लोकसभा -२०२४ चर्चा धागा.

Submitted by चद्रनाद नादीचार्य. on 7 April, 2024 - 15:36

लोकसभा २०२४, चर्चा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अक्षरनामाच्या लेक्खात - आघाडीने अजून जरा जास्त प्रमाणात जोर लावला असता, अजून थोडे जास्त कष्ट घेतले असते आणि आपल्या ऐक्याचे अजून चांगले प्रदर्शन केले असते,

यात लेव्हल प्लेइंग ग्राउंड असते तर हेही जोडायला हवं. यात निवडणूक आयोग, सरकारी यंत्रणा, प्रसारमाध्यमे असे मुद्दे येतील.

<< मतदाराना विकासाचे राजकारण नकोय. जात पात धर्म हेच पाहिजे. आता आघाड्यांच्या तडजोडी आणि भ्रष्टाचार हेच दिसणार.
Submitted by चिडकू on 4 June, 2024 - 20:24 >>

------ कुठला विकास?

मोदी , शहा , भिस्त यांच्या प्रचार सभा किंवा मोदी यांच्या मिळमिळीत प्रश्नाने भारलेल्या मुलाखती बघितल्यावर त्यांनी तरी कुठे विकासावर मते मागितली होती? दहा वर्षे सत्ता उपभोगल्यावर ( अगदी उपभोगलीच म्हणायची ) स्वत: च्या कामाबद्दल बोलण्यापेक्षा काँग्रेसच्या जाहिरनाम्यावरच जास्त बोलले.

माझी निर्मीती नॉन बायोलॉजिकल आहे, परमात्म्याने मला पाठविले - तोच माझ्याकडून कामे करवून घेतो. गांधी यांची ओळख चित्रपटामूळे झाली, (दहा वर्षे तुम्ही प्रधान मंत्री/ रखवालदार असल्यावरही ) पैशाने भरलेले अडाणी/ अंबानी यांचे टेंपो असली बालीश विधाने लोकांनी बघितली.

ED/ CBI/ IT चा गैरवापर करुन विरोधकांची गळाचेपी केली. आदळ आपट केली, पोलादी पंजे आवळले..... अगदी EC मधे पण मर्जीतली माणसे नेमली तरी गाडी काही ४०० पर्यंत नेता आलेली नाही. विकास झाला आहे असे मतदारांना वाटले नाही.

नानबा
आत्ताच्या परिस्थितीत bjp च सरकार येतय ही चांगलीच गोष्ट आहे, हे आधी नमूद करते >>>
भाजपा चाच पंतप्रधान ह्या वेळेस येणार ह्याचा आनंद च आहे कारण दुसरीकडे ही सध्या आनंदीआनंद च आहे.>>>
पोस्ट नाही पटली. ज्या लोकांची जागा कुठेतरी "दुसरीकडे" असायला पाहिजे होती ते आज आपले राज्यकर्ते झाले आहेत ह्या पेक्षा मोठे दुर्दैव अजून ते काय!

भाजपचा आय टी सेल, सोशल मीडियावरची हँडल्स आणि आता जोडीला टीव्ही न्युज चॅनेल्स , भाजपने प्रमोट केलेले प्रपोगंडा चित्रपट हे मुस्लिमांबद्दल जी भाषा वापरत आलेत ती भाषा यावेळी मोदींनी प्रचारसभांतून वापरली. यापेक्षा खाली घसरू शकत नाहीत असं म्हणावं तर रोज आणखी खालची पातळी गाठली.
भाजप सरकारे अस लेल्या राज्यांत याला कृतीची जोड मिळाली. दंग्याच्या नावाखाली फक्त मुस्लिमांच्याच घरांवर बुलडोझर कसा चालतो? ( बुलडोझर चालवणं बेकायदा आहे हे न्यायालयाने सांगूनही हे लोक जुमानत नाहीत. अमेरिकन हिंदुत्ववादी आपल्या स्वातंत्र्यदिन मिरवणुकीत बुलडोझर मिरवतात)
मुस्लिमांचं डिह्युमनायझेशन आणि डेमोनायझेशन करणं हा संघाचा जुना - मूळ गाभा आहे. मुस्लिमांना दुय्यम नागरीक करणं हा अजेंडा आहे. दुर्दैवाने ध्रुवीकरण इतकं झालं आहे आणि सुशिक्षित लोकांनीही हे स्वीकारलं आहे की विरोधी पक्षही याबद्दल फारसं बोलू धजत नाहीत.

चालत्या गाडीत रेल्वे पोलिसांचा एक जवान तीन मुस्लिम प्रवाशांना शोधून वेचून गोळ्या घालतो आणि त्यानंतर मोदी योगी यांची नावं घेतो, याचं श्रेय भाजपचं नाही , असं म्हणू शकाल का?

भाजपचा विचार करताना हा मुद्दा दुर्लक्षित करत असाल तर हिटलरच्या जर्मनीच्या इतिहासाची उजळणी करा.
अर्थात आता काळ बदलला आहे. लहान बाळांना बाँब टाकून मारलं तरी ते उद्याचे दहशतवादी होते असं म्हणत त्यावर मीम बनवायचा काळ आहे. त्यामुळे जर्मनीची आठवण करून देऊनही फार काही होईल असं वाटत नाही.

< विकास> नक्की कशाला विकास म्हणायचं हे स्पष्ट केलं की बरं असतं. याबद्दल सध्या एक धागा मायबोलीवर आहेच.
भाजपची विकासाची कल्पना - अधिकाधिक वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करायच्या आणि इतर गाड्यांमध्ये प्रवास करणार्‍या लोकांच्या हालात भर घालायची.
रिडिस्ट्रिब्युशन ऑफ वेल्थ हा एक मुद्दा गाजला. भाजपने खालून वर असे रिडिस्ट्रिब्युशन ऑफ वेल्थ केले. त्यावर मोदींना मुलाखतीत प्रश्न विचारल्यावर त्यांनी काय उत्तर दिले ते ऐकले असेलच.

भाजप बलात्कार्‍यांच्या पाठीशी प्रोअ‍ॅक्टिव्हली उभा राहतो, हाही ब्रेकिंग पॉइंट नसेल, तर वरच्या सगळ्या फुकटच्या वाफा आहेत.

दुर्दैवाने ध्रुवीकरण इतकं झालं आहे आणि सुशिक्षित लोकांनीही हे स्वीकारलं आहे की विरोधी पक्षही याबद्दल फारसं बोलू धजत नाहीत.
१००% सहमत. खूप धोकादायक पातळीपर्यंत पोचले आहे.

भरत, मी मुसलमान विरोधी पोस्ट्स ना विरोध करून, गांधी नेहरू वर घाणेरड्या पोस्ट्स t taakanaryaanaa virodh करून , ओवरोला जे काही चाललेलं आहे त्याला विरोध करून अनेक पर्सनल relations बिघडवून घेतले आहेत. अगदी 22 जानेवारी chyaa kaaryakramaachyaa वेळेसही unmaadaamule चिडचिड झालेली.
त्यामुळे तुम्ही मला हिटलर ची आठवण करून देत असाल तर उपयोग नाही.

मी गेले तीन दिवस कित्येक काळानंतर शांत feel करतेय, अस्वस्थ नाहीये.

त्या पोस्ट्सच्या मागे भाजप आहे, हे समजून घेणं कठीण आहे का?

आणि हे फक्त पोस्ट्सपुरतंच राहिलं आहे असं वाटतं का?

पण विरोधी पक्षाने ह्या वेळेस स्वताला सिद्ध करावे असे वाटते.
कसे करणार ?विरोधी पक्षाची मुस्कटदाबी केली जाते संसदेत. खोटे आरोप करून निलंबीत केले जाते. निवडणूक आयोग विरोधकांच्या प्रत्येक शंकेची टिंगल करतो ( निकाल लागेपर्यंत चालू होते ). हे सर्व थांबले पाहिजे

I have deleted my post because mala वाद घालत बसणं आणि सांगत राहणं शक्य नाही.

<< हिंदू आणि स्युडो हिंदू अशी विभागणी होतेय की काय Wink >>

------- हिंदू ( जो शांतता प्रिय आहे) आणि तालीबानी-हिंदू अशी विभागणी जास्त योग्य ठरेल. तालीबानी विचारसरणी भारताला अफगाणीस्तान/ पाकीस्तान च्या बरोबरीला नेतील.

मणिपूर मधे महिलांची बलात्कार/ नग्न धिंड काढल्यावरही ७५ दिवस षंढासारखे गप्प बसणे, वर्षभर महिला कुस्तीपटू आंदोलन करत होते तरी स्मृती इराणी ( काय खाते होते यांचे ?) किंवा हा " परिवार वाला" नॉन बायॉलॉजिकल entity तिथे फिरकला पण नव्हता.
महिला कुस्तीपटू जिंकलेले मेडल परत करत केले, त्यांना रस्त्यावरुन फरफटत नेले गेले.

राष्ट्रपती पदावर दलित महिला व्यक्ती आहे पण संसदेच्या उद्घाटनांत त्यांना कुठेही स्थान नव्हते. असे का झाले?

बिल्खिस बानू घटने मधल्या अपराध्यांना सोडविण्याचा प्रकारांतही किती खोटेपणा केला होता. हे सर्व घडत असतांना मुकेपणा हा पर्याय नाही आहे.

वरिल कुठल्याही घटनेत भक्तांना आवाज उठवावा असे वाटले नव्हते. आता खासदार कमी निवडून आल्यावर मतदारांना का दोष द्यायचा?

<पण विरोधी पक्षाने ह्या वेळेस स्वताला सिद्ध करावे असे वाटते.
कसे करणार ?विरोधी पक्षाची मुस्कटदाबी केली जाते संसदेत. खोटे आरोप करून निलंबीत केले जाते. निवडणूक आयोग विरोधकांच्या प्रत्येक शंकेची टिंगल करतो ( निकाल लागेपर्यंत चालू होते ). हे सर्व थांबले पाहिजे> यात प्रसारमाध्यमेही जोडा.

कसे करणार ?विरोधी पक्षाची मुस्कटदाबी केली जाते संसदेत. खोटे आरोप करून निलंबीत केले जाते. निवडणूक आयोग विरोधकांच्या प्रत्येक शंकेची टिंगल करतो ( निकाल लागेपर्यंत चालू होते ). हे सर्व थांबले पाहिजे
>> They won't be able to do it this time around.

They won't be able to do it this time around. >>> हे या वेळी तरी शक्य आहे असं  दिसतंय कारणे दोन 

  1. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या संख्येमध्ये फारसा फरक नाही आहे, गेल्यावेळी संख्याच इतकी कमी होती की विरोधकांचाआवाजच दबून जायचा. 
  2. जर चंद्राबाबू किंवा नितीश बाबू यांनी लोकसभा अध्यक्ष पद  घेतले ( जे ते घेतीलच याची दाट शक्यता आहे ) तर विरोधकांच्या मुद्द्यांची किमान सदनात पूर्ण मुस्कटदाबी होणार नाही. कारण हे दोघे आज भाजपसोबत आहेत पण त्यांना इतरांशी संबंध बिघडवून चालणार नाही. 

<< कसे करणार ?विरोधी पक्षाची मुस्कटदाबी केली जाते संसदेत. खोटे आरोप करून निलंबीत केले जाते. निवडणूक आयोग विरोधकांच्या प्रत्येक शंकेची टिंगल करतो ( निकाल लागेपर्यंत चालू होते ). हे सर्व थांबले पाहिजे
>> They won't be able to do it this time around. >>

------ कपटनिती वापरण्याचा मागचा इतिहास पहाता असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

शंकर सिंह वाघेला यांचे गोध्रा किंवा माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे पुलवामा हल्ला या संबंधांतल्या मुलाखती बघितल्यावर पोलरायझेशन घडविण्यासाठी कुठल्या थराला जातील हे सांगता येत नाही.

पुलवामा हल्ला होतो, दोन तासांत हल्ला कुणी केला हे कळते, धुराळा उडतो, हल्लेखोर दोन दिवसांत कुठेतरी चकमकीतच मारल्या जातो पण हाच हल्लेखोर एव्हढा मोठा स्फोटकांचा साठा कसा आणतो, गाडीमधे फिरवतो याचा तपास होत नाही. त्या हल्लेखोराला जवानांच्या ताफ्याचा मार्ग कसा समजतो.

जवानांच्या ने- आण करण्यासाठी केवळ पाच विमाने मागितली होती पण गृहमंत्रालयाने नकार दिला ( राज्यपाल मलिकांनी असा स्पष्ट आरोप केला आहे - म्हणून ED/ CBI त्यांच्या मागे लावली) पण नामिबियातून, द. अफि अफ्रिकेमधून भारतात चित्ते आणायला " खास " विमान पाठविले होते.

They won't be able to do it this time around.

<<

चहापेक्षा किटली गरम अशी म्हण आहे.

प्रशासन, पोलिस यात घुसलेले, लॅटरल एन्ट्री करून घुसवलेले संघोटे कसा कारभार करतात ते दिसलं नाहीये का? अमुक विद्यार्थी आंदोलन केले म्हणून तुला पासपोर्ट मिळू देणार नाही किंवा तिसऱ्याच सरकारी योजनेचा लाभ मिळण्यापासून तुझे कुटुंब वंचित ठेऊ असले उद्योग हे करत असतात.

केवळ लोकांनी पूर्ण कौल दिला नाही म्हणुन बदलणारे नाहीत हे. They don't care what the mandate is. आणि भयंकरच खोटारडे (आता भाषणात उघडपणे हिंदु मुस्लिम करून, दुसऱ्या क्षणी "मै हिंदु मुस्लिम कर ही नही सकता!", इकडे नारीशक्तीचे भाषण त्याच वेळी तिकडे बलात्काऱ्यांची सुटका, नविन संसदेत लोकशाही बळकट करण्याचे भाषण आणि त्याच वेळी महिला आंदोलकांना उचलणे, शहिदांच्या नावे उघडपणे नावे मतं मागून, मै कभी ऐसा कर नही सकता ही काही पटकन आठवलेली उदाहरणे ) व कारस्थानी आहेत. अजूनही मीडिया, स्वायत्त संस्था ताब्यात आहेत, 40-50 खासदारांवर टांगती तलवार देऊन फोडा (त्यातले जास्त एनडीए समर्थन पक्षातले असु शकतात) सहा महिने वर्षभरात आणि परत करा मनमानी असे होणार नाही याची खात्री देता येणार नाही.

कपटनिती वापरण्याचा
<<
कपटाला नीती म्हणण्याचा हलकट उद्योग फक्त मनुवादी विकृती भरलेले मेंदुच करू शकतात.

न्यायपालिकेतले संघाचे लोक.
<<
हो ते राहिलंच.

चौथा स्तंभ देखील सडवला आहेच तोही मोजला पाहिजे, ब्लेम द victim गेम ..

गृह खातं भजप स्वतःकडेच ठेवेल. म्हणजे इडी/ सीबीआय सगळंच आलं की. मग परिस्थिती फारशी सुधारेल असं वाटत नाही. लोकसभाध्यक्ष कोणाचा असेल आणि तो आपली विवेक बुद्धी किती वापरेल ह्यावर संसदेतील काम्काज अवलंबुन असेल. नाहीतर विरोधी खासदार निलंबित केले की झालं

गोध्रा (२००२) - गाडीच्या या डब्ब्यामधे कारसेवक आहेत, याच मार्गाने याच गाडीने जाणार आहे अशी माहिती कुणाला होती. आग कुणी लावली होती? आतून का बाहेरुन. चौकशी झाल्या - परस्पर विरोधी निष्कर्ष आहेत.
ते पोलिस अधिकारी भट अजूनही तुरुंगांत का खितपत पडले आहे? त्यांना जामिन का नाही ?

पुलवामा (२०१९) - जवानांचा एव्हढा मोठा ताफा रस्त्याने जाणार आहे , वेळ/ मार्ग अशी महत्वाची माहिती कुणाला होती? स्फोटकांचा एव्हढा मोठा साठा देशांत येतोच कसा? हवाई मार्गाने जवानांची ने-आण करायला नकार का दिला गेला ?
DSP दविंदर सिंहला गंभिर आरोप असतांनाही जामिन कसा मिळाला?

<< गृह खातं भजप स्वतःकडेच ठेवेल. म्हणजे इडी/ सीबीआय सगळंच आलं की. मग परिस्थिती फारशी सुधारेल असं वाटत नाही. लोकसभाध्यक्ष कोणाचा असेल आणि तो आपली विवेक बुद्धी किती वापरेल ह्यावर संसदेतील काम्काज अवलंबुन असेल. नाहीतर विरोधी खासदार निलंबित केले की झालं >>

----- ED - हे वित्त मंत्रालयाच्या आंतर्गत येते , त्यांच्या संकेत स्थळावर तसे लिहीले आहे.
https://enforcementdirectorate.gov.in

नायडू , नितीश किंवा त्यांचे क्रमांक दोन यांच्या संबंधांतल्या फाइल तयारच असतील... एक एक करुन सहकार्‍यांना पोखरतील. महाराष्ट्रात शिवसेनेचा विश्वासघात करायला मागे पुढे पाहिले नाही तिथे हे नायडू आणि नितीशकुमार कोण आहेत?

नानबा, तुमची सर्वात पहिली पोस्ट, जी डिलीट केली आहे, ती तुमच्याशी काही अंशी सहमत काही अंशी नसूनही ती उडवावी असे मला वाटत नाही. तुम्ही कुठल्या बाजूच्या आहात हे ठाऊक नाही. पण जर तुम्ही मोदी समर्थक असाल आणि आता त्या उन्मादातला फोलपणा समजला असेल तर पुष्कळ झाले असे मला वाटते. तुम्ही नसाल तर इग्नोर करा.

Pages