क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

“ पिचमधे काही तरी असले तरी एव्हढे काहीच नाही वाटले” - पहिला सेशन लाईव्ह बघताना बर्यापैकी झिप जाणवत होती. पिचमधे ओलावा होता आणि ढगाळ वातावरणामुळे बॉलर्सना मदत मिळत होती. शर्माची विकेfunction at() {
[native code]
}अ एका चांगल्या बॉलवर गेली. पण तू म्हणतोस तसं गिल आणि कोहलीच्या विकेटमधे रस्टीनेसचा भाग जास्त असावा.

बरेचदा बाद होणाऱ्या चेंडूत काही विशेष नसते. पण त्या आधी पडणाऱ्या कैक चेंडूत ते असते.

आता पाहिली हायलाईट. पहिल्या सेशनला मदत होतीच. पण दुसऱ्या सेशनला सुद्धा काही एफर्ट बॉल उसळत होते. आणि वातावरण सुद्धा ढगाळच होते. बांगलादेशने सुद्धा टॉस जिंकून याच अपेक्षेने गोलंदाजी घेतली असावी.
आश्विन जडेजाने कमाल फलंदाजी केली.
स्पिनरसाठी आज तरी फार काही दिसले नाही.

पहिले लवकर बाद झाले ते रस्टी नेस मुळे असावेत
>>
Totally
Pure ignorance towards match practice has caused this... तुम्ही personal स्पेस मधे कितीही ट्रेनिंग / प्रॅक्टिस केलीत तरी situational behavior ची प्रॅक्टिस ही मॅचेस खेळूनच होते.

किमान आतातरी शहाणपण शिका अन् डोमेस्टिक खेळायला लागा...

आश्विन TNPL सारख्या स्पर्धा पण बॅटिंग स्किल्स वाढवण्याच्या दृष्टीने वापरून घेतोय (तिथे तो वन डाऊन जातो). पण कोहली - शर्मा ला डोमेस्टिक म्हटलं की विश्रांती आठवते...

तब्बल 17 विकेट्स चा दिवस...

आपण सकाळी आठव्या बॉल वर जडेजा ला घालवलं अन् तेंव्हापासून ठराविक अंतराने विकेट्स पडतच गेल्या.
आपण 376 वर डाव आटोपल्यावर ही विकेट्स जातच होत्या. बांगला 36/4 असताना लिटन अन् शाकीब ची पाचव्या विकेट साठी 55 धावांची भागीदारी अन् शेपटानी शेवटच्या 3 विकेट्स साठी जोडलेल्या 20-20 धावा बांगलादेश ला दीडशे च्या जवळ घेऊन गेल्या.
दुसऱ्या डावात दिवसा अखेर आपण 81/3 वर आहोत. कोहली अन् गिल नी साधारण 40 धावा जोडून पाया भरला होता पण त्यात कोहली आउट झाला. त्या नंतरच्या 14 धावांच्या भागीदारीत पंतच्या 12 आहेत...
उद्या पूर्ण दिवस खेळून मोठ्ठं टार्गेट सेट करताना जमेल तितका बॅटिंग चा सराव करून घेतला पाहिजे...

SL v NZ, 1st Test
SL 237-4 & 305
NZ 340
Dhananjaya de Silva*: 34 (64)
Angelo Mathews: 34 (72)
Glenn Phillips 12-1-50-0
Day 3: Stumps - Sri Lanka lead by 202 runs

हा सामना सुद्धा रंगतदार होणार असे दिसतेय.

उद्या सकाळी चुम्मा खेळला तर मजा येईल
सुट्टी सत्कारणी लागेल..
मॅचचा निकाल बाकी लागला आहेच
अशा खेळपट्टीवर बांगलादेशचा भारतासमोर निभाव लागणे अवघड..

चुम्मा अर्धशतक !
Welcome back Happy

चार चौके दोन छक्के .. त्यातला एक त्याचा वर्ल्ड फेमस एका हाताने Happy

अर्धशतक झाल्यावर गेअर चेंज. सगळी फिल्डिंग बाउंडरीवर लावली आहे आणि तरी हा गुडघ्यावर बसून मागे सिक्स मारतो.
याला अर्धशतक झाल्यावर सेंचुरीचे काही पडले नाही. पब्लिकला एंटरटेन करायला खेळतोय आता. म्हणून चुम्मा प्लेयर आहे Happy

.

चुम्माsss शतक .. बदाम बदाम बदाम

.

पहिले अर्धशतक 88 चेंडू
दुसरे अर्धशतक 36 चेंडू

गेला अजून दोन फोर मारून..
ऐवरेज वाढवत बसला नाही
हा लक्षात याच्या खेळींसाठी राहणार. आकड्यांच्या पलीकडे Happy

अफगाणिस्तान नी साऊथ आफ्रिका चा 2 सामन्यात दारुण पराभव करून सीरिज जिंकली. आशिया मध्ये भरतानंतर white ball मध्ये अफगाणिस्तान आहे चांगली टीम

डाव जरा लवकरच घोषित केला असं वाटलं
किमान राहुल ला थोडी मॅच प्रॅक्टिस तरी करू द्यायला हवी होती

विकेट ड्राय अन् फ्लॅट होत चालली आहे
दुसऱ्या दिवशी 17 बळी खाणारी हीच का ती विकेट असं म्हणायची वेळ आली आहे, कारण दोन सत्रात फक्त एक विकेट गेली आहे आज.

आज हा व्हिडिओ खूप वायरल होत आहे
पंत बांगलादेश बॉलरला सांगत आहे फिल्डर कुठे हवा आणि त्याने तिथे तो लावला सुद्धा Happy
https://www.facebook.com/share/r/TxrUn3iF1FnhmSrJ/?mibextid=NqTh7c

“ डाव जरा लवकरच घोषित केला असं वाटलं” - सिरीजमधली पहिलीच मॅच आहे, तिसराच दिवस आहे, चेन्नईला ह्युमिडिटी जास्त आहे, बांग्लादेश ३ फास्ट बॉलर्स घेऊन खेळताहेत, इंडिया कम्फर्टेबल पोझिशनमधे आहे - ह्या सगळ्याचा विचार करता अजून वीस-पंचवीस ओव्हर्स बॅटिंग करून मग डिक्लेअर करता आलं असतं असं मलाही वाटलं.

डाव घोषित करण्यावरून आज उलट सुलट चर्चा वाचायला मिळाली.
1) उगाच लवकर केला. अजून बॅटिंग प्रॅक्टिस करायला हवी होती. अजून बांगलादेश बॉलर दमवायचे होते. सुट्टी होती छान दोन दिवस तर आज बॅटिंग बघितली असती.

2) 500+ खूप झाले. अजून कश्याला खेळायचे. अजून खेळलो असतो तर वाटले असते की आपण डरपोक आहोत किंवा बॉलरवर विश्वास नाही. मुंबईत आज पाऊस पडतोय. उद्या चेन्नईत पडून एक दिवस फुकट गेला तर. कश्याला पावसाची रिस्क घ्या.

मला सगळी मते आपल्या जागी योग्य वाटली. शर्मा, गंभीर यांना जे वाटले ते त्यांनी केले.

गेल्या काही दिवसात
अफगाणने आफ्रिकेला हरवले.
लंकेने आपल्याला हरवले.
बांगलादेशने पाकिस्तानला हरवले.

आणि या तिन्हीं मालिका हे तीन संघ डॉमिनेट करून फेवरेट वाटावे अश्या आवेशात जिंकले हे विशेष..

त्यामुळे हा कसोटी सामना सुरू झाला तेव्हा हलक्यात काही घ्यायला नको हेच डोक्यात होते. त्यात आपली पहिल्या इनिंगची सुरुवात तीन विकेट पडून झाली तेव्हा मनात शंकेची पाल चुकचुकली होती. पण पंतने येऊन आपला गेम खेळायला सुरुवात केली आणि सारे सोपे होत गेले.

शाकीब मंतरलेला धागा चघळत चघळत खेळतोय. वाटत नाही आऊट होईल. भारत हारल्यात जमा आहे. धागा कोणीतरी ओढायला पाहिजे. बाई काय हा प्रकार.

शाकीब मंतरलेला धागा चघळत चघळत खेळतोय. वाटत नाही आऊट होईल. भारत हारल्यात जमा आहे. धागा कोणीतरी ओढायला पाहिजे. बाई काय हा प्रकार.
>>
पहिल्या डावातही हेच करत होता
पण झालाच ना आउट

धागा जो पर्यंत कोरडा आहे तो पर्यंत प्रभाव टिकत असेल. पूर्ण ओला झाला की काम तमाम

अश्विनअण्णाचे ३७ व्या वेळी एका डावात ५ बळी.
मुरलीअण्णा ६७ वेळा नंतर वोर्न आणि अश्विन ३७ वेळा ५ बळी.

कोहलीने भर मैदानात आश्र्विनला कंबरेत झुकून टेक ए बो केले !
प्रेझेंटेशनमध्ये रोहीत शर्मा आश्र्विनचे कौतुक करताना थकत नव्हता..
हर्षा भोगले आश्विनला म्हणाला वेळ लिमिटेड आहे आपल्याकडे म्हणून थांबुया आता..
आता आश्र्विनवर डॉक्युमेंटरी दाखवत आहेत.

या सगळ्यात ऋषभ पंतची आता मुलाखत झाली. वन ऑफ द ग्रेटेस्ट कम बॅक इन द हिस्टरी ऑफ क्रिकेट !

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने आज कसोटीत पहिल्यांदा पराभवापेक्षा जास्त विजयाचा आकडा गाठला. आणि इथून आपण कायम पुढे राहू असा विश्वास या संघाकडे बघून वाटत आहे.

Well done India !

या सगळ्यात जडेजाला विसरू नका. आश्विनचे शतक झाले तर त्याचेही थोडक्यात हुकले. आश्विनने सामन्यात सहा विकेट काढल्या तर त्याने पाच काढल्या.
ज्याला एकेकाळी मांजरेकर उगाचच बिट्स अँड पिसेस चिंधी प्लेअर म्हणाला होता तो आज कसोटीत जगातला नंबर वन ऑल राऊंडर आहे. त्या लिस्ट मध्ये दुसऱ्या नंबरवर आश्विन आहे.

या सर्वांनी मिळून आज संपूर्ण भारतवर्षातील क्रिकेटप्रेमीची रविवारची सकाळ आनंददायी केली Happy

सगळे जीव तोडून खेळले एक चुम्मा सोडला तर. चूम्मा चक्क बांगलादेशच्या बाजूने खेळत होता. डोळ्याने इशारे करत बॉल कसा टाकायचा, फिल्डर कुठे लावायचा हे सांगत होता. शेवटी इशारे समजले नाहीत म्हणून चक्क ओरडून सांगत होता इथे फिल्डर लाव म्हणून. देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे चुंमावर

शतक आणि एका डावात पाच बळी ही कामगिरी गेल्या वीस वर्षात फक्त 11 वेळा झाली आहे.

त्यापैकी 4 वेळा एकट्या आश्विनने केली आहे

2 वेळा जडेजाने केली आहे

त्याआधी भारताच्या फक्त दोन खेळाडूंनी हे एकेकदा जमवले आहे. पॉली उम्रीगर आणि विनू मंकड

जगात सर्वाधिक वेळा ही कामगिरी इयान बोथमने 5 वेळा केली आहे. त्या खालोखाल आश्विन 4 वेळा आहे. जगात इतर कोणाला हे 3 वेळा सुद्धा जमले नाही.

टेक अ बो आश्विन

ह्या सगळ्याचा विचार करता अजून वीस-पंचवीस ओव्हर्स बॅटिंग करून मग डिक्लेअर करता आलं असतं असं मलाही वाटलं. >> सगळ्यात मह्त्वाचे म्हणजे राहुल ला सराव होउ देण्यासाठी थोडे लेट डिक्लेअर करायला हवे होते असे मलाही वाटले.

पुढच्या टेस्ट मधे पिच बघता कुलदीप आत येईल. बुमरा नि सिराज दोघांनाही ब्रेक देऊन आकाशदीप नि दयाल असे काँबो बघतील का ? वाटत नाही.

India Test record at Kanpur: Matches Played – 23; Won – 7; Lost – 3; Drawn – 13.

अश्यात पहिले तीन दिवस उतरत्या क्रमाने पावसाची शक्यता आहे.
सामना अनिर्णीत राहिला तर आपले पॉइंट कमी होतील.

सामना अनिर्णीत राहिला तर आपले पॉइंट कमी होतील. >> तो मूर्खपणा आहे पण त्याला इलाज नाही. विनिंग पर्सेंटेज ठरवताना पुरेसा सामना खेळलाच गेला नाही तर त्याला धरायला नको ना ?

तो धरला नाही तरी बांगलादेश सोबत सामना रद्द होणे हे सुद्धा एक नुकसानच झाले.
ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघाशी त्यांच्याच देशात जाऊन आपण पाच सामने खेळणार आहोत आणि बांगलादेश सोबत फक्त दोन. म्हणजे पाच प्रश्न अवघड, फक्त दोन प्रश्न सोपे, आणि त्यातलाही एक कॅन्सल Happy

रडू नका. एकतर आपण अंतिम सामन्यात पोचूच. (आशा/खात्री).
शिवाय बांगलादेशला हरवायला ५ पूर्ण दिवस लागत असले, तेही भारतात, तर बीसीसीआयचा मूर्खपणा. हे फक्त पाटा खेळपट्टीवर घडू शकते. आजकाल कानपूरही फिरते.
आपल्याला आता कदक पण फिरकी खेळपट्ट्या करता येऊ लागल्या आहेत. आपला फिरकी आणि जलदगती मारा सारखाच भेदक असल्याचा चांगला परिणाम.

वनडे आणि २०-२० चे वर्ल्ड कप आपण रोहीत शर्माच्या नेतृत्वात एकही सामना न गमावता अंतिम सामन्यात पोहोचलो आहोत. त्यामुळे कसोटीमध्ये देखील आपण अंतिम सामन्यात पोहोचू यात शंकाच नाही. तो विषयच नाही.

पण नियम योग्य आहेत का? सर्वाँना संधी समसमान यात मिळते का? हा मुद्दा आहे.
आपल्याला चिंता नाही म्हणून विषय कट असा स्वतापुरता विचार का करावा..

अजून एक स्लो ओवर रेट मुळे फाईन बसतो. जिथे वेगवान गोलंदाज जास्त वापरले जातात तिथे हा फटका जास्त बसतो. तिथे अधिक सवलत असते का कल्पना नाही.

Feeling sad for कुलदीप...

होम ग्राउंड वर पण संधी मिळाली नाही...

Pages