क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी हे पाहिले नाही पण स्कोअर कार्ड बघून वाटले की यशस्वी शतक व्हायला हवे होते. गिल ने मदत करायला हवी होती. कारण रनरेटचा सीन नव्हता.
बाकी गिल स्वार्थी खेळाडू वाटतो मला.
तो पुढे मागे कप्तान न झाला तर बरे...
शर्मा खरेच 2027 पर्यंत फॉर्म आणि फिटनेस वर टिकला पाहिजे..

Jasprit Bumrah

In Test, Under
Rohit's Captaincy - 13.80 Avg, 2.98 Eco
Others Captaincy - 23.09 Avg, 2.70 Eco

In ODI, Under
Rohit's Captaincy - 17.76 Avg, 4.26 Eco
Others Captaincy - 26.21 Avg, 4.71 Eco

In T20I, Under
Rohit's Captaincy - 14.57 Avg, 5.68 Eco
Others Captaincy - 19.04 Avg, 6.49 Eco

No one can use Jasprit bumrah better than Rohit Sharma

असाम्या, एखादी एमएलसीची मॅच स्टेडियममधे जाऊन पाहिलीस का नाही? टीव्ही कॉमेंटेटर्समधे गावसकर, बिशप, अक्रम वगैरे मंडळी आहेत.

सूर्या कप्तान होणे हे मजेशीर आहे.
आता मुंबई इंडियन्स मधून शर्मा बाहेर पडला तरी तिच्यात भारताचा 20-20 कर्णधार सूर्या असणार.. आणि पुन्हा तशीच सिच्युएशन निर्माण होणार.
पुन्हा एक भारतीय कप्तान आयपीएल मध्ये कप्तान नसणार.
जर मी भारताचा कप्तान होऊ शकतो तर आयपीएल संघाचा का नाही हा विचार आता सूर्या सुद्धा करणारच. सूर्या हार्दिक इगो क्लॅश होणार..

ते आपसूक होते. हा मानवी स्वभाव आहे. नॉर्मल वागणे सोपे नसते अश्या सिच्युएशनमध्ये. सारेच सचिन द्रविड सारखे महान आत्मे नसतात ज्याना कधी धोनीच्या कप्तानीत खेळताना अडचण आली नाही..

आणि आता सूर्या पांड्या बुमराह शर्मा किशन या सर्वाँना एकत्र अडवणे शक्य नाही.. सगळे लिलावात मोठी रक्कम मिळवतील असे आहेत.

हार्दिकने आता कॅप्टन्सीच्या मागे न लागता त्याचा खेळ इतका उंचवावा की प्रत्येक कॅप्टनला तो त्याच्या संघात हवा असेल Happy

बाकी सुर्या, बुमराह, पंत वगैरे पुढचा मोठा कॅप्टन तयार होईपर्यंतचे फिलर असू शकतात!!
गिल परवाच्या मॅचनंतर मनातून उतरलाय. बाकी इतर पर्यायांमध्ये कुणी दूरदूरपर्यंत दिसत नाहिये त्यामुळे कॅप्टन्सीच्या बाबतीत भारताचा नेक्स्ट कपिल, धोनी, रोहित (आपापल्या आवडीप्रमाणे घ्या Wink ) कोण असेल हे आत्ताच सांगता येणार नाही Happy

एखादी एमएलसीची मॅच स्टेडियममधे जाऊन पाहिलीस का नाही? >> नाही रे .. एव्हढ्या गरमी मधे बसायची हिम्मत होत नाही.

अभिषेक नि गायकवाड ला दोन्ही मधल्या एकाही संघात जागा मिळू नये ह्याचे आश्चर्य वाटले.

गिल परवाच्या मॅचनंतर मनातून उतरलाय. बाकी इतर पर्यायांमध्ये कुणी दूरदूरपर्यंत दिसत नाहिये >> +१ पण तो तरूण आहे नि पॉम्स च्या सिरीजमधे तो क्विक स्टडी आहे हे दिसलय तेंव्हा थोडा वेळ द्यायला हरकत नसावी. फिटनेस चे कारण दाखवून पांड्याला न घेणे ह्या लॉजिकने बुमराला जेव्हढे रेस्ट केले जाते ते बघता तोही लिस्ट मधून गायब झाला.

ते आपसूक होते. हा मानवी स्वभाव आहे. नॉर्मल वागणे सोपे नसते अश्या सिच्युएशनमध्ये. >> पांड्ञाने गुजराथमधूनन कप्तान म्हणून सोडून मुंबईमधे येताना कप्तानपदाची आशा धरली तर ते स्वार्थीपणाचे लक्षण असते पण इतर जणांसाठी नॉर्मल मानवी स्वभाव वगैरे असतो.

रस्त्यात पडलेले पैसे दिसले की ते उचलून खिश्यात टाकायचा मोह होणे नॉर्मल आहे.
ते कोणाचे आहे हे समजल्यावर सुद्धा तो मोह कायम राहणे हे चूक आहे.
पुढे जाऊन ते चोरणे हा अपराध आहे.

कप्तानपदाची आशा धरणे नॉर्मल आहे. म्हणजे मनात ती लालसा असणे नॉर्मल आहे. पण त्यानंतर आपण कोणाला रिप्लेस करायला जात आहोत याचा सारासार विचार करून योग्य निर्णय घेणे गरजेचे नव्हते का. मुंबईला पाच वेळा ट्रॉफी जिंकवून देणारा आणि भारताचा कप्तान ज्याने २०२३ वन डे वर्ल्डकप सुद्धा दमदार कामगिरी केली होती असा एक लिजंड खेळाडू आणि कर्णधार होता तिथे. अर्थात तुम्हाला शर्माच तितका आवडत नाही किंवा ग्रेट वाटत नाही त्यामुळे हे समजणे अवघड आहे. कदाचित त्या जागी सचिन असता तर समजले असते. पण असो, पुढे जनमाणसात याची काय रिअ‍ॅक्शन उठली ते आपण बघितलेच.

सध्या पांड्याला भारतीय संघाचा कप्तान सुद्धा केले जात नाहीये. यामागे फिटनेस सोबत ईतर खेळाडू त्याच्या कप्तानीत खेळण्यास उत्सुक नाही असे सुद्धा एक कारण पुढे येत आहे. या गोष्टी सुद्धा बघाव्या लागतात. कप्तानाला नुसते डावपेच येणे गरजेचे नसते, तर त्याला मॅन मॅनेजमेंट सुद्धा जमायला हवे. किंबहुना ते जास्त महत्वाचे आहे. शर्माने हा बेंचमार्क आणखी ऊंचावून ठेवला आहे.
जसे वर कोणीतरी म्हटले की गिल हा स्वार्थी खेळाडू वाटल्याने कप्तान न झाला तरच बरे... तसेच आहे हे.

लोकहो ईथे नवा धागा काढला आहे
आठवणीतले क्रिकेट विश्वचषक - १९९६
https://www.maayboli.com/node/85383
इथले चर्चा वादविवाद चालत राहतील.. तिथे आठवणी जागवूयात Happy

कप्तानपदाची आशा धरणे नॉर्मल आहे. म्हणजे मनात ती लालसा असणे नॉर्मल आहे. पण त्यानंतर आपण कोणाला रिप्लेस करायला जात आहोत याचा सारासार विचार करून योग्य निर्णय घेणे गरजेचे नव्हते का. >> मला कोण आवडतो किंवा नाही ह्याबद्दल तुझ्या डोक्यात आहे त्याचा नि वस्तुस्थितीशी किती संबंध आहे तितकाच संबंध काय संबंध आहे ह्या वाक्यांचा एकमेकांशी आहे. तुला वाडणार्‍या प्लेयर्स नी केले तर ते जस्तीफाईड असते अ थवा ते स्वार्थी किंवा सत्तालोलुप असतात ह्यापेक्षा अधिक काही नाही. रोहित ला काढण्याचा निर्णय आधीच घेऊन त्याप्रमाणे पांड्याला आणण्यात आलेले होते हे बाऊचर ने क्लॅरीफाय केलेले होते तेंव्हा लालसा वगैरे जे काही आहे हे सगळे निरर्थक आहे.

पांड्याला फिटनेस कंसर्न्स बद्दल कप्तान केले न जाणे ह्याबद्दल आगरकर नि गंभीर ह्यांनी त्याच्याशी प्रदीर्घ कॉल केला होता हे बीसीसीआय चे ऑफिशियल स्टेटमेंट आहे. त्यातून ह्यूमॅनिटीचे लक्षन दिसतेय ह्याउलट मॅनेजमेंटच्या चुकांबद्दल प्लेयरला त्रास देणे नि ते जस्टीफाय करत राहणे हे वागणे शुद्ध हलकटपणाचे लक्षण आहे.

जनमानसात ह्याची रिअ‍ॅक्शन उठली कारण ट्रेंड झाला. इतरांवर टीका करणे तेही आजकलच्या सोशल मिडीयाच्या जमान्यात हे अतिशय सोपे अहे. झापडबंद दुनिया ट्रेंडच्या पाठी धावत असतात. नुसते लोक म्हणतात म्हणजे गोष्टी बरोबरच असतात हे लॉजिक असेल तर धन्य आहे कारण तेच लोक फिरून जयजयकार करत होते.

कारण तेच लोक फिरून जयजयकार करत होते.
>>>>>

तेच लोक.. हेच लोक.. तुम्ही चेहरे बघता का Happy

रोहित शर्माला कप्तान पदावरून हटवले म्हणून मुंबईचा राजा रोहीत शर्मा बोलून त्याला सपोर्ट करणारे...
आणि पांड्याला छपरी बोलून ट्रोल करणारे..
हे सुद्धा एकच आहेत हे तुम्ही तुमच्या सोयीने ठरवले आहे Happy

बघा या दोघात फरक लक्षात येतो का ते..
नसेल तर पुढे बोलतच नाही Happy

ENG v WI, 2nd Test
WI 56-0 & 457
ENG 425 & 416
Kraigg Brathwaite*: 31 (28)
Mikyle Louis: 16 (38)
Gus Atkinson 5-1-26-0
Day 4: 3rd Session - West Indies need 329 runs

प्रत्येक इनिंग 400+ झाले आहेत. ते सुद्धा मारून झोडून.
विंडीज धक्का देऊ शकते. इंग्लंड पीच चौथ्या डावात फुटून खराब होण्याची शक्यता कमी असते.

हो इंटरेस्टिंग झाली आहे गेम. पहिल्या डावात इंग्लंडचे ४००+ पाहिल्यावर मला वाटले होते तिसर्‍या दिवशी इंग्लंड गुंडाळेल मॅच.

13 ओवर 61-0
33 ओवर 129-9

पहिल्या पाच विकेट तर मी आंघोळीला गेलो असताना पडल्या Happy
(आज केस धुवायचे असल्याने जास्त वेळेची आंघोळ होती)

हे सुद्धा एकच आहेत हे तुम्ही तुमच्या सोयीने ठरवले आहे >> सगळे सोड एक तरी नक्कीच माहित आहे. आता बोल. टीव्ही वर गांगूलीचा चेहरा बघून त्याच्या मनात चाललेल्या विचार वाचण्याची सिद्धी प्राप्त असलेल्यांकडुन चेहरे वाचायला शिकलोय Lol

क्रिकेट ओव्हर डोस मुळे की ऑलिंपिक गेम्स मुळे कालची मॅच कुणी पाहिली नाही का?

गिल अन् जयस्वाल टिपिकल टी20 ओपनर सारखे खेळले. सूर्या नी पण मस्त 50 केली पण 214 चेज करताना 14 ओव्हर नंतर लंका 140/1 होते अन् आपल्या पुंग्या टाईट झाल्या होत्या (इथेच मी फोकस पूर्ण हॉकी मॅच वर वळवला अन् पुढचा कमाल ट्विस्ट मिसला)
19.2 ओव्हर मधे लंका 170 वर आटोपली. म्हणजे 32 बॉल मधे 30 रन करताना त्यांनी 9 विकेट्स फेकल्या (त्यातल्या 3 पराग ला आहेत)

इथेच मी फोकस पूर्ण हॉकी मॅच वर वळवला अन् पुढचा कमाल ट्विस्ट मिसला>>> हॉकीचा ट्विस्ट कितीतरी पटीने जास्त होता.

दोन दिवस पिकनिक ला असल्याने मी सुद्धा सामने बघितले नाही. स्कोअर सुद्धा चेक करणे झाले नाही. घरीच असतो तर कदाचित बघितले असते. किंवा कदाचित नाही सुद्धा. शर्मा कोहली नसल्याने काही काळ अशी स्थिती राहणार. त्याला इलाज नाही..

Suryakumar Yadav has equalled Virat Kohli's record for the most Player of the Match (POTM) awards in T20 Internationals. Surya secured his 16th POTM award in just his 69th match, matching Kohli's tally achieved in 125 matches.

फक्त 69 सामन्यात!

138 टारगेट
पुरतील की नाही समजेल लवकरच..
पीच काही फलंदाजीला खास नाही..
संजू मात्र ठरल्याप्रमाणे फ्लॉप झाला. स्पर्धा खूप आहे. असे केले तर अवघड होईल त्याचे...
रियांन पराग छान खेळला.
पण मला विशेष सुंदरची फलंदाजी आवडली.
काही काही बॉल कसेही उसळत होते. पण तो एकही उतावीळ शॉट खेळला नाही.
ना नुसते वीस ओवर खेळून काढायला कुंथला ना हिरो बनायला दांडपट्टा फिरवला. अगदी ठहराववाली खेळी होती.

35 बिनबाद आणि संजू ने कॅच सोडली.. वाईट दिवस आहे त्याचा.
ही पार्टनरशिप तुटताच विकेट येऊ लागतील..

सुंदर रिंकू सूर्या पुन्हा सुपर ओवर सुंदर.. या सगळ्या ओवर 2-2 विकेट आल्या..
आणि एक खलील ओवरला 5-6 वाईड आले...काय बकवास खेळले लंका

आज रिंकू सिंगने गोलंदाजी केली. सूर्याने केली. यशस्वी सुद्धा सराव करतोय...
गंभीर इफेक्ट??

३० बॉल्स मधे ३० रन्स असे असले कि काय होते कि काय ह्या टीम ला ? अशाने समोरची टीम म्हणेल कि ३० मधे ६० असू दे त्यापेक्षा Lol

मी आज 30 बॉल 30 हवे असताना आमच्या ग्रूप वर बदाम टाकून कॉमेंट केली होती.
अर्थात एक गोड आठवण म्हणून.. पुन्हा जिंकतील असे वाटत नव्हते. कारण लंका खूप छान खेळत होती..

IMG_20240731_012732.jpg

Pages