ऑनलाईन खरेदी आणि आपण

Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11

सध्या फ्लिपकार्ट , अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.

**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो पण आधी मध्यम, श्रीमंत दोन्ही स्तरातली लोक घड्याळ गिफ्ट देणं पसंत करायचे. मेनली अ‍ॅनीव्हरसरी गिफ्ट/ साखपुडा गिफ्ट वगैरे.
तर आता खरेदी वर्ग फक्त स्टुडन्ट ग्रूप च उरला ..

सर्व घड्याळ कंपनीज स्मार्ट वॉच कडे चालल्याच आहेत.याच्या पुढचा फॅशन ट्रेंड जास्तीत जास्त नाजूक दिसणाऱ्या स्मार्ट रिंग आणि स्मार्ट लॉकेटस असेल बहुतेक.रिंग अलरेडी चालू झाल्या फिटर आणि इतर कंपनीज च्या.
(मध्ये एक अमेझॉन इंडिया वर ice डिव्हाईस ब्रेसलेटरुपात आला होता.कल्पना अशी की डिव्हाईस वर बारकोड मध्ये मेडिकल माहिती, इमर्जन्सी नंबर्स असतील.अपघात झाल्यावर, किंवा माणूस बेशुद्ध असल्यावर इतरांनी ब्रेसलेट स्कॅन करून ऍप वर माहिती मिळवायची.पण आपल्या इथे लोक व्हिडिओ बनवतात किंवा पळून जातात.त्यामुळे याची विक्री झाली नाही.)

बिग बास कर ती बास्केट रोज नोटिफिकेशन्स पाठवत असतात . कधी दहा रु. चे स्टोअर कध्यी काय. आज २९ रु. चे स्टोअर होते. त्यात सर्व भाज्या पाव पाव किलो, बाकी प्याक बंद मालाची छोटी पाकिटे असला चिल्लर माल होता. तरी ३०० प्रोड्क्ट होते. हे मला बरे पडते मग थोडी बहुत खरेदी केली. ह्या नोटिफिकेश्न्स वर लक्ष ठेवत चला.

आज अमॅझॉन वर असंबद्ध खरेदी केलेली आहे. मेंदी कोन्स, कुंकु कलर, एक मण्यांची लाइन, ह्या पासुन ज्वेलरी बनव ता येते. कानातले बनवायचे साहित्य. मणी आहेत दोरा आहे बाकीचे साहित्य. गार्बेज बॅग्ज.

अजुन काहीत्री चिल्लर आहे विसरले.

परवा मागिवलेले सर्व डॉग ट्रीट्स खतम. किती महाग आहेत. आता १५ दिवस वाट बघीन.

अली एक्स्प्रेस आता किती महाग झालंय?
एकेकाळी मी त्यावर २ रुपयात कानातले आणि ७ रुपयात पूर्ण नेकलेस सेट घेतला होता.

एवढ्यात कोणालातरी सेम नेकलेस हवा होता म्हणून बघायला गेले तर सेम दुकानांसारख्याच किमती होत्या सगळ्याच गोष्टींच्या. {हा काळ म्हणजे जेव्हा दक्षिणा ने इथे (बहुतेक याच धाग्यावर) अली एक्स्प्रेस वरून खूप स्वस्तात टॉप मागवण्याचा आणि मग मोठी साइझ मागवल्यावर व्हेंडर दोन्ही टॉप तुम्हीच ठेवा म्हणाला होता तो काळ. एवढे लक्षात राहिले कारण हा किस्सा ऐकून माझ्या एका बारीक मैत्रिणीने मला सांगून ठेवले होते की तुझ्याबाबतीत कधी असे झाले तर लहान साईझ वाले कपडे मला दे. Lol }

चायनीज वस्तूंवर अँटी डम्पिंग ड्युटी वगैरे आली की काय मधल्या काळात माहित नाही. एवढ्यात एका मैत्रिणीने त्याच्यावर पत्र्याच्या डब्याच्या आकाराची घरे विकायला आहेत याचे फोटो पाठवले होते. ते लाखात वगैरे होते.

frido कंपनीची ulimate comfort वाली उशी कोणी वापरली आहे का ? कशी आहे? मला एक tempur pedic सारखी किंवा चांगली मेमोरी फोम ची उशी भारतात हवी आहे. किंवा दुसऱ्या कोणत्या चांगल्या कं ची असेल तर कृपया सुचवा

Adore by Priyanka वरून earrings कधी कोणी ऑर्डर केली आहेत का? मला छान वाटली ..specially रेन ड्रॉप earrings... किंमत जरा जास्त वाटतीये. अजून एखादी चांगली साईट असेल earrings साठी तर सुचवा

मायबोली आयडी अनुष्काने वापरला आहे हा ब्रँड, एकदा विचारा तिला.(अडोर च्या किमती पाहिल्या नाहीत, पण कॅरटलेन शाया पण एकदा बघता येईल, आणि पीएनजी गार्गी.
अरे हो, आठवलं.फ्रिडो च्या उश्या आणि वेज पिलो आहे आमच्याकडे, बराच वापर होतो.झोपेच्या प्रतीत मला फरक नाही वाटला, पण नवऱ्यामते खूप फायदा होतोय.
मी फ्रिडो ची उशि मानपट्टी डोक्याच्या बाजूला आणि उंच डोक्याची पट्टी मानेखाली असं वापरते, ते जास्त आरामदायी वाटलं.

Adore by Priyanka >>>
मी तिथून एक मोत्याचा चोकर, रिंग आणि ईअररिंग पण घेतली आहे. किंमत थोडीशी जास्त आहे. मी voylla, ajio, amazon वरून ऍक्सेसरीज घेतल्या आहेत. साधारण सर्व साईटवर अशीच रेंज असते. दुकानातही फारसा फरक पडत नाही. उलट कधीतरी चांगली ऑनलाईन डील मिळते.

PNG Gargi मध्ये मंगळसूत्र आणि earrings असा कॉम्बो मिळत नाहीये आणि मंगळसूत्र सुद्धा सर्व १८ इंची आहेत.
पण सुरेख आहेत डिझाईन्स...

PNG वाले मराठी माणसांना प्रिय असले तरी कॉर्पोरेट/ऑफिस वेअर ज्वेलरी बाबत फारसे फ्लेक्झिबल नाहीत.(म्हणजे, आर्थिकदृष्ट्या त्यांचं बरोबर आहे, भरभक्कम वजन सोनं घेणारं गिऱ्हाईक = जास्त फायदा=जास्त व्हरायटी आणि लक्ष पुरवणे.)मला हल्ली png मध्ये गेल्यावर खुदाई खिन्नता येते.आपलं बजेट किंवा मागणी ('सोनं सोनं असं खूप बटबटीत दिसायला नाही पाहिजे, किंवा सोनं चांदीसारखं व्हाइट गोल्ड दिसेल असं दाखवा' म्हटलं की ते नाक उडवून हूँ करून शेजारच्या ठसठशीत ठुशी घेणाऱ्या गिऱ्हाइकांकडे वळतील असं.त्यांचे सेल्स वाले चांगले ट्रेंड असल्याने त्यांचं नाक उडवून हूँ बरंच सटल असतं.)
अगदी सोनं नाही, गार्गी किंवा png सिल्व्हर मध्येही त्यांची डिझाईन्स थोडी ओल्ड स्कुल असतात.
चांदी ज्वेलरी साठी डिझाईन्स म्हणून कॅरटलेन त्या मानाने आवडलं आहे.किंवा पीओरा.

गार्गी कलेक्शनमधले दोन इअरिंग्ज नवऱ्याने परस्पर एकदा आणले होते. (सवाई गंधर्व महोत्सवात बाहेर हाही स्टॉल होता!) फारच छान आहेत ते. पण नंतर मी लक्ष्मी रोडवरच्या दुकानात जाऊन बघितलं तर एकही घेण्याइतपत आवडलं नाही. चांगली होती डिझाइन्स पण माझ्या आवडीची नव्हती. तिथला माणूस म्हणाला की फर्ग्युसन रोडवरच्या दुकानात जाऊन पहा. पण तेव्हा वेळ नव्हता. आता ऑनलाइन बघणार आहे.

VLCC skin tightening facial kit for inr 130.I did this home facial today. Quite nice. And felt much better.IMG_20240619_163301_0.jpg

गार्गी कलेक्शनमधले दोन इअरिंग्ज नवऱ्याने परस्पर एकदा आणले होते>> किती बाई नशिबवान Wink

मी मोरतंत्र नावाच्या साईट वरून १ मोती/कुंदन चोकर मागवला आहे.. अप्रतिम आहे दिसायला. https://mortantra.com/products/tr-n269m-multicolor-gold-plated-necklace?...
हा माझाय. कुणाला नशा वगैरे होत असेल तर साईट व्हिजिट करू नये Wink Lol

सोन्या चांदी साठी मलबार गोल्ड च ऑप्शन इथे आहे. भारतात मुंबईत पार्ल्यात घेते, हर्चेकर, मुसळूण कर वगैरे. क्वालिटि अप्रतिम असते. शिवाय मराठी माणसाला हातभार.

मोरतंत्रवरून आठवले. द अमेथिस्ट स्टोअर वर फार छान गोष्टी दिसताहेत. कुणी घेतले असतील तर अनुभव सांगा. त्यांची डिलिव्हरी अल्मोस्ट ३० दिवसांनी मिळते म्हणून धीर होत नाही. बरेचदा तिथे जाऊन कार्ट भरून ठेवते.

द अमेथिस्ट स्टोअरमधून मी काही घेतलेलं नाही पण एक ओळखीची मुलगी आहे ती भरपूर घेते. चांदीचं घ्यायचं असेल तर चिक्कार हँडल्स आहेत इन्स्टावर वगैरे.

ओह.. धन्यवाद.
हे माहिती नव्हतं.
डिझाईन्स मस्त आहेत खरं.

मी अनु माझी आठवण काढलीस की काय आडोर बाय प्रियांका साठी????
आडोर बाय प्रियांका खरंच चांगलं आहे...
मी बऱ्याच गोष्टी मागवल्यात आणि चांगल्या आल्यात...
फक्त 100 rs चे शिपिंग चार्जेस आहेत 1200 च्या आत काही मागवलं तर.... रक्षाबंधन, बड्डे वगैरे गिफ्ट्स कारणासाठी द्यायला एकदम योग्य

एमेझॉन वरील कपड्यांचा मला चांगला अनुभव नाही आला....
मिंत्रा वर कपडे चांगले मिळतात... एक्स्चेंज / रिटर्न पॉलिसी खूप सोपी आहे., रिटर्न चे पैसे पण 2 दिवसात अकाउंट ला येतात... कधी कधी तुक्के पण लागतात... जसे flying मशीन ची 1800 ची जीन्स मला 450 रुपयात मिळालेली आहे... शिवाय हल्ली बॅगीज आणि क्रॉप टॉप ची फॅशन परत आलीय... तर अगदी 1000 च्या आत जीन्स टॉप दोन्ही येतात... शिवाय क्वालिटी ए वन... कॉलेज गोइंग मुला मुलींसाठी एकदम बेस्ट... मी माझ्या मुलीसाठी मिंत्रा वरून क सर्व शॉप करते...
नायका ची रिटर्न पॉलिसी मला चांगली वाटत नाही. कपडे चांगले असतात पण किमती महाग आहेत...
अजिओ पण चांगलं आहे..

सिल्वर चे दागिने मला ऑनलाईन फार महाग वाटतात...
मी पायातला चांदीचा कडा बघत होते तर 5000 च्या पुढे क सगळे.. पण रांका मध्ये मला तो 2000 ला पडला...
लोकल सोनार लोक चांदीचे कानातले वगैरे ठेवतात... ते चांगले असतात. स्टरलिंग नसते ते. अद्या , मोहा वगैरे खूप महाग आहेत.. अर्थात त्या डिझाईन चे पैसे आहेत ते...
अद्या कडून मी गेल्या वर्षी चांदी ची राखी मागवलेली. 600 ची इवळूशी राखी लाल धाग्यातली. शिवाय राखी चा जो पेंडंट ( काय म्हणतात मधल्या भागाला ज्याला दोरा बांधलेला असतो ) ते चक्र एक सेंटीमीटर व्यासाच होतं... आणि पातळ पत्र्यासारखं होतं त्याला धार होती. 650 रुपयाच्या मानाने अगदीच सुमार...

Giva महाग आहे पण सुंदर आहे. चांदीच्या नाजूक गळ्यातल्या साठी मस्त आहे. मी २ घेतलेत.
.
Everstylish भंगार आहे. जेवढं छान चित्रामध्ये दिसतं तेवढं तसं product येत नाही. तुटलेलं कानातलं आलं. मग return करावं लागलं.

Hi
Kuni online furniture especially garden furniture magavle aahe kay ? Kontya websites- products changle ? Anubhav Kasa ? Please share.

Pages