लोकसभा -२०२४ चर्चा धागा.

Submitted by चद्रनाद नादीचार्य. on 7 April, 2024 - 15:36

लोकसभा २०२४, चर्चा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पण मी काय म्हणतो विरोधी पक्ष हा कन्सेप्ट पाहिजेच कशाला? सगळयांनी एकाच पक्षात येऊन गुणगोविंद्याने कारभार करावा. विरोधी पक्ष आणि संसदेत चालणारा गोंधळ हा भारतीय एकत्र कुटुंबपध्तीसाठी मारक ठरतो आहे. भाऊ भाऊ, बहिण भाऊ, सासू सुन यांच्यात जमिनीवरून, घराच्या जबाबदारीवरून भांडणं होतात आणि एकंदरीत जीवनाची सगळी मज्जा निघुन जाते.

भरत बरोबर (बहुतेक तुम्ही माझ्या पोस्टवर लिहिलं असावं असं समजून लिहितेय). तो पहाटेचा शपथविधी ही बेकार गोष्ट होतीच, तेव्हाही मी फॅमिली grp वर लिहिलं होतं, इथे लिहिलं होतं की नाही ते आठवत नाही पण ती ही न पटलेली गोष्टच होती, वर लिहायला हवी होती.

मला उद्धव यांना देवेंद्र यांनी दोन वर्षे तरी मुख्यमंत्री करायला हवं असं वाटत होतं. फायदाच झाला असता भाजपचा, तीन वर्षे मुख्यमंत्रीपद मिळालं असतं, आता अजिबात नाही.

(अजूनही धर्मद्रोही वाले पोस्टस फिरताहेतच).
<<
हिंदूंनाच शिव्या घालणं सुरु आहे. धर्माचा बाजार मांडणारे खर्‍या धार्मिकांना शिव्या देताहेत. मज्जाय.

तोंडावर आपटलेल्या कोणत्या भाजपांडूंबद्दल तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद होतोय?

मला
१. उद्धट स्मृती इराणी
२. उज्ज्वल निकम : खोटी बिर्याणी बातमीवाला

दु:ख :
कोंबडीचोर.

हे मोदी समर्थका, ऐक. १० वर्षं तुझं ऐकत आलो. आज तू ऐक.

तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान बनतीलही, पण "ये जीत भी कोई जीत है" असं तुला वाटतंय याची खात्री आहे.

पण तुला ठाऊक नसलेली एक गोष्ट ही, की आजच्या या परिस्थितीला तू जबाबदार आहेस - थेट जबाबदर!

कधीकाळी अटलचा असलेला पक्ष मोदी-शहांनी टोटल उलट्या दिशेला नेऊन ठेवला. तुझ्या डोळ्यादेखत - नव्हे, तुझ्या संमतीने.

"अश्या फोडाफोडीने कमावलेल्या सत्तेला मी चिमट्याने सुद्धा स्पर्श करणार नाही" असं म्हणाले होते अटल. तू तेव्हाही टाळ्या वाजवल्यास, आणि आज, फक्त "तश्या"च पद्धतीने सत्ता मिळवू शकणाऱ्या मोदी-शहा आणि त्यांच्या नादी लागलेल्या फडणवीसांना तू टाळ्या वाजवत चाणक्य म्हणू लागलास. ही विसंगती इतरांना दिसत होती.

काल-परवाचे हजारो कोटींचे घोटाळेबाज पायघड्यांवर चालत येऊन तुझ्या डोक्यावर येऊन बसले तरी तू हूं की चूं केलं नाहीस.

PM Cares Fund आणि Electoral Bond ची माहिती जीवापाड तडफड करून लपवू पाहणारे अजून काय काय लपवत असतील अशी तुला शंका आली नाही.

कोण्या एका मुसलमान पोरावर दगडफेकीचा फक्त आरोप आहे, म्हणून त्याच्या अक्ख्या कुटुंबाच्या घरादारावर नांगर फिरवणाऱ्या घोर अन्यायाला तू टाळ्या पिटत "बुलडोझर न्याय" आणि रामराज्य म्हणून गौरवलंस.

"जश्न-ए-रिवाझ" हा साधा शब्द तुला खटकू लागला तेव्हा, कुठल्याही न्यूनगंडाशिवाय, "उर्दू तो मेरे ही मुल्क की जुबां है, तो मैं वो क्यूँ न बोलू?" असं ठामपणे म्हणणाऱ्या सुषमाला तू विसरला आहेस, हे जाणवायला लागलं.

साधेपणाने घरच्या देव्हाऱ्यात रामनवमी साजरी करण्याच्या ऐवजी, DJ वर आचकट-विचकट आणि शिव्याशाप देणारी गाणी लावून मशिदीच्या बाहेर मुद्दाम गोंगाट करणं याला तुझा आक्षेप दिसला नाही.

जिच्या आईसमोर तिचा स्वतःचा, आणि तिच्या डोळ्यासमोर तिच्या आईचा बलात्कार झाला, जिच्या डोळ्यादेखत तिच्या पोराला दगडावर आपटून मारलं, त्या बिल्किसच्या दोषींना गुजरात निवडणुकीच्या तोंडावर सोडून देण्याचा आदेश केंद्रीय गृहखात्यातून येतो ... त्या दोषींचा गावात सत्कार होतो ... सत्कार करण्याऱ्या कुटुंबाला निवडणुकीचं तिकीट मिळतं ... आणि हे सगळं होत असताना ३०० पार संख्या असलेले खासदार, किंवा महिला व बालकल्याण खात्याची मंत्री, किंवा ५५ हजार शाखा असलेल्या मातृसंस्थेतील एकालाही याविरुद्ध काही बोलावंसं वाटत नाही - या नैतिक दिवाळखोरीची तुला टोकाची घृणा वाटली नाही.

नपेक्षा तू हे विचारलं नसतंस - की "यांना पर्याय कोण" म्हणून.

आणि तुमचा तो "पर्याय" तरी त्याची योग्यता कशी सिद्ध करत होता रोज?

... तर रोज उठून भरल्या ताटावर नेहरूंच्या नावाने गळे काढत होता ... "क्लाउड है, तो बेनेफिट मिलेगा" असे हास्यास्पद बाळबोध सल्ले वायुदलाला देत होता ... व्हाईट हाऊसमध्ये बायडनशी हिंदीतून बोलतानासुद्धा डायरीतून वाचून दाखवत होता ... आख्खं मणिपूर जळत असताना गपगुमान राहण्याचा अचंबित करणारा बेजबाबदारपणा दाखवत होता ... दीड अब्ज नागरिकांना "चीनमधून कोणी आलंच नाही", असं धडधडीत खोटं सांगत होता ... "गांधीजींना सिनेमाच्या आधी कोणी ओळखत नव्हतं" अशी खुळचट विधान करत होता ... उत्तर प्रदेशातली एक सीट वाचवण्यासाठी, आतंरराष्ट्रीय कीर्तीच्या महिला मल्लांवर त्यांची पदकं सोडून देण्याची वेळ आणत होता ... मंगलयानाच्या लँडिंगच्या मंगलप्रसंगीसुद्धा स्वतःचीच छबी झळकेल अशी वखवख दाखवत होता ... रेल्वे स्टेशनवर आपलेच हजारो कटआउट्स लावून निर्लज्ज मायावतीलाही मागे टाकत होता ... "वॉर रुकवा दी" अशी बालिश बढाई मारत होता ... आपण एका देशाचे पंतप्रधान आहोत हे विसरून २० कोटी मुसलमानांना सरसकट घुसखोर म्हणत होता ... आणि प्रचार संपलेला असतानाही सर्व नियम-संकेत धाब्यावर बसवून डझनावारी कॅमेर्यांसमोर बक-ध्यान करत होता ...

तरी तुमचा प्रश्न एकच - याला पर्याय कोण!?

एकेकाळी स्वतःला "प्रधानसेवक" आणि "चौकीदार" म्हणवणारा जेव्हा स्वतःला "नॉन-बायोलॉजिकल ईश्वर-प्रेषित" म्हणवू लागला, तेव्हाही तुम्हाला असं वाटलं नाही की आपली निवड चुकते आहे म्हणून. "अबकी बार ४०० पार" म्हणत तो स्वतःच विरोधकांचा स्टार-प्रचारक "पप्पू" व्हायला लागलाय हे तुम्हाला लक्षात आलं नाही.

पण तरी तुम्ही म्हणाल की आजच्या निकालाला तुम्ही जबाबदार कसे?

ते यासाठी, की तुमचं हे वहावत जाणं इतरांना धडकी भरवणारं होतं आणि त्यामुळेच त्यांचा निश्चय पक्का झाला.

फाशीवर जाताना आपल्या आईचा कान चावून तिला जाब विचारणाऱ्या त्या गुन्हेगारासारखं मोदीही आज तुम्हाला म्हणतील: "मला आधीच समज दिली असतीत, तर ही वेळ आपल्यावर न येती आज!"

म्हणून तुम्ही जबाबदार! ही जबाबदारी टाळू नका आता.

- म. जो.

https://www.youtube.com/watch?v=yFdEORJpQoU
हा अत्यंत मार्मिक इंटर्व्ह्यु पहा...करण थापर व नीलांजन मुखोपाध्याय -जे नमोचे आत्मचरित्र लेखक आहेत आणि मोदी काय आहेत हे सांगतात

सगळ्यात जास्त आनंद होतोय? >>> स्मृती इराणी, कृपाशंकर सिह . कंगना राणावण, प्रज्वल, कुस्ती महासंघ अध्यक्षाचा भाऊ हे ही पडायला हवे होते खरतर. औरंगाबादची जागा एमआयएमच्या हातून गेली त्याचा आनंद झाला. पण त्याच बरोबर दानवे, मुंडे, गावित, भारती पवार मंडळी उगीच पडली असंही वाटलं.

एकंदरीत निकाल चांगला लागला. झ्टका मिळायला हवाच होता. खरतर कर्नाटक आणि पंजाब विधानसभांमध्ये मिळाला होता पण तो पुरेसा ठरला नाही. नंतर मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तिसगडच्या विधानसभांनी झटका इफेक्ट निघून गेला. महाराष्ट्राततर पाच वर्ष जी काय बजबजपुरी माजलीये ती बघता निकाल अनपेक्षित नव्हतेच.

र.आ. मनमोहनसिंगांची दोन्ही सरकारं अल्पमतातली नव्हती ना ? एकतर आघाड्या निवडणुकपूर्व होत्या आणि दुसरं म्हणजे सरकारने संसदेत बहुमत सिद्ध केलं होतं. पण नरसिंह रावांचं सरकार मात्र अल्पमतातलं होतं कारण त्यावेळी निवडणूका नको म्हणून विरोधी पक्षाने अविश्वासदर्शक ठरावावर मतदान न करता तो पास होऊ दिला होता. बाजुने किंवा विरोधी कुठलही मतदानही केलं नव्हतं.

एकतर आघाड्या निवडणुकपूर्व होत्या > २००४ ला आघाडीला बहुमत नव्हतं. २००९ ला २७२ च्या खाली होते. सपा बसपा निवडणूकपूर्व आघाडीत नव्हते.

मस्त पोस्ट आहे विहारी. एकदम महाभारतातले एखादे पीचलेले पात्र विचार मांडत आहे असे वाटले Happy पण काय करणार, आज परिस्थिती अशी आहे की डोळे कान बुद्धी ह्यावर चांगली दोन तीन जाड जाड पांघरूण आहेत भक्तांच्या.
पराग, मुंडे पडली हे उत्तम झाले. आज बीडची दयनीय अवस्था आहे. हे कुटुंब कित्येक दशके तिथे आहे, काहीही विकास काम केले नाहीये. वाट्टेल ती कामे इथले लोक स्थलांतरित होऊन पुण्या मुंबईत करतात. बदल आवश्यक होता.

दुर्गविहारी, भारी पोस्ट. ++
तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद होतोय?>>
अजित पवारच्या पक्षाला १ सीट मिळाली. त्यांच्या पत्नीही बारामतीतून हरल्या.
शिंदेंना मुंबईत फक्त एक निसटता विजय मिळाला. ठाण्यात पडले असते तर आणखी आनंद झाला असता.
एकुण महाराष्ट्राने भुरट्या लोकांना जागा दाखवली याचा अतीव आनंद झाला.

आयेगा तो मंगलही.
( आमच्या चहावाल्याचे नाव मंगल होते, दहाच्या ठोक्याला आम्ही त्याची अशी आठवण काढायचो).

शिंदेंना मुंबईत फक्त एक निसटता विजय मिळाला. ठाण्यात पडले असते तर आणखी आनंद झाला असता.
एकुण महाराष्ट्राने भुरट्या लोकांना जागा दाखवली याचा अतीव आनंद झाला. >> अमित - रागा एकच असा आहे की ज्याने क्लीन कॅम्पेन केले व तडजोडी केलेल्या नाहीत. बाकी सगळे सारखेच. २०२२ चे लोक "गद्दार" असतील, तर त्याआधीचे त्या त्या पक्षातून फुटलेलेही वेगळे नाहीत. त्यांच्या तडजोडी तत्त्वहीन असतील तर २०१९च्या ही तितक्याच आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून चांगले होते. पण त्यांनी तेथे जायला जी तडजोड केली ती जनतेचा कौल नाकारूनच केली होती. पवारांनी काँग्रेस फोडली होती, सोनिया गांधींच्या परदेशी असण्याचा मुद्दा आधी काढून नंतर पुन्हा त्यांच्याच बरोबर गेले होते. आता महाराष्ट्रात भाजपविरोधी वल्गना करणारे गेल्या दहा वर्षांत किती वेळा भाजपचे दार ठोठावून आले याची बरीच मनोरंजक माहिती शोधली तर उपलब्ध आहे. शिंद्यांना शिवसेनेत प्रचंड अपमान सहन करावे लागले म्हणून ते फुटले. सेनेतील दिग्गजांना आदित्य ठाकरेचे मित्र "मार्गदर्शन" वगैरे करू लागले होते. भक्त पब्लिकला हे डिटेल्स माहीत नाहीत व बाकीच्यांच्या सोयीचे नाहीत म्हणून ते चर्चेत येत नाहीत. तेव्हा राज्यातील राजकारणात कोणालाही तात्त्विक बाजू नाही. फॅन पब्लिकला एकमेकांना डिवचायला मुद्दे मिळतात इतकेच. कधी यांना, तर कधी त्यांना.

रागा यापेक्षा वेगळा आहे. त्याचे सगळे पटत नसले, तरी त्याला टोटल रिस्पेक्ट. व्हॉट्सअ‍ॅप वर येणार्‍या त्याच्या क्लिप्स पाहून त्याची टर उडवणार्‍या भक्तगणांनी जर काही पूर्वग्रह न ठेवता जरा फोकसने त्याचे एखादे भाषण १५-२० मिनिटे पाहिले तरी बास आहे.

ठाकर्‍यांनी कौल नाकारुन तडजोड केली होती हे अगदीच खरं आहे. पण त्यांनी शहांचं नाव घेतलं आणि तो माणूस माझ्या बुक्स मध्ये कपटी आहे त्यामुळे मी विश्वास ठेवला झालं. बाकी राजकारणात कोणालाच कोणी अस्पृष्य नाही हे आहेच. फक्त ते यावेळी फार डोळ्यात भरेल असे घडले त्यामुळे राग.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून चांगले होते >>>> होते का खरच ? फडणविसांना बाजूला ठेवा एकवेळ कारण तो पुन्हा वादाचा विषय होईल पण विलासराव आणि सुशीलकुमार ह्यांच्या इतकी तरी मॅच्युरीटी, व्हिजन, कामाचा उरक उबाठांना होता का ? कोव्हिडच्या सुरुवातीच्या काळात बरे वाटले होते पण नंतर अगदीच प्रभावहीन वाटले.

बाकी सगळे सारखेच >>>> अगदी १००% अनुमोदन. फडणविसांनी त्या पहाटेच्या शपतविधीचं नाटक न करता गुपचूप विरोधात बसायला हवं होतं. त्याने भरपूर वेगळा मेसेज गेला असता आणि सहानुभूती मिळाली असती.

२००४ ला आघाडीला बहुमत नव्हतं >>> हो का ? बघायला पहिजे परत. पण तरीही टेक्निकली (नियमांप्रमाणे) ती सरकारं अल्पमतातली नव्हत असं मी वाचल्याचं आठवतय.

>> फडणविसांनी त्या पहाटेच्या शपतविधीचं नाटक न करता गुपचूप विरोधात बसायला हवं होतं. त्याने भरपूर वेगळा मेसेज गेला असता आणि सहानुभूती मिळाली असती. >> हो!
हा अमित शहा फॉर्म्युला आणि पुश असावा असं ऐकलेलं आहे. तसं असलं तरी देफची अक्कल कुठे गेलेली हे आहेच.

ती सरकारं अल्पमतातली नव्हत >> निवडणूक झाल्यावर इतर पक्षांचा पाठिंबा घेतला तर तो कायदेशीर असतो की. डाव्यांनी बाहेरून पाठिंबा दिला होता. अणुभट्ट्यांच्या मुद्द्यावर काढून घेतला.

कॉंग्रेस + असं ज्याला म्हणत असत त्या आघाडीला बहुमत नव्हते असे म्हणण्याचा अर्थ नंतर जे पक्ष पाठिंबा देतात त्यांच्या वर नैतिक दृष्टीने पाठिंबा चालू ठेवण्याचे बंधन नसते ही टांगती तलवार कायम असते.
हे सगळे विस्मरणशक्ती दांडगी असतानाही आठवण झाली म्हणून लिहिले आहे.

निवडणूक झाल्यावर इतर पक्षांचा पाठिंबा घेतला तर तो कायदेशीर असतो की >>>> हो मग तेच म्हणतोय की. ती कायदेशीर बहुमतातली सरकारं होती. Happy राव सरकार अल्पमतातलं होतं कारण त्यांनी कधी बहुमत सिद्ध केलं नव्हतं पण त्याचबरोबर विरोधकांनी ते पडूही दिलं नव्हतं कारण पुन्हा मुदतपूर्व निवडणूका नको होत्या त्यावेळी.

पराग, राव सरकारने बहुमत सिद्ध केलं होतं. म्हणून तर शिबू सोरेन यांच्यावर पैसे घेऊन मतदान केल्याचे आरोप झाले ना ?
इथे अल्पमत म्हणजे निवडणुकीचा कौल अल्पमताचा असणे हा आहे.

फडणविसांनी त्या पहाटेच्या शपतविधीचं नाटक न करता गुपचूप विरोधात बसायला हवं होतं. त्याने भरपूर वेगळा मेसेज गेला असता आणि सहानुभूती मिळाली असती. >> ॲक्चुली हे शक्य नव्हतं....जर आठवत असेल तर २०१७ नंतर शिवसेना - भाजपात खटके उडू लागले होते त्याच दरम्यान फडणविसांनी आपलं सौम्य स्वरूप सोडून आवाज वाढवायला आणि शिवसेनेपेक्षा (उद्धवपेक्षा) मीच कसा आक्रमक हिंदू आहे हे ठसवायला सुरवात केली होती. आणि त्या नेपथ्या ला सुसंगत आक्रमक हिंदू हा कधीही कुणासमोर झुकत नसतो, तो आपल्या आकांक्षांवर सहजासहजी मुठ माती सोडत नसतो.... उलट तो पुन्हा पुन्हा ठामपणे सांगत रहातो मी पुन्हा येईन....मी पुन्हा येईन.....मी पुन्हा येईन....असा हिंदू आपल्या सहकऱ्याच्या साथ सोडण्यामुळे त्याच्या आकांक्षां कसा सोडून देणार?.....ते सुसंगत नव्हतं.....मिळणाऱ्या सहानुभूती पेक्षा जिसकी लाठी उसकी भैंस हा मेसेज देणं त्याच्यासाठी उपयुक्त/सुसंगत होतं.... त्यामुळे पहाटेचा शपथविधी घडवला गेला.

Pages