Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
वाह वाह
वाह वाह
काय भारी जिलेबी आहे.
तोंपासू इमोजी आहे इथे
>>>>>बारीक कुरकुरीत
>>>>>बारीक कुरकुरीत जिलब्यांची एक मजा असते तर जाडजूड तोंडात विरघळणाऱ्याची एक मजा असते.
मला दोन्ही आवडतात.
हाहाहा
अरेच्च्या ताक का? मग कदाचित दिल्लीत लस्सी व जिलबी मिळत असेल, दूध नसेल. मला आठवत नाही. कोणीतरी म्हटलेले पण दूध का लस्सी आठवत नाहीये.
गरम दूध + जलेबी उत्तरेतील,
गरम दूध + जलेबी उत्तरेतील, विशेषतः दिल्ली-हरियाणा-राजस्थान भागातील फेमस हिवाळी न्याहारी. दुधात साखर नाही टाकत, जिलबीत भरपूर असते म्हणून.
पूर्वांचली - उत्तर प्रदेशी दही-जलेबी का नाश्ता करतात, बारोमास.
मस्त आहे जिलेबी.
मस्त आहे जिलेबी.
एवढा पूर येऊन गेला तरी इकडे भजी कशी नाय आली.
आमच्यावेळच पुणं राहीलं नाही.
ऋ तुम्ही तरी आणायचेत खमंग पदार्थ.
कांदा भजी. अजून काय भेळ.
राडा चिवडा.. काहीही
काय मस्त जिलेबी आहे !
काय मस्त जिलेबी आहे !
आहा! काय जिलेबी आहे.
आहा! काय जिलेबी आहे.
मला पाहिजे आत्ताच्या आत्ता.
गरम दूध + जलेबी >>> +१ .
गरम दूध + जलेबी >>> +१ . दुधाबरोबर नाही पण गरमागरम जिलबी मी खाल्ली आहे बिकानेरवाल्याकडे. अ प्र ति म लागते.
हा वरचा फोटो कातिल आहे. स्क्रीनवरून उचलून घ्याव्याश्या वाटतायत जिलब्या
जिलेबी मस्तच दिसतेय.
जिलेबी मस्तच दिसतेय.
कुरकुरीत आणि जाडसर , मऊ दोन्ही चवी वेगळ्या आहेत, दोन्ही आवडतात. पण जास्त दुसरी म्हंजे जाड आणि मऊसर आवडते. ही आपली मराठी लग्न कार्यातली जिलबी.
>>>>>>>>>>>>कुरकुरीत आणि
>>>>>>>>>>>>कुरकुरीत आणि जाडसर , मऊ दोन्ही चवी वेगळ्या आहेत
असं आहे होय मला वाटे बिघडली की जाडी होते.
अरे वा, कुरकुरीत व्हर्सेस
अरे वा, कुरकुरीत व्हर्सेस जाडजूड ! दोन्हींचे फॅन्स दिसतात इथे. सुदैवाने जिलबीच्या स्पेक्सबद्दल आमच्या घरात दुर्मिळ असे एकमत आहे
रच्याकने, गुजरात + मुंबईतील काही भागात तेलातच जिलबी करतात, जास्त वेळ कुरकुरीत राहावी म्हणून. त्या जिलब्या चमकदार दिसतात दुरूनच. त्याला एक विचित्र वास असतो जो नाही आवडत. जिलबी शुद्ध तुपातलीच हवी. मूंछे हो तो नत्थुलाल जैसी वरना ना हो
काही पंचतारांकित हाटेलवाले ऑलिव्ह ऑइल मध्ये जिलब्या तळतात, मी एखादा राजा वगैरे असतो तर या गुन्ह्यासाठी त्यांना ५० फटक्यांची शिक्षा दिली असती.
तुपातल्या जिलब्या जरा गार झाल्या की त्यांना एक ओशट वास आणि गिळगिळीत टेक्सचर लाभते. डिट्टो फॉर जाड जिलब्या. स्ट्रॉंग डिसलाईक !
जिलब्या तोंपासू! मला अशाच
जिलब्या तोंपासू! मला अशाच आवडतात कुरकुरीत!मी collegeमध्ये असताना खूप डोकं दुःखाचं बरेच डॉ री उपाय करून झाले. मग कोणीतरी सुचवलं पहाटे अनेश्या पोटी शिळी जिलबी व दूध प्यायचे. जवळपास पंधरा दिवस नेटाने आईने दिले होते. डोके दुखायचे थांबले. वरचे combination वाचून आठवले.
तोपासु जिलेबी!
तोपासु जिलेबी!
कुरकुरित,निट गोड आणी गरम सुरेख लागते...मधे इथे एका स्विट वाल्याकडे गुळाची जिलेबी होती...मस्त लागत होती.
दोन्ही आवडतात. पण जास्त दुसरी
दोन्ही आवडतात. पण जास्त दुसरी म्हंजे जाड आणि मऊसर आवडते
>>>>
+786
मलाही दोन्ही आवडतात पण मऊ जाड जास्त आवडते. ती गोड मिठाई सारखी वाटते. कुरकुरीत जिलेबी स्नॅक्स सारखी वाटते
कधी जिलेबी ना कुरकुरीत ना नरम अशी मधल्यामध्ये असेल तर मी ओवन मध्ये किंचित गरम करून खातो.
ताकात सुद्धा नरम जिलेबी बुडवायला आवडते.
ढोकळ्याचा चुरा आणि जिलेबी मिक्स करून वरून बारीक शेव आणि कोथिंबीर टाकून सुद्धा छान लागते.
खव्याच्या जिलबीची आठवण आली !
खव्याच्या जिलबीची आठवण आली !
काय कल्ला आहेत जिलब्या! मला
काय कल्ला आहेत जिलब्या! मला प्र चं ड आवडतात गरम जिलब्या. अनेक आठवणी आहेत गरम जिलबी खाल्याच्या. त्यातल्या दोन खूप आवडत्या - कॉलेज मधे असताना एका लग्नाला घरीच आचारी बोलावला होता तेव्हा ताई सोबत पैज लावून आठ द्रोण उडवले होते जिलबीचे
आणि नंतर जेव्हा मुलगी थोडी चार वर्षांची झाली तेव्हा तिच्या ग्राउंड समोरच एक जिलेबी वाला होता तिथे तिने आग्रह केला म्हणून तिच्यासोबत जिलबी खाल्ली! माझं मन पाकात इतकं भिजले होते की लेक आपल्यासारखीच निघाली! मग आमचा स्पेशल अचीव्हमेंट साठी तिथे जाण्याचा सिलसिला सुरूच झाला. 
>>>>>>>.मग आमचा स्पेशल
>>>>>>>.मग आमचा स्पेशल अचीव्हमेंट साठी तिथे जाण्याचा सिलसिला सुरूच झाला. Happy
मस्त मस्त!
आज भरपूर पाऊस असल्या मुळे
आज भरपूर पाऊस असल्या मुळे घरीच पार्टी केली

वडापाव, मूग डाळ, फोडणीचा भात आणि मुगाचा डोसा.
वेज मिसो रामेन
वेज मिसो रामेन
वॉव रामेन.
वॉव रामेन.
जिलेबी मला मुळीच आवडत नाही कुरकुरीत असो वा मऊ. सो वरच्या चर्चेत सामिल नाही होऊ शकत.
@ऋन्मेश जिलेबी फाफडा दोन्ही डीप फ्राय, सलग १०-१५ दिवस खाता. गॉड ब्लेस्स यु.
मूगडाळ कचोरी बनवायची खूप
मूगडाळ कचोरी बनवायची खूप इच्छा होत आहे. ईथे शोधून बघते कृती धागा.
(No subject)
मेदू वडा - आजचा ब्रेकफास्ट
मेदू वडा - आजचा ब्रेकफास्ट होता. Aashu29 तुमच्या फोटोतला सांबार रंग एकदम झकास आहे.
वेज मिसो रामेन -
Tempting दिसतात, रंगीबेरंगी. हार्ट हार्ट.
फुल्ल नॉर्दी ब्रंच. क्यालरीज
फुल्ल नॉर्दी ब्रंच. क्यालरीज गेल्या खड्ड्यात (आय मीन पोटात)
रस्सा आलू आणि पुरी !
वाह पावसाळ्यात असे काहीतरी
वाह पावसाळ्यात असे काहीतरी चमचमीत हवेच वाटते.
मस्त अनिंद्य!
मस्त अनिंद्य!

खरेच, पावसाळ्यात गरम पुर्या- बटाटा रस्सा याची मजा काही औरच. डाएट गेले खड्ड्यात! तसेही वजन कमी होत नाही आणि असेही.....!!
आहाहा! पुरीभाजी!! एकदम
आहाहा! पुरीभाजी!! एकदम उत्तरेकडे नेलंत राव
बायदवे, म्हाळसा येत नाही का इथे हल्ली? बरेच दिवस झाले तिने केलेले डबे नाही दिसले या धाग्यावर.
योगायोगाने झब्बू.
योगायोगाने झब्बू.
OTF साबुदाणा खिचडी !
OTF साबुदाणा खिचडी !
या पदार्थाला मनात मानाचे स्थान आहे. Calories, fats, dietary plan वगैरे सर्व बाजूला ठेऊन अधून-मधून घडतोच. उपास वगैरे करत नाही, हे जस्ट celebratory ब्रंच.
मन आनंद आनंद छायो
अ-निं-द्य कुठे फेडाल हे पाप?
अ-निं-द्य कुठे फेडाल हे पाप? काय रंग आहे. ख-मं-ग!!!
छान फोटो येतात इथे
छान फोटो येतात इथे
आजच शनिवार उपास असल्याणे सा खि खाल्ली असल्याने वरचा फोटो पाहून त्रास नाही झाला
Pages