Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11
सध्या फ्लिपकार्ट , अॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.
**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चांगल्या ट्राउजर्स साठी
चांगल्या ट्राउजर्स साठी पॉवरसूत्रा (वेगळे काही आठवू नका) पण बघा.किमती जास्त आहेत पण डिस्काउंट चालू असताना घेतल्या तर कपड्याची प्रत आणि शिवण चांगली आहे.
https://www.powersutra.co/collections/women-trousers
वेगळे काही आठवू नका >>> हे का
वेगळे काही आठवू नका >>> हे का लिहिलंस? आता तेच आठवतंय
https://www.myntra.com
https://www.myntra.com/29431038?skuId=94583376&sellerPartnerId=9114&orde...
हि मॅक्स ची सुद्धा ट्राऊजर माझ्याकडे आहे अति म्हणजे अति हलकी आणि फिटिंग वगैरे सुंदर , किंमत पण कमी .
फक्त जरा पारदर्शक आहे पण हिप कव्हरिंग टॉप घातला कि काम व्हायला हरकत नाही किंवा लॉन्ग कुर्त्या खाली पण चालून जाईल
वेगळे काही आठवू नका >>> हे का
वेगळे काही आठवू नका >>> हे का लिहिलंस? आता तेच आठवतंय >>>>
कमाल चावट बायका आहेत
मला तर वेब साईट उघडेपर्यंत
मला तर वेब साईट उघडेपर्यंत धाकधुक होती समोर काय दिसेल
मुलीसाठी असंच काहीतरी हवं
मुलीसाठी असंच काहीतरी हवं होतं. Thanx
या किंमती ठीकच आहेत ना?
फिटबिट व्हर्सा 2, क्रोमा
फिटबिट व्हर्सा 2, क्रोमा मध्ये सेल मध्ये घेतलेले.हे मॉडेल बंद झाल्याने याला चांगला डिस्काउंट होता.
9 ते 10 महिन्यात अतिशय व्यवस्थित काळजी घेऊन, कधीही ओव्हरचार्ज न करून, वॉटर रेझिस्ट (प्रूफ नव्हे) करणारे असले तरी अगदी पावसात भिजू न देता आत प्लास्टिक मध्ये ठेवणे इतकं करूनही डिस्प्ले डॅमेज झाला.पहिले अपडेट होणे बंद झाले(म्हणजे डिस्प्ले वर एक स्थिर आकडा दिसून ऍक्टिव्हिटी फक्त ऍप मध्ये), आणि मग डिस्प्ले थोडा थोडा करून पूर्ण कोरा झाला.अगदी ऍप मध्ये अपडेट होत होता तोवर आम्ही चालवून घेत होतो.मग नाईलाज झाल्यावर क्रोमा मध्ये दाखवायला नेले ते म्हणाले थेट फिटबिट ला कॉन्टॅक्ट करा.मग हे चक्र पूर्ण केले, यात बरेचदा इश्यू आपोआप बंद होणे, मग परत कॉल सेंटर किंवा बॉट ला पूर्ण केस समजवावी लागणे हे प्रकार 5 वेळा झाले.नंतर फिटबीट ने 'आता आम्ही गुगल झालो-गुगल चा इश्यू' आणि गुगल ने 'आम्ही फिटबीट आहे पण आम्ही वॉच चे इश्यू घेत नाही' म्हणून विश्वामित्र मेनका बनून वॉच रुपी शकुंतला बाळाची जबाबदारी नाकारणं हे झालं.
25 मे 2024 पासून चालू असलेल्या अखंड फॉलोअप, टिकेट्स, बॉट, कॉल सेंटर, इंस्टा वर फॉलोअप, जीमेल वर माझ्याकडून पाहिले नम्र, मग असर्टीव्ह, मग हताश, मग सौम्य धमक्यांची(बघा हां, लवकर रिफंड द्या नाहीतर मला हायर चॅनल ला जावे लागेल) अनेक मेल्स झाल्यावर 24 ऑगस्ट रोजी फिटबिट चा 156 डॉलर चे भारतीय पैसे + gst करून रिफंड खात्यात जमा झाला आहे.
एरवी इतकी लढाई केली नसतीही.पण फिटबिट चे 2 डिव्हाईस अतिशय नीट काळजी घेऊनही याच प्रकारे बाद झाले. त्यामुळे यावेळी नेटाने पैसे मिळवले.आता एम आय वॉच आतापर्यंत चालू आहे.पण एम आय चे एकंदर आयुष्य पाहता 3 वर्षं डिव्हाईस चालला तरी भरपूर.
अनेक मेल्स झाल्यावर 24 ऑगस्ट
अनेक मेल्स झाल्यावर 24 ऑगस्ट रोजी फिटबिट चा 156 डॉलर चे भारतीय पैसे + gst करून रिफंड खात्यात जमा झाला आहे.>>> शाब्बास अनू, पुन्हा एकदा चिकाटी ला सलाम.
फीटबीट व्हर्सा माझ्या कडे ही आहे, साधारणतः १५-१८ हजार रेंज वाले घड्याळ ३ वर्ष टिकावे ही अपेक्षा गैर आहे का? माझे तसे टिकले आहे.
ह्या पुर्वी कंपनी ने दिलेले फिटबीट चेच होते ते २ वर्ष टिकले..
तुझ्या अनुभवांवरून- लढले तर आशेचा किरण दिसू शकतो, असे वाटते
माझे 12 चे(आणि क्रेडिट कार्ड
माझे ( क्रेडिट कार्ड चा काहीतरी डिस्काउंट किंवा एका नातेवाईकांचा आयडी कार्ड वापरून टाटा डिस्काउंट करून) 11700 चे होते, व्हर्सा 2 मॉडेल बंद झाल्याने डिस्काउंट होते.
(राजकारणी लोक सारखे विधान बदलतात तसं मी सारखा प्रतिसाद बदलते आहे.विचार करून विचार प्रवाहात.आता कामे करते.)
आणि मुर'स लॉ किंवा सिस्टम ऑन चिप चा लाईफस्पॅन काहीही म्हणूदे(चिप चं आयुष्य 2 वर्षं वगैरे), मी भारतीय रुपये कमावून चांगल्या फीचर्स चं म्हणून परदेशी कंपनीचं 10000 पेक्षा महाग स्मार्ट वॉच किंवा काही डिव्हाईस घेत असेन तर तो किमान 3 वर्षं आणि कमाल 5 वर्षं चांगल्या युजेज ने टिकला पाहिजे अशी अपेक्षा असेल.त्यांना असे डिव्हाईस बनवणे जमत नसेल तर मग क्वालिटी ची तडजोड करून कमाल 5000 च्या आत उपलब्ध देशी किंवा चिनी पर्याय निवडणे भाग असते.आता एम आय वॉच निवडले आहे, तेही चांगले आहे.फिटबिट ची अधून मधून आठवण येते हार्टबिट आणि स्लीप ऍक्युरसी साठी.
काल Autofegi Soft Gelatin
काल Autofegi Soft Gelatin Capsule च्या ऑनलाईन साईटवर प्रॉडक्ट वर क्लिक केलं तर साईटवर काही तरी गोंधळ झाला . त्यामुळे पुन्हा पुन्हा क्लिक केलं तर अचानक जी पे रजिस्ट्रेशन चालू झाल्याचे दिसले. त्यानंतर एका फोनवरून अगम्य मेसेज आला. ताबडतोब युपीआय अॅप्स डिसेबल करून टाकले. इथून पुढे डेबीट कार्ड किंवा कॅशने व्यवहार करण्याचे ठरवले आहे. सावध किती रहायचे याला पण मर्यादा आहेत.
खरं आहे.हा संदेश ऑनलाइन स्कॅम
खरं आहे.हा संदेश ऑनलाइन स्कॅम च्या धाग्यावरही टाका.तिथे चर्चा करू.
ग्रीनटोकरी
ग्रीनटोकरी
यांच्या सासवड जवळच्या फार्म वर साईट टूर केली होती 2019 मध्ये.मिंट कोरिएंडर सॅलड ड्रेसिंग खूप चांगलं आहे.आणि फायरी डियाब्लो सॉस.जॅम पण चांगले आहेत पण मुद्दाम घेत नाही.
तर ग्रीन टोकरी ला लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन ऑर्डर दिली होती.पण नंतर त्यांचा संदेश आला की आम्ही फक्त औंध पर्यंतच पोहचवू, स्टोअर मधून घेऊन जा.मग त्यांना रिफंड द्या म्हटलं, त्यांनी दिला.
आता त्यांनी बरीच चांगली प्रॉडक्ट आणली आजेत.म्हणून ऑर्डर केलं, मग एका आठवड्याने त्यांच्या बाईचा संदेश आला की सामान मिळालं का, तिला म्हटलं अजून नाही.आणि त्या रात्री समान आलं.कळवायला विसरले.मग एकदा आम्ही बाहेर असताना तेच सर्व सामान परत आलं.म्हटलं जाऊदे यांची चूक आहे.नको कळवायला.पण मग मेरा जमीर मुझे धुतकारने लगा. मग बाईला परत व्हॉटसप वर सर्व रामायण समजवलं. तुम्ही सर्व ऑर्डर डबल पाठवली आहे, पण माझ्यात आता रिटर्न पिकअप चे व्याप करण्याचे त्राण राहिले नाही, माझ्याकडून परत पैसे मागा मी देते सांगितलं.मग परत पे केले.
आता हे ठीक आहे.पण इतकी प्रॉडक्ट डबल घेऊन संपवायची कशी?मग त्यातली काही नातेवाईकांना वाटली.
म्युसली(केलॉग नो ऍडेड शुगर) हे अतिशय आवडतं खाद्य.तर ग्रीन टोकरी वाली दुप्पट म्युसली आली आहे.त्यात भारतीय संस्कृती टाकायला त्यांनी शेंगदाणे आणि चिवड्यात असतात तसे सुके खोबरे काप टाकले आहेत.हे भारतीयीकरण जिभेला अजिबात रुचले नाही.एक पाकीट रोज थोडे थोडे दह्यात ओव्हर नाईट भिजवून संपवून दुसरे मिक्सरमधून काढून केक थालीपीठ धिरड्यात संपवेन.
अनु चे शॉपिंग व रिटर्न चे
अनु चे शॉपिंग व रिटर्न चे अनुभव ह्यावर पुस्तक होईल.
पण भरपूर संयम आहे खरंच
हो खरंच.हल्ली बाहेर जाणे(आणि
हो खरंच.हल्ली बाहेर जाणे(आणि ऑफिस मध्ये चालणे) सोडून जास्त आजूबाजूला जाणे होत नाही.जवळचे ग्रोसरी शॉप वैताग आहे.तिथे एका वेळी 4 माणसे असतात.त्यातला एक सिनियर सिटीझन्स शी गप्पा मारत असतो दुसरा फोनवर असतो तिसरा आत स्टॉक करत असतो आणि चौथा बिल करणारा पंटर नवा असल्याने सगळ्यांच्या किमती आजूबाजूला विचारत असतो. हव्या असलेल्या गोष्टी मिळत नाहीत.त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग वर बरेच रुटीन चालते.
मेरा जमीर मुझे धुतकारने लगा>>
मेरा जमीर मुझे धुतकारने लगा>>
पुलंचा माझे ग्रहयोग की काय
पुलंचा माझे ग्रहयोग की काय उल्लेख आहे ना? शत्रूपक्ष मध्ये? किंवा मला चुकीचे आठवत असेल.
तसे अनुचे online शॉपिंग चे ग्रहयोग चेक केले पाहिजे.
सुपरबॉटम म्हणून लहान मुलांचा
सुपरबॉटम म्हणून लहान मुलांचा डायपर चा ब्रॅण्ड आहे . कोणी वापरला आहे का ? काय अनुभव ?
https://superbottoms.com/products/newborn-uno-cloth-diaper-3-dry-feel-la...
अनु, त्यापेक्षा शेंगदाणे आणि
अनु, त्यापेक्षा शेंगदाणे आणि खोबरे वेचून वेचून बाजूला काढ आणि नॉर्मल म्युसली सारखे खा ना
हो तसेच करावे लागेल.खूप आहेत
हो तसेच करावे लागेल.खूप आहेत
जाई, सुपर bottom चांगले आहे.
जाई, सुपर bottom चांगले आहे. मी खरंतर श्री ला pampers च वापरले होते पण माझी एक मैत्रीण ह्या कंपनीत मार्केटिंग मध्ये होती तिने मला ह्याचे सगळे प्रोडक्ट, क्लोथ डायपर स्मॉल टू बिग साईज असा सेट दिला होता. ज्यातील बिब्स आणि नि सपोर्ट मी श्री साठी वापरले अन डायपर वहिनीला दिले, तिचा अनुभव चांगला होता पण ते डायपर नीट धुवून सुकायला खूप वेळ लागतो
अच्छा VB , नोटेड . थँक्स
अच्छा VB , नोटेड . थँक्स
मागवून पाहते
Superbottom तितकेसे वापरले
Superbottom तितकेसे वापरले जात नाहीत.
सुकत नाहीत आणि लगेच लहान होतात कारण बाळ लवकर मोठे होते.
मी घेतले होते
Everstylish वरून गळ्यातल्या
Everstylish वरून गळ्यातल्या चेन्स पेंडंट चे, ब्रेसलेट घेतले होते. दोन वापरात ब्रेसलेट चा रंग गेला आणि तुटलं.
चेन पहिल्यांदा घातली नी गळ्यातून तुटून थेट हातात आली.
.
सुंदर दिसत आहेत म्हणून घेतले आणि फसले
१ पुजा ज्वेलरी म्हणुन मुलुंड
१ पुजा ज्वेलरी म्हणुन मुलुंड वेस्ट ला स्टेशन जवळ मोठे दुकान आहे, दुमजली. चमक दमक बघून ३ हजाराचे स्टोन वाले (पॉलिश हमी असलेले) बँगल्स घेतल्या. पण न वापरता ६ महिन्यात गोल्ड काळे पडले, परत दुकानात पॉलिश ला नेले तर उडवा उडवी उत्तरे मग ऑर्डर नंबर दाखवला, तर म्हणे ह्यावर गोल्ड फिनीश राहत नाही, मग प्लॅटिनम्/सिल्व्हर प्लेटींग करून दिले.
पण परत कधी काही घेणार नाही. शक्यतो टाळा खरेदी इथुन. टिपिकल गुजराती गोड गोड भुलथापा & चमकदमक आहे बाकी काही नाही.
त्यापेक्षा दिनानाथ खाली जी छोटी शॉप्स आहेत पार्ल्याला तिकडून किडुक मिडुक घेतलेले पण बरीच वर्ष चमक टिकून राहिली, कधी घेतले न आठवे इतपत.
मला पीओरा किंवा इस्टेल ची ओके
मला पीओरा किंवा इस्टेल ची ओके वाटली इमिटेशन किंवा पॉलिश ज्वेलरी.
ब्रेसलेट चं पॉलिश 5 वर्षांपासून टिकून आहे.अर्थात मधल्या काळात ते हरवलं होतं त्यामुळे वापर नव्हता, त्यानेही जास्त टिकलं असेल.
लुमिअर (https://www.facebook.com/lumiereartandcrafts) चे कागदी रंगीत आयटम वापरते ऑफिस ला.पण त्यात जरा लांब प्रकार जास्त हवे.गोल आकार जास्त आहेत.बहुधा त्या आकारात डिझाईन काढणे, व्यक्त करणे जास्त सोपे जाते.नीलम आणि सॅप या अतिशय गुणी कलाकार आहेत.
बाकी कापडी, ठसठशीत आयटम भरपूर आहेत घरी, पण फार वापरायची वेळ येत नाही.ते वापरता येतील अश्या साड्या घ्यायला हव्या.
पीओरा किंवा इस्टेल>> ऑनलाईन
पीओरा किंवा इस्टेल>> ऑनलाईन आहेत का?
नालेसाठी घोडा घेणे
ते वापरता येतील अश्या साड्या घ्यायला हव्या.>>>
(No subject)
https://www.google.com/url?sa
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&opi=89978449&url=https:...
https://estele.co/collections/jewellery?srsltid=AfmBOoquqDWrnx1C4lcq-B02...
सुपरबॉटम म्हणून लहान मुलांचा
सुपरबॉटम म्हणून लहान मुलांचा डायपर चा ब्रॅण्ड आहे . कोणी वापरला आहे का ? काय अनुभव ? >> सुपर बॉटम मस्त आहे. क्लॉथ डायपर्स बेस्ट. आणि इतर ही गोष्टी.
सुकण्याचा थोडा इश्यू आहे. पण ड्रायर मध्ये पण टाकता येतात.
त्यांचे trial किट्स येतात. आणि ते स्वतःही घरी येतात consultation साठी. नक्की वापरून पाहा.
अनु खतरनाक चिकाटी आहे.
अनु खतरनाक चिकाटी आहे.
आम्ही सध्या अमेझॉन सोबत रिटर्न - रिटर्न खेळतोय, २७ जुलै पासून. एक सोफा कम बेड ऑर्डर केला होता. त्याऐवजी १४kg असा स्टॅम्प असलेला १२*१२ च कुशन डेलिवर झालंय. कस्टमर केअर, एफबी वर एस्कलेट करून झालंय. काही रिस्पॉन्स नाही. "एकच वादा, रिटर्न उद्या". पण तो उद्या उगवत नाहीये.
आता शेवटचा पर्याय म्हणून ग्रिवांस ऑफिसर ला मेल करणार. रिटर्न झालं तर ठीक नाही तर कन्सुमर कोर्ट.
कुणाला अनुभव आहे का अजून काही करता येईल म्हणजे रिटर्न होईल, आणि रिफंड मिळेल.
Pages