बिग बॅास मराठी - ५

Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47

२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा शो आता खरच स्क्रिप्टेड वाटत आहे,तसे सगळेच असतात,पण हा अगदी दिसत आहे.
वैभव आणि वर्षा दोघही बॉटम टू मध्ये असताना,वर्षापेक्षा वैभव नक्कीच आणखी एक आठवडा डिझर्व्ह करत होता पण तरीही वर्षाला ठेवल ,म्हणजेच डीजेने अपडेट केल्याप्रमाणे खरच ही राहणार का?
आता राहिले आहेत सात आठवडे,शेवटच्या आठवड्यात एलिमिनेशन नसत.म्हणजे सहा आठवड्यात पाच लोकांना काढायच आहे.
बहुतेक संग्राम,डीपी,वर्षा,पँडी,अंकिता /सूरज इथे जरा टफ फाईट आहे,जर पाचच ठेवणार असतील तर.
बाकीचे चार ऑलरेडी फिनँलेपर्यंत पोचलेले आहेत.
काल निक्कीला बॉटम 3मध्ये ठेवल्यावर आणि वर्षाला तिच्या आधी सेफ केल्यावर जरा धक्का बसल्यासारख वाटल,जरी तिला माहीत आहे की आपण जाणार नाही,तरीही .
अंजू,वर्षाचा नवरा दाखवला नाही,पण ते एकत्र राहतात का हा प्रश्न आहे.

फार बोअर झाला राव सिझन... वाईल्ड कार्ड पण फुसका बार... त्याच्या तोंडात पण दम नाही.
अभिजीत च जिंकतोय बहुतेक....
आर्या ला काढलं म्हणुन जनता पेटलिये सोमी वर.. शिवानी ला पण असच काढलं होतं पण मग परत आणलं... आर्या चं तसं करतील का ?
आर्या जाताना जे बोलली ते सगळं तिला नाईलाजाने पढवुन ठेवलेलं बोलायला लावलं असेल असं वाटलं.. नाहितर बिबॉ च्या काही तरी कॉट्रँक्ट नुसार केस वगैरे करण्याची धमकी मिळाली असेल..
निक्की कोळुन प्यायली आहे बिबॉ... प्रोव्होक करुन एका तरी माणसाला काढता येतं हे माहिती आहे तिला... जान्हवी किंवा आर्या चा तोल कधी न कधी सुटणारच होता.. आर्या सापडली.

काल रडायची स्पर्धा होती. सूरजच्या डोळ्यांत पाणी दिसलं का? तो दोनदा हुंदका देण्यासाठी रितेशच्या छातीत डोकं खुपसायला धावला.
निक्की अगदीच कोल्ड आहे. गेम अंगात भिनलाय तिला.
पॅडीने तेवढातही आपण काही चुकीचं करत नाही, हे ठासून सांगितलं. तो सूरजचा आधार घेतो ही वैभवची स्तुती रिपीट केली. त्याचा कॉन्फिडन्स आवडला.
घरच्या लोकांची भेट घडवून - तुमचे कुटुंबीय तुम्हांला बघताहेत , तेव्हा नीट वागा, असा संदेश दिला का?
वैभव वर्षाच्या आधी गेला हे बरोबर वाटलं. वर्षाचा आवाज येतो, ती विनोद करते. हा कुठेच दिसत नाही.
सूरजच्या फॅन फॉलोइंगमुळे तो जाणार नाही. पण तो अक्षरशः का ही ही करत नाही. तरीपण संग्राम असाच राहिला, तर तोच जावा या आठवड्यात. रितेशने भरपूर अपमान केला त्याचा.
धनंजयनी वर्षाचं झाड धरलेलं दिसतंय.

आर्याला काढलं म्हणुन जनता पेटलिये सोमी वर
धीस इज सिक बेहविअर, हेच ते हिंसेचे समर्थन

थप्पड मारली तर होते
जाणीवपूर्वक मारली असे तिने स्वतः कबूल केले, एक्झीट इंटरव्ह्यू मध्येही तिला या बद्दल कसलाच गिल्ट नाही वाटला

परागच्यावेळीही हेच झालेलं, परागला सपोर्ट होता . सो मि वर लोकांनी जसं लिहीलं आहे निक्कीच्या कानफटात मारली हे आम्हाला बघायचं आहे त्यावेळी नेहाचंही पब्लिकला बघायचं होतं, नेहा व्हिलन म्हणूनच प्रोजेक्ट होती बाहेर. लोकं खुश झालेली परागवर. मला सगळंच चुकीचं वाटतं. परागही चुकला, आर्याही चुकलीच. शिव चावलेला हेही चुक होतं पण आरोहला काहीतरी आमिष देऊन त्याला माफ करायला लावलेलं.

निक्कीलाही तिच्या वागण्याची समज द्यायला हवी तीव्र शब्दात, ती खूप चुकीचं वागते. जान्हवीही अशीच वागत होती पण ती कलर्स मराठीची असल्याने तिला टीप्स देऊन तिची प्रतिमा सुधारत नेली बिग बॉसने.

निक्की बिग बॉसच्या सांगण्यावरुन वागत असेल तर प्रश्नच मिटला.

वैभव गेला ते बरंच झालं, त्याला कितीही स्पून फीडींग करा, तो अरबाझची सावली म्हणूनच राहीला.

हेलो सगळ्यांना,
मी मायबोलीची जुनी सदस्य आहे बरेच वर्षे रोमात होते. आज लिहावं वाटलं.
कारणही तसेच आहे मी पण नियमित बगते बिग बॉस मागचे नाही पाहिले फक्त मराठी पहिलाच पहिला आणि शिव ठाकरे च.
ह्या वेळी निकी आणि ग्रुप माझ्या पण डोक्यात गेला होता पाहिले काही आठवडे, पण जेव्हा निकी आणि अभिजित ची जोडी बनवली तेव्हापासून चक्क निकी मला आवडायला लागली आहे. तिने सिद्ध केले आहे तिच्याबरोबर कोणीही असू द्या तिच्यावरच फोकस राहणार. त्यातल्या त्यात बी टीम म्हंजे काही म्हंजे काहीच करत नाही.
अंकिता आणि वर्षा: काही कळात नाही ह्यांना त्यात वर्षा तर पुस्तकी बोलण्याने डोक्यात जाते निकी बरी तिच्यापेक्षा.
दिपी आणि पंढरीनाथ: अंकिता आणि वर्षा पेक्षा एक परसेंत बरे
सूरज: ह्याला जिंकवणार कारण एमसी स्टन पेक्षा बराच आहे
अभीजीत आणि आर्या : का आहेत हे
जान्वि : हि नकोच वाटते नेहमि निगेटिव्ह च का वागायच असत हिला? निकिचि चुकिचि नक्कल करते.

आता सध्याचा विषय सोशल मीडिया वर लोकांनी आर्या ची आरती आणि मंदिर जर बंधेले तर आश्चर्य वाटू नये. लोकांना हेच काळात नाही आर्या चुकली आहे. गेम हाच आहे ना. निकी गेम कोळून प्याली आहे. एखाद्या पोस्ट वर आर्याच्या विरोधात बोलले तर लोक आता बिग बॉस चे सिंहावलोकन करा असे सांगतात.
मला तरी निकी च गेम आवडायला लागलाय आणि झालेल्या घटने मध्ये तिची काहीच चूक नव्हती एकतर दार बंद करायची काहीच गरच नव्हती दोघी तिघी मिळून तिला अडवू शकत होत्या इव्हान आधी त्यांनी तिला उचलून, धक्का बुक्की करून केले पण होते, बर टास्क पण पूर्ण बी टीम chya हातात होता. पण आर्यला आपण निकिपेक्षा काही कमी नाही आपण पण काहीतरी करु अशी हुक्की आली आणि तिने गरज नसताना कॉपी केली...आणि केला स्वतःच सत्यानाश तसाही ती गेलीच असती ह्या विक मध्ये अजिबात दिसत नव्हती आणि दिसली तरी निकी ची कॉपी करताना. मागे पण तिचा भांडी घासायचा टास्क होता तिने भांडी घासली नाही आणि मग निकिने कढई मध्ये चहा केला ते बेड वर नेऊन ठेवला शी किती विचित्र वाटत? असो मला तर वाटलं सोशल मीडिया वर मी एकटीच होते आर्या विरुद्ध बोलणारी. आता आज मी शांत केला स्वतःला. कितीही बोलला तरी लोक पेटलेत नुसते.
अर बाज सोद्ल तर कोनिपन सधि विचर्पुस केलि नहि तिचि. हेच जर तिने केलि अस्त तर सग्ल्यनि मिलुन जिव घेत्ला अस्त निकिच एव्धे होउन पन सग्ल घरात्ले आर्या बरोबर होते.
पण कहिहि असो सध्य तरि मि निकि बरोबर आहे.

इथे आर्याची चुक आहे असे आम्ही बरेच जण म्हणतोय, तुम्ही इथे लिहीत जा सीमा. आर्याकडून बिग बॉसने वदवून घेतलं आणि दाखवलंही की ती कशी चुकली. निक्की मधे मलाही आवडायला लागलेली जेव्हा सगळे तिच्याविरोधात गेले तेव्हा, मी लिहीलंही, मी परवा इथेही लिहीलं की तिला लागलेलं कोणी विचारायला गेलं नाही, मी गेले असते पण निक्की फार चुकीचंच वागतेय बरेचदा, ते काम तिला नेमून दिलं असेल तर तिचं काही चुकत नाही पण आदरवाईज ती चुकीचं वागतेय बरेचदा असं पर्सनल मत, म्हणून ती परत आता आवडत नाहीये.

आर्याचा उदो उदो करणारे उद्या विसरुनही जातील, इथे तिला काम मिळण्यासाठी चॅनेल्स आणि इंडस्ट्रीची गरज आहे, लोकं नाही देणार. त्यामुळे तिने बिग बॉसचं ऐकलं आणि चुक कबूल केली ते बरोबर, चॅनेल तिला काम देईल पुढे, जसं परागला दिला शो करायला कलर्सने तसंच होईल.

धक्का मारला, पकडून ठेवलं तर ती हिंसा होत नाही. थप्पड मारली तर होते, असा नियम दिसतोय. >>> धक्का आणि पकडणे धरलं तर आत्ताचे बहुतेक बाहेर असतील, खेळायला कोणीच रहाणार नाही.

Submitted by Seema२७६ on 16 September, 2024 - 07:00
छान लिहिले आहे, लिहीत जा इकडे

ओ एम जी इतक उघड उघड प्रॉम्टिम्ग असेल तर डेली सोप का डीक्लेयर करत नाहित?सॉरी टु से पण रितेश-जेनेलिया जोडि आवडते पण रितेशच होस्टिन्ग सपशेल गन्डलय...अत्यत पाट्या टा़कु होस्टिन्ग...बीबॉ टिम त्याला पॉइन्ट काढुन देते आणी त्यावर फारसे बदल न करता काहिच क्रियेटिव्हिती न वापरता रितेश ते शनिवारी एकवुन येतो..या शनिवारी तर चक्क नॉमिनेशन कशी चुकिची केली यावर बोलले...देवा! अरे ! रिअ‍ॅलिटी शो म्हणता ना? मग सगळच मेकर्स ठरवणार असतिल तर स्क्रिप्ट लिहुनच द्या तसही निकी आणी जान्हवी सोडली तर फारसे कुणि स्मार्ट नाही...
डिपि,वर्शा,सुरज याना गेम किती कळतो ही शन्काच आहे.

वोटिंगच्या टर्म्स आणि कंडीशन मधील नियम क्रमांक 10:

The elimination of any participant and/or the decisions made by Viacom18 and/or the Channel and/or Platform shall be final and binding and in no event shall the viewer(s) dispute the decision made by the judges of the Program, Viacom18 and/or the Channel

हे वाचून ठरवा.

हा शो किंवा इतर कुठलाही शो किंवा चित्रपट भावनिक न होता बघितले पाहिजे. ते फक्त मनोरंजनासाठी असतात. कलाकारांना त्याचे पैसे मिळतात, आपल्याला मनोरंजन आणि गप्पांसाठी विषय.

या.सिझन मधली नॉमिनेशन काय पण शोच आता स्क्रिप्टेड आहे.
या आठवड्यात संग्राम जाईल.सिझन एक आणि दोन मध्ये सहा होते फायनलमध्ये,किशोरीला ममांच्या सांगण्यावरून ठेवल होत म्हणे.
तस यावेळी सहा ठेवले तर मग अंकिता पण येईल सहा मध्ये.

हो, आम्हाला नाही वाटत आर्या चूकीची, इन फॅक्ट हिरो वाटते, थप्पड दाखवली असती तर टाळ्या वाजवल्या असत्या ऑडियन्सने, याला हिंसेचे समर्थ्॑न म्हणायचं तर म्हणा !
आर्याने काही रॅन्डम कोणाला तरी जाऊन थप्पड नाही मारली, तिने स्वतः निकीचा अनेक वेळा मार खालाय, अ‍ॅटॅक फेस केलाय, आर्यानी कोणाला आणि कुठल्या सिच्युएशन मधे मारले त्यामुळे पब्लिक सपोर्ट आहे तिला.
प्रॉब्लेम असा आहे कि निकी आणि जान्हवीने आर्यावर कितीतरी वेळा इन्टेन्शनली अ‍ॅटॅक केलाय, आर्याने कॅमेराला दाखवलय तिला लागलेलं, तेंव्हा बिबॉने काही अ‍ॅक्शन घेतली नाही, अशा अनेक गोष्टी पब्लिकने लक्षात ठेवल्यात तर ती तिथे निकी बरोबर रहातेय , ती बरी विसरेल ?
बिबॉचे रुलबुल काही का असेना , फॅक्ट हीच आहे कि अनेकदा आर्याला लागलं आणि तिला चान्स मिळाल्यावर तिनी स्कोअर सेट्ल केला.
पहिल्या टास्क पासून जी निकी अनेक प्रकारच्या हिंसा करतेय, if she gets taste of her own medicine, she can’t take it !
निकीच्या आईने थप्पड मिळाल्याचा निषेध केला होता, त्यावर ही मेघाची कॉमेन्ट बघा Proud
IMG_1753.jpeg

आर्या सांगत आहे की आधी निक्किने पण गालावर मारव होत.आता खरखोट माहित नाही.
वैभव म्हणत आहे की प्रेक्षकांना धक्काबुक्की मध्ये लागण आणि इंटेशनली लागण यातला फरक कळत नाही.
आता आधी आर्या म्हणते त्याप्रमाणे जर खरच निक्कीने आधी गालावर मारल असेल आणि म्हणून फुटेज दाखवत नसतील तर माहित नाही.
निक्की आणि अरबाज एकत्रच डुबतील अस वैभवच म्हणण आहे,(तरी हा अरबाजसोबतच होता)याचा अर्थ घरातल्यांनाही माहित असणार की बिबॉस या पिक्चरमधली निक्की आणि अरबाज ही मुख्य कँरँक्टर्स आहेत जी शेवटी बाद होणार.
म्हणूनच जरा जास्तच स्क्रिप्टेड वाटत आहे.

ती निक्की कित्ती कर्कश्श्या आहे ओरडण्यात, tv mute करावा लागतोय.

आजच्या एपिसोडवरून बिग बॉसला जान्हवीला विनर करायचं आहे, हे सरळसरळ दिसलं.

यु पि आर्या विकेंड वारमध्ये बिग बॉस आणि रितेशसमोर काहीच बोलली नाही, चूक कबूल करून निक्की आणि सगळ्यांची माफी मागितली, ती गेल्यावर बाकीचे सर्व तिने बेसिक नियम मोडला त्यामुळे योग्य शिक्षा दिली असं म्हणाले, त्यामुळे आर्याची बाजू कमजोर दिसतेय, मजबूत असेल तर ती कोर्टात जाऊ शकते ह्या शो मेकर्स विरोधात.

यावेळी बिग बॉस जास्त फ्रेंडली वागतायेत, जास्त बोलतायेत.

पाडलेल्या टीम्स पाहून अरबाझ निक्कीची टीम जिंकेल असं वाटलं होतं. पण नेहमीप्रमाणे बिग बॉसचं नेहमीचं ट्विस्ट आलं.

अरबाझ वि संग्राम आणि सूरज वि.पॅडी किंवा अभिजीत असा सामना झाला असता, तर टीम ए जिंकली असती. पण अरबाझ वि पॅडी आणि सूरज वि संग्राम असा सामना झाल्याने निकाल बदलला.

सूरजचं स्ट्राँग फॅन फॉलोइंग आहे. तेव्हा आता वर्षा आणि जान्हवी यांच्यातून एक बाहेर जाईल असं वाटतं. निक्की - अरबाझला काय काढत नाहीत.

मला नॉमीनेशनचं समजलंच नाही. पॉईंट्स वर पूर्ण टीम नॉमीनेट होणार होती का.

निक्की, अभिजित, डीपी टास्क छान खेळले. अंकिता जाम फुसकी निघाली, निक्की चपळ. जान्हवी अभिजित मध्ये जान्हवी सहज जिंकेल वाटलेलं पण अभिजित सहज जिंकला, जान्हवीला लागलं पायाला.

बाकी अरबाझ पॅडीदादा आणि संग्राम सुरज चुकीच्या जोड्या लावल्या त्यामुळे अरबाझ, संग्राम सहज जिकले. सुरजने प्रयत्न चांगले केले. अरबाझचं बोलून झाल्यावर आज अभिजीतने मस्त पंच टाकला, मजा आली.

संग्रामला दम किती लागतो, सुरज कुल होता.

भरत दोन वर्षांपूर्वी पराग कलर्स मराठीवर रेसिपी शो मध्ये दिसला होता होस्ट करताना, तो शो तात्पुरता होता काही दिवस का कसा ते माहिती नाही, मी एकदाच बघितलं होतं त्याला.

कलर्स मराठीच्या कुकरी शो ( मेजवानी परिपूर्ण किचन?) मध्ये तो बिग बॉसच्या खूप आधी होता. विष्णू मनोहर यांच्यानंतर तो तिथे मुख्य शेफ म्हणून आला. मग तिथून झीच्या खवैये मध्ये गेला. तुम्हांला जुना एखादा एपिसोड दिसला असेल.

तो आधी होता ते माहितेय.

मग झी वर बघितला का नंतर, मला कलर्स का आठवतंय. मला वाटतंय कलर्सवर नंतर बघितल्यासारखं, बघते शोधून.

टीम बी चांगली खेळली आज.अंकिताच्या हाताला लागल असल्यामुळे कदाचित गन स्वत:च्या साईडला घेता आली नसेल.अभिजितने मस्त उचलली.सूरज खरतर थोडा आधी पोचला होता,पण संग्रामच्या साईडला गेल्यावर अशक्यच होत.
टीम बी हरली तर संग्राम प्याद होत बिबॉसच पण बहुतेक त्याला एक आठवडा आणखी दिला.
आतातरी वर्षाला काढा.झाले की 50दिवस,अर्धी सिझन होती ना.गँरेंटी संपायला हवी आता.
अरबाज आणि निक्कीला फिनँलेची गँरेंटी असूनही नॉमिनेशन्स ला का एवढ घाबरतात ,कळत नाही.
सोमिवर चर्चा आहे कोणीतरी सायली पाटील वाईल्ड कार्ड येणार आहे.अफवाही असेल.पण आठव्या आठवड्यात वाईल्ड कार्ड?

अंकिताच्या हाताला लागलेले माहिती नव्हतं, मग बरोबर, उगाच वर फुसकी लिहिलं.

https://timesofindia.indiatimes.com/tv/news/marathi/chef-parag-kanhere-a...

भरत ही लिंक, कलर्स मराठीवर आज काय स्पेशल मध्ये बघितलेलं त्याला. नंतर फॉलो केलं नव्हतं.

https://www.youtube.com/watch?v=vIOcikYyR9w&list=PLVd4UNTzQNKEdInQZHumnw... इथे पराग आहे. हा शो बिग बॉस नंतर आलेला त्याचा.

हो, आम्हाला नाही वाटत आर्या चूकीची, इन फॅक्ट हिरो वाटते, थप्पड दाखवली असती तर टाळ्या वाजवल्या असत्या ऑडियन्सने, याला हिंसेचे समर्थ्॑न म्हणायचं तर म्हणा ! +१११
जर अरबाजने प्रत्येक गेममध्ये (जाणूनबुजून) केलेली धक्काबुक्की (आठवा त्याने काय जोरात अभिजीतला ढकललं, तसंच सुरजला अडवायच्या नादात उचलून फेकत होता) आणि निक्कीने मारलेली नखे हिंसा नसेल तर आर्याने (बिगबॉसकडे अनेक वेळा केलेल्या तक्रारींनंतरही दुर्लक्ष झाल्यानंतर) मारलेली एक थप्पड अगदीच नॉर्मल आहे. निक्की डिझर्व्स दॅट!
मेघाच्या पोस्टशीही पूर्णपणे सहमत.

आर्याने ठरवून मारलं हे तिचं चुकलं. शिवाय त्यामुळे कॅप्ट नसी टास्क रद्द झालं. हे तिच्या टीमला नुकसान करणारं होतं. निक्कीने किंवा जान्हवीने तिच्याबाबत जे जे चुकीचं केलं त्याबद्दल त्यांनी बोलणी खाल्लीत त्यामुळे ते ग्रजेस आता ठेवण्याला अर्थ नाही.. निक्कीला त्या बोलण्यांनी काही फरक पडत नाही म्हणा. तसा तर तिला थप्पड पडल्यानेही काही फरक पडला नाही. उलट त्यामुळे एक मेंबर एलिमिनेट करता आला, एक शनिवार बोलणी कमी पडली , दुसरी टीम वाईट दुष्ट आहे असं दाखवता आलं.
तिच्यापेक्षा अरबाझच जास्त कोकलत होता.
काल हे दोघे आपल्याला बदललं पाहिजे असं काहीतरी बोलत होते.

--
याआधी मी रितेशचं फार काम पाहिलेलं नाही. इथे तो आवडतोय. काढ्यात तुमचे शब्द , पॅडीच्या चक्रव्युहातून बाहेर आल्यानंतरच्या रिअ‍ॅक्शनवरची रिअ‍ॅक्शन , अलका कुबलना तुमचा आशीर्वाद असाच राहू दे म्हणणं हे सगळं कोणी लिहून देऊन येत नाही. तसंच मांजरेकर एव्हिक्शनची अनाउन्समेंट आणि त्यातला सस्पेन्स खूप ताणायचे तसं रितेश करीत नाही, हेही आवडतंय.

मांजरेकर एव्हिक्शनची अनाउन्समेंट आणि त्यातला सस्पेन्स खूप ताणायचे तसं रितेश करीत नाही >> हो. तो एक फारच मोठा वैताग होता. व्हॅलीड पॉइंट.

YT वर काही लोक म्हणत आहेत की निक्किने सुद्धा आर्या च्या कानाखाली मारले म्हणून. आर्याच्या मुलाखतीत असे काही आहे का? नसेल तर जस्ट गॉसिप असेल.

बाकी तिथे काय झाले याचे फुटेज प्रेक्षकांना न दाखवणे हेच प्रचंड फिशी आहे. बिबी फडतूस वाटू लागले आहे पूर्णच.

वैभवचीपण मुलाखत आली आहे YT वर. अतीशय बोरिंग. फक्त 'मीच चुकलो' हे पुन्हा पुन्हा मान्य करतोय हीच एक काय ती जमेची बाजू.

तो ant rider का काय आता काय कमेंट्री करत असेल त्याचे त्यालाच माहित. पूर्ण गेमच फुसका बार झाला आहे.

काल नॉमिनेशन मध्ये आलेले सदस्य बघता या आठवड्यात गटणे बाईंचा नंबर आहे बहुतेक बाहेर जायचा.

अंकिताची काल पुन्हा चीड आली. तिच्या अश्या वागण्यामुळे फार टॅलेंट नसताना माझे मन धनंजयला झुकते माप देऊ लागले आहे. काल त्याच्या विषयी गॉसिप करताना बी टीम अंकिता त्याच्या बाबतीत कसे वाटतेय हे लक्षात येण्यात कमी पडतेय का? कालचा धनंजय बोलत नाही हे कळल्यावर अंकिताचा क्षणिक ड्रामा पण अतिशय फेक होता.

बाकी पूर्ण बिग बॉस मध्ये निकी सोडून सगळे ठार वेडे भरले आहेत. नॉमिनेट करताना द्यायच्या कारणांमध्ये एकट्या निकीनेच ओव्हरऑल परफॉर्मन्सच्या बेसिसवर कारणे दिली.. जसे की अंकीता मध्ये हा गेम जिंकण्याची, वेळोवेळी कॅप्टन होण्याची संधी मिळाल्यास कॅप्टन होण्याची माझ्याइतकी जिद्द दिसत नाही. मी तिच्यापेक्षा हा गेम जास्त सिरीयसली खेळते आहे. त्यामुळे मी जास्त लायक कँडिडेट आहे वगैरे. अतिशय अचूक कारण. (त्यावर त्या मठ्ठ अंकिताने ते आरोप खोडून काढायचे सुद्धा कष्ट न घेता आपण इथे पिकनिक साठी आलो आहेत हे पुन्हा एकदा प्रुव्ह केले).

बाकी सगळे माठ त्यावेळेच्या (म्हणजे त्या पर्टिक्युलर बंदूक उचलणे टास्कमध्ये) आपण कसे चपळ / जास्त ताकद असलेले होतो हे बोलत बसले. एका टास्क मधील परफॉर्मन्स वर लायक कँडिडेचर ची कारणे ठरतात का?घरातील ओव्हरऑल वावर, आत्तापर्यंत मोडलेले नियम, चतुराई वगैरे पॉइंट्स इतर कोणी मांडले नाहीत. तो संग्राम तर पुन्हा पुन्हा सुरजला "तू खूप strong प्लेअर आहेस" हे म्हणत बसला. का? तर बाहेर त्याला सपोर्ट आहे हे बघून आलाय. :facepalm:

बाकी अरबाझ पॅडीदादा आणि संग्राम सुरज चुकीच्या जोड्या लावल्या त्यामुळे अरबाझ, संग्राम सहज जिकले.

>> आजही अरबाज वि संग्राम जोडी असती तर संग्रामला कोणी उभे पण केले नसते बाहेर.

Pages