात..
मला काकाकुवा लक्षातच येत
मला काकाकुवा लक्षातच येत नाहीये. नाव ऐकलंय, गुगलून बघते. जान्हवीला खवले मांजरही माहिती नव्हती. बाकी घोरपड हाईट होती, मजा आली.
जान्हवीने बरोबर क्लू सांगितले त्याला >>> हो, बिचारी खूप प्रयत्न करत होती.
बघितला एकदाचा काकाकुवा, तो पोपट गरुड मिक्स वाटला मला, वर डोक्यावर तुरा. बघितला असेल चित्रात वगैरे मागे पण हा तो काकाकुवा मला खरंच माहिती नव्हतं.
एकंदरीत काकाकुवाने अरबाजला कुव्यात ढकललं.
संग्राम जान्हवीला मदत करत होता कॅप्टनरूमच्या टॉयलेटपर्यंत न्यायला, तेव्हा बी टीमवाले गॉसिप का करत होते समजलं नाही, ते मला थोडं पटलं नाही. एवढं असेल तर एखाद्या लेडीजने जायचं ना मदत करायला किंवा अंकीता सांगू शकते ना जान्हवीला तुला जायचं असेल तर मला सांग, मी मदतीला येते, वर्षाताई, निक्की कोणीही अशी मदत करु शकल्या असत्या. बरं तो नेतोय तर चिडवायचं कशाला, ते समजलं नाही. संग्रामचेही जान्हवीशी बोलताना लक्ष नव्हतं कामाकडे, चहा सांडवला त्याने. त्यामुळे बाकीचे gossiping करत होते का, लक्षात येत नाहीये माझ्या.
लक्षात येत नाहीये माझ्या >>
लक्षात येत नाहीये माझ्या >>
संग्रामने कालच्या की परवाच्या एपिसोड पासून स्वतः च जान्हवीच्या बाबतीत काहीतरी वेगळं वागायला सुरुवात केली आहे.
वैभव गेल्यानंतर तो जान्हवी कडे गेला आणि सगळ्यांना म्हणाला की "तिला / त्यांना डेट साठी विचारतो आहे". तेव्हा पॅडी, अंकीता वगैरे म्हणाले पण की ती काय इकडे प्रेम प्रकरण करत नसते. खुद्द जान्हवी सुद्धा म्हणाली की "माझ्या चॉईसचे इथे कोणीही नाही". त्यावर तो काहीच बोलला नाही. पण नंतर तो तिच्यासोबत एकटाच जेवायला वेगळा बसला होता.
मग तिला मदत करतो आहे हे दिसले आपल्याला. पण मे बी त्याच्याच अश्या बोलण्याने इतरांना त्याची मदत सुद्धा साधेपणाने घेता येत नाहीये. कदाचीत इतरही सेवा खूप करत असेल ज्याची गरज नसेल किंवा ती इतरांच्या डोळ्यावर आली असेल.
आजच्याच सीन मध्ये जान्हवी दुखापत झालेला एक पाय खुर्चीवर ठेवून बसली तर हा पण बसला. तिने कारण विचारले तर याने तेवढ्यात चहा सांडला. तिथपर्यंत पण ठीक होतं पण या मनुष्याने तेवढ्यात "माझं तुझ्याकडे लक्ष होतं.. तू मला distract केलंस आणि म्हणून माझा चहा सांडला" असं बोलून घेतलं.
जान्हवी आपल्या नॉर्मल वैवाहिक मर्यादेत राहून कोणतीही लाईन देत नसताना हा बळंच एकतर्फी फ्लर्ट करतोय असे दिसते आहे आणि म्हणूनच तिथल्या लोकांना आणि प्रेक्षकांना सुद्धा खटकते आहे.
संग्रामने हा जान्हवी flirt ट्रॅक पुढे असाच चालू ठेवला तर bb बाहेर त्याच्या इमेजची पूर्ण वाट लागेल.
काकाकुव्वा प्राणी नाही पक्षी
काकाकुव्वा प्राणी नाही पक्षी आहे

नेहेमीच्या भाषेतही तो काकाकुवाच ! हा पक्षी इतक्या लोकांना माहित नाही बघून गंमतच वाटली
दीपांजली +१२३
दीपांजली +१२३
ओहह पियू, संग्रामचं हे कालही
ओहह पियू, संग्रामचं हे कालही दाखवलेले का, नेमकं मी दुसरीकडे बिझी असले की महत्वाचं दाखवतात bb
थँक्स पियू डिटेलिंगसाठी. अच्छा म्हणून gossiping चाललेले, धन्य आहे संग्राम. त्याची फॅमिली आहे, तिची फॅमिली आहे, दोघांची मुलं बघत असतील ना. अर्थात जान्हवीची काहीही चूक नाहीये यात.
डिजे बरोबर काकाकुवा पक्षी आहे, मी गुगलले, मीच प्राणी लिहिलेलं.
Btw आता बहुतेक एखादी लेडी wild card आणतील, काल का परवा सुरजशी बोलत होते ना bb.
हा पक्षी इतक्या लोकांना माहित
हा पक्षी इतक्या लोकांना माहित नाही बघून गंमतच वाटली
>>>
आणि खवले मांजर उर्फ पँगोलीन, पेपर मध्ये याच्या सारख्या तस्करी बद्दल बातम्या येत असतात, विशेषतः कोकणात. जान्हवीला छोटा मुलगा आहे, त्याला लहानपणी प्राणी पक्षी शिकवले असतील ना.
कालचा खेळ छान होता, यांना "एक्टिंग" करायची होती आणि ती कोणालाच जमत नव्हती
. त्यातही दिग्गज कलाकार पंढरीनाथ यांनी घोळ केलाच. घुबडाची कृती दोन्ही डोळ्यावर अंगठा आणि तर्जनी याचे गोल करण्याचे चिन्ह करायचे असे ठरले होते तर यांनी काही वेगळेच केले. वर्षा आजींनी मात्र घोरपड पुन्हा एकदा छान केली. आठवा आठवडा सुरु आहे आणि अंकिताला अजूनही खेळ कळत नाहीये. तिच्यामुळे ३० हजारचे २० हजार झाले. आतमधून निक्की ओरडल्यावर तिने प्राण्यांच्या सिक्वेन्सला ओके दिले. जान्हवी अरबाजची जोडी घोषित झाल्यावर त्यांना म्हणाली कोणाला काय करायचे हे ऐका जसे अरबाज एक्टिंग करणार आणि पाय दुखावलेली जान्हवी धावणार.
gossiping >>> पिकनिक ग्रुप तर फुल्ल गॉसीपींन्ग करत होते, पंढरीनाथने जान्हवीचा प्रेम विवाह झालाय आणि पळून लग्न केलंय इत्यादी बोललेले दाखवले. मग त्याच्या लक्षात आले काही तरी जास्त बोललो तेव्हा सारवासारव केली.
संग्राम फारच फुसका बार निघाला, ACने बॉडी दुखते वगैरे सांगत होता जसे याच्या जिम मध्ये AC नसावा आणि ३ प्राणी धावून आणले तेवढ्याची त्याला धाप लागली. एकतर वय झालय त्याच्या किंवा मसल बिल्डिंगच्या नादात आधी सप्लिमेंट्स खूप जास्त घेतल्या असाव्या.
निक्कीने जसा एक बॉडीबिल्डर अरबाज पकडला आणि गेम खेळतेय तसेच जान्हवी करताना दिसत आहे, तिने संग्रामला पकडले. दोन्ही प्रकार वेगळे आहेत पण पुढे या दोघीना या दोघांची मदतच होईल असे सुरु आहे. संग्राम तीन आठवड्याची एम्जी घेऊन आलाय असे बोलला. नंतर अभिजितने ते रिले केले. हे दाखवून बिबॉ टीमने प्रेक्षकांना सरळसरळ हिंट दिली कि कोणाला किती दिवस ठेवायचे हे ते ठरवतात. हिंट वरून आठवले अंकिताला काल पुन्हा एकदा मोठी हिंट दिली कि बाई तू खेळ आणि दिसेल अशी खेळ नाही तर लोक तुझे नाव विसरत आहेत. तिला विजेता करण्याच्या प्लॅन दिसतोय. कारण सुरज काही विशेष करत नाहीये, निक्की, जान्हवी, अरबाज नेगेटिव्ह शेड मध्ये आहेत.
गॉसिप वरून ऐकावे लागणार
गॉसिप वरून ऐकावे लागणार विकेन्डला अभिजीत अंकिता पॅडीला.
संग्राम सेफ फ्लर्टिंग करत होता पण मदतही करत होता तिला चालायला, ऑबव्हियस्ली ते दोघेही मॅरीड आहेत आणि मर्यादे पलिकडे जाणार नाहीत , तरी गॉसिप..तुम्ही कराना मग तिला मदत, हिरो बनायचा चान्स मिस करतात स्वतः आणि दुसर्याबद्दल गॉसिप करतात !
खवले मांजर आणि अरबाझच्या काकाकुव्याने आज धमाल आणली आज
.तुम्ही कराना मग तिला मदत,
.तुम्ही कराना मग तिला मदत, हिरो बनायचा चान्स मिस करतात स्वतः आणि दुसर्याबद्दल गॉसिप करतात ! >>> सेम वाटलं. मला आधीचं संग्रामचं फ्लर्टींग माहीती नव्हतं. तरीही पिकनिक गँग चुकीची वाटली. हिरो होण्यासाठी नाही पण अशावेळी अंकीता, वर्षाताई मदत करु शकत होत्या माणूसकी म्हणून, निक्की करेल असं वाटत नाही.
तिला विजेता करण्याच्या प्लॅन दिसतोय. >>> नाही करणार, ती मागे पडत चाललीय. हल्ली तिच जास्त गॉसिपिंग करते, टीममधल्या लोकांबद्दलही, तिला पुढे न्यायचं असतं तर हे दाखवलं नसतं.
निक्की जान्हवी सोबत नाहीये
निक्की जान्हवी सोबत नाहीये असे तिने स्वतः सांगितले, हे किती खरे हे तिलाच माहिती व्यतिरिक्त बोलताना दिसली नाही. किंबहुना वैभव बाहेर गेला तेव्हा जान्हवी निक्कीच्या मांडीवर डोके ठेऊन रडली.
संग्राम जान्हवी जवळ अरबाजची चुगली करताना दाखवला आहे. काही तरी सुरु आहे त्या दोघांचे. आपल्याला एका तासात काय दाखवतात आणि त्यावर आपण किती अंदाज बंधू शकतो याचा सगळा हा खेळ.
निक्कीला वैभव गेल्याचं रडू
निक्कीला वैभव गेल्याचं रडू फार उशिरा आलं. खूप प्रयत्नाने आणलं असावं.
अभिजीत, निक्की आणि अरबाझ हे रिअलिटी शो करून आलेले आहेत, तेही हिंदीत. त्यांच्या तुलनेत अंकिताने स्वतःला कमतर मानणे समजू शकतो. शिवाय तिचं यु ट्यूब चॅनेल स्टाइलपेक्षा कंटेंटवर भर देणारं असावं.
काकाकुवा मी पाहिलेला नाही किंवा चित्रही पाहिलं नसावं. पु लंच्या पाळीव प्राणी मध्ये त्याच्यावर एक परिच्छेद आहे. पक्षी ओळखल्यावर अरबाझनेही गोंधळ घातला. तो नंतर म्हणाला की एक कट आउट सारखं पडत होतं आणि तो ते पुन्हा ठेवत होता. पण ते काय आहे, हेच त्याने पाहिले नाही.
धनंजय काल बराच स्मार्ट खेळला. इतरांना चांगल्या टिप्सही दिल्या. हल्ली त्याचे लाउड एक्स्प्रेशन्स डोक्यात जातात.
अभिजीतचा सिंगिग शो होता पण
अभिजीतचा सिंगिग शो होता पण निक्की अरबाज मुरलेले आहेत. अंकीता आधी आवडायची पण हल्ली नाही फार आवडत. चमक काही दाखवतेय असं वाटत नाहीये. फेअर असते हा प्लस पॉइंट, ज्याने टीमही डुबते कधीकधी म्हणा पण गॉसिपिंगमधे पुढे हा मायनस पॉईंट. ह्यालाच कोकणातल्या गजाली म्हणतात का, पारावर बसून निवांत करायच्या.
सुरजला पुश करायचा फार प्रयत्न केला बिग बॉसने, राखीला आणून त्याला कानपिचक्या देतात का बघुया.
शिव नेहाची सतत खेळात जोडी जमवायचे, तसं आता बिग बॉस अभिजीत जान्हवी करुन बघतायेत. त्यामुळे त्यांच्या मनात अभिजीत जान्हवी टॉप २ असावेत.
बाकी संग्राम जान्हवीचे सीन्स दाखवू नका, एक दोन सीन दाखवले, बास झालं. त्याची मुलगी आणि तिचा मुलगा लहान आहे, शो बघत असतील. अर्थात घरच्यांनी लहान मुलांना दाखवायचा की नाही शो ठरवायला हवं. अर्थात पर्सनल मत. जान्हवी नाही करत फ्लर्टींग पण तो करतोय. मदत करतोय ही चांगली गोष्ट आहे, ते दाखवा पण इतर नको.
संग्रामने तो तीन आठवड्याच्या
संग्रामने तो तीन आठवड्याच्या कॉन्ट्रॅक्ट वर आला आहे ,हे सांगितल,तसच अभिजित जेव्हा म्हणाला की अरबाज या वीकमध्ये जाऊ शकतो,तेव्हाही लगेच म्हणाला की अरबाजला कस काढतील मग निक्कीच काय होणार.त्याला नाही काढणार.
हे एवढ सगळं बिबॉस एडिटिंग टीमने कट कस नाही केल.
अभिजीत स्वतःवर वेळ आल्यावर
अभिजीत स्वतःवर वेळ आल्यावर मुर्खपणा करतोय, झेब्रा ओळखू शकला नाही लवकर, धन्य आहे.
आज फार येता जाता बघणं होतंय. वोटींग सुरजला तुफान म्हणजे ६५ टक्के होतंय. उरलेल्यात सर्व त्यात अरबाझ शेवटी, नंतर वर्षाताई, मग निक्की हे डेंजर झोनमधे आहेत. जान्हवी, सुरज सेफ आहेत.
संग्राम समोर आता वैभव बरा
संग्राम समोर आता वैभव बरा वाटत आहे.
अगदीच सुमार खेळ चालू आहे त्याचा. आरबाझ समोर अगदिच फिका पडलाय. त्याला टास्क स्ट्रॅटजी बिल्कुल जमत नाही.
प्राणी ओळखायच्या खेळात फार
प्राणी ओळखायच्या खेळात फार मजा आली.. काकाकुवा भारी...
बिचारी अंकिता हतबल झालेली.. सुरज ला विनर करायचे मनसुबे बिबॉ रचत असेल तर अवघड आहे. त्याच्या बर्याच बेसिक मधे वांदे आहेत. उगिच सिंपथी वर विनर करणं म्हणजे अतिच....
काकाकुवा खरंतर पुलं नी फेमस केलाय... माझा शत्रुपक्ष वाचलेल्या ऐकलेल्याला नक्की माहिती असणार...पण बिबॉ घरातल्या तमाम मराठी सिरीअल मधे वगैरे काम करणार्या लोकांनी पुलं ऐकले/वाचले नाहियेत ? कधीच नाही ऐकला काकाकुवा शब्द असं जान्हवी १० वेळा म्हणाली. बर्याच जणांना माहिती नव्हता.
काल सुरज ला सांबर शब्द माहिती नव्हता
अंकिता ने प्राण्यांचा सिक्वेन्स पास करयला फार वेळ घेतला.
काल अंड्यांच्या टास्क मधे परत एकदा अरबाज संग्राम वर भारी पडला. संग्राम म्हणजे नुसतीच बॉडी पण काही दम नाही अशी अवस्था आहे. तोंडात पण दम नाही. अरबाज समोर अगदीच नांगी टाकतो.. पहिल्या फेरित अरबाज आपल्याला अडवतोय लक्षात आल्यावर तरी शहाणं व्हावं माणसानं... अंकिता म्हणाली पण त्याला तसं..
निक्की ने अरबाज चं न ऐकता स्वत: ला हवे त्यांना काढले.. अभिजीत आणी संग्राम ला वाचवले.. अरबाज चा नीट वापर करुन घेतला. अरबाज तरी शहाणा होणार नाहिच... निक्की मुळे जाणार हा माणुस.. आणि तो गेला तरी तिला अभिजीत आहेच तिला...
वैभव अरबाझ २.० होता आणि
वैभव अरबाझ २.० होता आणि संग्राम तर वैभव 2.0 गद्दार बैलबुद्धी झालाय
काकाकुवा शत्रुपक्षात नाही.
काकाकुवा शत्रुपक्षात नाही. पाळीव प्राणी हा वेगळा लेख आहे, त्यात आहे. शिकारीचं वर्णन करणारे, घर दाखवणारे आणि अल्बम दाखवणारे हे शत्रूपक्ष.
पु लं ना जाऊन २४ वर्षे झाली. त्यामुळे आताच्या तरुणांना ते माहीत नसले तर नवल नाही.
निक्की दोन दिवस वेगळाच सौम्य आवाज लावतेय. आधीचा अभिनय होता की आताचा असा प्रश्न पडतोय. अरबाझ आज काय करतो ते बघायचं.
अरबाझ संग्राम काय बोलले ते ऐकू आलं नाही.
सूरजला आधी प्राण्यांची नावं सांगून ठेवता आली असती.
कॉफी, पोहे, भात मायक्रोवेव्हमध्ये करता आले असते. अर्थात दहा लोकांसाठी करायचं म्हणजे तेवढे बाउल्स हवेत. दोन बॅचेस मध्ये करायचं तरी मायक्रोवेव्हमध्ये पदार्थ करायची माहिती हवी. बहुतेक लोक फक्त अन्न पुन्हा गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह वापरतात.
पाण्याचं टास्क छान आणि कल्पक होतं.
काकाकुवा शत्रुपक्षात नाही.
काकाकुवा शत्रुपक्षात नाही. पाळीव प्राणी हा वेगळा लेख आहे, त्यात आहे. शिकारीचं वर्णन करणारे, घर दाखवणारे आणि अल्बम दाखवणारे हे शत्रूपक्ष. >> हो हो बरोबर...सॉरीच... गल्ली चुकली एकदम
परत एकदा ऐकायची वेळ आली म्हणायची.
कुठे नेऊन ठेवलाय तो वाईल्ड
कुठे नेऊन ठेवलाय तो वाईल्ड कार्ड माझा
काल तर संग्राम काकाला अरबाजने दोन वेळा पकडले, टास्क मध्ये निक्कीने अरबाजचा गेम केला. अंकिता आणि पंढरीनाथ कॅप्टनशिप उमेदवारीतून बाद झाले. या वेळी दोन्ही टास्क बरेच चांगले खेळले लोक. प्राणी ओळखा मध्ये तशीही काही मारामारी होणार नव्हतीच, कोकिळा टास्क मध्ये पकडपकडी होणार. पंढरीनाथ जेव्हा अंडे पकडायला येणार तेव्हा बघायला मजा येईल का? तेव्हा आधी दिसली तशी चपळाई दिसेल का?
बिग बॉसने चहा मागितला, तेव्हा
बिग बॉसने चहा मागितला, तेव्हा मी निक्कीला सांगत होते मावेत कर, हाहाहा.
काकाकुवा पु लं च्या लेखात वाचला होता हे भरत यांनी लिहीलं तेव्हा आठवलं, आता परत पु ल वाचायला घ्यायला हवेत. बहुतेक दुरदर्शनवर कथाकथन करायचे ते, तेव्हाही ऐकलेलं.
यावेळी कोण जाईल. वर्षाताई जायला हव्यात पण काय माहीती.
निक्की जसं वागते ते बघून अरबाझ जान्हवीसोबत टीम करेल असं वाटतंय.
संग्रामने काय गद्दारी केली, काल मी फार कमी बघितलं. बाकी तो फारच पुचाट आहे, नेक्स्ट विक पाठवा त्याला घरी.
Pages