वेबसीरीज ३

Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझेमन नाईट मॅनेजर छान आहे. अनिल कपूर सॉल्लीड.
अनू कंसातल्या मजकुराला +१. शेवट तर काहीही.. चिटींग बिटींग ला विसरून नवरा परत अंगठी घेऊन दारात.. Lol

Call me bae is watched in 85 percent of india pin codes. Give up your negative Dhar ma biases peoples and watch for a slice of different world.

अमा, आम्ही आमचं मत दिलय Happy पॉजिटिव्ह, नीगेटिव्ह दोन्ही.
पठान हिट्ट झाला,मासेस ला आवडला म्हणुन तो मला आवडायलाच पाहिजे असं कुठं आहे? Happy
टेक्निकल टीम ला नावं ठेवत नाही आहोत. कथेवर मतं व्यक्तं होत आहेत.

I enjoyed Call me Bae. Ananya Pandey suited the best for the role.

Netflix वर दुसरी एक सिरीज पहिली ' The perfect couple ' . मर्डर मिस्ट्री आहे. निकोल किडमनने snob character मस्त play केलं आहे. अतिश्रीमंत आणि perfect couple वाटणाऱ्या घरातील पोकळ वासे आणि लग्नाला जमलेल्या पाहुण्यातील एकेक नमुने पाहायला मिळतात. ईशान खट्टरला बऱ्यापैकी रोल आहे. आणि तो चक्क श्रीमंत आणि main हिरॉईनला प्रेमात पाडतो इतपत महत्त्वाचा रोल आहे.

He he Dil pe mat lo. Thank you aashu29 for viewing. It is my home production Wink

हिंदी नाईट मॅनेजर पाणी घालून वाढवली आहे. साधारण पहिले ५ एपिसोड्स पाणी आहे. तिथून पुढे इंग्रजी सिरीजची डिट्टो कॉपी आहे.

इंग्रजी नाईट मॅनेजर मस्त आहे, क्रिस्प.

इंग्रजी नाईट मॅनेजर मस्त आहे >> हिंदीवाल्यांचीच आहे का? की वेगळे प्रोडक्शन आहे? मी हिंदी पाहतेय. मला ठीक वाटली. पण इंग्लिश जास्त चांगली असू शकते. पुस्तक शोधते अमेझॉनवर.

कॉल मी बे मला ऐशा इंस्पायर्ड वाटली with अनन्या पांडे. वन टाईम वॉच, नाही पाहिली तरी फरक पडत नाही. फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम्स. सिद्धांत चतुर्वेदीची कॉमेंट इथे पण लागू होते.

नाईट मॅनेजर मी दोन्ही पाहिल्या.
मूळ इंग्रजी आहे. त्यावरूनच हिंदी घेतली आहे.
ढापली नाहीये. प्रॉपर legal right घेउन.
पहिला बांगलादेश angle सोडून भारतीयकरण छान झालंय.
अनिल कपूर बेस्ट आहे.

वाह अमा मस्तच.लेकीचं अभिनंदन.
अनन्या पांडे छान दिसते.मला वाटतं मुलगी पुढे जाईल.खो गये हम कहा मध्ये अभिनय आवडला होता, गहाराईया मध्ये पण.

नेटफ्लिक्स वर Live to 100: secrets of the blue zones ही सहा भागांची docu-series पाहिली. एकदा बघावी अशी आहे. शंभरच्या आसपास असलेली धडधाकट म्हातारी माणसं पाहून छान वाटलं. त्यांच्या या तब्येतीची रहस्य देखील रोचक.

It is my home production >>> हे हुकले होते. अमा - खरेच? Happy

Hi farend good morning. Yes. My daughter has worked on this project and gets full single screen name credit as a developer. Check the end credits.

Wow! सही! नक्कीच बघेन. नावावरून इंटरेस्टिंग वाटतच होता. अभिनंदन!

Call me bae..one time watch आहे..
अनन्या पांडे..मस्त एकदम.. अभिनय छानच.. आणि दिसलिये खूप मस्त..! काही काही ठिकाणी तर अतिशय cute दिसली आहे.!

Hi farend good morning. Yes. My daughter has worked on this project and gets full single screen name credit as a developer. Check the end credits.<<. वा अभिनंदन..!!

IC-814 पाहिली. हे विमान अपहरण झालं तेव्हा माझा ब्रँच मॅनेजर नेपाळमध्ये सकुटुंब सुटीवर होता. तो त्या विमानात नाही, हे कळलं. पण फ्लाइट्स बंद झाल्याने काही दिवस अडकून पडला.
तेव्हा ऑफिसात रात्रंदिन युद्धाचा प्रसंग असल्याने आणि मुंबईचे पेपर इंदूरला दुपारी मिळत असल्याने, तसंच घरी टीव्ही नसल्याने याबद्दल फार माहिती घेता आली नाही. अतिरेक्यांना सोडणे, सोपवणे हे तेव्हापेक्षा नंतरच अधिक ठळकपणे कळले.
अपहरणाची पूर्वसूचना मिळूनही आपल्या गुप्तचर व अन्य प्रशासकीय यंत्रणांची ढिलाई हा पहिल्या एपिसोडमधला भाग आणि पुढे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा स्टँड हे धक्कादायक होतं. तिथे बोलण्यात कारगिलचाही संदर्भ आलाच आहे.
विजय वर्माचं काम परफेक्ट. काही सीन्स अंगावर आले.
अरविंद स्वामीला पाहून छान वाटलं. रोजामध्ये तो फक्त २२ वर्षांचा होता?
प्रवाशांची, त्यांच्या नातलगांची , इ. खरी दृश्ये घेतली नसती तर बरं झालं असतं

अनुभव सिन्हा, विजय वर्मा आणि कॅप्टन देवी शरण एकत्र

आयपीटीव्हीवर (सोनी लिव्ह)मानवत मर्डर्स बघतेय. क्राईम थ्रिलर आहे. मानवत नावाच्या गावात एकामागोमाग होणारे लहान मुलींचे, बायकांचे खून त्यामागचे सुत्रधार कोण त्यावर पोलिसांचा चाललेला तपास असा प्लॉट आहे.

सोनाली कुलकर्णी (सिनिअर), सई ताम्हणकर, आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरे अशी तगडी कास्ट आहे. थोडी डार्क आहे. पण आवडतेय बघायला. मकरंद अनासपुरेचा वेगळा रोल बघायला चांगला आहे. आशुतोष गोवारीकर ला खूप दिवसांनी बघितलं. विग नाही चांगला दिसते त्याला पण काम चांगलं केलंय, थोडं अवघडलेलं मराठी बोलतोय. पण दुर्लक्ष केलं त्याकडेही.
सोकुल आणि सई दोघींचा हातखंडा आहे अशा गावातल्या बायकांचा डार्क रोल करण्यात. दोघी बेस्ट. गोंदण खूप जास्त आहे मानेवर हातापायावर. तिकडेच लक्ष जातं बर्‍याचदा.

स्माइली - स्पॅनिश - नेटफ्लिक्स
अ‍ॅलेक्स बार्सिलोनातला एक हॉट बारटेंडर. गे . त्याला सेक्ससाठी पार्टनर मिळतात, पण प्रेम मिळत नाही. त्याला आवडलेल्या पार्टनरने त्याच्याकडे पाठ फिरवल्यावर बारमधल्या लँडलाइनवरून तो त्या पार्टनरला एक मोठ्ठा व्हॉइस मेसेज पाठवतो. चुकीचा नंबर डायल केल्याने तो ब्रुनो या आर्किटेक्टला मिळतो. आजकाल कोण लँडलाइनवरून फोन करतं? तो लँडलाइनवरून फोन का करतो, ते कळत नाही. पण आपल्या कथेचा ट्रिगर तो आहे, त्यामुळे सोडून देऊ. तर ब्रुनोसुद्धा गे आहे आणि तोही प्रेम शोधतोय. अ‍ॅलेक्सची तडफड त्याच्यापर्यंत पोचते आणि तू चुकीच्या माणसाला फोन केलास हे सांगण्यासाठी तो अ‍ॅलेक्सला फोन करतो, दोघांना एकमेकांत इंटरेस्ट वाटतो आणि ते अ‍ॅलेक्सच्या बारमध्ये भेटायचं ठरवतात. .
तर अ‍ॅलेक्स आणि ब्रुनो भेटतात. पहि ल्या भेटीत आपल्या एक्स पार्टनर्सबद्दल आणि ती रिलेशन्स का टिकली नाहीत, याबद्दल कोण बोलेल? ब्रुनो बोलतो. मग आर्किटेक्चरबद्दल बोलतो. आपणही काहीतरी बोललं पाहिजे म्हणून अ‍ॅलेक्स त्याच्या दोन दोन जिम्स आणि वर्क आउट्सबद्दल बोलतो. दोघांनीही मनात एकमेकांवर काट मारलेली असते की आपण याच्यासाठी नाही. (हा आपल्यासाठी नाही, असंही , पण पहिलं जास्त). बोलण्याचं भांडण होतं, अपमान केला जातो, चॅलेंज केलं जातं आणि दोघे एकत्र झोपतात. तो अनुभव त्यांना खूप आवडतो. आतापर्यंतचा बेस्ट. पण अजूनही आपण याच्यासाठी नाही, हा प्रश्न कायम. त्यामुळे पुन्हा भेटायचं काही ठरवत नाहीत. दोघांच्या मनात एकमेकांबद्दलचे विचार येत असतात, पण कोणीच पुढचं पाऊल उचलत नाही. शेवटी ब्रुनो खूप विचार करून अ‍ॅलेक्सला एक स्मायली पाठवतो. त्याचा चांगदेव झाला असावा. अ‍ॅलेक्सने स्मायलीचा अर्थ लावून उत्तर द्यायला घेतलेल्या भरपूर वेळात तो हा मेसेज रिकॉल करतो. तर मालिकेचं नाव स्मायली.

इतर पात्र -
१ अ‍ॅलेक्ससाठी पार्टनर शोधणारी, त्याचं जुळवायला धडपडणारी त्याची आई रोझा
२ तिने अ‍ॅलेक्ससाठी शोधलेला पार्टनर इब्रा -हा मूळ सेनेगलचा तरुण (आपण फक्त मजा करू , ते मला तुझ्याबद्दल काहीतरी वाटतंय),
३ अनेक वर्षांनी शहरात परतलेला रोझा आणि तिच्या नवर्‍याचा मित्र रामिरो.
४ बारचा ( गे बार) मालक हावि (javi) - हा अ‍ॅलेक्सच्या आईवडिलांच्या वयाचा. transvestite - क्रॉस ड्रेसिंग करून गाणी म्हणतो. त्याचा शो बघायला गर्दी जमते. मालिकेतला फिलॉसॉफर
५ बारची दुसरी मालक व्हेरो आणि तिची पार्टनर पॅट्री.
६ ब्रुनोच्या ऑफिसातला , त्याच्या प्रेमात असलेला गे को वर्कर - हुशार आर्किटेक्ट रामोन.
७ ब्रुनोचा कलीग अल्बर्ट आणि अल्बर्टची बायको नुरिया -आपल्या तिसर्‍या मुलाला- तान्ह्या बाळाला त्याची सेक्स्युअलिटी कळेपर्यंत They म्हणावं असा अल्बर्टचा आग्रह असतो. पण हिजाब घालणार्‍या बेबीसीटरला तू कुठली, असंही विचारतो

मालिकेत अनेक मुद्दे हाताळले आहेत - जोडीदार निवडताना त्याचं आणि आपलं बॅक्ग्राउंड , लेव्हल, , आवडीनिवडी पाहाव्या की एकमेकांसोबत कसं वाटतंय ते पाहून कॉमन ग्राउंड शोधावं ?
प्रेम शोधायला वयाचं बंधन नाही ;
चांगला पैसा आणि पोझिशन देणार्‍या पण न आवडणार्‍या कामाच्या रगाड्यात आनंद हरवून जगण्यापेक्षा आवडतं काम निवडाव;
संबंधातलं प्रेम संपलं की ते ताणू नयेत - दूर व्हावं ;
ज्याला आपण आवडतो, तो आपल्याला आवडत नसेल तर नाही म्हणणं कठीण जाणं ;
आपल्या आईवडिलांशी आउट होण्याचा ताण , त्यांनी आपली लैंगिकता स्वीकारल्याचा आनंद , नाकारून संबंधच तोडल्याचं दु:ख.

शेवट बॉलीवुडी आहे. म्हणजे जगभरच्या रोमॅटिक स्टोरीज अशाच संपतात. तिथेही पुन्हा स्मायली आहेच. पण आता ती सगळं काही सांगून जाते.

सगळ्या जोड्या जुळवयचा अट्टहास केलेला नाही. ( म्हणजे काही पात्रं एकटीही राहिलीत )

ब्रुनो आणि अ‍ॅलेक्स यांचे केस जन्मात कधी विंचरले असतील असं वाटत नाही. मालिका बघताना ती इंग्लिश वाटावी इतकं डबिंग छान आहे. फोनमधले स्पॅनिश मेसेजेस दाखवले नसते, तर ती डब्ड आहे हे कळलंही नसतं.

Lol मला हे वाचतानाच इतकं गोंधळायला झालं! कोण कोणाचं कोण हे तीन तीनदा वाचलं.
चांगदेवला फुटलोच Lol

मला हे वाचतानाच इतकं गोंधळायला झालं!>>>> अगदी अगदी.
चांगदेवला फुटलोच>>>>>मी पण
ब्रुनो आणि अ‍ॅलेक्स यांचे केस जन्मात कधी विंचरले असतील असं वाटत नाही. यानंतर मी चुकून,
एक फिलॉसॉफर लागतो, तो न्हावी आहे.
असं वाचलं.

भरत , तुम्ही हल्ली फारच सुसाट लिहिताहात. Happy

मी काही महिन्यांपूर्वी एक गे बॉलिवूड स्टाईल फेअरी टेल बघितली होती. काही भाग अ आणि अ असूनही इतका सुंदर गे रोमान्स यापूर्वी कधीही बघण्यात आला नव्हता. त्यांचीही ओढ, त्यांचीही धडपड, त्यांचेही आकर्षण स्ट्रेट लोकांसारखेच असते हे छान दाखवले होते. म्हणजे ते असतेच तसे पण दाखवताना ते मांडता येत नाही बरेचदा, जे या चित्रपटात जमून आले होते. गे इन्टिमेट सीन्सही आकर्षक पद्धतीने दाखवले आहेत जे एरवी ओंगळपणे मांडल्यासारखे वाटतात. आपल्याकडच्या सिरीजमधे तर टुकार आणि उथळपणे किंवा ओढूनताणून दाखवल्याप्रमाणे (कधीकधी चक्क व्यभिचारी) दाखवतात, अशाने दृष्टिकोन कसा नॉर्मलाईज होणार कळत नाही.

Red, white and Royal blue नावाचा चित्रपट आहे, मी चिकवावर लिहिले होते पण लिंक नाही आता.

Lol

आता आकडे देऊन लिहिलंय. कोणी मालिका पाहिली तर त्यांना स्पॉयलर्स वाटू नयेत म्हणून अगदीच त्रोटक लिहिलं, नाहीतर इतर पात्रांच्या स्टोरीजही महत्त्वाच्या आहेत , प्रत्येकावर एकेक परिच्छेद लिहिता आला असता.

स्माइलीमध्येही न्युडिटी नाही, कुठे ओंगळ वाटलं नाही. या पात्रांना पडणारे प्रश्न स्ट्रेट लोकांनाही पडूच शकतत. पण तिथे लग्न , फॅमिली हे बाँड / बंध - > बंधन अधिक घट्ट असतात. याबद्दलही यातली पात्रं बोलतात.

मला हे वाचतानाच इतकं गोंधळायला झालं!>>>> अगदी अगदी. >>> हो ना. दोन वेळा वाचलं.

Red, white and Royal blue नावाचा चित्रपट आहे, मी चिकवावर लिहिले होते पण लिंक नाही आता.>>> फारच गोड चित्रपट आहे तो.

हो. रेड व्हाईट अँड रॉयल ब्लू बघितलेला. आवडलेला.
भरत तुम्ही चांगदेवचे कॉपीराईट घेऊन ठेवा. मला फारच आवडलेला आहे तो प्रयोग. कधी एकदा करता येईल असं झालंय Lol

भरत Lol मलाही एकदा वाचून गोंधळायला झालंय.
चांगदेवचं संत्र सोला कोणीतरी! Wink नाही कळलंय.

Lol चांगदेवाचे कॉपीराइट चांगदेवांकडेच असणार ना, तेही 'कोरे पत्र 'का होईना लिहायचे. तेव्हा इमोजी किंवा स्लॅन्ग्ज नव्हते, त्याला ते तरी काय करणार. नाही तरी मुक्ताईने त्यांना 'लोल' केलेच. LOL dude.. even after 1100 years of life you are still dumb..!

Pages