लोकसभा -२०२४ चर्चा धागा.

Submitted by चद्रनाद नादीचार्य. on 7 April, 2024 - 15:36

लोकसभा २०२४, चर्चा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आता आल्याबरोबर युट्यूबवर एका व्हिडीओची थंबनेल पाहिली. त्यात कुणी तरी भाजपाई मुस्लीम आणि रामभक्त हिंदूंना शिव्या देत आहे असे शीर्षक होते तर अयोध्येतलं राममंदीर पाडून पुन्हा मशीद बांधा अशी अर्धवट उपशीर्षकाची ओळ होती. आवरून येई पर्यंत व्हिडीओ गायब झाला. बघू पुन्हा सापडला तर लिंक देईन.

युट्यूबने व्हिडीओ उडवला बहुतेक.
थोडक्यात खरी बातमी आहे. आम्ही मंदीर बांधूनही पडलो याचा थयथयाट आहे . पण मंदीर पाडून पुन्हा मशीद बांधून द्यावी ( तीच लायकी आहे हिंदूंची) असा त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता बहुतेक.

ज्यांना राम कळलाच नाही, त्यांना मंदिरं बांधुनही कळणार नाहीच. मथुरा, काशीच काय आणखी कुठेही बांधुन कळणार नाही.

काही काळ काँग्रेसच्या विश्लेषकांचे विश्लेषण फॉलो केलेले आहे. त्यावेळी मोदींबद्दल फक्त द्वेष आणि द्वेष होता.
द्वेष बाजूला ठेवून गुजरातेत भाजप का जिंकते याची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हां एकांगी विश्लेषकांच्या सर्कल मधे ते समजणार नाही हे लक्षात आले. मग द्वेष बाजूला ठेवून दुसरी बाजू ऐकण्याची सवय लावून घेतली.
गुजरातेत मोदी १.०, २.० आणि ३.० या काळातला मोदींचा प्रचार वेगवेगळा आहे हे मागच्या पोस्टमधे याच धाग्यावर मांडलेले आहे. मोदींच्या या चलाखीला काँग्रेसने का हाणून पाडले नाही ?

याचे उत्तर शोधताना लक्षात आले ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष.
काँग्रेसने हार्डकोअर संघी असलेले आणि गुजरातेत ज्यांनी भाजपची एकहाती सत्ता आणली त्या माजी मुख्यमंत्री शंकरसिंग वाघेला यांना प्रदेशाध्यक्ष नेमले. या काळात गुजरातेत विरोधी पक्षच अस्तित्वात नव्हता. अहमद पटेल हे गुजरातचे काँग्रेस लीडर सुद्धा कधीही आक्रमक राहीले नाहीत.

शंकरसिंग वाघेला आणि मोदीही गुरू शिष्याची जोडी होत.
वाघेला मोदींना हरवतील ही कल्पना कॉंग्रेसची असेल तर असा पक्ष हरण्याच्याच लायकीचा आहे.

मोदींची पहिली निवडणूक ही गुजरात दंगलींच्या पार्श्वभूमीवर झाली. दुसरी निवडणूक गुजराती अस्मिता आणि नर्मदा सरोवर या मुद्द्यांवर झाली.
तिसर्‍या निवडणुकीत विकास हा मुद्दा बनवला. तोपर्यंत बहुमत कमी होत गेलेले होते पण सत्ता राखली.

दुसर्‍या टर्मच्या एण्डपासून मोदी विरूद्ध संघ हा लुटुपुटीचा सामना लावला गेला. तोगडीया गुजरातेत जाऊन मोदींवर टीका करायचे. कटियार सुद्धा टी़का करायचे. हा प्रयत्न भाजपची हार्डकोअर मतं + काठावरची लूज लिबरल मतं या समीकरणासाठी चालला होता.

आता तीच परिस्थिती केंद्रात आहे. केंद्रात आता मोदी विरूद्ध संघ किंवा मोदी विरूद्द्ध योगी असा सामना लावला जाईल.
जेणेकरून काँग्रेस विरूद्द्ध भाजप या ध्रुवीकरणासारखेच पक्षातच द्विपक्षीय ध्रुवीकरण करून आपली मतं कायम ठेवून अधिकची बोनस मतं लुटायची हा गेम प्लान कदाचित मोदी खेळतील.

संविधानावर डोकं ठेवतानाच्या फोटोमुळे सुरूवात झाली असा संशय आलाच.

<< सशक्त विरोधी पक्ष असणे >>> हे उत्तम झालेले आहे. भारताचे ह्यातच भले आहे. फक्त संसदेतही एकमेकांच्या पक्षीय उखाळ्यापाखळ्यांपेक्षा देशाच्या भल्याचे निर्णय घेतले जावेत. हवे तिथे strong, हवे तिथे मऊ राहाता आले पाहिजे.
काही separatists भरघोस मतांनी निवडून आले आहेत ह्याचा अर्थ ती विचारधारा संसदेत असणार आहे. ते भारताशी निष्ठा दर्शवणारी शपथ घेतील... घ्यावीच लागेल. ते जर त्यांच्या भागाची development करत असतील तर त्यांना योग्य ती मदत, separatist agenda राबवायचा प्रयास करत असतील तर त्यांना यशस्वी होवू न देणे हे सत्ताधारी व विरोधी पक्षाचे दोघांचे काम असेल. तिथे केवळ विरोधास विरोध चालणार नाही.
Submitted by अश्विनी के on 7 June, 2024 - 03:25. >>

------ संसदेत गृहमंत्री / पंतप्रधान खोटी माहिती सांगतात ( याचा अर्थ संसदेबाहेर ते खरे बोलतांत असा होत नाही Happy ). निवडणूक रोख्यांच्या वेळी अर्थमंत्रीही खोटी माहिती पुरवितात ( RBI / SC/ IT पैकी कुणाचेही objection नव्हते असे ते संसदेत सांङत सांगतात पण प्रत्यक्षांत या सर्व संस्थांनी त्यांचा विरोध लेखी स्वरुपांत सरकारला कळविला होता. हे सर्व पत्र व्यावहार उपलब्द आहे )

खासदार रमेश बिधोडी यांनी लोकसभेत भाषणामधे अगदी खालच्या पातळीवर एका अन्य सदस्यावर टिका केली होती. त्यांचे द्वेषाने भरलेले विखार संसदेत मांडले जात असतांना त्यांना कुणीही अटकाव केला नाही, यावेळी दोन केंद्रिय मंत्री हसत असल्याचे चित्र दिसते. पैकी एक माजी कायदा मंत्री आहे.

बिधोडी यांनी भारताशी निष्ठा दर्शवणारी शपथ घेतली होती? बिधोरीवर काय कारवाई झाली जेणेकरुन इतरांनाही धाक बसेलका? या प्रकाराला New normal समजायचे का?

फुटिरतावादी यांच्या संसदेतल्या प्रवेशाबद्दल जेव्हढी काळजी वाटायला हवी तेव्हढीच काळजी बिधोडी सारख्यांच्या विखारी विचारांची पण वाटायला हवी. भाजपा नेते बिधोडींना हसून प्रोत्साहन देतो ( त्यांचे भाषण मला एकू आले नाही - असे वर खोटे बोलणे ).

@Bharat मोदिंच्या इमेजसाठी इंडिया टुडे वाल्यानी GOT च्या मॅड किंग वरून प्रेरणा घेतलेली दिसतेय !!!! Wink

हया निवडणुकीतले काही ठळक मुद्दे जे भाजपच्या मूळावर उठले
- इंडिया आघाडीने पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर न करणे.
- मोदींचे अत्यंत अप्रभावी भाषणे.
-१० वर्षात काय केले हे सांगण्यापेक्षा मोदीनी लोकाना भीती घालायचा प्रयत्न केला. जसे काँग्रेस सत्तेत आली तर तुमच्या घरी २ म्हशी असतील तर एक ओढून नेईल.
- राहुल गांधीशी डिबेट करायला मोदीनी नकार दिला. ह्याचा सरळ प्रभाव राहुल ह्यांची प्रतिमा सुधारण्यात झाला.
-राम मंदिराचे घाईत उद्घाटन, शंकराचार्याचा विरोध.
- उद्घाटन प्रसंगात एककल्ली पणा, फक्त मोदी आणि मोदीच जे लोकांना रूचले नाही. उद्घाटन प्रसंग हा हिंदूंचा सोहळा न राहता तो भाजपचा कार्यक्रम करण्यात आला. त्यामुळे अनेक हिंदू प्रभावित झाले. खासकरून युपीत. राममंदिर हा हिंदूंसाठी खूपच संवेदनशील मुद्दा होता.
- “जो राम को लाये है” हा प्रचार ही लोकाना आवडला नाही. आपल्या देवापेक्षा कुणी व्यक्ती श्रेष्ठ असू शकत नाही असे हिंदू लोक
उघड बोलत होते.
-महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना हलक्यात घेणे नडले. २०१९ लाच २.५ वर्षासाठी मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर मोदीना महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात सभा घ्याव्या लागल्या नसत्या, सहज २० जागा जिंकल्या असत्या नी त्याच सभा इतर राज्यात घेतल्या असत्या तर २० जागा आणखी जिंकल्या असत्या. एकट्या उद्धव ठाकरेंमुळे ३० ते ४० जागा भाजपच्या कमी झाल्या.
- शरद पवारांना नाव न घेता भटकती आत्मा संबोधने महाराष्ट्रातील लोकाना रूचले नाही.
- मतदार संघात भाजप खासदारांनी ५ वर्षात आपला चेहरा दाखवला नव्हता. मागच्या वेळी दीड ते दोन लाख लिड ने जिंकलो. हया वेळीही जिंकूच त्यामुळे अनेक खासदारांनी मतदारसंघात फिरणे टाळले.
- इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आपापले राज्य सांभाळले. उगाच बाहेर फिरले नाही. जसे ममता बंगालात, अखिलेश युपीत नी ठाकरे/पवार महाराष्ट्रातच थांबले.
-मागच्या १० वर्षात काय कामे केली हे मोदीनी सांगितलेच नाही तसेच पुढे काय करणार हे देखील सांगितले नाही.
- भाजपचा कोअर मतदार अजित ठाकरेंना सोबत घेतल्यामुळे नाराज होता, त्याने मतदान केंद्रात जाणे टाळले किंवा भाजपला धडा शिकवायला सरळ विरोधात मतदान केले.
- शिवसेना फोडणे अनेकांना आवडणे नाही.
- ईडी सीबीआय चा गैरवापर, भ्रष्टाना पक्षात घेऊन पावन करून घेणे इतके उघडपणे सुरू होते की ह्याचा आपल्या मतदारांवर प्रभाव होत असेल ह्याचा भाजपने आजीबातच विचार केला नाही.
-स्थानीक प्रश्न सोडवण्यात आलेले अपयश. त्यांची दखल सुधा घेण्यात आली नाही. दिंडोरी की कुठल्यातरी सभेत एका शेतकऱ्याने मोदीना कांदा प्रश्नावर बोला अस सांगितल्यावर मोदीनी त्याला “जय श्रीराम “ असे उत्तर दिले. त्यामुळे त्याभागात संतापाची लाट उसळली होती.
-कांद्याबाबत भेदभाव- गुजरात मधील कांद्याला एक्सपोर्टची परमिशन पण महाराष्ट्रातील कांद्याला नाही असे शेतकरी बोलून संताप व्यक्त करत होते.
- मुसलमानांना विरुद्ध उगाच वक्तव्ये केली. ह्याचा परिणाम मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदानात झाले, मुसलमानातील मोदीविरोधी प्रचंड लाट ओळखून mim ने आपले उमेदवार उतरवले नाही. नाहीतर भाजपा सोबत त्यांचाही धुव्वा उडाला असता.
- जरंगे प्रकरण नीट हाताळले नाही. जरांगे मराठा समाजाच्या गळ्यातील ताईत झाले होते तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या मागे sit चौकशी लावण्यात आली. ह्यामुळे मराठा समाज प्रभावित झाला.
- भाजपच्या संविधान बदलण्याच्या घोषणेमुळे (भाजपनेते उघड बोलत होते) तसेच मनुस्मृती अभ्यासक्रमात आणणे/ समर्थन करने ह्यामुळे दलित मतदार प्रभावित झाला.
-मोदींची थकलेली देहबोली तसेच मुद्दे सोडून भरकटलेली भाषणे.
- ध्रुव राठीने उपस्थित केलेले मुद्दे भाजपेयीना खोडून काढता आले नाही. ध्रुव राठीचे व्हिडीओ अतिशय प्रभावशाली होते. ध्रुव राठीला न्यूज़ चॅनल्स ही उत्तरे देऊ शकले नाहीत. राठी चे व्हिडिओ बर्याच राज्यात मोठमोठे फ्लेक्स लाऊन दाखवले जात होते. ध्रुव राठीला प्रभावित होऊन त्याचे सबस्क्रायबर्स २ कोटी झाले. त्याचे व्हिडीओ ३० कोटी भारतीयांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे.
- ⁠संजय राउत यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तर न देता त्यांच्यावर वयक्तिक टीका करणे, ह्यावरून भाजप नेते संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या मुद्याना उत्तर न देता त्यापासून पळ काढतात असा मॅसेज सामान्य लोकांत गेला.
- ⁠भाजपच्या काही नेत्यांची शिवराळ भाषा.
- ⁠शिवसेना आणी राष्ट्रवादी फोडून ठाकरे नी पवारांचे चिन्ह नी पक्ष इतराना बहाल केल्याचा महाराष्ट्रात राग होता.
- ⁠महाराष्ट्रात ठाकरे नी पवारांच्या तोडीस तोड नेता भाजपकडे नसणे.
- ⁠राज्यात प्रियंका गांधी ह्यांच्या झालेल्या प्रचंड सभा. (नंदूरबार आणी नांदेड जागा ह्याच सभेने फिरवल्या.)
- ⁠उद्धव ठाकरे ह्यांची आक्रमक भाषणे तसेच सभांना जमलेली प्रचंड गर्दी. तसेच लढाऊ बाणा. सोप्या जागा मित्रपक्षांना देऊन ठाकरेंनी अटीतटीच्या जागा स्वतः कडे घेतल्या.
- ⁠पवार नी ठाकरेंसोबत असलेली प्रचंड सहानुभूती
- ⁠१०० टक्के मोदींवर विसंबून असणे. भाजप नेत्यांनी आपली राज्यातील कामे दाखवलीच नाहीत.
- ⁠चिन पाक निवडणुकीत आणणे. लोकाना ते रुचलेच नाही.
सत्ताबदल झाला नाही हे म्हणणे खोटे आहे. “मोदी” सरकार जाऊन “NDA” चे सरकार आले आहे.
मागच्या दहा वर्षातील नी इंदिरा/राजीव कालखंड पहिला तर एक गोष्ट लक्षात येते. एकहाती सत्ता देऊन देशाचा काहीही फायदा होत नाही. फक्त राज्यकर्त्यांचा अहंकार वाढतो नी येणकेनप्रकारे विरोधकांना त्रास देणे सुरु होते. त्यामुळे भारत देशासाठी “गठबंधन” करून आलेले सरकारच बेस्ट. त्यामुळे सत्ता राबवणाऱ्यांवर अंकुश राहतो. एक एकहाती सत्ता नेमकी कशासाठी हवी असते हे कळले नाही. जर मोदीना “चांगले” निर्णयच घ्यायचे होते तर मागच्या दहा वर्षात का घेतले नाहीत? तेव्हाही एखाती सत्ताच होती ना?
- अमरेंद्र बाहुबली.

missing votes.jpg
मतदानाचे मतदानोत्तर जाहीर केलेले आकडे आणि मतमोजणीनुसारचे आकडे यांत फरक पडण्याची कारणे आयोगाने आयोगाच्या अधिकार्‍यांनी सांगितली आहेत.
१ मॉक पोल - चाचणी मतदानात नोंदवलेली मते उडवायची राहून गेली किंवा त्याच्या पट्ट्या vvpat slips काढायच्या राहून गेल्या
२. फॉर्म १७ वर नोंदलेली मते आणि मतमोजणीच्या वेळी त्या यंत्रावर दिसणारी मते यांत फरक असणे.

अशा मतांची त्या मतदारसंघातकरिता बेरीज विजेत्या उमेदवाराच्या आघाडीपेक्षा जास्त भरली, तरच ती मते शेवटी मोजली जातात.

ह्यावेळी त्यानी काहीतरी मुद्यांवर मते दिली. उगाच कंगना उभीय दे मत, स्मृती इराणी उभी आहे दे मत असे केले नाही.

कल्पना विस्तार असा एक प्रकार परिक्षेत असायचा , आता आहे का हे माहित नाही Happy

" राहुल गांधी यांच्यावर सुरत न्यायालयाने केलेली कारवाई एक परफेक्ट देखावा होता....
माझ्या माहिती प्रमाणे, त्यांनीच मोदी यांच्याकडे संसदेतून काही काळासाठी रजा मिळावी अशी इच्छा व्यक्त केली होती. पुढे जे घडले ते लोकांना दाखविण्यासाठी. धुळ खात असणार्‍या फाइलच्या / आरोपाच्या आधारावर त्यांचे खासदारपद रद्द करविले आणि राहुल गांधी यांना हवी असलेली रजा मिळवून दिली. पडद्यामागे राहुल आणि मोदी दोघेही हसून एकमेकांना टाळी देत होते Happy ... कसे बनविले पब्लिकला.

खासदार संजय सिंग यांच्यावर ED कारवाई हा पण एक असाच १०० % देखावा होता. त्यांना EDच्या ( त्या आधी CBI ) कस्टडीत ठेवण्याचे खरे कारण अगदी वेगळे आहे असे माहितगाराकडून ( त्यांचेच स्विय सहाय्यक होते) खात्री लायक वृत्त आहे. लोकांना दाखविण्यासाठी संगनमताने लुटुपुटीच्या कारवाईची योजना आखली गेली.
आपचेच मनिष शिसोदिया तसेच केजरीवालांबद्दलही अगदी वेगळेच कळाले आहे. त्यावर वेगळ्या धाग्यात कधीतरी नक्की मांडेल Happy

उद्धव ठाकरे यांचा जनाधार कमी झाला होता.... तो वाढावा, त्यांना जनतेची सहानुभूती मिळावी या उद्देशाने मोदी / शहा यांनी त्यांच्यावर तिखट प्रहार करायची योजना आखली, प्रसंगी "नकली" वगैरे शब्द वापरण्याचा अभिनय करुन झाला. लोकांचा समज होतो हे दोघे भांडत आहेत आणि सहानुभूती चा फायदा ठाकरे यांना मिळतो - त्यांच्या पक्षाच्या लोकसभेतल्या जागा वाढतात. मोदी यांची लोकप्रियता प्रचंड मोठी आहे, त्यामुळे त्यांना काहीच फरक पडत नाही. आता उद्या ठाकरेंच्या या नवनिर्वाचित खासदारांनाही भाजपात सामिल व्हावे असे वाटणारच. खरे तर आपल्यावर ED शस्त्र कधी वापरले जाईल याची ते आतुरतेने वाट बघत आहेत. निवडून आल्यावर , पहिल्याच दिवशी बॅगा भरगच्च भरुन ठेवलेल्या असतात. ED ची प्रतिक्षा करणे किती वाईट आहे हे शिंदे यांच्या पेक्षा जास्त चांगले कोण जाणू शकतो?

जनतेला दाखविण्यासाठी हे सर्व भांडणे असतात... पण प्रत्यक्षांत ते आतून एकमेकांना मिळालेले असतात. आपण उगाचच डोके फोडतो. "

थापा मोड समाप्त. Happy

भाऊ तोरसेकर गायबलेत म्हणे! तब्येत बिघडली, 400 पार न झाल्याने अतिसार लागला

परत आलेत!
चक्क शरद पवार यांची स्तुती करणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. नेहमीप्रमाणे आणि अपेक्षे प्रमाणे उद्दव ठाकरे यांच्यावर दुगाण्या झाडणारा व्हिडीओ आहेच. मुस्लिम मतं शिवसेनेला मिळाल्याचे चांगलेच झोंबलं आहे.
बाकी आता नेहमीचे गुऱ्हाळ सुरु होईलच.

"तुमच्या सगळ्यांच्या मिळून 234 आल्या... आमच्या एकट्या भाजपाच्या 240 आल्या "

हा मूर्ख तर्क फक्त भक्त देवू शकतो... कारण त्याला मोदी एकटा शेर आहे असे वाटते.

तर अजूनही अक्कल न आलेल्या अतीमंद भक्तहो... मोदी एकटा लढत नाही तर 39 सहकारी पक्षांना घेवून लढतो. NDA मध्ये 2014, 2019 आणि 2024 अशा तिन्ही वेळेस 38 ते 40 सहकारी पक्ष होते. ह्या सहकारी पक्षांची मते जोडून जोडून तुमचा लबाड लांडगा स्वतःला शेर म्हणून मिळवतो.

उदाहरण सांगतो... 2019 मध्ये शिवसेना सोबत होती म्हणून शिवसेनेच्या मतांच्या जीवावर भाजपला महाराष्ट्रात 23 खासदार मिळाले. 2024 मध्ये जवळपास 75% शिवसेना आणि राष्ट्रवादी नेते फोडून सोबत घेवूनसुद्धा भाजपला फक्त 9 खासदार निवडून आणता आलेत. जर शिंदेसेना, अजित पवार गट, RPI आठवले, रासप, मनसे आणि वंचितच्या कुबड्या नसत्या तर राज्यात एकही खासदार एकट्याच्या जीवावर निवडून आणायची भाजपची लायकी नाही.

रावसाहेब दानवे, भारती पवार आणि सुधीर मुनगंटीवार असे मंत्री आणि पंकजा मुंडे, हिना गावित, सुजय विखे या भाजपाच्या मातब्बर नेत्यांचा इथे पराभव झालाय. मोदींनी पंचवीसेक सभा महाराष्ट्रात घेतल्या आणि त्यातल्या फक्त 4 सभा यशस्वी ठरल्या ... त्याही फक्त सहकारी पक्षांच्या मतदानामुळे! नरेंद्र मोदींपेक्षा राज ठाकरेंच्या सभांना जास्त यश मिळाले आहे हे ध्यानात राहू द्या!

आणि जे महाराष्ट्रात आहे तेच देशात आहे... भाजपची सत्ता 39 सहकारी पक्षांच्या जीवावर आहे. प्रादेशिक सहकारी पक्षांमुळे भाजप निवडून येतो... अगदी वाजपेयींच्या काळापासून!

तेव्हा आता ते शेर वगैरे विसरून जा... तुमचा शेर आता पोपटासारखं हिरवं जॅकेट घालून प्रादेशिक पक्षमित्रांच्या जीवावर जगतोय! त्या मित्रपक्षांना आता दुखवायला जाल तर शेरचा पावशेर होईल!

- डॉ. विनय काटे

राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेल ला आधी कबुल केलेले कॅबिनेट ऐनवेळी नाकारून राज्यमंत्रीपद दिल्याने अजित पवारांनी ते नाकारले. ### माज आणि मज्जा !

आता राहुल गांधी दररोज एक अविश्वासाचा ठराव आणणार!
शिवाय पैसे चारून किंवा धमक्या देऊन भाजपाचे खासदार फोडणे, असे चालूच राहील.

पंतप्रधानांना संसदीय लोकशाही मूल्यांची किती सवय आहे, हे देशानं बघितलं आहे.
एखाद्या मुद्द्यावर विरोधक मागणी करायचे की पंतप्रधानांनी येऊन निवेदन द्यावं तर ते मौन बाळगून गप्प. अविश्वास ठराव मांडल्यावर पंतप्रधानांना कंपल्सरी येऊन उत्तर द्यावं लागतं. म्हणून सायबांना बोलतं करायचा एक उपाय म्हणून तो संसदीय अधिकार विरोधकांना वापरावं लागायचा. आता तशी वेळ येऊ नये ही अपेक्षा. अविश्वास ठराव दरवेळी जिंकतीलच अशी खात्री नाही. संसदेतली परिस्थिती बदलली आहे आता. ठराव आणण्याआधीच उत्तरं द्यावीत. पंतप्रधानानं संसदेला उत्तरदायी रहावं, राज्यघटनेची तीच अपेक्षा आहे.

Pages