बिग बॅास मराठी - ५

Submitted by sonalisl on 27 July, 2024 - 11:47

२८ जुलै पासून बिग बॅास मराठीचा ५ वा सिझन कलर्स मराठीवर सुरू होणार आहे. यावेळी बाची शाळा रितेश देशमुख घेणार आहेत. घर कसे आहे? घरात कोण-कोण येणार? हे लवकरच समजेल.
या भागात काय होईल, कसे होईल, कोणाचा खेळ आवडतोय, कोणाचा नाही, कोण बाहेर जाणार, कोण राहणार यावर चर्चा करायला हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पॅडी दादा असायला हवे टॉप 5 मधे, काल त्यांच्या पुढारी बरोबर उभे असताना कमेन्टस ऐकायला मजा आली!!!! त्यांना गेम & लोक दोन्ही चांगले कळतात.

काल टीम बी बरे खेळले की. चांगले वाटले बघायला फॉर अ चेन्ज. निकीचे फारसे काही चालले नाही.
आणि टीम बी आणि जान्हवीचा निकीच्या जेवणाबद्दलचा स्टँड ही मला आवडला. पण काही सांगता येत नाही रितेश झापेल सुद्धा निकीला जेवण का दिलं नाही म्हणून. निकी त्याचा इशू करायचा प्रयत्न करत होती उपाशी ठेवले वगैरे बोलून. पण तिला कुणी आयते दिले नाही इतकेच. उपाशी ठेवण्याचा काही संबंध नव्हता. तिचे तिला स्वयंपाक करून जेवता येत होते. पण कुणी तिच्या अर्ग्युमेन्ट ला तसे स्पष्ट उत्तर देत नव्हते.

डबल एलिमिनेशन झाले तर घनश्याम आणि धनंजय बाहेर येतील. एकल एलिमिनेशन झाले तर घनश्याम
<<<
पब्लिक व्होटिंग प्रमाणे पाहिलं तर त्याला सूरज खालोखाल दुसरा नंबर आहे, अभिजीत पेक्षा सोशल मिडीया पॉप्युलॅरीटी जास्तं आहे त्याची पण बिबॉचे सांगता येत नाही, कन्टेन्ट बेसिस वर त्याला काढलं तर घरात काही फरक पडत नाही.
मी पण ती पुढारी सूरजची वहिनी शोधायची क्लिप पाहिली, जाम फनी.. Biggrin
हे का नाही टाकत मेन एपिसोड मधे ?
पुढारी सूरज एकत्रं खेळले असते तर पुढारीची पर्सनॅलिटी अजुन चमकली असती, पॉझिटिव् दिसला असता !

अरे बाबांनो नका बघू हा कार्यक्रम. फसवताहेत तुम्हाला सगळे मिळून. वाईट वाटतंय रे मला.

त्या सूरजला सोमिशर जवळजवळ विनर म्हणून घोषित केले आहे. >>> धन्य आहेत. हिंदीतला एम सी स्टान वाटतोय तो सर्वांना बहुतेक.
<<
एम्सी स्टॅन काहीही करायचा नाही, टास्क्स मधे बाजुला बसायचा, मॉर्निंग सॉंग्जना जांभयादेत बसायचा , सूरज तसा नाहीये.
त्याला पटकन समजत नाही , बोलण्यात इतरां सारखा शार्प नाही , स्ट्रॅटजीज करता येत नाहीत हे सगळं खरय पण त्याला अ‍ॅक्टिव्ह रहायचं असतं, सहभाग घ्यायचा असतो आणि जिंकायची भूक आहे त्यात !
मला आवडेल तो जिंकला तर, अख्या घरात तो एकटाच पॉझिटिव दिसतोय, खूप कठिण परीस्थीतून इथपर्यन्त आलाय, ऑरगॅनिक फॅन्स मिळवलेत !
बिबॉ आणि इतर पब्लिकने त्याला मनीबॅग घेऊन जायला कन्व्हिन्स करु नयेत म्हणजे झालं !

कॅप्टनसी टास्क छान झाला. टीम बीने जान्हवी आणि वैभवला आपल्यात धरलेलं नाही. कॅप्टनसी साठी त्यांनी जान्हवीला सपोर्ट केलं नाही.

मला पाहिजे त्याच ड्युटी मी करणार हा निक्कीचा हट्ट कॅप्टन्सनी चालवून घेता नये. यावर रितेश उद्या काही म्हणतो का बघू.

खरतर सगळ्यांनाच हाकलल पाहिजे. जिथे जीव तोडून भांडायला पाहिजे त्या कँप्टन्सी टास्कमध्ये ठरवून खेळतात.आणि कचरा करतात अख्ख्या टास्कचाआणि भांड्यासारख्या फालतू कारणांवरून भांडत बसतात आणि स्त:च निक्कीला फुटेज देतात..यांना अजूनही इम्युनिटीच महत्व कळलेल दिसत नाही.त्यासाठी मेघासारखेच लोक पाहिजेत.
त्या सूरजला जर आधीच ठरवल होत कँप्टन तर मग कशाला हा खटाटोप ,फक्त पावसात नाचण्यासाठी.
आता सुध्दा त्या सूरजला काही करता येत नव्हत, तो सगळ पँडी आणि अभिजितला येऊन सांगत होता.असा असतो का कँप्टन.
जान्हवी आवडत नाही,पण आज ती बोलली ते बरोबर होत,सूरज कुठल्याही अँगलने कँप्टन म्हणून योग्य नाही.

मी रिपीट तासभर बघितलं.

टीम बी ने जान्हवीला सपोर्ट केला नाही हे बरं झालं, सुरज झाला मला बरं वाटलं. निक्कीच्या हातात गेल्यावर ती जान्हवीला काढणारच होती ते बघितलं.

आर्या उगाचच वेगळ्या गोष्टीत लक्ष वेधून घेते, तिच्या लाडक्या वैभवनेच झापलं तिला भांडी बेडरूममध्ये बेड वर ठेवण्यावरून, ती नडते निक्कीला हे मात्र खरं, त्यामुळे फक्त जान्हवी नाही, ती ही मस्त विरोध करते निक्कीचा.

ओहह डिजे एम सी स्टॅन एकदमच gone case होता म्हणजे.

यावेळी कॅप्टन म्हणून सुरज उठून दिसला तर तो नक्की विनर होईल. गणपतीवर फार श्रद्धा आहे त्याची आणि फॅन्सना देव मानतो तो, त्याला बाहेर जायची भीती नाही वाटत, बहुतेक त्याला आपल्याला वोट्स नक्की मिळतील ह्याची खात्री आहे, असं असेल तर त्याने मनी बॅग घेऊ नये.

गॉन केस नाही अगदीच, फनी होता, एन्टरटेनिंग होता , त्याची टपोरी स्टाइल होती बोलण्याची जी पब्लिकला आवडायची पण शिव ठाकरे नसता तर याने कधीच गिव्हप केलं असतं !
या सगळ्यापेक्षा ह्युज प्लस म्हणजे प्रचंड फॅन फॉलॉइंग घेऊन आला होता, सगळ्या रॅपर कम्युनिटीने त्याला खूप सपोर्ट केला होता.
हिन्दीतला ऑडियन्स म्हणजे बेकार कल्ट जनता असते, आपला आवडता स्पर्धक कसाही खेळो, वेड्यासारखा सपोर्ट करतात !
हे स्टॅन, मुनव्वर लोक बिबॉच्या घराच्या आत जाण्याच्या आधीच ट्विटर वॉर्स ट्रेन्ड्स सुरु होतात , खूप पॉलिटिक्स आणि प्रेशर आणतात मेकर्सवर !

झाला एकदाचा सूरज कॅप्टन आणि कॅप्टन झाल्या झाल्या निकी आर्याचे भांड्याला भांडे लागणे सॉल्व्ह करणं काही जमेना त्याला Proud
आर्या कधीकधी फार धमाल करते, मस्तं नडते निकीला. आज रेनडान्स मधेही कसली भारी नाचली, कोणीच सपोर्ट नाही केलं तिला !
पॅडी आज पण आवफला, मस्तं सार्कॅस्टिक बोलत आडवा तिडवा करत होता पुढार्‍याला शाब्दिक माराने आणि नाचला पण कसला भारी !
अभिजीत ठरकी मोड मधे गेला निकीला भिजताना पाहून, वन्स मोअर करत होता येडा, काही केल्या आवडत नाही मला तो, एक वेळ निकी आवडेल !
जान्हवीने चांगलाच गेम अप केलाय, टास्क पण खेळली आणि रिअ‍ॅलिटी चेकही मिळाले, ना घर कि ना घाटकी.. ए बी कोणीच सपोर्ट नाही करणार तिला सहजासहजी !

कालचा पूर्ण बघितला एपिसोड नाही पण निक्कीला शिक्षा झाली. कॅप्टनशिप पदाची उमेदवारी नेहमीसाठी काढली आणि या आठवड्यात घरातील सगळी भांडी तिने एकटीने घासायची, तसे न केल्यास थेट नॉमिनेशन.

संग्राम चौघुले कोण ते माहीती नाही पण अरबाझ, वैभव टाईप आहे. आता वैभव किंवा अरबाझला घरचा रस्ता. अरबाझ गॅरेंटी घेऊन आला असेल तर वैभव जाईल.

निक्कीला जेलात न टाकता बाकी शिक्षा दिल्या, ते बरं झालं. जेलात आयतं खायला प्यायला मिळून फुटेजही मिळालं असतं.

पुढारी जाणार हे निश्चित होतं. अभिजीतच्या मुर्खपणामुळे एक आठवडा राहीला, पण शेवटी दोन आठवडे टास्क चांगला खेळला. शेवटी सुरजला गिफ्ट दिलं. त्याच्या ग्रुपला कौतुक करुन साईडलाईन केलं, मज्जा आली बघताना.

निक्कीला रितेशच्या ओरडण्याने काहीही फरक पडत नव्हता. शिक्षेमुळे फरक पडतो का ते पाहायचं. तिच्यापेक्षा अरबाझलाच जास्त त्रास होत होता.
रितेशने To treat as a door mat या वाक्रप्रचाराचा अर्थ त्याला सांगायला हवा होता. तरीही डोक्यात प्रकाश पडलाच असता असे नाही.

अरबाज जितका दिसतो चांगला तितकाच तो मूर्ख आहे . किती असंबद्ध स्पष्टीकरण देत होता रितेश बोलताना . नुसतं थोबाड चांगलं असून काय उपयोग ? डोक्यात कांदे बटाटे असले तर असल्या सो कॉल्ड देखण्या माणसाकडे कोणीच ढुंकून बघणार नाही . (बेअक्कल लोक बघतील अर्थात )

निक्की नक्कीच फिनाले किंवा तो विक एवढी गॅरंटी घेऊन आलेली असणार. तिला फरक पडत नाही, ती गेम कोळून प्यायली आहे, तिला तिचा रोल समजतो आणि ती तो निभावते.

लास्ट 5 मध्ये अंकिता आणि जान्हवी नक्की असतील.

सुरज छोट्या छोट्या गोष्टींत मन जिंकतो, गणपती बाप्पाचे (जेनेलिया वहिनीने पाठवलेले) मोदक सर्वांनी घेतले, पण गणपतीबाप्पाला नैवेद्य दाखवून खायचं फक्त एकट्या सुरजने केलं, रितेशलाही आनंद झाला हे बघून.

जान्हवीने टास्कमधले मोदक छान आणि पटापट केले.

सगळ्यांना मागच्या वर्षीचे त्यांच्या त्यांचा घरच्या गणपतीचे फोटो दाखवले.

आज आली का वाईल्ड कार्ड एन्ट्री?

निक्की ला काही फरक पडत नाही ला १००% अनुमोदन. अरबाज ला अक्कल येत नाही.. येणारपण नाही ला अनुमोदन.

दक्षिणा ची कमेंट वाचून कॉलेज मधले काही क्रश आठवले. दिसायला चांगले असल्याने जरा फॉलो केले गेले. पण त्यांनी बोलायला तोंड उघडल्या उघडल्या त्यांची लेव्हल कळून मोठ्ठा पोपट झाला.

इतक्या उशीरा संग्राम चौघुले वाइल्ड कार्ड कशाला आणलाय मि.इंडिया बॉडी बिल्डर ?
आधीच आणायला हवे होते त्याला जेंव्हा ए गृप एकत्रं होता आणि बी गृप कमकुवत होती , ए टिम माज करत होते .. इतक्या उशीरा संग्राम येणे म्हणजे सध्या बॉटमला असलेल्या अरबाझला आणि वैभवला महत्त्व देणे Uhoh
मुळात आता ए गृपला टफ फाइट द्यायला पैलवान वगैरे गरज आहे का खरच ?

बाकी निकीच्या शिक्षेला काही अर्थ नाही, भांडी घासली नाही तर काय ती म्हणे , तर नॉमिनेट होणार ! रिअली ? ती ऑलरेडी फिनालेत जायची एम्जी घेऊन आली आहे, कितीही वेळा नॉमिनेट करा, काय फरक पडेल तिला ? उलट आता ती अजुन राडा करणार, सिझनभर कॅप्टन होऊ शकत नाही म्हणजे बरेचदा तिला संचालन करायला मिळणार.. मजाच मज्जा तिची Proud

त्या संग्रामचे टॉप ५, तो घरी जायच्या आधीचे ते असे अभिजीत, निक्की, सुरज, अरबाज, जान्हवी.

हा आल्यावर अरबाजच्या जागी हा असेल.

कालचा भाग पूर्ण नाही पाहिला,त्या संग्रामची एंट्री तेवढी पाहिली.त्याने त्याच्या टॉप 5मध्ये सूरजला तिसरा नंबर दिला,निक्कीला दुसरा दिला,झाल,सोमिवर सूरज फँन्स खवळले.म्हणजे त्या सूरजला काही बोलायचच नाही.
संग्राम तर सरळसरळ"तुला निक्की आणि अरबाजला जाऊन भिडायच आहे" हा बिबॉसचा आदेश घेऊनच आला आहे.
क्लिपमध्ये पाहिल.पाण्यात ढकलून नॉमिनेट करायच आहे संग्रामला ,त्याने निक्कीच नाव घेतल ,तिने मेडिकल कंडिशन सांगून नकार दिला ,तर याने सरळ ढकलल..
आर्या तर लाजून पार गेलीच आहे.आता याच्या मागे लागणार.

सुरज दिसतो तितका भोळा नाहीये. त्याला सगळं कळतंय. सुरुवातीला भाषेची आणि मल्टिकॅमेरा सेटअपची अडचण असावी. पण आता तो आव आणतोय. काल घनश्यामने MF कॉइन दिला तेव्हाची त्याची प्रतिक्रिया सगळं बोलून गेली आणि जेव्हा नॉमिनेशन मधून सेफ झाला तेव्हाही त्याने अगदी नॉर्मल बिहेव केला. एकंदरीत त्याला दिलेला रोल तो व्यवस्थित निभावतोय. वर्षा आजीच्या काही जुन्या मुलाखती बघितल्या, तिथे त्या एवढ्या नाटकी बोलत नाहीत. इथे त्या एका रोल मध्ये आहेत असेच दिसते. जान्हवी, निक्की, अरबाज यांनाही भरपूर इनपुट्स मिळाले असतील, मिळत असतील. आपल्याला ते दाखवत नाहीत. धनंजय आणि पंढरीनाथ तर सरळ सरळ कॉमिक रोल मध्ये असल्याचे दाखवतात/ वागतात.

बाकी घनश्याम घराबाहेर गेला, संग्राम आला. तो काही विशेष करेल असे वाटत नाही. या वेळी धनंजय बाहेर जाऊ शकतो.

निक्की काम करताना जास्तच दाखवतील. त्यामुळे तिच्यावर फोकस असणारच आहे.

जय का मीरा आदिशच्या वेळी झालेले डायलॉगज परत दिसले प्रोमोत. निक्की संग्रामला म्हणते माझ्याआधी तू बाहेर जाशील.

परत निक्कीच केंद्रस्थानी असणार.निक्कीवरून फोकस हलणार नाही याची मेकर्स पूर्णपणे काळजी घेणार. निक्की त्यावरच तर आली असेल.एवढा हिंदी बिबॉस करून,जिथे पैसे कमी मिळतित अशा मराठी बिबॉसमध्ये ती उगाच का येईल.बर,तिला काय फार मराठी इंडस्ट्रीत करियर करायच नाही,त्यामुळे मराठी इंडस्ट्री काय बोलते,काय रिअँक्ट करते ,इव्हन मराठी प्रेक्षक काय रिअँक्ट करतात तिला काहीही फर पडत नाही.ती तिला दिलेल काम अगदी चोख पार पाडत आहे.
संग्रामला ठेवतील आणि अरबाजला काढतील अस वाटत आहे.
वर्षा,डीपी,आर्या, पँडी ,वैभव हे अनुक्रमे जातील अस वाटत आहे.

निकिचं तरी काम नाकारावं असं लाइफ थोडीच होतं इथे येण्या आधी !
करेल कि मराठीत काम निकी (मिळालं तर Wink ), जय दुधाने नाही का करतोय मराठी सिरीयल !
हिन्दीत तसेही काय करणार ती ? कोण आणि का काम देईल तिथे ?
बिबॉ झालं , खतरोंके खिलाडी झालं , पुढे काय ? झलक मिळेल फार तर किंवा अजुन एखाद्या बिबॉ सिझनला वाइल्ड कार्ड एन्ट्री !
मराठी सिरीयल मधे व्हॅम्प बनुच शकते निकी Proud

Pages