Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Comfort food . .
दोन Comfort food
सारभात मासे आणि आंबे...
आणि माझगाव, मुंबई स्पेशल आईसक्रीम
.
.
अहा,ती कुल्फी बघून जीव जळला.
अहा,ती कुल्फी बघून जीव जळला.
Wow कसाटा.
Wow कसाटा.
रमा ह्याला rainbow icecream म्हणेल
आईस्क्रीम फार भारी. पिझ्झा,
आईस्क्रीम फार भारी. पिझ्झा, इडली सर्वच छान..!
बेगल, ग्वाकामोले, सावरक्रीम आणि ऑम्लेट.




माबोवरचीच झटका चटणी -
आमच्याकडे वर्षभर शेंगदाण्याची चटणी होते, तिचा कंटाळा आल्याने हिचा धडाका सुरु केला आहे.
बटर चिकन आणि मटर पनीर.
मी दोन-तीन नॉन व्हेज पदार्थ शिकले आहे, त्यामुळे मुलांना करता येते आणि एकच ग्रेव्ही करून स्वतः ला पनीर करते.
कोबी हेटर्स क्लबवर स्वाती२ यांनी दिलेल्या कृतीवरून कोबीच्या वड्या ज्या काही तरी होऊन कटलेट झाल्या.
पास्ता, बटाटे.

मेथीचे पराठे, कोशिंबीर, बटाटा भाजी आणि हळदीचं लोणचं -


शबरीचा पराठा झालाय.
अस्मिता शेवटचं ताट मला.
अस्मिता शेवटचं ताट मला.
हे उष्टं आहे, मी छान, ताजं
हे उष्टं आहे, मी छान, ताजं करून देईन तुला किट्टू
अस्मिता तू फारच कॉम्प्लेक्स
अस्मिता तू फारच कॉम्प्लेक्स देतेस बाई….
तो बेगल विशेष आवडला. कोशिंबिरीचं टेक्स्चरही कसं मस्त आहे. मागे कधीतरी डोनर कबाब खाल्ले होते. त्यासोबत त्यांनी या टेक्स्चरचं दही (बहुतेक ग्रीक योगर्ट असावं) दिलं होतं. त्याचीच आठवण आली एकदम…
अस्मिता , मस्त रंगीबेरंगी
अस्मिता , मस्त रंगीबेरंगी आहेत मेनू !! पास्ता बरोबरचे बटाटे रोस्ट केलेत का ? पराठ्याबरोबरची कोशिंबीर माझी all time favourite !!! मस्त दिसतेय .
ऋन्मेष ची ice cream पार्टी पण छान !! फोटोमधून थोडे घेता आले असते तर .....
ते रेनबो आईस्किम काय मस्तय..
ते रेनबो आईस्किम काय मस्तय...अस्मिताची खाद्यजत्रा तोपासु
खाना खजाना
खाना खजाना
हो, उकडलेले बटाटे परतून घेतले
हो, उकडलेले बटाटे परतून घेतले आहेत अश्विनी.
माझेमन, हे गोपी ब्रॅंडचे देशी दही आहे. बेगल घराजवळच्या बेकरीचे आहे. हा बेगलचा नाश्ता सध्या फार आवडतोय- हेव्ही होतो आणि दिवसभर भूक लागत नाही.
थॅंक्स सर्वांना
रेनबो आईसक्रीम छान नाव..
रेनबो आईसक्रीम छान नाव..
कोबीच्या वड्या माझ्याही फार आवडीच्या.. अळूवड्या, कोथींबीर वड्या इतक्याच.. भाज्या खात नसल्याने हे प्रकार शाळेत असताना डब्यात असायचेच.
Wow मस्तच फोटो!
Wow मस्तच फोटो!
Pizza yummy खरपूस दिसतोय. रेसीपी प्लीज
ऋ - सार भात, तुकडी मस्त दिसतेय. Ice-cream baghun खल्लास.
अस्मिता - तुमचे food photo dump amazing असतात. कोबीच्या वड्या, चटणी मी घेते
अस्मिता सगळे पदार्थ एकदम मस्त
अस्मिता सगळे पदार्थ एकदम मस्त..
@मनमोहन>>> मॉडर्नचा पिझ्झा
@मनमोहन>>> मॉडर्नचा पिझ्झा बेस विकत आणला. सॉस हेब्बर रेसिपीत ३ बदल करून केले. बंगलोरी/देशी टमेटो वापरले. ते जास्त आंबट असतात. नुसते चॉप्ड टमेटो वापरायच्या ऐवजी मोठ्या फोडी रोस्ट करून घेतल्या, तुकडे करून सॉसमध्ये घातले. सुकवलेले थाईम, रोझमेरी घरात होते म्हणून घातले. बेस पाणी स्प्रिंकल करून किंचीत ओला केला. वर सॉस लावून रंगीत भोपळी मिरच्या, मश्रुम, झुकिनीच्या पातळ स्लाईस, पांढरा कांदा (होता म्हणून), टमेटो, स्वीट कॉर्नचा लेअर करून श्रेडेड मोझरेला चीज पसरवले. थोडे ऑऑ शिंपडले. ओटीजीमध्ये २२० सेंटी. ला १२-१४ मिनीट (चीज सोनेरी होईपर्यंत) पिझ्झा मोडवर बेक केले. वरून प्रत्येकाला हवे तसे ऑरेगानो व चिली फ्लेक्स शिवरले.
अस्मिता,छानच ग!
अस्मिता,छानच ग!
एवढं टाईप केलेलं गेलं.
एवढं टाईप केलेलं गेलं.
ऋ चं पान मस्त आहे. ( माशांचा तुकडा कुठला मासा आहे?) आणि हे आईस्क्रीम कुठे मिळतं? कसलं खतरनाक दिसतंय.
अस्मे तुला हातचं जोडले. काय एकेक पदार्थ!!
माझे मन पिझ्झा मस्त दिसतोय.
माझे मन पिझ्झा मस्त दिसतोय. आणि मागच्या पानावर वरचे बाकी चे पदार्थ पण मस्त आहेत. इडल्या, डोसे डाळीचे वडे आणि अजून एक पिझ्झा.
सगळ्यांचेच पदार्थ तोंपासू.
सगळ्यांचेच पदार्थ तोंपासू. आईस्क्रीम खाल्लं नाही कुठे मिळतं? चटणीची रेसिपी? मी केलेल्या चटणीचा लाल रंग येतं नाही .
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/60726


मंजूताई, झटका चटणीची कृती. लाल मिरच्या आणि तिखट दोन्ही घालून करते.
मनमोहन, हो. मी एकदमच बरेच फोटो टाकते.
थॅंक्स सर्वांना.
अमुपरी,
मेथीचे पराठे/ ठेपले-
बारीक चिरलेली मेथी, कणीक, बेसन( दोन तीन चमचे), तीळ, ओवा, जिरे, तिखट, मीठ, पाव वाटी तेल, दोन तीन चमचे दही, चमचाभर गूळ ऐच्छिक. थोडं पाणी घालून तिंबून अर्धा तास भिजवून लाटून पुन्हा तेल लावून भाजून घ्यावे. तेल भरपूर असल्याने ते असे तुकतुकीत दिसतात.
अस्मिता कमाल पदार्थ आहेत.
अस्मिता कमाल पदार्थ आहेत.
सगळे veg पदार्थ इकडे पाठवून दे
धन्यवाद अस्मिता..
धन्यवाद अस्मिता..
अस्मिता, धन्यवाद! सगळं
अस्मिता, धन्यवाद! सगळं साहित्य आहे घरात करून पाहीन. मेथीचे ठेपले असेच करते पण तेल कमी लावते.
शबरीचा पराठा
शबरीचा पराठा
आज संडे स्पेशल - होम मेड
आज संडे स्पेशल - होम मेड बटाटे वडे, हिरव्या मिरच्या संगट
महाराष्ट्रीय नाश्ता.
छान दिसत आहेत बटाटेवडे..
आमच्याकडे मुद्दाम कमी आणि शिल्लक बटाट्याची भाजी संपवायला जास्त वेळ होतात
आणि हा आमचा महाराष्ट्रीय नाश्ता.
पोहे उपमा खिचडी
आज हा फोटो स्टेटस ला लावताच एका दोघानी विचारले की हे पोहे उपमा पदार्थ तुम्ही बाहेरून का मागवता, घरी नाही का करत..
पण मुंबईला माझ्या माहेरी गेलो की बरेचदा नाश्ता बाहेरूनच असतो. कारण पहाटेपर्यंत आम्ही तीन भूते जागे असतो. पण माझी आई झोपलेली असते. तेव्हा पहाटे चहा पिऊन मॉर्निंग वॉकला डोंगरावर जातो. परत येताना काहीतरी घेऊन येतो.
तसेही हॉस्टेल लाईफ यावरच निघाली आहे
Mexican panini (राजू सँडविच)
Mexican panini (राजू सँडविच) आणि
Gooey pastry (210 Degrees)
छान.
छान.
म्हाळसादेवींनी सुद्धा एंट्री घ्यायला हवी आता.
काय फोटो आहेत एकसे बढकर एक
काय फोटो आहेत एकसे बढकर एक
अस्मिताच्या शेजारी घराच्या किमती वाढल्या असतील फोटो बघून

तिथे जेवण करून नारायण नारायण म्हणत अंतर्धान होउन ऋन्मेषकडे ते आइस्क्रीम खायला प्रकट व्हावे
पेरी पेरी चिकन
पेरी पेरी चिकन


कोबी हेटर क्लबवर दिलेले सॅलड
Pages