ऑनलाईन खरेदी आणि आपण

Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11

सध्या फ्लिपकार्ट , अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.

**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो अनिष्का, आठवण काढली, आडोर चा तुला चांगला अनुभव आहे आठवलं.

फर्निचर साठी मला भरोसेमंद वाटलेला एकमेव पर्याय आयकिया. पुण्यात चाकण ला वेअरहाऊस आहे, ऑनलाइन मागवता येते.प्रत चांगली आहे.काही काही वस्तुंना ऑफर्स असतात ते लक्ष ठेवत राहावे लागते.मुंबईत तर स्टोअर आहेच.

'लव्ह चाईल्ड' बाय मसाबाचा बाय १ गेट १ सेल सुरु आहे. बुलेट लिपस्टिकची प्राईझ ६०० आहे. सेलपूर्वी मला वाटते ४५० - ५०० च्या रेंजमध्ये पहिल्या होत्या या लिपस्टिक्स. इच्छूकांनी लाभ घ्यावा.

ही पोस्ट वाचून बऱ्याच जणांना देजावू होईल.
1. तिरा वर परफ्युमस ना खूप चांगले डिस्काउंट होते म्हणून ऑर्डर केले.
2. जे पॅकबंद पार्सल आले त्यात इतर ऑर्डर वस्तू आणि परफ्युम चा रिकामा उघडा जुना दिसणारा खोका होता.
3. खोक्याच्या शेजारी न मागवलेलं मामाअर्थ चं क्रीम होतं ज्याची किंमत परफ्युम च्या 1/6 पट होती.
4. माझ्याकडे ओपनिंग व्हिडीओ नव्हता, कारण पूर्णपणे वेगळ्या साईट वरून सेम घोटाळा होईल याची कल्पना नव्हती.
5. लगेच कस्टमर केअर ला फोन केला, साईटवर चॅट करून रिकाम्या खोक्याचे फोटो पाठवले आणि इश्यू लॉग केला.
6. आज परफ्युम चे पैसे तिरा वाल्यांनी परत दिले.

नवऱ्याने हात जोडून 'माझे आई कृपा करून आता ऑनलाईन परफ्युम मागवू नकोस' असे सांगितले आहे.
यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की मामाअर्थ चे क्रीम कोणत्याही पावतीवर नव्हते.ते फ्री पण नव्हते कारण फ्री वेगळी वस्तू होती ती नीट होती पार्सल मध्ये.यावेळी 'या ऐवजी क्रीम आले' सांगत बसले नाही कारण रिटर्न पिकअप चा अभूतपूर्व गोंधळ झाला असता परफ्युम च्या पावतीवर क्रीम दिल्यावर.मागच्यावेळी किमान आतल्या पावतीवर सॉक्स आणि बाहेरच्या पावतीवर परफ्युम होते.

यात 'परफ्युम च्या वजनाचे क्रीम'ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे.बहुतेक पूर्ण पार्सल चे वजन केले जाते आणि ते अपेक्षेइतके असावे लागते.ते क्रीम 'अपेक्षेइतके वजन व्हायला घातलेली भर' होती.
तिरा वाल्यांना हे रिपोर्ट केले आहे की ही अदलाबदल कुरियर वाल्या ठिकाणी न होता मूळ पॅकिंग च्या ठिकाणी झाली आहे.

पुण्यात राहत असाल तर परफ्युम साठी कँप मधल्या वेस्ट एण्डच्या बेसमेण्टमधल्या शॉप्स मधे किंवा डेक्कन जिमखाना गरवारे पूलाजवळ दुकानात जावे. काळे सुगंधीचा काही अनुभव नाही. परफ्युम पण स्वतःसाठी खरेदी केलेले नाहीत त्यामुळे अल्पज्ञान आहे. हाँगकाँग लेन मधे असायचे पूर्वी. आता ती लेन आहे कि नाही कल्पना नाही.

अ‍ॅमेझॉनवरून भिंतीतले शू रॅक ऑर्डर केले आहे. बघूयात क्वालिटी..

(कॅम्प आणि डेक्कन दोन्ही आमच्या साठी अगदी कधीतरी जायची ठिकाणं आहेत.शक्यतो मॉल मध्ये किंवा पिंपरी मार्केट ला जातो.पिंपरी मार्केट मध्ये पण चांगली दुकानं आहेत.पण माल usa (उल्हासनगर सिंधी असोसिएशन) मेड असण्याची शक्यता असते.)
भिंतीतले म्हणजे कसे आहे?

https://www.amazon.in/gp/aw/d/B0BLJTHSLB/?_encoding=UTF8&pd_rd_plhdr=t&a...

असे आहे. किंमत कमी जास्त असू शकते.

धायरी इथे एक कारखाना आहे. तो सापडला नाही.
शिवाय ऑर्डर दिल्यानंतर खूप वेळ लावतात, फोन उचलत नाहीत या तक्रारी वाचल्यावर अ‍ॅमेझॉनवरून ऑर्डर केलं.

बाहेरच्या पॅसेजमधे लावता येतं. लॉक करता येतं. घरात बूट चप्पल ची झंझट नाही राहत.

अनु तुम्ही online ऑर्डर करायच्या आधी पत्रिका जुळवून पहा Proud
तुमची आणि site ची
रिटर्न योग असेल तर आधीच कळेल
Light 1
.
रघुजी ते ११हजाराला आहे.. बापरे

अनू व्हाय यू ऑलवेज Lol मागल्या खेपेचा बदला असावा का? ही बाई फार पाठपुरावा करते, बघूयात अजून किती चिकाटी आहे हिच्यात असा काहीतरी ऑन्लाईन वाल्यांचा उद्देश्य Wink

ही खरेदी गेली सहा वर्षे रखडली आहे. त्या वेळी आठ हजार किंमत होती. दीड कि दोनहजार डिस्काउंट होतं.
पण बायकोला विचारायला गेलो आणि...

अनु तुम्ही online ऑर्डर करायच्या आधी पत्रिका जुळवून पहा >>>
खरं...
जाऊ दे, होऊ घातलेल्या मनस्तापासाठी त्यांनी आधीच मामाअर्थचं क्रीम पाठवले असे समजा.

औंधला प्रदर्शनात पाहिले आहे हे. त्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजच्या ग्राउंडवर भिंतीत बसवायचे कपाट पाहिले. ते सोयीचे वाटले.
घरात नको होतं.

अजिओ वरुन बायको आणि मुलीसाठी ऑर्डर केल्या. पण ह्यावेळी प्र चं ड वेळ घेतला डिलिव्हरी करता. मग फोन करुन तक्रार केली तेव्हा आणखी चार दिवस घेऊन वस्तु घरी आल्या

मेगा सेल, डिस्काउंट पिरियड मध्ये पॅकिंग आणि कुरियर टिम्स वर प्रचंड ताण असतो.(मागच्याच पानावर डिलिव्हरी वाल्याना 4 ट्रक लोड केल्याशिवाय मिल आणि बाथरूम ब्रेक न दिल्याची बातमी आहे गुरुग्राम वेअरहाऊस ची.) त्यामुळे गोंधळ, उशिरा डिलिव्हरी, वस्तू गहाळ असणे, चुकीचे रंग पाठवले जाणे या गोष्टी खूप घडतात.बरं हल्ली सततच काही न काही कारणाने साईट्स शॉपिंग फेस्ट ठेवत असतात त्यामुळे 'ऑफ सिझन ला खरेदी करू' असंपण होत नाही.
तरीही मागच्या काहो अनुभवावरून:
ख्रिसमस, राखी,दिवाळी,व्हॅलेन्टाईन डे च्या आधीचे 15 दिवस ते तो मूळ सणाचा दिवस काहीही ऑर्डर करू नका.घोळ किंवा उशीर ठरलेला.

ख्रिसमस, राखी,दिवाळी,व्हॅलेन्टाईन डे च्या आधीचे 15 दिवस ते तो मूळ सणाचा दिवस >> २२ जून ला ऑर्डर केली होती, तेव्हा तर काहीच नव्हतं. असो. एखादा odd incidence म्हणुन सोदुन दिलंय. आजवरचा अजिओ चा अनुभव चांगलाच आहे

चिकाटी आहे!
माझ्याकडून बदलणे, परत करणे काही काही होत नाही. पदरी पडलं की ते आपलं मानून वापरायचं झालं.

भारतात असताना एक पार्सल कुरिअर करायल एका ऑफिस मध्ये गेलेलो. तिकडची माणसं, आरडाओरडा, अस्ताव्यस्त पडलेलं सामान, एन्वलप्स... मला भोवळ आली. मग कुरिअरवाले घरी येताना बघितले. ते सँटाक्लॉजची थैली बाईकवर टाकून येतात. त्यातुन ज्याचं त्याला मिळणं हे केवळ विधात्याने तुमच्या खात्यात ते लिहिलं असेल तरच होईल. दैवयोग! माझा विश्वास न्हवता, पण बसला! मानवाला या जन्मात ती पार्सल सिस्टिम पार करणे हे भवसागर पार करण्याहुन कठिण आहे. भवसागर लो हँगिग फ्रुट!

अमेझॉन, फ्लिपकार्ट,अजिओ डिलिव्हरीमध्ये फार घोळ नाही झालाय माझ्याकडे कधी. एकदाच फक्त अमेझॉन सेलरने रिप्लेसमेंट ऑर्डर अव्हेलेबल नाही म्हणून परस्पर पैसेही रिटर्न न करता कॅन्सल केली होती. ती अमेझॉनवाल्यानी व्यवस्थित मार्गी लावली. पण आजकाल अमेझॉनची सेम डे डिलिव्हरी नसतेच जवळजवळ किंवा तुम्ही पहाटे ५ ला ऑर्डर केली तरच त्या दिवशी मिळते. (फर्स्ट वर्ल्ड झालो नसलो तरी फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम यायला सुरूवात झालीय का? )

किसानकनेक्टवाल्यांचा एरियातला डिलिव्हरीचा माणूस बदलला की एखाद ऑर्डर पत्ता मिळत नाही म्हणून लापता होणे, मग त्रिस्थळी कॉल करून मी कित्येक वर्ष याच पत्त्यावर कश्या डिलिव्हऱ्या घेतेय, तो असलेल्या विवक्षित स्थळापासून माझी बिल्डिंग नैऋत्येकडे ४३७ पावलावर कशी आहे हे सप्रमाण सिद्ध करणे वगैरे होते. सध्याचा माणूस स्थिर आहे. लवकर भाज्या आणून देतो. त्या बदल्यात तो मला आण्टी म्हणतो ते मी चालवून घेते.

लवकर भाज्या आणून देतो. त्या बदल्यात तो मला आण्टी म्हणतो ते मी चालवून घेते. >>>
एकवेळ भाज्या हरवल्या तरी चालेल. >>> Lol

मानवाला या जन्मात ती पार्सल सिस्टिम पार करणे हे भवसागर पार करण्याहुन कठिण आहे. भवसागर लो हँगिग फ्रुट! >>> Lol अमित मग ते प्राचीन काळी मेल इन रिबेट्स असायचे ते तू करत होतास का? आपण वस्तू नवीन आणलेली असताना, सगळे डोक्यात फ्रेश असताना अ‍ॅप्लाय करणार नाही आणि ते ही लोक ३-४ आठवडे द्यायचे आपल्या विसरायला संधी म्हणून. मी नेहमी विसरायचो म्हणून एकदा एक्सेल शीट बनवला होता ट्रॅक ठेवायला. त्यात २ का ३ एण्ट्रीज टाकल्या होत्या ४-५ कॉलम्स भरतील इतका डेटा तयार करून. चांगला फॉर्मॅट वगैरे करून ठेवला. क्रमांक, वस्तूचे नाव, दुकान, रिबेटची अमाउंट, डेडलाइन, नोट्स (त्या व्यवस्थित wrap होउन पूर्ण दिसतील म्हणजे महत्त्वाचा मजकूर स्क्रीनबाहेर हिंडायला जाणार नाही ई). टोटल गटणे. एखादे शिल्प घडवल्यावर शिल्पकाराने त्याकडे बघत राहावे तसे त्या स्प्रेडशीटकडे दोन पाच मिनिटे तेव्हा अभिमानाने पाहिलेही असेल.

मात्र त्यानंतर तो पुन्हा कधी उघडला का ते लक्षात नाही. जहाँ से तुम मोड मुड गये थे वो मोड अब भी वही पडे है - या मोडमधेच राहिला असावा. नंतर मेल इन रिबेट्सही दुर्मिळ झाले.

मेन प्रॉब्लेम हा होता की जी सवय हे रिबेट्स वेळेवर मेल करायच्या आड येते, तीच सवय तो एक्सेल शीट लक्षात ठेवायच्याही आड येते Happy

सुरुवातीला नवीन होतो तेव्हा एक दोनदा मेल इनला पाठवलं होतं. द्यायचा रिबेट तर सरळ द्या की! फॉर्म भरुन मग कुठला बारकोड कापून त्या एन्वलप मध्ये घालून ते पोस्टात टाकायचं आणि मग चेक आला की तो परत बँकेत भरायचा.. त्याकाळी फोनवरुन फोटो काढून ही चेक भरता येत नसे. पब्लिकला चार रांगात उभं केलं नाही तर ते सुधारणार नाही हा पौष्टिक अ‍ॅटिट्युड. कशासाठी?
माझा पत्ता आणि फोन नंबर हवाय तर मागा की! देतो मी! इतकं मेल इन वगैरेचे आढेवेढे घेऊन कशाला ते?

पूर्वी दोन साईझचे कपडे आणून न होणारा दुकानात परत केला आहे. आता रामदासीबुवाची कफनी झाली तर झाली. आणलं की ते परत करणार नाही हा बाणा अंगिकारला आहे. अगदी कॉस्कोला सुद्धा परत करणार नाही.
फक्त होम डिपोला परत करतो मी. कारण तिकडून एक वस्तू आणली की घरी आल्यावर समजतं आपल्याला भलतंच काही हवं होतं. त्यापेक्षा द्रोणागिरी आणावा, न वापरलेलं द्यावं.

+१ चं उलट आहे. घेण्यापेक्षा परतच जास्त होतात वस्तू. तरी आता अ‍ॅमेझॉन घरी येऊन घेऊन जातात ते एक बरं आहे.

Pages