Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सलीम-जावेद या जोडीच्या
सलीम-जावेद या जोडीच्या कामगिरीवर "Angry Young Men" ही तीन भागांची सिरीज प्राइमवर आली आहे. त्याबद्दल गेले ५-६ दिवस प्रोमोज बघत होतो. पहिला भाग काल पाहिला. चांगला आहे. "जंजीर" च्या आधीचा काळ व त्यांचे स्ट्रगल दाखवले आहे. जंजीर पर्यंत येउन हा पहिला भाग थांबतो. आता पुढे बघायची उत्सुकता आहे.
या सिरीजच्या नावाचा फॉण्ट/स्टायलिंग दीवार्/डॉन च्या पोस्टर्सची आठवण करून देतात.
पहायला पाहिजे.
पहायला पाहिजे.
सलीम आणि जावेदची दहा वर्षांपूर्वीची मुलाखत गेल्या आठवड्यात बघत होतो. त्यात बराचसा माल मसाला आलेला आहे.
नेफ्लिवर बेबी रेनडीअर बघतेय.
नेफ्लिवर बेबी रेनडीअर बघतेय. मस्त आहे एकदम क्रिपी.. आवडलीये. लिमिटेड आहे. पटपट बघून होतात भाग.
ग्यारह ग्यारह ( ११:११ ) सिरीज
ग्यारह ग्यारह ( ११:११ ) सिरीज पाहिली. मजा आली पहायला. अगदी उत्कंठावर्धक वगैरे केली आहे. कलाकारांची कामं पण चांगली वाटली तशी. ही सिरीज 'सिग्नल' नावाच्या कोरिअन सिरीजवरून बेतलेली आहे. सिग्नल नेटफ्लिक्स वर संपूर्ण आहे. तर कदाचित ती पण बघेन आता. म्हणजे पुढे काय झालं ते तरी कळेल. शिवाय हे असं याच दोघांचं कम्युनिकेशन का होतंय यावर काही उजेड पडतोय का ते ही पहायचं आहेच.
@ आचार्य : रेकोसाठी धन्यवाद!
ही सिरीज 'सिग्नल' नावाच्या
ही सिरीज 'सिग्नल' नावाच्या कोरिअन सिरीजवरून बेतलेली आहे. >>> ओह ! यासाठी धन्यवाद.
मला किती दिवसांपासून बघायची
मला किती दिवसांपासून बघायची आहे बेबी रेनडिअर. रेडिओवर त्यातल्या कॉन्ट्रोवर्सी बद्दल आणि कालच पहिल्या ट्रान्स व्यक्तीला ट्रान्स कॅरेक्टर साठी एमी नॉमिनेशन मिळाल्यावर मुलाखत ऐकलेली.
थँक्स. बघतो.
काल जीओवर शेखर होम्स चालू
काल जीओवर शेखर होम्स चालू केली.
अतिशय सुमार . लहान मुलांच्या चित्रपटासारखे संवाद वाटले. पहिल्या भागातील रहस्य ही यथातथाच.
के के मेनन म्हातारा दिसतो. तरी आज दुसरा भाग बघणार .
Moriarty बद्दल उत्सुकता आहे मला आता.
आपला बोमकेश बक्षी मस्त होता.
एमिलीचा ह्या सीजन चा पहिला
एमिलीचा ह्या सीजन चा पहिला भाग संपवला. आता दुसरा भाग सप्टेंबर मध्ये येत आहे. एमिली सहसा निराश करत नाही, पण इतकी मजा नाही आली ह्यावेळी. सिल्वी फारच आवडते, पण ह्यावेळी काहीतरी मिसिंग वाटले तिच्यात. Luc मस्त आहे ह्यावेळी. Julian पण ओके ओके होता मागच्या तिन्ही भागात छान काम केले होते. पिएर नव्हता, तो हवा एक दोन सीन मध्ये तरी..
पहिला भाग पाहिला आहे बेबी
पहिला भाग पाहिला आहे बेबी रेनडिअरचा. पुढे पाहिलेली नाही. इतर सिरीज जास्त एंगेजिंग वाटल्या. वरती उल्लेख केलेली Those About to Die बघतोय. ती जबरी आहे. अमेरिकेत पीकॉकवर.
प्राइमवर अँग्री यंग मेन, अॅपल वर बॅड मंकी (अजून पाहिली नाही).
डेडली आत्या मागे पडत आहे या सगळ्याच्या नादात. परवा तिला एका एपिसोडमधे राक्षसी हास्य करताना पाहिले.
एमिली बघितली. तितकी मजा नाही
एमिली बघितली. तितकी मजा नाही आली, पण ठीक आहे.
मिंडी राहिली लंपन.
सिल्वी, लुक, मिंडी आणि थोडाफार ज्युलिअन यांच्यासाठीच बघतो मी. बाकी टायटल कॅरेक्टर आणि तिचे क्रशेश आपले तोंडी लावायला. सिल्वी आली की मजा येते.
एमिली बघितली. तितकी मजा नाही
एमिली बघितली. तितकी मजा नाही आली, पण ठीक आहे. >>> +१११. हातात फारसे सॉलिड काही लागले नाही तरी बघताना मजा येते हे खरं
मॅ स्करेड पार्टीतले आउटफिट्स आउटरेजस होते.
एमिली बघितली. तितकी मजा नाही
एमिली बघितली. तितकी मजा नाही आली, पण ठीक आहे. >>> +१११. हातात फारसे सॉलिड काही लागले नाही तरी बघताना एक किमान मजा येते हे खरं
मॅ स्करेड पार्टीतले आउटफिट्स आउटरेजस होते.
फ्रेंच होते! त्याच्याच
फ्रेंच होते!
त्याच्याच बापाच्या कंपनीत त्याच्याच बापावर फॅशन मधुन जोक भारी होता! 
बेबी रेनडिअर आवडली होती.
बेबी रेनडिअर आवडली होती.
एमिली पकड घेणारी नव्हती वाटली.
कधीकधी कपील शर्मा शो चा एखादा भाग थोडावेळ पाहिला जातो. काल https://youtu.be/XWCl9rh6DJ8?si=0CXV0QNA3O-vpcBj हा पहाताना, पाचव्या मिनिटाला सोनु १५-२० सेकंदच गायलाय. ते ऐकल्यावर सोनुच्या गाण्यावर कायम जीव ओवाळुन टाकावासा का वाटतो ते पुन्हा एकदा कळले. नंतर शो मधल्या दुसर्या पात्राने सुरांवर छान विनोद केले आहेत.
सुनिधी , हा एपिसोड आणि तू
सुनिधी , हा एपिसोड आणि तू सांगते आहेस तो पार्ट माझा आवडता आहे. किती सहज गायला आहे सोनू! काय फिरत आहे आवाजाला!! आत्ताच्या फारच मोजक्या गायकांमधे दिसतं हे. सध्याच्या गायकांना गायक का म्हणावं तेच कळत नाही खरंतर.
माझा पण आवडता आहे हा एपिसोड,
माझा पण आवडता आहे हा एपिसोड, फार सुदर गायलाय सोनु..कपिल स्वत:ही गाण्याची आवड असलेला आणी गातो पण चान्गला त्यामुळे असे एपिसोड फार रन्गतात..
प्राइमवर अॅन्ग्री यन्ग मॅन
प्राइमवर अॅन्ग्री यन्ग मॅन सिरिज बघितली सलिम-जावेद जोडगळीच्या राइटिन्ग जर्नी वर आहे ...बरच काही आधी माहित असलेलच आहे पण तरी जजिर्,शोले,दिवार च्या आठवणी, मेकिन्ग, सगळ्याच्या मुलाखती एन्गेजिन्ग आहेत...दोघामधेही वयोमानाने एक हळवेपणा आलाय अस जाणवत...जावेद अख्तर याच्यात जास्त!!
तरुणपणीचे सलिम खान थेट अरबाज सारखे दिसतात तर फरहान मधेही जावेद अख्तरची झलक दिसते..बाकी हनि इराणी सगळ्यात जास्त दुखावलेली असल्याने तिच्या बोलण्यात ते येत..पण बरच मेलो होवुन
बच्चन च्या बाबतित ही डेस्टीनी चोझ हिम अॅन्ड ही पुल्ड द मॅजीक ह्याचा वारवार प्रत्यय येतो..
काल जीओवर शेखर होम्स चालू
काल जीओवर शेखर होम्स चालू केली. अतिशय सुमार .
बहुतेक नीट पाहीली नाही तुम्ही. सर्व भाग पहा मग समजेल. शेवटच्या भागातला धक्का अनपेक्शित
त्यावेळी चालू केलेली पहायला.
त्यावेळी चालू केलेली पहायला. आज शेवटचे दोन भाग बघून संपवली. मैत्रिणीला लगेच मेसेज पाठवला शेवटचे दोन भाग बघ. सुरुवातीचे नाही बघितले तरी चालतील. Moriarty आल्यावर जरा रस येतो , शेवटचा धक्का अनपेक्षित.
पण बाकी पूर्ण सीरीज "ठीकेय " वाटली.
शेखर होमचे पहिले दोन एपिसोड्स
शेखर होमचे पहिले दोन एपिसोड्स ठीक आहेत. त्यानंतर ते खूपच बोअरिंग होतं. स्किप करा. सगळा वेळ वाया घालवण्यासारखा आहे. कुणीही हे पाहू नये. खूपच वाईट. KK कडून असं कधीच अपेक्षित नव्हतं.
ग्यारह ग्यारह पाहिलं. काहीही
ग्यारह ग्यारह पाहिलं. काहीही आहे.स्पॉयलर देत नाही पण काहीही आहे.
हल्ली टाईम ट्रॅव्हल किंवा टाईम लूप ची फोडणी मारून लोकांना काहीही वाढता येतं हे कळलं.(टाईम लूप चा छळ अलरेडी त्या सिनेमाभर पांढरा क्रॉप टॉप आणि जीन्स घातलेल्या ज्युनिअर सोकु ने विकी वेलींगकर मध्ये करून झाला होता.तरी मला अक्कल आली नाही.)
रमड आणि प्राजक्ता, तुम्हालाही
रमड आणि प्राजक्ता, तुम्हालाही सोनुचे गायन आवडले वाचुन छान वाटलं. कधीकधी अचानक अशा छोट्या गोष्टी मिळुन जातात एखादा भाग पहाताना.
(No subject)
Emily in Paris
Emily in Paris @Netflix
कोण कौतुक करत होते ते इकडे या आधी. तुमच्यामुळे बघितली.
काहीही विशेष घडत नाही आणि न घडलेले पुन्हा पुन्हा होत रहाते. पॅरिस एक रोमॅन्टिक शहर आहे. येथे ड्रायव्हर, कंडक्टर, वेटर, शेफ सहित सगळेच कायम फ्लर्टेशियस असतात. कामाचे उगा अधुनमधून बोलतात. बहुतेक स्त्रियांना ते आवडते, त्याही प्रोत्साहन देतात, जमेल तशी भर घालतात. 'वॅम बॅम थॅन्क्यू मॅम ऑर सर व्हॉटेव्हर' हा या रोमान्सचा आधार आहे.
एकुणएक पुरुष देखणा आहे, ट्रेनमधे बॅग उचलणारा सुद्धा. गॅब्रियल सारखा मित्र एखादी मुलगी लॉकर मधे ठेवेल तर कमील त्याला एमिली सोबत रहायला भाग पाडत होती.
Anton तरूण कबीर बेदी सारखा वाटला. ॲल्फी आणि गेब्रिएल मधे दोघांपैकी एकाला निवडणे म्हणजे चॉकलेट क्रूसॉं व रेग्युलर क्रूसॉं मधे निवडण्यासारखे होते असे एमिली सोशल मीडिया वर म्हणाली.
अवघड मात्र होते खरे..!
प्रत्येकजण या स्वप्नाळू आणि भाबड्या एमिलीवर भाळते. कॅमरेन डियाझचा There is something about Mary आठवला. अडचणी तोंडी लावण्यापुरत्या येतात तरी तिची प्रत्येक आयडिया हिट होते, प्रत्येक जण प्रभावित होतो. पुढेपुढे तर 'दिसली एमिली- झाले प्रभावित' इतके सोयीचे वाटले.
सिल्वीचे व मिंडीचे काम आवडले पण मिंडीच्या गाण्यांचा कंटाळा यायला लागला. 'हम साथ साथ है' मधल्या गाण्यांइतकीच वारंवार येऊ लागली. सतत ब्रेक अप आणि पॅच अप , शिवाय अधुनमधून पॉलिगॉमस. व्हिज्युअली अपिलींग आहे..झाले. रिक्त मालिका आहे. कामं वाईट नाहीत पण कथानकच सशक्त नाही. कपडे आणि फॅशन तर 'सेक्स ॲन्ड द सिटी' मधे यापेक्षा चांगली होती व कंटेटही धमाल होता. ही विनोदी न वाटता हलकीफुलकी वाटली.
प्राईम वर उर्फी जावेदची
प्राईम वर उर्फी जावेदची डॉक्युमेंटरी पाहिली.टाईमपास आहे.थोडी दया पण आली तिची.सगळीकडे असुरक्षितता, लहानपणी आईबाप सेपरेशन, घरातून पळून जाणे, 24 व्या वर्षी फाईन लाईन्स दिसतात असं समजून बोटोक्स करणे,ब्रेस्ट अपलिफ्ट करायला घेणे वगैरे.डॅमेजड चाइल्डहूड.
पण मुलगी सॉरटेड आहे, स्वतःची लेव्हल,शॉक व्हॅल्यू ची किंमत आणि झेप आणि पैश्यांची गरज एकदम ओळखून आहे.
ड्रेस म्हणून मोठा पाव घालणे, नूडल्स च्या कंपनी साठी ड्रेस वर नूडल्स आणि मोमो चे खरे बाउल चिकटवून त्यातून खाणं वगैरे कॉमेडी प्रकार आहेत.डोक्याला ताप नाही
फ्रेंच आणि अमेरिकन आणि एल्फी
फ्रेंच आणि अमेरिकन आणि एल्फी आल्यावर थोडे ब्रिटिश स्टिरिओटाईप्स आणि त्यावरचे जोक्स हा माझ्यासाठी सेलिंग पॉईंट होता. एल्फी कायम तिला 'कूपर'(... रादर 'कूपss) म्हणतो. एकदाही एमिली म्हणत नाही आणि मला जाम हसू येतं.
सारखे एकाच व्यक्तीं बरोबर ब्रेकप आणि एकत्र येणे बघितल्यावर मला टायटॅनिक आठवलेला. अरे किती वेळा त्याच त्याच पाण्यात जाणारेस वेगवेगळ्या व्यक्तींना वाचवायला. एकदाच काय ते ठरव आणि मरुन जा! तर ते असो... स्टोरी कशाला बघायची? एकदोन रात्रींत उडवायचे एपिसोड की झालं.
सिल्वी - लूक - ज्युलिअन आणि मिंडीच्या जोक्सना किंवा वागण्याला जोक समजुन हसायचं. बास.
बायदवे इट्स ख्वॉसा ... यू अमेरिकन्स! :आयरोल:
Bonjour, Bonjour ! रामरामच्या
Bonjour, Bonjour ! 'रामराम'च्या चालीत वाचा.
स्टोरी कशाला बघायची?

>>> होतीच कुठे कथा? प्रयत्ने सिझन्सचे सीन रगडिता स्टोरीही गळे
हो, कूपS गोड होते. एल्फीच प्रामाणिक वाटला. गेब्रिएल 'टू टायमर' होता सुरवातीपासूनच.
ख्वॉसा >>> oui
दिसली एमिली- झाले प्रभावित >>
दिसली एमिली- झाले प्रभावित >>>
मी ४-५ एपिसोड्स बघितले आहेत. मला कंटाळा आला नंतर.
इंडियन एअरलाइन्सच्या IC ८१४
इंडियन एअरलाइन्सच्या IC ८१४ च्या अपहरणावर आधारित नेटफ्लिक्सवर आलेली सीरीज पाहितेय. इथे कोणी बघतेय का ?
ही घटना घडली तेव्हा मी शाळेत होते . फारसे काही आठवत नाही आहे . नवीन लग्न झालेल्या जोडप्यापैकी एकाला मारून टाकले या बातमीला ठळक प्रसिद्धी मिळाल्याचे आठवते आहे
तत्कालीन सरकारची , नोकरशाहीची उदासीनता , वेळकाढूपणा हे गंभीर दोष प्रकर्षाने जाणवतत् . पंतप्रधानांदेखील वेळीच योग्य ब्रीफ केले गेले नव्हते असे दिसते . घोळ घालण्याचा फटका अमृतसरवरून अपहृत विमान जबरदस्तीचे टेक ऑफ घेण्यात झाला आणि पुढचे महाभारत घडले . एकदंरीतच अजित डोवाल यांच्या म्हणण्यानुसार ही घटना म्हणजे भारतसाठी diplomatic failure च होते .
आम्ही बघतोय आता.खूप मोठे
आम्ही बघतोय आता.खूप मोठे कलाकार असल्याने गोंधळ आहे जरा, नक्की कोण कोण आहे यावर.
विजय वर्मा, आणि एअरहोस्टेस चं काम उत्तम.
Pages