Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11
सध्या फ्लिपकार्ट , अॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.
**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नायका वर sale चालू आहे म्हणून
नायका वर sale चालू आहे म्हणून बघायला गेले तर जे हवे आहेत ते प्रॉडक्ट्स महागच आहेत.
Curly hair care ची range कार्ट मध्ये टाकून ठेवलीये पण विकत घेण्याची हिंमत होईना
रिलायन्स ने शेन.कॉम घेतली
रिलायन्स ने शेन.कॉम घेतली म्हणे.>.> हो या डीलबद्दल काही महिन्यांपूर्वीच वाचलेले आठवते.
मग आता टिकटॉक पण परत येईल का ?
पण अमेरिकेत तरी शीन पेक्षा टिमू (temu.com ) जोरात आहे. मी पण टिमूवरून भरपूर फुटकळ गोष्टी मागवल्या आहेत. काही पर्याय तर अमेझॉनच्या तोंडात मारतील एवढे स्वस्त असतात.
शीनचे कपडे तेच तेच असतात. पण व्हेकेशन शॉपिंग साठी बेस्ट.
शीनचे कपडे तेच तेच असतात. पण
शीनचे कपडे तेच तेच असतात. पण व्हेकेशन>>> ++१११ मला शीन चा कंटाळा आलाय. मटेरियल फारच सींथेटिक सारखे असते. सिंगापूर ला शीन ३-४ वर्षांपासून आहे. इतके घराघरात घुसलेय की मालकिणी & कामवाल्या बायका दोन्ही शीन वरून कपडे मागवतात
मी बरेच व्हेकेशन्स., ऑफिस वेयर, घरगुती कपडे, मुलीसाठी जीन्स शीन वरून मागवले होते. जीन्स तर ६०-७०% कमी किम्मतीत आहेत & बर्या टिकतातही.
भारतात कोणते बरे ऑप्शन्स आहेत ओलाईन कपड्यांसाठी? माईंत्रा - साईझ इशू जाणवला, फ्लिपकार्ट- जास्त व्हराईटी नाहीत.
आजीओ , सिलोरी (कुर्तीज
आजीओ इथे स्वस्त किंवा ब्रान्डेड महाग दोन्ही प्रकारचे कपडे मिळतात. त्यांचे लक्झरी वर्जनपण आहे. मी वापरले नाही, सिलोरी (कुर्तीज किंवा सलवार कमीज बरे मिळतात इथे), फेबलस्ट्रीट (वेस्टर्नवेअरसाठी. पण हे सिंथेटिक असतात. यांच्याकडे टॆलर्ड ऑप्शन आहे ठराविक कपड्यांसाठी. ऑप्शन सीलेक्ट करून मापं द्यायची. जरा जास्त वेळ आणि थोडे पैसे जास्त लागतात.) यांची पिंकफोर्ट ही बहीण कंपनी आहे आणि तिथे नॅचरल फायबर्समधले कपडे असतात.
अर्बनीक पण आहे.वेस्टर्न कपडे
अर्बनीक पण आहे.वेस्टर्न कपडे बरे दिसतात.
https://m.in.urbanic.com/
धन्यवाद माझेमन & अनू
धन्यवाद माझेमन & अनू
मी सुद्धा हल्लीच shein वरून
मी सुद्धा हल्लीच shein वरून इथे बाजारात न मिळणाऱ्या किंवा अती महाग फुटकळ गोष्टी स्वयंपाकघर a साठी मागवल्या. लालबागaत किंवा किर्तीकर मंडईत याहून छान मिळतील असे वाटलं.
तसेच मुलांसाठी कपडे मागवले, त्यांचे स्विमिंग चे कपडे बरे निघाले पण शर्ट ची गुणवत्ता बरी वाटली नाही. तसेच एकच वयाच्या कपड्यानच्या मापात बराच फरक दिसतो.
त्यामुळे पुन्हा shein वरून मुलांसाठी कपडे मागवायचे नाही असं ठरवलंय.
पुढच्या वेळी तेमु वापरून बघेन, इथेही ओळखितले काही जण वापरतात, सारखी जाहिरात पण येते.
meesho आणि shein मला तरी गुणवत्तेचा भरवसा नाही , नशिबाने चांगला माल मिळाला तर मिळाला असे वाटते.
भारतात अजिओ , Amazon आणि मिंत्रा चा अनुभव बरा आहे.
टीमू काही तरी चाईल्ड अब्युज
टीमू काही तरी चाईल्ड अब्युज ची केस रिलेटेड असल्याचं कुठेतरी वाचल्याचं आठवतंय त्यामुळे ती साईट अजिबात वापरावी वाटत नाही.
माईंत्रा
मिंत्रा गं मिंत्रा
घरी चार चार online आणि चेन
घरी चार चार online आणि चेन सुपरमार्केटस आहेत, पण सूनेसाठी शिंप्याकडून ड्रेस शिवून घेतला. किती हा साधेपणा!
https://www.moneycontrol.com/lifestyle/art/jayasri-burman-interview-arti...
दार्जिलिंगला एकदा किमोनो
दार्जिलिंगला एकदा किमोनो मिळालं. दुकानदाराने असली किमोनो पाहीजे असेल तर मागच्या भागात या म्हणून घेऊन गेला. तिथे टॅअडिशनल किमोनोज होते. एक साधं सोपं होतं. ते पटकन गुंडाळायला सोयीचं असल्याने घेतलं. आता किमोनोज तसे दिसत नाहीत. ऑनलाईन तर किमोनोजच्या नावाखाली सगळे मॉडर्न प्रकार आहेत.
किमोनो घरी आणल्यावर सर्वांचं मत असं पडलं कि हे लेडीज आहे. मी ठासून सांगत होतो कि त्यांच्या कडे लेडीज किमोनो वेगळा असतो. पण सगळे एव्हढे ठाम होते कि मलाच आपण चुकतोय असं वाटू लागलं. शेवटी विचार केला कि " जपानीयों को पता है कि ये मेन्स किमोनो है, मुझे पता है कि ये मेन्स किमोनो है, लेकिन जनता को कहां पता है ?"
ते बोहारणीनं पण घेतलं नाही. असली झबली नका देऊ, साड्या, शर्ट पँट टाका म्हणाली.
(No subject)
आता इतकं मस्त वर्णन आलंय तर
आता इतकं मस्त वर्णन आलंय तर किमोनो चा फोटो पण हवा.आमच्याकडे आम्ही पुतणीला चीनहुन आणलेला टिपिकल लाल सॅटीन किमोनो, मग तिने गणपतीत फॅन्सी ड्रेस ला वापरलेला, मग मध्ये 4-5 वर्षं जाऊ देऊन लेकीने गणपतीत वापरलेला,एकदा शेजाऱ्यांनी शाळेत फॅन्सी ड्रेस ला वापरला, , मध्ये मध्ये घरी नाईट गाऊन, स्विम सूट वर सोसायटीत घालायचा रोब असे आडवेतिडवे प्रकार करून पण नव्या सारखा टिकला होता.मग स्वच्छ धुवून गुडविल ला दिला.
वावा, किमोनो प्रसन्न झाला.
वावा, किमोनो प्रसन्न झाला.
चीनहुन आणलेला टिपिकल लाल
चीनहुन आणलेला टिपिकल लाल सॅटीन किमोनो >> अरे वा ! लेकीने चांगला उपयोग केला
गुडविल ?
माझ्याकडे किमोनोचा फोटो नाही. एक त्यात काढून घेतला होता. शोधतो.
त्या वेळी त्यातलं एव्हढं समजत नव्हतं. पण किमोनोचे किती तरी प्रकार आहे. एक तर थ्री पीस सूट सारखा आहे. बहुतेक प्रतिष्ठीत लोकांमधे मिरवण्यासाठी असेल. बहुतेक मी आणलेलं सामुराई किमोनो असावं. कारण त्याला वरून बांधायचा कापडी बेल्ट नव्हता.
बाथरूम मधून बाहेर येताना लपेटायचा गाऊन असतो, तशी बांधणी होती. दोन नाड्या होत्या. त्या मागून ओढून घेऊन पुढे गाठ मारायची.
ठेवायला हवा होता.
हो बरोबर, मोठ्या स्लीपवेअर्स
हो बरोबर, मोठ्या स्लीपवेअर्स दुकानात जे आत सॅटिन नाईटी आणि वर रोब असतो तसाच होता.हा असा.

एक्झॅक्टली. हा लेडीज किमोनो.
एक्झॅक्टली. हा लेडीज किमोनो. छानच आहे.
पंखा आणि छत्री पण
लोकहो मायग्लॅमवर सेल चालू आहे
लोकहो मायग्लॅमवर सेल चालू आहे. बऱ्याच गोष्टी (लिपस्टीक, बीबीक्रीम, सिरम्स इ.) २९ रुपयांत मिळत आहेत. अर्थात त्यांचे डिलीव्हरी चार्जेस २०० रु. पर्यंत जातात. तरीही स्वस्तच मिळतील.
किमोनो मस्त….
डेकॅथलॉनवर Anniversary
डेकॅथलॉनवर Anniversary निमित्ताने ७०% ऑफ होता. रविवारी वाकडला सर्विस रोड जाम होता. अजून असेल तर लाभ घ्यावा.
त्यांच्या स्टोअरला एक पिस्टल च्या आकाराचा मसाजर आहे. अल्टीमेट आहे.
ओके हा मसाजर बघते.
ओके हा मसाजर बघते.
नायकाला पण चांगले डिस्काउंट चालू आहेत.
माझेमन १ फु.स. मेकप चे
माझेमन १ फु.स. मेकप चे प्रॉडक्ट ३०% पेक्ष जास्त सूट असल्यास घेऊ नका, त्यांची एक्स्पायरी जवळ असते आणि धड ती प्रॉडक्ट वर न दिसेल अशी असते. नीट चेक करा.
सादाचा लॉन्ग/शॉर्ट लिनन
सादाचा लॉन्ग/शॉर्ट लिनन कुर्ता कुणी घेतलाय का? फिटिंग व्यवस्थित असते का?
@आशु२९ >>> मी यावेळी नाही घेतले ब्यूटी प्रॉडक्ट्स. मागे घेतलेले तेव्हा असा काही प्रॉब्लेम नव्हता आला. पण येस अशी फसवणुक होऊ शकते.
जाई , सॉरी आज पहिला हा धागा .
जाई , सॉरी आज पहिला हा धागा .. सादा ब्रँड चे कापड अप्रतिम आहे . माझा अनुभव सविस्तर सांगते .
मी सादाच्या वेबसाईटवरून ऑर्डर केली ... त्यांच्या एव्हरीडे पँट्स चे कापड उत्तम आहे पण आपण पॅन्ट कमरेवर चढवतो तो भाग फार तोकडा वाटतो . त्यातून बसताना वगैरे हिप एरियलाकव्हरेज जास्त लागते ना .. तर ते पुढे मागे सेम आहे ... बसताना पॅन्ट खाली सरकते जे मला अजिबात आवडलं नाही . त्यांची हाय वेस्ट लिनन पॅन्ट चा पण सेम प्रॉब्लेम . त्यामुळे पँट्स बाद . त्याच ऑर्डर मध्ये मी लिनन फुल स्लिव्हस शर्ट मागवला होता जो माझ्या मापाप्रमाणे अगदी बरोबर रादर थोडा सैलच वाटला पण कम्फर्टेबल . (ऑफिसात कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या ) त्याच ऑर्डर मध्ये मी एक शॉर्ट कुर्ता मागवला होता .. माझ्या मापाचा ... तो मात्र अगदी अंगाबरोबर घट्ट वाटला ... धुवून आटला तर ? म्हणून २ पँट्स आणि तो एक शॉर्ट कुर्ता परत केला . फक्त शर्ट ठेवला. ऑर्डर करताना साईज चार्ट फॉलो केला होता तेव्हा त्यांनी मला जो साईज बसेल असं म्हटलं होतं तोच मागवला होता पण प्रत्यक्ष लक्षात आलं कि त्यापेक्षा एक साईज मोठा मला बसेल ... नीट कंफर्टेबली . पण तो krotch एरिया इश्यू . आणि सादा च्या वेबसाईट वर नेमका तेव्हामाझा साईज उपलब्ध नव्हता ... हा हि बसेल का बघू try करून म्हणून मी त्यांच्याकडे उपलब्ध होता तो मागवला (जो त्यांनी दावा केला होता कि अमुक कमरेला बसेल )
आता पुढे मजा ... मिंत्रा वर मला माझ्या रेग्युलर साईजची सादा ची पॅन्ट दिसली ... कदाचित हि बसेल म्हणून मागवून बघू म्हणून मागवली . पण माझ्या रेग्युलर मापाची पॅन्ट पण सेम इश्यू . शॉर्ट कुर्ता सुद्धा मागवला ... पण त्यांनी मला एक साईज डाऊन पाठवला तो बदलून माझा नेहमीचा साईज मागवला तर तो उत्तम बसला . सेम हाच कुर्ता सेम साईज मी त्यांच्या मूळ वेबसाईट वरून मागवला तेव्हा मला घट्ट बसला होता (अंगाबरोबर ) पण मिंत्रा वरचा मात्र नीट बसला ... असं का झालं असेल ?
कोणाला जर स्पोर्ट्स वेअर
कोणाला जर स्पोर्ट्स वेअर मध्ये बूट कट बॉटम हवी असेल तर हि नक्की try करा . अप्रतिम फिटिंग आहे . मी घेतली आहे आणि मला फार आवडली आहे .
https://www.myntra.com/29655738?skuId=95359660&sellerPartnerId=8966&orde...
आणि फॉर्मल स्ट्रेचेबल पँट्स
आणि फॉर्मल स्ट्रेचेबल पँट्स साठी खालचा एक ब्रँड try केला मला तरी खूप आवडला.
https://www.myntra.com/30044490?skuId=96659710&sellerPartnerId=17590&ord...
दक्षिणा ह्या pants छान आहेत
दक्षिणा ह्या pants छान आहेत मी wishlist केल्या होतंय पण मागवल्या नाहीत आता घेते,. ह्यांचा बेज रंग चांगला येईल ना? न्यूट्रल रंग म्हणून हवा आहे.
हो किल्ली मी पण बेजच
हो किल्ली मी पण बेजच मागवलाआहे आणि सुंदर आला आहे तुला whatsapp ला फोटो पाठवते .
सादाच्या एव्हरीडे पँट्सबद्दल
सादाच्या एव्हरीडे पँट्सबद्दल माझेपण दोन शब्द. वरती दक्षिणा यांच्याशी पूर्ण सहमत आहे.
मी त्यांच्या दोन पँट्सवर ऑफर होती आणि रिव्यू छान होते म्हणून मागवल्या होत्या. त्यांच्या साईझ चार्टप्रमाणेच मागवलेल्या. कापड खूप छान आहे . धुतल्यावर आटलेही नाही किंवा रंगही जशाचा तसा आहे . म्हणजे काही कॉटन्स एक-दोनदा धुतले कि जूने दिसतात तसे काही नाही .
पण अगदी ढगळ बगळ फिटींग आहे . म्हणजे नेहमी साडी नेसणाऱ्या स्त्रिया फॉरेन ट्रीपला जायचे म्हणून कशा सेफ पँट्स घालतील तसे . माझ्या ट्रॉउझर्स एरवी वेल फिटेड असतात. त्यामुळे ह्यात मला जरा विचित्र वाटते. एक साईझ कमी मागवला तर टाइट होईल असे वाटले .मग पँट्स परत करायचा कंटाळा केला किंवा वापरू कशातरी म्हणून ठेवल्यात . आता एक पॅन्ट कधीतरी वापरते. पण म्हातारीचा फील येतो. मला वाटते त्यांच्या कट्स मध्ये स्त्रियांच्या शरीरयष्टीचा फारसा विचार केला नाहीये.
मला असेही वाटते कि भारतात ज्या शॉर्ट्स मिळतात त्या पण थोड्या पुरुषांच्या फिटिंगच्या असतात .
थँक्स दक्षिणा
थँक्स दक्षिणा आणि आरती .
मागवल्या कधी सादाच्या पँट्स तर लक्षात ठेवेन
आ_रती आजकाल धगळ पँट्स ची फॅशन
आ_रती आजकाल ढगळ पँट्स ची फॅशन आलिये ना प्लाझो टाईप किंवा फिटींग नसलेल्या. त्यात खपत नाहित का त्या पँट्स? फोटो टाकणे
सादाच्या साईटवर ऑर्डरच प्लेस
सादाच्या साईटवर ऑर्डरच प्लेस करता येत नाहीये. व्हॉट्सअप केले तर त्यांनी रात्री कधी तरी रिप्लाय केला. कोणत्या टाइमलाईनवर काम करताहेत कोणास ठाऊक. जाऊ दे.
Pages