क्रिकेट - ८

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 June, 2023 - 03:36

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

तिथे अ‍ॅशेसला पहिल्याच दिवशी ईंग्लंडने राडा घालायला सुरुवात केलीय
आपण ईथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/80861

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिषेक आणि शर्मा
अशी दोन नावे एकत्र आल्यावर अंगार तर बरसणारच होते Happy

ह्या नवीन टीमची फिल्डिंग ‘रणजी’ लेव्हलची वाटतीय. बरंच काम करावं लागणार आहे. >> +१. अभिशेक काल मस्तच खेळला, फुटण्यासाठी अचूक वेळ पकडली विचित्र पिचवर. इंप्रेसीव्ह इनिंग होती. गायकवाड बिचारा त्याच्या नॅचरल खेळाशी विसंगत खेळतो असे वाटत राहते मला.

(अय्यर येणार परत आता) >> जरुरी नाही. त्याच्या जागी आलेले - सर्फराझ, पड्डिकल दोघेही चांगले खेळलेले आहेत. अयर ला काहीतरी वेगळे करावे लागेल .

टेस्ट मधे नाहीं रे, व्हाईट बॉल गेम मधे... अन् तिथे तो कॅप्टन पण होऊ शकेल. (बीसीसीआयच्या ग्रूमिंग लिस्ट वर होता तो)
आत्ता त्याला कॉन्ट्रॅक्ट पण नाही आहे, ते ही मिळेल पुढच्या टर्म ला.

गंभीर नी ठेवलेल्या काही अटी या आहेत असं वाचलं:
- कंप्लीट कंट्रोल अन् फ्रीडम (सपोर्ट स्टाफ सिलेक्षन)
- फॉरमॅट स्पेसिफिक टीम अन् प्लेअर ग्रूमींग
- २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर रोकोज ना वन डे मधून सन्मानाने नारळ
- योयो टेस्ट ला रामराम, प्लेईंग स्किल फिटनेस अन् करंट फॉर्म बेस्ड सिलेक्षन

रोहीत कोहली यांना कधी नारळ द्यायचा हि अट गंभीर कशी ठेवू शकतो...
त्याच्या नावावर काहीही चटपटीत खपवले जात मार्केट मध्ये असे मला वाटते. कारण त्याने ज्या काही डिमांड केल्या असतील त्या अश्या सहजी बाहेर येणार नाहीत. त्याने किंवा बीसीसीआयने काही ओफिशियल स्टेटमेंट तर तेवढेच विश्वासार्ह समजावे.

बाई दवे, रोहीत शर्मा 2027 वन डे वर्ल्डकप ला कर्णधार असावा अशी इच्छा बरेच जण व्यक्त करत आहेत...

बाई दवे, रोहीत शर्मा 2027 वन डे वर्ल्डकप ला कर्णधार असावा अशी इच्छा बरेच जण व्यक्त करत आहेत... >> मग नाही केले तर जो कोणी होईल त्याच्या नावाने शिमगा करायचा हे प्लॅनिंग पण सुरू झालच असेल नाही ? इथे तोवर रोहित ला खेळायचेय का ते माहित नाही नि तीस्मार्खा निघाले कर्णाधार कोण ते ठरवायला.

त्याच्या नावावर काहीही चटपटीत खपवले जात मार्केट मध्ये असे मला वाटते. कारण त्याने ज्या काही डिमांड केल्या असतील त्या अश्या सहजी बाहेर येणार नाहीत >> मलाही असेच वाटते. वरचे 2027 वाले पोस्ट पण तसेच आहे हे उघड आहे. Lol

टेस्ट मधे नाहीं रे, व्हाईट बॉल गेम मधे... अन् तिथे तो कॅप्टन पण होऊ शकेल. >> आलं लक्षात. तो श्रूड कॅप्तान आहे असे मलाही वाटते. पण वय आड येऊ शकते. किमान टी २० च्या टीम मधे तरी नसावा नि येती दोन वर्षे झिंबावे ला गेले आहेत ते नि बुमरा, पांड्या, कदाचित दुबे वगळता अजून कोणी नसावे असे वाटते. तशात आहे त्यांच्यामधे एव्हढी मारामारी होणार आहे कि बस्स ! ओपनिंग चा स्लॉट बघ - जयस्वाल, गिल, शर्मा, सॅमसन - नुस्ता खच पडलाय.

बीसीसीआयने काही ओफिशियल स्टेटमेंट तर तेवढेच विश्वासार्ह समजावे.
>>
मी तरी मीडिया मधे आलेल्या गोष्टी बोललो
काही लोकं तर खेळाडूच्या मनात काय चालू आहे हे ही ठामपणे सांगत असतात

खेळाडूंच्या डोक्यात काय चालू आहे आणि ते कसा विचार करतात हे क्रिकेटिंग जजमेंट झाले...

गंभीरला विराट आणि शर्मा यांना नारळ द्यायचा आहे हे स्टेटमेंट समजू शकतो, तो एक अंदाज झाला.

पण त्याने तशी अट घातली आहे हे स्टेटमेंट फॅक्ट म्हणून काही अधिकृत सोर्स असल्याशिवाय ठामपणे मांडणे चूक..

अर्थात कोणी मांडले तर माझी काही हरकत नाही..
पण इथे कोणी वाचून ते तसेच आहे असे समजू नये म्हणून मी इतरांसाठी क्लिअर केले की असे कुठलेही स्टेटमेंट ना त्याने दिले ना बीसीसीआयने..

वर्ल्डकप विजयानंतर आढावा घेणारी एक मोठी पोस्ट लिहली होती पण पोस्ट करण्याआधी दुसरे काहीतरी interruption आले आणि मायबोलीवर परत येताना बहुतेक बॅक बटण दाबले गेले आणि सगळी ड्राफ्ट पोस्ट हरवली..... परत मग पुन्हा तेच सगळे लिहावेसे वाटले नाही!!
नुसतेच सगळे व्हिडीओ आणि क्लिप्स बघत होतो गेले काही दिवस सेलिब्रेशनचे!! निव्वळ आनंद!!

असो!! गंभीरची निवड फारशी पटलेली नाही..... तो खेळाडू म्हणून आवडत होता पण एक कोच आणि कॅप्टन म्हणून तो आयपीएलमध्येही कधी आवडला नाही...... my way or highway वाला वाटतो तो आणि स्वताच्या मतांबद्दल/समजुतींबद्दल हेकेखोर वाटतो (किमान बघितलेल्या मुलाखती, वेगवेगळे बाईट्स आणि आयपीएलमधला एकंदर वावर बघून तशी इमेज तरी झालेली आहे)
प्रेशर त्याच्या चेहऱ्यावर आणि बॉडी लॅंग्वेजमधून लगेच दिसते.
आणि भारताला या धाटणीचे कोचेस फारसे मानवत नाहीत हा इतिहास आहे!!

*एकंदर वावर बघून तशी इमेज तरी झालेली आहे)* - +१ . राहुल व रोहितने संघात निर्माण केलेलं मोकळं, सांघिक ऐक्याचं पोषक वातावरण तसंच बहरत राहावं, एवढीच प्रार्थना !
.

“ ओपनिंग चा स्लॉट बघ - जयस्वाल, गिल, शर्मा, सॅमसन - नुस्ता खच पडलाय.” - आजचा बॅटिंग लाईन-अप पाहिलास का? पहिल्या चारातले कुणीही दोघं ओपन करू शकतील. टॉप हेवी टीम होणार असं दिसतंय.

आजचा बॅटिंग लाईन-अप पाहिलास का? पहिल्या चारातले कुणीही दोघं ओपन करू शकतील. टॉप हेवी टीम होणार असं दिसतंय. >> शर्माला खाली आणणे मला पटले नाही. तो ट्रेंड सेटर आहे ह्या एक्स्प्लोसीव्ह बॅटींगचा. जय्स्वाल नि त्याने ओपन करून गिल ने खाली यायला हवे होते (खरे तर गिल टी २० मधे सध्याच्या आपल्या फिलॉसॉफीमधे बसतो का असा प्रश्न मला आता पडू लागलाय - त्याचा नॅचरल खेळ - गायकवाडचा पण - कोहली टाईप आहे. सुरूवातीपासून आक्रमक खेळणॅ त्यांना नॅचरली जमतेय असे वाटत नाही. It seems they go against their grain and trying to enforce things awkwardly. थोडे सेट झाले कि ते चित्र वेगळे दिसतात - भयंकर फ्लूएन्सी येते. स्ट्राईक रेट खतरा होतो.) दोन लेफ्टी ओपन झाल्याने काही फरक पडतो असे वाटत नाही.

(किमान बघितलेल्या मुलाखती, वेगवेगळे बाईट्स आणि आयपीएलमधला एकंदर वावर बघून तशी इमेज तरी झालेली आहे) >> दिल्ली च्या संघामधे युवा खेळाडूंना दिलेल्या ट्रीटमेंट विरुद्ध त्याने आवाज उठवला होता. आयपील मधे नविन हक ला स्लेज केल्याबद्दल कोहलीशी पंगा घेतला होता (नि गेल्या आयपील मधे कोहली ला मिठी मारून त्याच प्रकाराचा समारोप केला होता ) , यंदाच्या आय्पील मधे चंद्रकांत पंडीत च्या कोचिंग स्टाईल वर प्रश्न आल्यावर त्याची बाजू घेऊन पटवून दिले होते. हि दुसरी बाजू पण आहे रे. २००७ नि २०११ च्या विजयांमधे गंभिरचा सिंहाचा वाटा होता. प्रेशर अ‍ॅब्सॉर्ब करून खडूसपणे खेळणे - never sell your wicket cheap - हे जरी तो संघात भिनवू शकला तर आपला संघ एव्हढा टॅलेंटेड आहे कि नक्कीच विजयी ठरेल अशी आशा वाटते.

>> त्याने आवाज उठवला होता.
>> पंगा घेतला होता
याच्याबद्दलच बोलतोय मी की त्याची एकंदर इमेज अतिस्पष्टवक्ता, बंडखोर आणि इगोएस्टिक आहे.... तोच इगो संघाच्या हिताच्या आड येऊ नये म्हणजे मिळवली

>>२००७ नि २०११ च्या विजयांमधे गंभिरचा सिंहाचा वाटा होता. प्रेशर अ‍ॅब्सॉर्ब करून खडूसपणे खेळणे
खेळाडू म्हणून दुमत नाहिये रे त्याच्याबद्दल पण एक कोच म्हणून ड्रेसींग रुममधल्या सध्याच्या वातावरणाशी तो कितपत जुळवून घेईल याबद्दल शंका आहे.!! असो घोडामैदान जवळच आहे Happy
रेड बॉल क्रिकेटसाठी लक्ष्मण आणि व्हाईट बॉलसाठी गंभीर असे करुन दोघांनाही आजमावता आले असते!!

अर्थात हार्दिकबद्दल माझा अंदाज चुकला तसा गंभीरबद्दल चुकला तर चांगलेच आहे संघासाठी Happy

लक्ष्मणला नकोय असे त्याने स्पष्ट केलय. तो NCA चे काम बघणार आहे. त्याच्या लिमिटेड कोचिंग च्या रोल मधे मला तो फारसा उल्लेखनीय वाटला नाही - रन ऑफ त मिल्स वाटलाय. ह्याउलट त्याचे अ‍ॅकॅडेमीवाले काम जबरदस्त आहे.

त्याची एकंदर इमेज अतिस्पष्टवक्ता, बंडखोर आणि इगोएस्टिक आहे >> मान्य पण मला वाटते त्यामागच्या काँटेक्स्ट ला बघणे जरुरी आहे. परत मराठी माणसाला दिल्ली कडून येणारे सहसा वाईल्ड वाटतात Wink

२०११ च्या विजयांमधे गंभिरचा सिंहाचा वाटा होता. >>>> २०११ च्या विजयाचं आणि फायनलचं पण गंभीरला जेव्हडं श्रेयं मिळायला हवं होतं तेव्हडं मिळालं नाही असं माझं पर्सेप्शन आहे. त्या फायनलला त्याचे १०० व्हायला हवे होते. खेळाडून म्हणून ठिक होता, खासदार म्हणून अगदीच निष्प्रभ होता. आता कोच म्हणून तो कशी कामगिरी करतो ते आता कळेलच. Proud

विषय संपला !
>>
चला, मग आता बीसीसीआयला म्हणाव दुकान बंद करा
यापुढे इंडिया टीव्ही वाले पब्लिक पोल घेऊन क्रिकेट चालवतील...

२०११ च्या विजयाचं आणि फायनलचं पण गंभीरला जेव्हडं श्रेयं मिळायला हवं होतं तेव्हडं मिळालं नाही असं माझं पर्सेप्शन आहे >> पण इंडीया टीव्ही वर तसा पोल येईतो त्याला किम्मत नाहि रे Wink

“ शर्माला खाली आणणे मला पटले नाही. तो ट्रेंड सेटर आहे ह्या एक्स्प्लोसीव्ह बॅटींगचा. जय्स्वाल नि त्याने ओपन करून गिल ने खाली यायला हवे होते (खरे तर गिल टी २० मधे सध्याच्या आपल्या फिलॉसॉफीमधे बसतो का असा प्रश्न मला आता पडू लागलाय” - ह्या सिरीजमधे शर्मा आणि जैस्वालने ओपन करायला हवं असं मलाही वाटतं. गिल आणि ऋतुराज दोघंही एकत्र पूर्ण स्ट्रेंथ च्या टी-२० टीममधे खेळणार नाहीत बहुदा.

“ खेळाडून म्हणून ठिक होता,” - त्याची कदाचित विस्मरणात गेलेली आणखी एक इनिंग म्हणजे त्याने न्यूझिलंडमधे एकदा एक मॅरॅथॉन शतक मारून (जवळ जवळ दोन दिवस बॅटिंग करून) टेस्ट वाचवली होती. २००७ आणि २०११ वर्ल्डकप फायनल्स इतकीच मला त्याची ती इनिंग नेहमी आठवते. बिग मॅच प्लेयर!

अरे किती घाई Happy
पुन्हा वाचा माझी आधीची पोस्ट
..
रोहीत शर्मा 2027 वन डे वर्ल्डकप ला कर्णधार असावा अशी इच्छा बरेच जण व्यक्त करत आहेत...
...

याच पोस्ट ला प्रमाण म्हणून एक स्क्रीन शॉट टाकला.
बाकी सर्वांकडे गुगल असेलच. रोहीत शर्मा 2007 वर्ल्डकप कप्तान वगैरे टाकले की समजेलच याची किती चर्चा चालू आहे. आणि इतकेच वर म्हटले होते. लगेच त्यामुळे बोर्डाने निर्णय घ्यावा असे म्हटले नाहीये.
सचिनला क्रिकेटप्रेमी देव मानतात म्हणून बोर्डाने लगेच त्याचे मंदीर बांधायला हवे असे कोणी म्हणणार नाही.
असो...

पण एकीकडे तुम्ही लोकं गंभीरचे कोहली रोहित या सिनीयरशी कसे जमेल यावर चर्चा करता आणि दुसरीकडे गंभीर त्यांचे करीअर कधी संपवायचे हे ठरवून तशी अट घालूनच कोच झाला यावर सुद्धा विश्वास ठेवता.. हे सत्य असणे शक्य तरी आहे का? Happy

२०२७ ला रोहित शर्मा परत एकदा झेंडा गाडणार आहे. रोहित खेळणार असेल तर क्रिकेट बघण्यात मजा असते. हे गिल आणि गायकवाड जयस्वाल काय कामाचे नाहीत.

Trophies won under MS Dhoni's captaincy

World T20 2007
Gambhir:Leading run scorer for Ind
75 in the final vs Pakistan

CB series 2008
Gambhir:Leaving run scorer in that series

India first time became no.1 in test 2009
Gambhir: Most test runs for Ind in 2008-09
No.1 test player at that time
ICC test player of 2009

India won test series in NZ after 41 years
Gambhir:Most runs in that series, and a historic match saving knock

India won Asia cup 2010
Gambhir: Most runs for Ind in that tournament with most MOTM

India won world cup 2011 after 28 years
Gambhir: 2nd highest run scorer for India and 97 in the final vs SL

Gautam Gambhir the untold story Happy

After Rahul Dravid, Rohit Sharma also decides to give his ₹5 Crore prize money, Indian captain unhappy with support staff's bonus

https://m.thesportstak.com/cricket-news/after-rahul-dravid-rohit-sharma-...

*दानशूर रोहित शर्मा*

एक ही तो दिल है कितनी बार जीतोगे भाई

ही माणसे खेळाडू म्हणून लिजेंड आहेतच. त्याच सोबत माणुसकी आणि खिलाडूवृत्तीची फुटपट्टी लावता फार पुढे गेली आहेत !

यशस्वी जयस्वालचे शतक होऊ द्यायला हवे होते गिलने..... रेकॉर्डसाठी खेळू नये वगैरे सगळे ठीक आहे पण तो शतकाच्या इतक्या जवळ असताना, मॅचच्या रिझल्टवर परिणाम होण्याची काही शक्यता नसताना, NRR वगैरेचीही काही भानगड नसताना अशी अपेक्षा ठेवायला हरकत नसावी!!
स्वताचे अर्धशतक झाल्यावरही त्याने (इतरांची तोंडे बंद केली अश्या अर्थाचे) जे काही हावभाव केले ते आवडले नाहीत!!

Pages