बिग बॅास मराठी - ५

Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47

२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आर्या नडत होती निक्कीला, ती गेली तर एकटी जान्हवी नडणार, हे मेकर्स टीमच्या पथ्यावर पडेल, त्यामुळे सध्यातरी जान्हवी मला क्लियर कट विनर वाटते, ती टास्क चांगला खेळते, स्वयंपाक वगैरे करते, किती वर्षे वुमन विनर नाहीये. निक्कीलाही टिप्स देतील जान्हवीला जास्त छळायच्या Lol बिग बॉस तो खेल जाते है अपना गेम. आज पॅडीदादा म्हणाले बिग बॉस बद्दल ते एकदम करेक्ट होतं. मला आवडेल पॅडीदादा जिंकले तर.

Btw मी comfort चं नाही बघितलं. वैभवबद्दल अरबाझ इमोशनल झालेला, की तो एकटा पडलाय.

आज बिचाऱ्या बी टीमच्या कॅप्टनशिपचा घास काढून घेतला बिग बॉसने, voting घेऊन करायचं की कॅप्टन कोणालातरी.

निक्की अरबाज ला बिगबॉसने भयंकर लाडवून ठेवलंय. त्यांनी इतक्या वेळा बाकी लोकांना मारलंय टास्कच्या नावाखाली ते चालतंय. ब टीमने व्यवस्थित मांडलं तर आर्यावर एवढं फुटणार नाही!

अरे काय, जेल मध्ये टाकले आर्याला. तेव्हाच घराबाहेर काढायचे होते. पराग सोबत एक न्याय आर्या सोबत दुसरा कारण यांच्याकडे खेळायला कोणी नाही Lol शेवटी कोणी कॅप्टन झालेच नाही कारण धनंजय ला पुढील वेळी नॉमिनेशन मध्ये आणायचे आणि बाहेर काढायचे. या वेळी वर्षा आजी किंवा वैभव ला बाहेर जावे लागले असते पण आता कदाचित धक्क्यावर आर्याला बाहेर काढतील रोजगार हमी योजना फायदा या दोघांना होईल.

लोकांना खायला मिळत नाही हे आधीच्या सिझन मध्येही सांगून झालंय. बरं मग शिक्षा दिली होती ती वापस का घेतली, काहीही सुरू आहे. पंढरीनाथला उशिरा का होईना गेम कळू लागला आहे. या खाण्याच्या सिच्युएशनवर रडून फुटेज मिळवले आणि काही लोकांचे ब्राऊनी पॉइंट्स. अंकिता हरवलेली दिसली.

मी मागे लिहिलं तसे सूरज बद्दल वैभवने अरबाजला बोलून दाखवल की सूरज भोळा दिसण्याची ॲक्टिंग करतोय त्याला सगळ कळत. सुरुवातीला त्याला नक्कीच भाषेची अडचण आणि मल्टीकॅमेरा सेटअपची सवय नसावी पण आता तो सरावला आहे. पण त्याचा खेळ काही उंचावत नाहीये. धनंजय, वर्षा, वैभव नंतर बाहेर जाण्यासाठी नंबर येऊ शकतो.

नाही, सूरज काही केल्या कुठेही जाणार नाहीये, टोटल व्होट्स पैकी अर्ध्या पेक्षा जास्तं व्होट्स त्याला एकट्याला मिळतात, कोणालाही टाका त्याच्या बरोबर नॉमिनेशन मधे, तो नाही जात, टॉप ५ मधे असणारच आहे Happy
‘पिझ्झा बर्गर नको, भाकरीची ऑप्शन आहे का ? ‘ असे एखादे जेन्युइन इनोसन्ट वाक्यं टाकलं तरी ते इनफ आहे ऑडियन्सचे मन जिंकायला , लहान गावातले बरेच लोक कनेक्ट करत असतील त्याच्याशी !
आर्या आवडली मला, उगीच माफी वगैरे नाही मागितली, तिच्या मताशी ठाम होती !
अंकितानेही सपोर्ट केले आर्याला ते आवडलं , अभिजीत अ‍ॅज ऑल्वेज स्पाइनलेस फट्टु, आपण चूकीचे नाही दिसलो पाहिजे मोड मधे, असला कसला स्वतःचं मत नसणारा माणुस बिबॉचा लाडका ?

सोशल मीडियावर लोक इतके हॅपी आहेत निकीला मारल्याने. आर्या ला शिक्षा दिली तर बिबॉ वर बहिष्कार घालू अश्या किमान १०० कमेंट्स मीच इन्स्टा वर वाचल्या. तर त्याचा काही परिणाम होऊन आर्या घरात राहील का?

समोरच्याला छापील भाषेत बोलून बोलून इरीटेट करणे ही वऊ ची एकमेव strategy आहे असे कालचा एपिसोड बघून वाटले.

पॅडी खूप आवडायला लागला आहे हळुहळू.

काल comfort वाल्या टास्क मध्ये काहीही गरज नसताना डीपी टॉयलेट मध्ये जाऊन रडतो आणि झोपतो हे अंकिताने सांगितल्यावर सोमिवर अंकिताला कुजकी, दुसऱ्यावर जळणारी, वगैरे का म्हणतात ते कळलं.

प्लस, डिपी वैभव / अरबाज ला म्हणत होते की त्यांच्यासाठी अंकिता ही प्रायोरिटी असते पण तिच्यासाठी ते कोणीही नाही हेही अगदी लगेच सिद्ध झाले. त्याने त्याचा कमर्फ्ट झोन म्हणून अंकिता चे नाव सांगितले. आणि तिने मात्र पूर्ण ग्रुप बी च माझा कंफर्ट झोन आहे असे सांगितले. धनंजय ने पुन्हा पुन्हा माझी तिच्याकडून काहीही अपेक्षा नाही हे म्हणून तिला आपण दुखावले गेलो आहोत याची हिंट देण्याचा प्रयत्न केला पण तिला काहीही कळलच नाही किंवा तिने मुद्दाम ते इग्नोर केले.

अंकिता हळुहळू अगदीच न आवडणाऱ्या गटात जाते आहे. निकी सारखे तोंडावर भांडणारे लोक परवडले पण हे नको बाबा. तिने आत्तापर्यंत दिपी, पॅडी यांना अगदी हसत हसत नॉमिनेट केलेलं आहे आणि तेच निकी, अरबाज वगैरे एकमेकांशी भांडण झालेल असताना सुद्धा जास्त लॉयल आहेत.

मागच्या हिन्दी बिबॉ सिझनला सलमान खानने समर्थन केले होते अशा सिनॅरिओ मधे अभिषेकने मारलेल्या थप्पडीचे , हिरो उठके व्हिलन को मारता है और सीटी पडते है, वैसा लगा , बघाच !
https://youtu.be/NowiFnUM2Ds?si=iSDwF4dXQEvCANvH
https://youtu.be/1VUCbJwtWmE?si=INR_ZlYAJK5vwT0l

अंकिया अतिशय धूर्त आहे.हसत हसत एखाद्याला मारतात तशी आहे.डीपी वॉशरुममध्ये झोपतो हा मुद्दा हसून सांगितला ,आता याचा वापर नक्कीच त्यांच्या विरोधात होऊ शकतो.
नंतर अभिजितशी संग्राम विरुद्ध बोलत होती,वेळ आली की सगळ अभिजितवरच शेकेल.
काल आर्याच्या बाजूने ठामपणे उभी राहिली, आज बघू धक्कय्याव काय बोलते.
पण अतिशय धूर्त आणि कावेबाज वाटायला लागली आहे आता अंकिता.
निक्कीशी भिडायला हिनेच आर्याला बाथरुममध्ये जायला सांगितल होत कारण पहिल्यावेळी अनुभव आला होता,मग दुसर्यांदा स्वत:का नाही गेली.
पँडी,सूरज डीपी इव्हन जान्हवीने सावध रहायला हव हिच्यापासून.
मला.ही विनर झालेली अजिबात आवडणार नाही.
लेटेस्ट न्युजनुसार आर्याला बाहेर काढल आहे,काल नेहा शितोळेने आर्याच्या क्रुतीचा निषेध केला ,ते स्वाभाविकच आहे .
पण या सगळ्यात पराग शांत कसा.कुठेच दिसत नाही तो.युट्युब वालेही गेले नाहीत वाटत इंटर्व्ह्यु घ्यायला.

आपल्याला दाखवलं नाही पण आर्याने धक्काबुक्की केली असती तर चाललं असतं, कानफटात मुद्दामून मारली असेल तर परागला एक न्याय आणि आर्याला दुसरा होईल. परागच्यावेळीही बरेच जण बाहेर त्याच्या बाजूने उभे होते, आत्ता आर्याच्या बाजूनेही आहेत. परागने मुलीला मारलं म्हणून एक न्याय आणि इथे निक्की व्हिलनगिरी करते म्हणून तिला मुद्दाम मारलं असेल आणि पब्लिक खुश आहे म्हणून रुल्स बदलायचे हे बरोबर नाही.

त्यात ती आर्या बिग बॉस बोलत असताना हसत होती, हे तिच्या विरोधात जाणार. निक्की कितीही व्हिलन असूदे, एकही मुलगी तिला किती लागलं आहे बघायला नाही गेली, सगळ्या आर्याच्या बाजूने बोलत होत्या. तिच्या गालावर दिसत होतं लागलेलं. त्याउलट मुलं सावध प्रतिक्रिया देत होती. डीपी दादाही म्हणाले की तिला पश्चाताप झालेला दिसत नव्हता. तिला जाणीव फार उशिरा झालेली दिसली, नंतर फार उशिरा जेलमध्ये रडत होती. ती विनर मटेरियल नव्हती पण निक्कीला छान नडत होती.

अंकिता हळुहळू अगदीच न आवडणाऱ्या गटात जाते आहे. निकी सारखे तोंडावर भांडणारे लोक परवडले >>> अगदी अगदी. ती आणि जान्हवी खूप खुश दिसल्या, फक्त वर्षाताई विरोधात बोलल्या.

सुरजला काढलं तर टीआरपी कमी होईल. त्याला पाचवा ठेवतील किंवा मिडविक काढतील.

डीजे ते अभिषेकचे मी बघितलं होतं पण इथे परागला काढल्याने मराठीवाले स्वत:च्या रूलमध्ये अडकले आहेत. आरोह शिवच्या वेळी आरोहला विचारलं होतं, माफ करणार का. इथे निक्कीला ते विचारता येणार नाही कारण ती आधीच म्हणाली आहे की, तिला काढा नाहीतर मला काढा.

आर्याला काढायचे नसेल तर निक्कीला बोलाऊन काहीतरी आमिष दाखवून, माफ करायला सांगू शकतात बिग बॉस.

तीही व्हिलन असूदे, एकही मुलगी तिला किती लागलं आहे बघायला नाही गेली, सगळ्या आर्याच्या बाजूने बोलत होत्या
<<<<
रिअली ? का म्हणून जायचे त्यांनी विचारायला ? ती निकी आहे, तिचे रेप्युटेशन बघता का कोणी विचारपूस करावी तिची ?
नशीब नाही गेल्या विचारायला , नाही तर बी टिमला अजुन शिव्या मिळाल्या असत्या पब्लिअक्च्या Wink
निकीने कितीदा नखं मारली आहेत आर्याला, तिला कुठे त्याचं काही वाटतं !
अरबाझ इतकी धक्काबुक्की करतो, जातो का कधी विचारायला ?

'भाऊचा धक्का'वर अगदीच स्पून फीडिंग करतात आणि काही म्हणून सिक्रेट राहू देत नाहीत. एच आर मॅनेजरने न्यु रिक्रुटला शिकवावं तसं रितेश संग्रामला शिकवत होता.
पॅडीने चक्रव्यूहातून बाहेर आल्यावर काय कळलंय ते गुलदस्त्यात ठेवलं, तेही फोडलं.

हो डिजे मी असते तर लागलं किती बघायला गेले असते. निक्की कितीही बेकार असुदे, मी नाही, तो माझा स्वभाव नाही, हा मुद्दा डोक्यात. बिग बॉस कमी votes दाखवून निक्कीलाही बाहेर काढू शकतं की, करायला हवं त्यांनी तसं.

आर्याने धक्काबुक्की केली असती तर काहीच झालं नसतं, तिने कानफटात मारली, ते चूकीचे होतं. रितेश म्हणाला फुटेज दाखवू शकत नाही. बिग बॉस कधीच स्वतः वर घेत नाहीत, स्टेप बाय स्टेप गेला रितेश, आर्याकडून वदवून घेतलं की ती कशी चुकली ते.

आर्याबाबत योग्य निर्णय, नाहीतर पुढे bb ला भारी पडलं असतं.

तिला बाहेर काढल्यावर लगेच बरेच जण तिची चूक होती, बरोबर आहे बिग बॉसचं म्हणायला लागले, एकटी अंकिता थोडं आर्या असं का वागली असेल त्याबद्दल बोलली.

भरत परफेक्ट पोस्ट.

बाकी पॅडीदादा खरोखर चलाख आहेत, मस्त पचका केला त्यांनी.

त्या वैभवला धक्क्यावर अरबाजविरुध्द भडकावून काही उपयोग झाला नाही,आता त्या संग्रामला भडकावत आहेत.पण मला नाही वाटत तो काही दाद देईल.
एकीकडे रितेश म्हणतो की तुम्ही गेम बघून आला आहात,तुम्हाला कशासाठी पाठवल आहे हेही माहित आहे.पण मग ह्याच संग्रामला हे ही कळलच असेल ना की निक्की आणा अरबाज सुध्दा गँरेंटी घेऊनच आले आहेत आणि शेवटपर्यंत जाणार आहेत पण तो वाईल्ड कार्ड काही आठवड्यांसाठीच आहे ,अरबाजला टक्कर देऊन टीआरपी वाढवण्यासाठी. तो तसाही बाहेर जाणारच आहे.मग संग्राम सुध्दा त्याच्या पध्दतीनेच टक्कर देईल ,तो फारतर लोकांच्या शिव्या आईल अरबाजला न तुडवल्याबद्दल, पण उगाचच हातापाई करून, वाटेल ते बोलूश स्वत:ची इमेज का बिघडवेल,तो थोडीच राहाणार आहे शेवटपर्यंत.
या वेळी बिबॉसचे प्लँन फसत आहेच हेच खर.
वैभव काही अरबाजच्या विरोधात जात नाही,निक्की अरबाज जोडी लोकांना आवडत नाही,सिनिअर म्हणून वर्षा अगदीच निष्प्रभ ठरली तिच्यापेक्षा किशोरी नक्कीच ग्रेसफुल होती.
युट्यूबर्स, इंन्फ्लुएंजर्स सगळे फुसके बार निघाले.
एक काय ती ,जान्हवी,तिला सुध्दा कलर्सनेच पुढाकार घेऊन विनिंग रेसमध्ये आणल असाव.
वाईल्ड कार्ड काही ऐकेल अस वाटत नाही,तो माईल्ड कार्डच राहील.
त्यामुळे बिबॉसला निक्कीशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही.
आर्याला काढल ते योग्यच होत.पण ते कालही करता आल असत,पण धक्क्याला टीआरपी हवा होता ,म्हणून आज केल.
आता अजूनच बोअर होईल अस वाटत आहे.

निक्की अरबाझ यांना स्वतःला कित्ती ओवरकॉन्फीडन्स आहे, हे लोकांना अजिबात आवडत नाहीयेत. हेच जान्हवीला आतून सांगतील (रीतेशने तसं समोरुनही सांगितलं खरं तर) आणि विरोधात उभं करतील, खरं तर ती स्वतः हुशार आहे, असाच गेम खेळत जाणार ती, हे बहुतेक नवरा मागे म्हणाला, तिची स्ट्रॅटेजी आहे ती. असं मी तुकड्या तुकड्यात बघितलं. पुर्ण मुलाखत नाही बघितली.

युट्यूबर्स, इंन्फ्लुएंजर्स सगळे फुसके बार निघाले. >>> हे बाकी खरं. अंकीता आता अजिबात आवडत नाहीये, जान्हवी हळूहळू आवडेल बहुतेक मला, हाहाहा. सध्या मला पॅडीदादा योग्य वाटतायेत.

https://www.youtube.com/watch?v=tPIcsP1qsdM अमृता मस्त रोस्ट करते. ही आणि तेजु आवडायच्या मला लास्ट सीझनला.

निक्कीची आई आपला तो बाब्या करतेय, मान्य आर्याची आणि संग्रामची चूक होती पण आपली मुलगी काय दिवे लावतेय तेही बघाकी, ती किती सज्जन आहे हे ही बघा.

Btw ते फुटेज दाखवू शकत नाही ह्याचं कारण जे सांगितलं, ते अजिबात पटण्यासारखे नव्हतं, काहीही होतं.

आर्याचा बाहेर सत्कार करतील लोकं तेव्हा निक्कीच्या आईची प्रतिक्रिया बघायला मजा येईल.

आज रितेश घरात जाणार आहे कल्ला करायला,पण मला वाटतं,वर्षाला एलिमिनेट करायला जात असेल.एवढ्या मोठ्या सिनियर अभिनेत्रीला,तुमच्या नावाची पाटी घेऊन बाहेर या,असं सांगण कदाचित योग्य वाटत नसेल भाऊंना,म्हणून स्वत:जाऊन सन्मानाने बाहेर घेऊन येतील.

मला फारच बोअर होतोय हा season...बघायची इच्छाच होत नाही...निकिला बघावसं वाटत नाही...आणि अरबाज बोलायला लागला की त्याच्या मराठीमुळे ऐकवत नाही...भाऊचा धक्का पण किती एकसुरी असतो काहीच आतुरता वाटत नाही...रितेश बोलतो चांगला पण तेच सगळंच open करुन टाकतो त्यामुळे असं वाटतं यापेक्षा मांजरेकर असताना किमान चावडी पाहण्यात मजा वाटायची...

वर्षा आजीला बाहेर आणायला रितेश जाणार असे वाटले पण मग दुसरी शक्यता वाटते की रितेश आत जाणार, आणि वैभवला सोबत घेऊन बाहेर येण्याचे दाखवणार पण प्रत्यक्षात वैभवला सिक्रेट रूम मध्ये ठेवणार. अरबाज ची पॉवर कमी करणार आणि संग्राम विरुद्ध अरबाज असा खेळ काही दिवस दाखवणार. त्या दिवसात अरबाज वैभव विरुद्ध बोलणार, मग वैभव ला उपरती होणार. रुमच्या बाहेर आल्यावर तो अरबाज विरुद्ध खेळणार (जसे आता जान्हवी ही निक्की विरुद्ध खेळते). थोड्या दिवसात माईल्ड कार्ड घराबाहेर जाणार. शेवटच्या काही लोकात (5 मध्ये नाही) कोणी योग्य उमेदवार सापडत नसल्याने वैभवला दे धक्का करत पोहोचवणार.

डबल एलिमिनेशन करणार नाहीत कारण आत्ताच एक माईल्ड कार्ड घरात आला आहे. आर्या आणि वैभव/वर्षा बाहेर गेले तर घरात माणसे कमी होतील. मग पुढचा वाईल्ड कार्ड लवकर आणावा लागेल किंवा पुन्हा एकदा फेक एलिमिनेशन दाखवावे लागेल.

एक नक्की यावेळी बिबॉचे प्लॅन बिघडत आहेत.

अरे केले आहे डबल एलिमिनेशन, आली कि न्युज , गेला वैभव बाहेर!
वर्षा उसगावकर नाही जात इतक्यात , १० आठवडे एम्जी घेऊन आली आहे अशी न्युज पाहिली होती.
बाकी आजचा धक्का एकदम बकवास आणि बायस्ड , पाठ करून आल्या सारखा बोलत होता रितेश !

हिंसेचे समर्थन? >>> मी नाही करत, उलट मी आर्याला काढलं ते योग्यच लिहीलं पण सो मि वर लोकं लिहीत होती त्यावर लिहीलं. निक्कीची आई खरोखर आपली मुलगी संत आहे असं समजतेय.

मी नाही करत

तुम्ही करता असे नाही लिहिले, जे सत्कार करतील त्यांच्यासाठी होते ते, काय करणार एकूण कठीण झाले आहे सगळीकडेच. थोडेसे काही बोलले तर लोक अंगावर येतात, मारामारी करतात, बातम्या वाचतोच आपण.

अर्थात केला तरी तिने तो सत्कार स्वीकारायला नको, कारण ती चुकली आहे.

बाकी निक्की अरबाझला सांगत होती, कोणीही कॅप्टन होऊदे, मी ड्युटीज करणार नाही, मी शेवटी बिग बॉस जी शिक्षा देईल, ती स्वीकारेन. यावर रीतेशने बोलायला हवं आहे तिला, कालच सुनवायला हवं होतं.

कालचा धक्का तसा निक्की च्या बाजूने होता. निक्कीला मारले म्हणून आर्या घराबाहेर गेली, संग्राम ने धक्का दिला म्हणून पहिल्या आठवड्यात बोलणी खाल्ली वर निक्कीला सॉरी बोलला, कोथमिर फेकली म्हणून वर्षा आजीने बोलणे ऐकले (त्यांना अजूनही त्याचा काहीही पश्चातप झाला नाही).

धक्क्यावर एक बरे झाले की पंढरीनाथचे कौतुक केले पण नंतर पचका केला. आज वैभव बाहेर आला असेल तर दुसरा वाईल्ड कार्ड सदस्य लवकर आणावा लागणार.

बाकी निक्की जान्हवी यांना मुद्दे उचलणं छान जमतं आणि फोकस ठेवतात स्वतःवर. बी टीम कमी पडते यात. कोथिंबीर मुद्दा अंकीताने उचलला नाही, तिच्या आधी लक्षात आलेलं, ती भांडू शकत नाही पण वाद घालू शकत होती, कमीत कमी डीपि, पॅडीदादा यांना सांगू शकत होती. निक्कीने परफेक्ट उचलला, या बाबतीत ती एक्स्पर्ट आहे.

रविवारचा तसा बोअर होतो.

आजचा थोडा इमोशनलही होता. कोणाचे parents, कोणाची मुलं संवाद साधायला आली होती. जान्हवीचा मुलगा, pady दादांची मुलगी, अभिजीतच्या मुली सर्व छान बोलले. काही जणांचे कटही केलं असावं. वर्षाताईचा नवरा हवा होता दाखवायला, अलका कुबल होती. जान्हवीचा मुलगा गोड आहे, पंढरी दादाची मुलगी स्मार्ट आहे, दुसरी फक्त फोटोत दाखवली. अभिजीतच्या मुली मस्त व्यक्त झाल्या.

आज ज्या जोड्या दाखवल्या त्यानुसार जान्हवी, अभिजीत किंवा अभिजीत जान्हवी टॉप 2 असतील का, मध्ये इथल्या युपिनेही लिहिलेलं बहुतेक, हे दोघे लाईट्स बंद करतील बहुतेक. तसं वाटलं मला आज. थ्री फोर निक्की अरबाज किंवा अरबाज निक्की. पाचवे कोण असेल माहिती नाही.

माझ्या नवऱ्याला अभिजीत फार आवडतो, तो जिंकला तर त्याला आवडेल. नवरा फार बघत नाही, मी बिग बॉस बघताना डोकावतो.

Pages