क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वनडे आणि २०-२० चे वर्ल्ड कप आपण रोहीत शर्माच्या नेतृत्वात एकही सामना न गमावता अंतिम सामन्यात पोहोचलो आहोत. त्यामुळे कसोटीमध्ये देखील आपण अंतिम सामन्यात पोहोचू यात शंकाच नाही.
>>
हे लॉजिक अगाध आहे

गेट वेल सून...

यात अगाध काय?
आपल्याकडे फलंदाजांचे कौतुक करायची सवय आहे. गोलंदाजांना सहानुभूती मिळते. पण कर्णधाराचे श्रेय मात्र नेहमीच नाकारले जाते. Captain is as good as his team म्हटले की झाले. विषय संपला.

आणि गेट वेल सून कशाला? शर्माच्या कप्तानीचे कौतुक आहे म्हणून?

विनिंग पर्सेंटेज पहिल्या दोन टीम्स ठरवण्यासाठी धरल्या जात असल्यामूळे आपल्याला अजून नवामधले पाच जिंकणे जरुरी आहे. ऑस्ट्रेलियामधे पाचामधले दोन जिंकणे हे लॉटरी असेल कारण दोन सामने ड्रॉप ईन पिचेसवर आहेत. पिंक बॉलवर बर्‍याच करामती होतात त्यामूळे काहीही गृहित धरायची माझी तयारी नाही.

आपण जर आता नंबर वन वर असू तर आपल्याला अजून किती सामने जिंकायचे आहेत वगैरे हिशोब करायची इतक्यात गरज वाटत नाही.
अमुक तमुक सामने जिंकले तर प्रवेश निश्चित हे आता काढताना दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर असणारे संघ त्यांचे सर्वच किंवा बहुतांश सामने जिंकून आपल्या पुढे जातील हे गृहीत धरले असेल. जे तसेच होणार नाही. म्हणून मला अश्या शक्यता काढायची आवड असून सुद्धा मी सध्या याचा विचार करत नाहीये.

आणि मला ऑस्ट्रेलियाची तितकी भीती वाटत नाहीये. उलट मी एक्साईटेड आहे ते क्वालिटी क्रिकेट आणि काटे की टक्कर बघायला. आपले वेगवान शमी, बुमराह, सिराज आणि आता नवा आकाशदीप फिट राहू दे, आश्विन जोडीला आहेच. टेस्ट मॅच बॉलर जिंकवून देतात. फलंदाजांनी त्यांना साथ द्यायची आहे ज्यासाठी ते सक्षम वाटत आहेत. त्यात एकस फॅक्टर पंत परत आला आहे. मजा येणार आहे.

आपण जर आता नंबर वन वर असू तर आपल्याला अजून किती सामने जिंकायचे आहेत वगैरे हिशोब करायची इतक्यात गरज वाटत नाही. >> 'm grateful that you are not around any coaching job for Indian team. That's all I can say.

मी आपल्या टीमला चॅम्पियन समजतो
त्यामुळे चहाता म्हणून माझी माईंडसेट सुद्धा चॅम्पियन सारखे आहे Happy

ह्याला सर्वसामान्य जनता ओव्हर काँफिडन्स म्हणते. रोहित शर्मा चे विचार तुझ्यासारखे आते तर २०१५ नंतर क्रिकेट खेळला नसता. नशिब आमचे !

आत्मविश्वास आणि ओवरकॉन्फिडन्स हा सापेक्ष असतो...
जसे स्मार्टनेसबाबत आपल्यापेक्षा जास्त स्मार्ट तो ओवरस्मार्ट आणि आपल्यापेक्षा कमी स्मार्ट तो बावळट..
तसेच ज्याला आपल्यापेक्षा ज्याला जास्त आत्मविश्वास तो ओवरकॉन्फिडंट Happy

असो,
आकडेमोड न करणे याचा अर्थ फायनलला पोहोचलाय समजून रात्री दारू ची पार्टी करून सकाळी खेळायला उतरणे असा होत नाही. तर त्याची गरज नाही इतकेच.
बाकी हा संघ फायनलला पोहोचायला असा विचार करून नाही तर आपले जगातले नंबर वन स्थान टिकवायला आणि आपला सन्मान राखायला म्हणून दरवेळी तितक्याच ताकदीने मैदानात उतरत असेल याची खात्री बाळगा Happy

Next inspection at 2 PM,
"तारीख पे तारीख" ची आठवण झाली.

गेला आजचा दिवस सुद्धा डब्यात
पुढचे दोन दिवस पूर्ण ओवर होतील का कल्पना नाही.
पीच स्लो आहे. इथून निकाल लागणे अवघड दिसतेय.
पहिल्या दिवशी हिच चिंता व्यक्त केली होती.

फास्टेस्ट टीम 50
रेकॉर्ड झाला आज
अवघ्या 3.0 ओवरमध्ये
..

फास्टेस्ट टीम 100 सुद्धा रेकॉर्ड झाला.. 10.1 ओवर
आधीचा आपलाच होता. हीच सलामी जोडी असेल.. चेक करायला हवे

WTC फायनलला जाऊन हारण्यापेक्षा ही टेस्ट ड्रॉ झालेली बरी आहे.

भारताचा अ‍ॅप्रोच जबरदस्त होता. मॅच निकाली करण्यासाठीच सगळे खेळले. जैस्वालची एक रिव्हर्स स्वीपची बाऊंड्री वगळता, सगळे शॉट्स एकदम ‘प्रॉपर’ होते. रोहित, गिल, राहूल, कोहली पण मस्तच खेळले. कुठलाही (‘जॅमबॉल’, ‘गौतीबॉल’ वगैरे) दंगा न करता ८+ च्या रेटने पावणे तीनशे रन्स केल्या.. बुमराह, अश्विन, सिराज तर आहेतच, पण आकाश दीप पण एकदम भेदक आहे. शेवटचा दिवस रंगतदार होणार!!

काळ काम वेग.. याचे गणित दिवसभर चालू राहणार.. मजा येणार.. ब्युटी ऑफ टेस्ट क्रिकेट!

पावसाने रसभंग करू नये फक्त...

Most Man of The Series in Test Cricket

आश्विन 11
मुरलीधरन 11
जॅक कॅलिस 9
रिचर्ड हॅडली 8
इम्रान खान 8
शेन वॉर्न 8

भारताचा जबरदस्त विजय!! एकदम रूथलेस परफॉर्मन्स!!

भारताला भारतात येऊन हारवणं नेहमीच अवघड होतं/आहे. पण ही टीम वेगळी आहे. खूप स्टार परफॉर्मर्स आहेत, पण तरिही टीम कुणा स्टारवर अ ति अवलंबून नाही. प्रत्येकाला बॅक-अप आहे. कोहली, अश्विन, जडेजा, शर्मा जितके महत्वाचे आहेत तितक्याच जोमानं जैस्वाल, गिल, कुलदीप, अक्षर, सर्फराझ, श्रेयस, आकाश सुद्धा तयार आहेत. ही खरी भारताची ताकद आअहे. ह्या बाबतीत बीसीसीआय ला क्रेडिट द्यायला हवं.

2019 साली कोहलीच्या नेतृत्वात आपण सलग 7 कसोटी जिंकलो होतो. ड्रॉ सुद्धा नाही ज्यात.
आपला सलग कसोटी जिंकायचा हा विक्रम आहे.

त्या खालोखाल आज आपण शर्माच्या कप्तानीत सलग 6 कसोटी सामने जिंकलो आहोत.

एकदम रूथलेस परफॉर्मन्स!! ! >> हो ना ! बाझबॉलचा नुसताच दबदबा करण्यापेक्षा हा प्रकार जास्त भेदक आहे. तसे बघितले तर स्कंड नि थर्ड डे पिच होते हे नि बॅटींग अजिबात कठीन नव्हते ऑड बॉल लो राहत होते ते वगळता. पण बॉलिंग युनिट ने जबरदस्त प्लॅनिंग करून विकेट्स काढल्या आहेत. अश्विन नि बुमरा चा एक्सेंज पाहिलात का ? मजा आली बघायला. बा<ङ्लादेश डीअर इन हेडलाईट मोड मधे गेले कालच्या असॉल्ट नंतर.

आत किविज विरुद्ध कसे पिचेस असतील ह्याची उत्सुकता लागली आहे. स्पिन धार्जिणी करून तीन - शून्य खिशात घालून मग डाऊन अंडर टेंशन नाही घेणार कि चेन्नई सारखी पिचेस ठेवून किवीजच्या चांगल्या पेस अ‍ॅटॅक विरुद्ध डाऊन अंडर चा सराव केला जाईल? मध्यम मार्ग असेल असे वाटते. एखादा सामना पटकन खिशात घालून मग दुसरा भाग केला जाईल. किवीज चा पेस अ‍ॅटॅक लंकेत चांगला चालला आहे.

. ह्या बाबतीत बीसीसीआय ला क्रेडिट द्यायला हवं. >> +१

आश्विनने खूप छान म्हटले.
"बांगलादेशची पहिली इनिंग आटोपल्यावर रोहीत शर्मा मला येऊन म्हणाला की तुम्हां बॉलरना दुसऱ्या इनिंगला ८० ओवर मिळतील हे बघू. भले मग त्या नादात बांगलादेशचा पहिला इनिंग स्कोअर २३० च्या आत आपण बाद झालो तरी चालेल पण आम्ही मारणारा. आणि असे म्हणून त्याने पहिल्या दुसऱ्या बॉललाच दोन सिक्स मारून टोन सेट केला"

+७८६ आश्विन
चार विकेट पडल्यावर देखील कोहली राहुल यांना जणू सूचनाच होत्या की मारायचेच आहे.

पण बांगलादेशने सामना त्या तीन ओवर ५१-० इथेच गमावला. खांदे तेव्हाच इतके पडले असतील त्यांचे की आत्मविश्वासाच्या चिंधड्या उडाल्या असतील. त्यानंतर आपण हा सामना थोडीशी चिकाटी दाखवून वाचवू शकतो असा विश्वासच दिसला नाही त्यांच्याकडे.

हा सामना भारताची आक्रमक वृत्ती आणि विजयाची भूक यासाठी कायम लक्षात राहणार..

"बा<ङ्लादेश डीअर इन हेडलाईट मोड मधे गेले कालच्या असॉल्ट नंतर." - हे मात्र खरंय. पाकिस्तानविरूद्धच्या विजयानंतर वाढलेला त्यांचा कॉन्फिडन्स पार रसातलाला गेला असेल काअल. जेमतेम सव्वा-दोन दिवसात आक्खी टेस्ट हारले ते.

किवीज पण लंकेकडून मार खाऊन येतायत. मला वाटतं इंडियाचा अ‍ॅप्रोच शक्यतो ३-० जिंकण्याचाच असेल. सद्ध्या एकीकडे अश्विन-जडेजा/कुलदीप आणि दुसरीकडे बुमराह , सिराज, शामी/आकाश असल्यामुळे विकेट अ‍ॅग्नोस्टिक असू शकते इंडियाची टीम.

In 147 years of Test Cricket INDIA 1st Team in to play both Innings of a Test match without facing a Maiden over

MUM v ROI, Irani Cup
MUM 237-4
Ajinkya Rahane*: 86 (197)
Sarfaraz Khan: 54 (88)
Day 1: Stumps

३७-३ होते
रहाणेला न्यायचा का ऑस्ट्रेलियाला.. खेळवले नाही तरी बसवून ठेवा. युक्तीच्या चार गोष्टी सांगेल

कप्तान नाही हा लीडर आहे.. निडर आहे Happy

FB_IMG_1727820568582.jpg

Pages