Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आणि बाहेर गेले की पॅटीस
आणि हो,
सोबत टपरीवरचा कटींग चहा मस्ट.. त्याशिवाय नाश्ता पूर्ण नाही.
.
Potato cheese पकोडे
Potato cheese पकोडे
मागच्या आठवड्यात एकीने खिलवले.
.
ऋ photo कमाल आहेत
खिलवले...
खिलवले...
सावधान.. आपण मायबोलीवर आहात.
खाऊ घातले म्हणावे
बाकी सजावट अगदी रेस्टॉरंटसारखी आहे..
I have comeback.. ' life is
I have comeback.. ' life is too short' just say खिलवले
धन्यवाद
तिला आहे आवड masterchef पणा करण्याची!
गिरमिट
गिरमिट
चिकन आणि वडे .
चिकन आणि वडे ..

भेळ, वडे मस्त….
भेळ, वडे मस्त….
फक्त फोटो पाहून जीभ खवळली.
फक्त फोटो पाहून जीभ खवळली.
ऋ, ते वडे आण इकडे
गिरमिट काय आहे?
गिरमिट काय आहे?
भेळेचा प्रकार का? काय कॉम्बिनेशन असते?
लेकीची फर्माईश. दर २-३
लेकीची फर्माईश. दर २-३ दिवसांनी कुठल्या ना कुठल्या तरी पुस्तकात केकचं चित्र दिसतं. मग जप सुरू होतो.
कमीत कमी गिल्टवाला कणीक- नाचणीचा चॉकलेट केक.
व्वा
व्वा
मी चिन्मयी , वरील केकची
मी चिन्मयी , वरील केकची पाक्रू देऊ शकाल का ?
केक काय भारी दिसतोय..
केक काय भारी दिसतोय..
केक हा माझ्या फार आवडीचा प्रकार नसून देखील उचलून खावासा वाटतोय
जाई, हे घ्या.
जाई, हे घ्या.
साहित्य-
नाचणी पीठ ३/४ कप
गव्हाचे पीठ ३/४ कप
कोको पावडर २ टे.स्पू.
बेकिंग पावडर दीड टीस्पून
बेकिंग सोडा अर्धा टीस्पून
मीठ चिमूटभर
गुळ पावडर १/२ कप
दही १/३ कप
दूध ३/४ कप
तेल १/२ कप
व्हॅनिला इसेन्स १ टीस्पून
चॉको चिप्स आवडीनुसार
कृती-
१. एका भांड्यात तेल आणि गुळ पावडर घेऊन चांगली मिक्स करावी. त्यात सगळं दही आणि थोडं दूध घालून पुन्हा मिक्स करावे. इसेन्स घालावा.
२. सगळे सुके जिन्नस चाळून एकत्र घ्यावेत. आधीच्या मिश्रणात मिसळून नीट एकत्र करावेत. हळूहळू उरलेले दूध घालून छान मिक्स करून घ्यावे. चॉको चिप्स घालून अलगद ढवळून घ्यावे.
३. केक टिनमध्ये मिश्रण ओतून १० मिनिटे प्रीहीट केलेल्या भांड्यात ३० मिनिटे गॅस एकदम बारीक करून बेक करावे.
४. ३० मिनिटांनंतर टूथपिक घालून बघावे. गरज वाटल्यास आणि ५ मिनिटे ठेवून मग गॅस बंद करावा.
-माझ्याकडे ओव्हन नाहीये त्यामुळे मी मोठ्या कढईत किंवा पातेल्यात करते.
- अर्धा कप गूळ थोडा कमी वाटला मला. अजून २/३ चमचे चालेल.
- यात चमचाभर व्हिनेगर घातले तर अजून छान फुलेल असं वाटतंय.
- चॉको चिप्स ऑप्शनल आहेत. चॉकलेटचे तुकडे घातले तरी चालेल किंवा नाहीच घातले तरी चालेल.
धन्यवाद
धन्यवाद चिन्मयी
(No subject)
पुपो
कटाची आमटी
अळूची आणि दोडक्याची भाजी
कारले घालून पंचामृत
उडीद डाळीचे वडे
का ची कोशिंबीर
आवडीचे नावडीचे पदार्थ एकच
आवडीचे नावडीचे पदार्थ एकच ताटात..
सोबत एक रिकामी प्लेट ठेव म्हणजे जे नको ते त्यात काढून आवडीच्यावर ताव मारता येईल
चिन्मयी कमाल केक आहे. लगेच
चिन्मयी कमाल केक आहे. लगेच करून बघितला. फार मस्त झाला. सॉफ्ट आणी परफेक्ट गोड. धन्यवाद :)
अरे वाह.. मस्त.
अरे वाह.. मस्त.
घरगुती आणि सेल्फ मेड पिझा
घरगुती आणि सेल्फ मेड पिझा
बायकोच्या मार्गदर्शनाखाली बनवला
.
भारी दिसतोय पिझ्झा! डोळ्यात
भारी दिसतोय पिझ्झा! डोळ्यात बदाम
मला १ किलो थालीपिठाच्या
मला १ किलो थालीपिठाच्या भाजणीचे प्रमाण कुणी देऊ शकेल का?
सान्वी, माझे जे प्रमानाहे
सान्वी, माझे जे प्रमाण आहे त्यात सुमारे अडीच किलो+ भाजणी होते.
चालेल का?
व्वा.. पिझ्झा एकदम मस्त
व्वा.. पिझ्झा एकदम मस्त दिसतोय... तोंपासू
@छल्ला मग त्याचेच 1 किलो चे
@छल्ला मग त्याचेच 1 किलो चे करून पाठवा ना, अडीच किलो खूप होईल मला
४०० ग्रॅम बाजरी, २२५ ग्रॅम
४०० ग्रॅम बाजरी, २२५ ग्रॅम ज्वारी, १२५ ग्रॅम हरभरे, १०० ग्रॅम काळे उडीद, १०० ग्रॅम मूग अथवा सोयाबीन, ३० ग्रॅम धने , २० ग्रॅम जिरे, मूठभर तांदूळ.
सगळे वेगवेगळे भाजून घ्यायचे आणि एकत्र दळून आणायचे
खूप खूप धनयवाद छल्ला..
खूप खूप धनयवाद छल्ला..
(No subject)
आज जिलबी डे !
या मनपसंत आहेत कारण सर्व अटी शर्ती पूर्ण केल्या आहेत- एकाच रंगाच्या, एकाच आकाराच्या, तोंड पोळेल इतक्या गरमागरम, कुरकुरीत, शुद्ध तुपातल्या, नो तुकडे.
ख़ुश होने को और क्या चाहिए
अश्या बारीक व नाजूक जिलब्या
अश्या बारीक व नाजूक जिलब्या फार खमंग असतात. जाड्या मऊ पडतात.
-----------
दिल्लीत सकाळी सकाळी म्हणे थंड दूध व गरमागरम जिलब्या विकायला असतात. म्हणजे लोक एकत्रच खातात दोन्ही. बरोबर आहे, दुधामुळे , जिलबीचा गोड मिट्टपणा कमी होत असेल.
मस्त दिसत आहेत जिलब्या
मस्त दिसत आहेत जिलब्या
बारीक कुरकुरीत जिलब्यांची एक मजा असते तर जाडजूड तोंडात विरघळणाऱ्याची एक मजा असते.
मला दोन्ही आवडतात.
ताक, जिलेबी आणि फाफडा हे त्रिकूट माझे फेवरेट.. कधी मूड आला की दहा पंधरा दिवस रोज सलग खातो हे. ताक घरीच करतो. ते मला माझ्या हाताचेच आवडते.
Pages