वेबसीरीज ३

Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11

तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पियु, मला फेसबुकचं माहिती नाही. युट्युबवरही एपिसोड्स आहेत पण दोन तीन एपिसोड्स एकत्र करुन टाकलेले आहेत त्यामुळे लिंक लागत नाही. इकडे आयपी टिव्हीवर बघितले सीझन्स असयाचं. तेव्हा एक एक करत बघेन आता.

मूनवॉक चांगली आहे मी कॉमेडी आहे म्हणून बघायला घेतली पण नॉर्मल कॉमेडीच्या अपेक्षेने पाहू नका वियर्ड कॉमेडी आहे .स्टोरीलाईन ही की एक चोर आहे ज्याला खूप कॉन्फिडन्स आहे की तो जगातला बेस्ट चोर आहे तरीही एक शुल्लकश्या चुकीने पकडला जातो पण स्टोरी इथूनच सुरू होते त्याची गर्लफ्रेंड त्याला जेल मध्ये असल्या कारणाने सोडून जाते एका दुसऱ्या हिरो( जो हाई प्रोफाईल चोरच असतो) बरोबर पण एक ऑप्शन ठेवते जर' दोघांपैकी जो जास्त मोलाच्या वस्तूची चोरी करेल त्याची मी ' तर दोघांपैकी कोणाला हिरोइन भेटते . चोरी नक्की कशाची करतात .मूनवॉक शी काय संबंध ते वेबसेरीज मध्ये पाहा . ताहीर झालेला ऍक्टर अंशुमन पुष्कर प्रॉमिसिंग आहे करण कोचर त्याच्या पुढे फिका वाटतो हिरोईन "अपहरण" वाली ,तीचं जास्त काम नाही एक्सपोज करण्याशिवाय तरीही एखाददुसरी शिवी आणि एक किस शिवाय क्लीन वेबसेरीज आहे +16.शिबा चढ्ढा आणि गीतांजली कुलकर्णी सपोर्टिंग रोल मध्ये आहेत.10भाग आहेत पण छोटे आहेत पटापट संपतात.बॅकग्राऊंड स्कोर स्नेहा खानवलकर ने दिलाय वासेपुर वाली.ही गायबच झाली होती.बाकी डायलॉग अजून क्रिस्प हवे होते गुलाब एन्ड गॅंग सारखे पण तरीही एकदोन सीन मस्त आहेत जसे की कोर्टात मूनवॉक चं अर्थ सांगतांनाचा प्रसंग. डोक्याला जास्त विचार न करता फक्त पाहात राहिली तर वेबसेरीज चांगली आहे . जिओ सिनेमावर आहे.

>>इथे कोणी युट्युबवर इंडीयाज गॉट लेटेन्ट पाहत नाही का? शिव्या भरपूर आहे पण समय रेनाचे काहीकाही जोक्स आवडतायेत.

हो एकदम क्रूड आहे पण एकदा सवय झाली कि मजा येते. पहिला असा रिअ‍ॅलिटी शो असावा ज्यात लोक स्पर्धकांचा पर्फॉर्म्न्स फॉरवर्ड करून जजेस नी स्पर्धकाण्ची पिसं काढलेली पाहतात

कुठल्याही प्रकारच्या संगीतात रुची असेल तर बंदिश अ‍ॅण्ड बँडीट्सचा दुसरा सिझन नक्की बघा.

क्लीशे स्टोरीलाईन आहे, बर्‍याच अंशी ठोकळे कलाकार आहेत, दिव्या दत्ता वगळता एकही कलाकार गाण्याचा अभिनय करू शकलेला नाही. पण संगीत खूप सुंदर आहे आणि सगळ्यात जास्त आवडले ते म्हणजे संगीताबद्दल मांडलेले विचार.

घराणेदार गायकी, फ्युजन, सुगम संगीत, संगीतात काव्याचे महत्व, ओरीजीनॅलिटी, गायकी आणि परफॉरमन्स यातला फरक (हा तर पहिल्या सिझनमध्येच अधोरेखीत केला होता) अशा अनेक विषयांना स्पर्श करत कथानक पुढे सरकते. काही विचार खुलवले आहेत तर काहींकरता वन लायनर्स आहेत - पण डोक्यात विचारांची चक्रे सुरू करून देण्यात मालिका यशस्वी होते. असे असूनही आम्ही काही कलात्मक दाखवतोय असा आव कुठेही नाही, निव्वळ कमर्शीयल मालिका आहे त्यामुळे क्लीशे कथानकही जराही कंटाळवाणे होत नाही.

शास्त्रीय, फ्यूजन आणि फ्लॅट आवाजाचे बँड अशा प्रकारचे संगीत आहे. आपल्याला जे आवडते ने ऐकावे न आवडणारे फास्ट फॉरवर्ड करावे अशी सोय आहे.

शेवट ज्या नोटवर केलाय तो खूप आवडला. काहीतरी अपूर्ण असल्याशिवाय कला बहरत नाही - हे खूप सुंदर मांडले आहे.

माधव, सुंदर परीक्षण.!!
मलाही फार आवडली बंदिश बंडित !
शंकर महादेवन ने खूप अभ्यास करून बनवली आहे.
अर्थातच, अशी स्क्रिप्ट आणि संगीत लिहायला तितक्याच ताकदीचा गायक हवा.

माधव छान लिहिलंय. ही बघायची राहिलीच आहे. आता नक्की बघेन.

Dead to Me (नेफ्लि भारत) ही सिरीज मागेच पाहिली होती. डार्क कॉमेडी आहे. फारच एंगेजिंग आहे. मला खूपच आवडली होती. आता तशीच No Good Deed (नेफ्लि भारत) आली आहे. सेम जॉनरां. डेड टु मी मधली ज्युडी इथे मार्गो आहे. बघायला सुरुवात केलीये. चांगली वाटतेय.

बंदिश बॅन्डिट्स - सीझन १ मला आवडला नव्हता अजिबात. सगळं फारच वरवरचं वाटलं होतं. तेव्हा इथे त्याची थोडीफार पिसंही काढली होती. त्यामुळे दुसरा सीझन बघावासा वाटलेला नाही अजूनतरी.

बंदिश बॅन्डिट्स - सीझन १ मला आवडला नव्हता अजिबात >>> मलाही नव्हता आवडला फारसा पण त्यातल्या त्या स्पर्धेतल्या बंदिशीने त्या सिझनची सगळी पापे घुऊन काढली होती. त्या बंदिशीच्या भरवशावर दुसरा सिझन बघायला लागलो आणि तो आवडला. पिसे काढायला यातही भरपूर वाव आहे पण जे सांगायचा प्रयत्न केला आहे ते अभिनय तोकडा पडूनही आवडले. कथानकही वेगवान आहे या सिझनचे.

मी तुमच्या सारख्याच मित्रांचे अभिप्राय वाचून सीझन-१ बघायच्या फंदात पडलो न्हवतो. आता १ बघू का एकदम २ चालेल? मला याची शून्य माहिती आहे.

बंदिश बॅन्डिट्स 1 मला आवडली होती. त्यातल्या उथळ वाटणाऱ्या गोष्टी, मास्क man आणि शिव्या देणारी व्यक्तिरेखा इग्नोर केल्या तर छान वाटली. शेवटच्या बंदिशी तर आधीचे सगळे विसरायला लावणारे होते. अतुल कुलकर्णी खरोखरचा गायक असून ती विरह बंदिश त्याने गायली असं वाटलं.
दुसरा सिझन बघणार आता.

अमितव, मला वाटतं आधी सीझन-१ बघावा लागेल.
पण फक्त गाण्यांसाठी बघणार असलास तर म्युझिक अ‍ॅपवर त्यातली गाणी ऐक Wink

पाताललोक सिझन 2 येतोय 17 जानेवारीला. पहिला सिझन व्यवस्थित संपला होताकी, दुसरा कशाला, एनिवे जयदीप अहलावत आवडतो, त्याच्यासाठी बघेन कदाचित.

गँग्स ऑफ लंडन - एक रोमहर्षक आणि थरारक मालिका

"गँग्स ऑफ लंडन" ही एक रोमांचक आणि थरारक वेब सीरीज आहे जी क्राइम, हिंसा आणि कौटुंबिक नाट्य यांचा अप्रतिम संगम आहे. ही मालिका लंडनमधील विविध गँग्स आणि त्यांच्या साम्राज्यांसाठी सुरू असलेल्या संघर्षावर आधारित आहे.

कथेची सुरुवात माफिया डॉन च्या खुनापासून होते, ज्यामुळे शहरातील गँग्समध्ये सत्तेचा संघर्ष पेटतो. मालिकेतील दृष्ये जबरदस्त आहेत – मारामाऱ्या, षड्यंत्र, आणि भावनिक नाट्य या सगळ्याचा उत्तम समतोल राखला गेला आहे.

कथेची गुंतागुंत आणि अप्रत्याशित वळणे प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतात.

जरी ही मालिका काही प्रमाणात जास्त हिंसक वाटू शकते, तरीही ती क्राइम ड्रामा आवडणाऱ्यांसाठी एक अप्रतिम अनुभव आहे. लंडनमधील गँग्सच्या जगाचा एक भयंकर पण रोमांचक आढावा मिळवायचा असेल, तर ही मालिका नक्कीच पाहावी.

थँक्यू. Lol तुमची रेकमेंडेशन चांगली असतात, आता हे असलं खरंच लिहिलं असतं तर विश्वास एकदम डळमळीत झाला असता Lol

मला लिहायचा फार आळस आहे. आणि कृबु ( chatgpt ) काय देइल जर मराठित समीक्षण द्या अस सन्गितल्यावर हे बघायच होते.
Give me short review on Gangs of London in Marathi अस दिले होते.

"रात जवान है" सरप्रायजिंगली छान आहे प्रोमो बघून वाटलेलं अमीर लोकांचे प्रॉब्लेम्स परंतु लौकीकार्थाने अमीर असले तरीही लहान मुलं असलेल्या तीन पालकांची मध्यमवर्गीय गोष्ट जे बालमित्र आहेत.बरून सोबती ने हाउस हसबंड छान उभा केलाय मुलाबरोबर त्याची केमिस्ट्री छान वाटते.प्रिया बापटनेही बरा अभिनय केलाय स्पेशली ओव्हरऍक्टिग केली नाहीये तसाही तिचा रोल मराठी मुलीचा आहे . राधिका चा रोल प्ले केलेल्या अंजली आनंद चा रोल सर्वात जास्त आवडला . हिचा रॉकी आणि राणी मधलाही रोल छान होता यात जास्त फुटेज आहे.काही संवाद विनोदाच्या अंगाने जातात तर काही विचार करायला लावतात. स्पेशली दोघींच्याही वडीलांसोबतचे सीन मस्त आहेत. एकंदरीत हलकीफुलकी छान आहे सीरीज.आठ भाग आहेत प्रत्येक भागात वेगळा विषय आहे. ज्यांना लहान मुलं आहेत ते जास्त रिलेट करू शकतील. त्यांना नक्कीच बघण्यासारखी आहे. सोनी लिव वर पाहू शकता.

खोज काय चटकन बघून झाली. छोटे एपिसोडस आहेत .
खिळवून ठेवते पण शेवट फुस्स निघाला. फॅमिली मॅन मधला मवाचा मराठी सहकारी आहे त्याचं खरं नाव काय ?
कसला भारी अ‍ॅक्टर आहे हा. वाटतच नाही अभिनय करतोय.

मीसिंग यू: नेटफ्लिक्स
क्राईम, ड्रामा, मिस्ट्री+ ब्रिटिश. आणि एकदम ताजी. आजच आलेली आहे + लिमिटेड सिरीज. पाच एपिसोड.
एका दिवसात उडवली. खिळवून ठेवणारी आहे.
स्टोरी सांगत बसत नाही, टिपिकल हारलेन कोबन ची कथा आहे.

खूप दिवस वाटत होते की द ब्लॅकलिस्टचा जेम्स स्पेडर कुणासारखा तरी अभिनय करतो म्हणजे मध्येच स्थिर नजर ठेवणे ओठाला पाडलेली मुरड, गालाची ट्विच आणि शब्दोच्चार - मग आठवलं श्रीराम लागू.

Pages