लोकसभा -२०२४ चर्चा धागा.

Submitted by चद्रनाद नादीचार्य. on 7 April, 2024 - 15:36

लोकसभा २०२४, चर्चा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

जर मोदी शहांनी योग्य तो धडा घेतला असेल तर ह्या अशा अंधभक्तांना थाम्बवायला हवं. अर्थात शक्य असेल तर, भस्मासूर बाटली बाहेर पडला आहे म्हणा

मी फक्त ईतकच म्हणेन की ही निवडणूक जनतेन हँक केली होती उन्मत्त झालेल्या मोदी फडणवीस व शहांना धडा शिकवलामोदी व भाजपने आपल्या मात्रुसंसंस्थेच्या पाठीतही मोदी स्वार्थासाठी खंजीर खुपसला सभ्य राजकारणाला तिलांजली देत पक्ष पळवले ईडी सिबीआय चा गैरवापर केला त्यामुळेचारसो पारचा नारा अंगाशी आला आणि स्वबळावर बहुमतही मोदी व भाजपला मी ळवताच आले नाही मोदीच्या नसलेल्या हवेचा फुगा हवेतच विरला बाकी भारतीय जनतेलाही कळले की एकाच पक्षाला पाशवी बहुमत देणे हे लोकशाहीसाठी घातक आहे म्हणून जनतेने संसदेत प्रबळ विरोधीपक्षही दिला सरकार भाजपचे बनो वा इंडिया आघाडीचे विरोधी पक्ष प्रबळच रहाणार जय लोकशाहीचा झाला मोदीनां फक्त लाख मताचा लिड तर भाजप नेते ज्याला पप्पु म्हणून हिनवत होते त्याने अमेठी सह दोन्ही जागा जींकत तिन ते चार लाखाचा लिड घेतला अयोध्येतही जनतेन भाजपला धडा शिकवला म्हणजे ही निवडणूक जनतेने लढवली वजींकलीही सत्तेत कुणीही बसो पण प्रबळ विरोधिपक्ष दिल्याबद्दल भारतीय जनतेचे आभार मानायला हवेत ।

मोदी शहांनी योग्य तो धडा घेतला असेल तर >> याची सुतराम शक्यता वाटत नाही. निदान आपण म्हणतोय त्या अर्थाने तरी धडा घेतला नसेलच. जास्तच लोकशाही दिली होती आपण,( कोणीही युट्युबवर व्हिडिओज काय अपलोड करतात, हवे ते ट्विट्स काय करतात, वाटेल तेव्हा आपले जुने व्हिडिओ काय वर काढतात, सिल करवलेली बँक्स अकाउण्ट्स उघडण्याचे आदेशच काय येतात, आत केलेल्यांना जामीनच काय देतात, आपण एवढी काळजी घेउन लपवलेली कृत्ये ऐनवेळी बाहेर काढुन चक्क 'आपल्याच' आयोगाच्या साईटवर डेटा पब्लिशच काय करतात ई.)आता असे होऊ देण्याची चूक करायची नाही असा धडा घेउन शकतात.

भाजपा चारसौ पार गेली तर संविधान खतरे मे असा खूप प्रचार झाला आणि त्याचा नक्कीच भाजपाला फटका पडला. पण नक्की कसे खतरे मध्ये गेले असते हे कोणी सांगू शकेल का ? निव्वळ मेजॉरिटी मुळे कोणाला संविधान बदल करायला वाव असेल तर, काँग्रेसला ४०० पार मिळाले तरी पण मग संविधान खतरे मध्ये जाईल

उद्या मराठा , जाट आंदोलनामुळे आरक्षण मर्यादा ५०% च्या वर न्यायची असेल तरी पण संविधान बदल करावा लागेल ना ?

<आता EVM hack झाले आहेत की नाहीत? Election rigged आहे की नाही? आता भारत democracy राहिला आहे की नाही? Lol>

मतदानानंतर जाहीर केलेले मतदानाचे आकडे आणि मतमोजणीनंतरचे आकडे यात फरक आहे. याचं उत्तर आयोग देणार नाही. २०१९ मध्येही दिलं नव्हतं. मतदानोत्तर आकडेवारी गायब केली.

नैरृत्त्य मुंबईतला निकाल कसा कसा बदलला ते पाहता इथले अधिकारी चंडिगढहून प्रशिक्षण घेऊन आले होते का असा प्रश्न पडला.

बरं, या पुढे तरी संसदेत विरोधी पक्षाचे लोक बोलत असताना त्यांचा आवाज किंवा चेहरा किंवा दोन्ही किंवा ते स्वतःच गायब होणार नाहीत अशी आशा ठेवावी का?

He poster त्या लष्कराच्या भाकरी वर पोस्ट करा एकच आकडा मूर्खा सारखा छापला आहे सगळीकडे.
ही दुक्कल ह्यातून काहीही धडा घेणार नाही. उलटपक्षी आता ह्यांची प्रचंड तडफड होत असणार आहे, आणि काहीतरी सनसनाटी घडवून आणतील. चार तारखे पासून झोपले सुधा नसतील. थांबा आणि पहा हे आपल्या नशिबी.

मतदानानंतर जाहीर केलेले मतदानाचे आकडे आणि मतमोजणीनंतरचे आकडे यात फरक आहे. >>>> नक्की काय प्रोसिजर आहे ते पाहावे लागेल. Postal ballets व इतर गोष्टी हा फरक पाडू शकतात का?

काही वर्षांपूर्वी election duty वर असताना आम्ही sincerely आमच्या मतदानाचा form भरून देत होतो कारण आम्ही आमच्या मतदान केंद्रात evm मध्ये मत नोंदवू शकत नव्हतो. आणि आम्हाला तर मतदान करायचेच असायचे. ज्या गोष्टीसाठी घाम गळतोय त्यापासून आम्हीच का वंचित राहावे? एकदा तिथल्या अधिकाऱ्यांनी ते form जमा करणे वगैरला इतका casual approach दाखवला होता की काही from चक्क जमिनीवर इकडे तिकडे पडले होते. मला वाटलं गर्दी गोंधळात असे होतेय म्हणून मी ते गोळा करुन करुन टेबलवर दिले आणि म्हटले आमचे मत जाईल हो, प्लिज हे नीट ठेवा. त्यावर तो म्हणाला होता की अहो हे मोजलंच जात नाही. अगदीच टाय झाला तर मोजले जातात फारतर. हे ऐकल्यावर तुम्हीच सांगा काय वाटलं असेल आम्हाला? आम्ही त्यानंतर इलेक्शन ड्युटी लागली की कसलेही form भरून मत नोंदवणे बंद केले. आता मोजली तरी जात आहेत बहुतेक.

नैरृत्त्य मुंबईतला निकाल कसा कसा बदलला ते पाहता इथले अधिकारी चंडिगढहून प्रशिक्षण घेऊन आले होते का असा प्रश्न पडला. >>> हो ती मतमोजणी खूप वर खाली होत होती. जर हेच उलटे झाले असते तर?? आणि निकाल बदलायला एकच का अधिकारी प्रशिक्षण देवून पाठवला असेल? भली मोठी batch असे प्रशिक्षण देवून नसती का पाठवता आली? मानखुर्दची (मिहीर कोटेचा ) मतमोजणीही अशीच आश्चर्यजनक होती असे ऐकले.

एके काळी काँग्रेस, NCP ला ही मत देवून झाले आहे माझे. BJP-शिवसेना युती तुटली, शिवसेना तुटली ह्याचेही वाईट वाटते.... बाळासाहेबांसाठी. अनेकांना वाटत असेल तसे. पण जग बदलत असते आणि राजकारणात कोणाचाच भरवसा नाही. त्यांच्या पायी आपण toxic न होणे हे साधता आले पाहिजे.

अतीमहत्वाकांक्षी ४०० पार न झाल्याबद्दल मला खूप बरे वाटले आहे. भ्रम म्हणा, माज म्हणा... कुणालाही झाला की तो उतरायला हवाच. जे झाले ते उत्तम झाले.

एकेकाळी Congress = सरकार असे समीकरण होते. दुसरे कोणी असूच शकत नाही अशी अवस्था. लोकांनाही असेच वाटे, काँग्रेसलाही असेच वाटे. पण त्यांचाही माज जनतेनेच उतरवला.

इतक्या मोठ्या देशातला इलेक्शन सोहळा उत्तम प्रकारे पार पडल्याबद्दल पोलीस (आणि इतर security forces), Administration, Election duty केलेले लोक आणि भारतीय जनता... ह्यांचे आभार व मनःपूर्वक अभिनंदन.

त्यावेळी आणि ह्यावेळीही.... It is proved that we are robust democracy. कोणी किती fear mongering केले तरी तसे नाहीये.

Long live Indian Democracy.

(जर हेच उलटे झाले असते तर?)
उलटे होताना दिसत नाही ना!
इथे पोस्टल व्होट्सचे आकडे बदलत गेले. फरक कमी असल्याने पोस्टल व्होट्स महत्त्वाची ठरली आणि त्यांच्या वैधतेबाबत मतमोजणी अधिकाऱ्याचे मतही.
च़ंडिगढमध्ये व्हिडियो होता, तरीही तो प्रकार नाकारला, काय काय कारणे दिली. पटकन विसरून जायचं?

माझ्या पहिल्या पोस्टमध्ये मी निवडणूक आयोगाच्या अनेक निर्णयांबद्दल आणि कामकाजाबद्दल लिहिल़ आहे. जर निवडणूक आयोग निष्पक्ष असता तर निकाल आणखी वेगळा आला असता.

मीडिया हा लोकशाहीचा एक खांब. तो आपल्या कर्तव्याला जागतोय का हे बघूच. त्यांचीही विश्वासार्हता रसातळाला गेलीच आहे. पण त्यांना बळी पडणारी भोळी भाबडी जनता बरीच आहे. जाणून बुजून बळी पडणारे शिकले सावरलेले हुशार लोक आणखी वेगळे.

असाच प्रकार कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बंगलोरमधल्या मतदारसंघांत झाला.

It is NOT a certificate of health for India's democracy. >>> Perfect!
(वर भरत यांनी दिलेल्या लिंक मधील वाक्य.)

पण त्यांना बळी पडणारी भोळी भाबडी जनता बरीच आहे. जाणून बुजून बळी पडणारे शिकले सावरलेले हुशार लोक आणखी वेगळे. >>> बरोबर. दोन्ही बाजूनी बरेच खरे खोटे प्रचार चालू असतात. जनता दोन्ही प्रचारांना बळी पडताना दिसते. त्याचा उबग आला आहे. आमचंच खरं हा हेका, अट्टाहास नकोसा वाटतो. आपल्यापेक्षा वेगळे मत असलेल्याची अक्कल काढणे बघायला नकोसे वाटते. एखाद्या पक्षाची (किंवा वेगवेगळ्या पक्षांची ) काही मते पटू /न पटू शकणारी जनता असते हेच मान्य होताना दिसत नाही. सगळं शुभ्र किंवा सगळं काळं असं नसतं. एक एक व्यक्तीही तशी नसते तर अश्या अनेक व्यक्तींनी बनलेला पक्ष कसा असेल? पण अशी पूर्ण पांढरी किंवा पूर्ण काळी अशी प्रतिमा जाणूनबुजून निर्माण केली जाताना दिसते. त्या दोनच options मध्ये सामान्य जनतेला कोंबून बसवयचा अट्टाहास केला जातो. लेबलिंग केलं जातं. हे होवू नये. हे देखिल एक प्रकारचे polarization आहे. Respect each others intellect.

उलटे होताना दिसत नाही ना! >>> मिहीर कोटेचाचे मानखुर्द मध्ये नक्की काय झाले? फक्त उल्लेख वाचला मिडीयामध्ये. खरा खोटा धुराळा खूप उडवला जातो मीडियामध्ये त्यामुळे खूप involve होत नाही, जितकं कमी influence होता होईल तितके बघते. कसरत आहे ही. पण दोन्ही बाजूने चालू असलेले extreme hatred बघता ती कसरत करणे परवडते. विरोधी मत असणारे लोक देखिल आपलेच आहेत, भारतीयच आहेत हे भान सुटता कामा नाही. त्यांचा तिरस्कार मनात निर्माण होता कामा नये.

जनतेनी भाजप ला भरघोस यश दिलेलं नाही आणि काँग्रेसआणि मित्र पक्षांना 2019 पेक्षा खुप जागा जास्त मिळाल्या आहे. ह्याचा अर्थ काँग्रेस लोकांना फार चांगली वाटतेय असा आहे का ? की भाजप नको म्हणून काँग्रेस हीच भावना अधिक आहे ? अर्थात आपल्याकडे लोकशाही आहे, निवडणुका होतात म्हणून हे शक्य झालं हे नाकारता येत नाही.

लोकशाही मध्ये सशक्त विरोधी पक्ष असणे ही गरज लोकांनी अधोरेखित केलीये ममो. लोकांचा कल लक्षात घेऊन सत्ता राबवावी, लोकांना गृहीत धरू नये हा संदेश दोन्ही बाजूंसाठी आहे

आमच्याकडे एकदा काही गुंड कार्यकर्ते दार फोडून घरात घुसले. बर्गलर डिटेक्शन सिस्टिमने फोन वर अलार्म दिला आणि वेब कॅमेरात मला गुंड लोखंडी कपाट उघडायच्या प्रयत्नात दिसले. मी फार काही लांब नव्हतो, आणि होतो तिथे जवळ पोलीस स्टेशन होते. मी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलीसांना फोन वर सगळे दाखवले आणि चला म्हणालो लगेच नाहीतर ते पूर्ण घर साफ करतील. पण पोलिसांनी वेळ काढूपणा केला आणि ते गुंड घर सोडताहेत दिसल्यावर मला म्हणाले चल जाऊ. आम्ही निघालो, मी पोलिसांना तुम्ही मुद्दाम उशीर केला, त्यांना पकडता येऊ नये म्हणुन असा आरोप केला.

आम्ही घरी पोचलो तर गुंड निघून गेले होते. मी त्यांनी काय चोरून नेले सांगू लागलो. हॉल मधला टीव्ही, लॅपटॉप, ऍपल वॉच, लोखंडी कपाटातील दहा हजार आसपास कॅश, त्यातील नेहमीच्या वापरातील दोन सोन्याच्या बांगड्या, दोन अंगठ्या, चार चांदीची ताटं, वाट्या, पेले.

मग पोलीस म्हणाले बरं आता काय काय गेलं नाही हे पण सांगा. मी एक एक करून सांगायला लागलो, बेडरूम मधला टीव्ही, पीसी, बेडरूम मध्ये असलेली गोदरेज सेफवर मोठे डेंट आहेत पण उघडता नाहीं आली त्यातले दागिने, वीस हजार कॅश एवढे नाही नेले, मावे, फुप्रो

मग पोलीस म्हणाले "बघ! ते खरंच चोर असते त्यांनी या वस्तु सोडल्या असत्या का? विचार कर शांतपणे. आता तरी कार्यकर्त्यांना गुंड चोर म्हणणे, पोलिसांवर आरोप करणे बंद करा."
आणि ते निघुन गेले.

(चोरी झालीच नाही - भाग २:)
-----
(रआ: भाग-१. म्या पामराचा नव्हे.)

Submitted by अश्विनी के on 7 June, 2024 - 12:59 पूर्ण पोस्टला अनुमोदन

मानव Happy
भाग 1 कुठे आहे? ( हा ट्रॅप आहे का?)

सशक्त विरोधी पक्ष असणे >>> हे उत्तम झालेले आहे. भारताचे ह्यातच भले आहे. फक्त संसदेतही एकमेकांच्या पक्षीय उखाळ्यापाखळ्यांपेक्षा देशाच्या भल्याचे निर्णय घेतले जावेत. हवे तिथे strong, हवे तिथे मऊ राहाता आले पाहिजे.

काही separatists भरघोस मतांनी निवडून आले आहेत ह्याचा अर्थ ती विचारधारा संसदेत असणार आहे. ते भारताशी निष्ठा दर्शवणारी शपथ घेतील... घ्यावीच लागेल. ते जर त्यांच्या भागाची development करत असतील तर त्यांना योग्य ती मदत, separatist agenda राबवायचा प्रयास करत असतील तर त्यांना यशस्वी होवू न देणे हे सत्ताधारी व विरोधी पक्षाचे दोघांचे काम असेल. तिथे केवळ विरोधास विरोध चालणार नाही.

माझे एक निरीक्षण सांगतो.
दिल्लीत मदनलाल खुराना युग चालू असतानाची गोष्ट.

काम पहाटे संपले आणि फ्लाईट बुक नव्हती. ऑगस्ट क्रांती राजधानी मिळाली. संध्याकाळी सात च्या दरम्यान एक ओळखीचा वाटणारा चेहरा दिसला. खूपच डोके शिणवले तेव्हा आठवले दिल्लीत भाजपचे जे लाखो पोस्टर्स होते त्यावर हा चेहरा होता. (दिल्ली प्रदेशाध्यक्ष होते काही काळ विजयकुमार.. आडनाव लक्षात नाही गोयल असेल बहुतेक).

न राहवून त्यांना विचारले. मग त्यांनी हसून दारूची. बाटली काढली. ऑफर दिली. नाही म्हटल्यावर नाराज झाले. दारूवरून जोक मारले. मग दोस्ती झाली.

गंमत नंतर एकदा दिल्ली देहरादून शताब्दी मधे पुन्हा ते होते. त्याच्या सोबत एक कॉग्रेस नेता आणि एक सपाचा आमदार कि खासदार होता. ते त्यांच्या शिक्षण सःस्थांबद्दल बोलत होते एकमेकांचं कौतुक करत होते.

मी उठलो तेव्हा विजयकुमार यांनी आवाज दिला. हम राजधानी मे मिले थे, याद है ना? नाम भुले गया माफ करना म्हणाले.
मी म्हणालो इतका मोठा माणूस लक्षात ठेवतो हेच खूप आहे.
तर म्हणाले आप हमसे बडे हो सर जी. जिस दिन हमसे उब गये एक उंगली से पटक दोगे.
माझी कामं गेल्या वेळी सांगितलेली लक्षात होती. बाकीचे दोघे म्हणाले
बुलाओ भी कभी, हम भी देखना चाहते है
तर कॉंग्रेस वाला म्हणाला इन्हे मत बुलाना, उधर भी मेडिकल कॉलेज खोल देंगे.
तिघेही जोरात हसले.
सांगायचा मुद्दा एवढाच. लोक जेव्हढे इथे दिवसरात्र एकमेकांवर तुटून पडतात तसे नेते करत नाहीत. उगीच अशोकराव चव्हाण, विखे अजित पवार गेले का?
माझ्या माहितीप्रमाणे ते ईडीच्या धाकाने गेले हा परफेक्ट देखावा करण्यात आला होता. म्हणजे जनतेला सांगायला कारण मिळाले.
ती लुटुपुटीची कारवाई होती.
नाही तर शरद पवार गटाने कोर्टात याचिका दाखल केली असती.

{विरोधी मत असणारे लोक देखिल आपलेच आहेत, भारतीयच आहेत हे भान सुटता कामा नाही. त्यांचा तिरस्कार मनात निर्माण होता कामा नये.}
हे त्या तिकडे सांगा. नातलग, शाळा, कॉलेजच्या WhatsApp groups वर anti national certificates आणि पाकिस्तानची तिकिटं मिळतात आम्हांला.

{ह्याचा अर्थ काँग्रेस लोकांना फार चांगली वाटतेय असा आहे का ? की भाजप नको म्हणून काँग्रेस हीच भावना अधिक आहे}

प्रत्येकाचं मत आणि कारण वेगळं असेल ना?
मी इथल्या भाजप समर्थकांना अनेकदा विचारलं आहे, तुम्ही भाजपला मत कशासाठी देता? विकास ,भ्रष्टाचाराचा नायनाट की हिंदुत्व.
२०१४ मध्ये इथे एका मायबोलीकरांचे मोठा लेख लिहून युपीए किती वाईट ते सांगितलं. Vote for change , not for hindutva असं लिहीलं. मग मोदी सरकारने दिलेला change बघून ते गायब झाले.

<अर्थात आपल्याकडे लोकशाही आहे, निवडणुका होतात म्हणून हे शक्य झालं हे नाकारता येत नाही. >

पण ती लोकशाही सशक्त आहे असं नाही. याबद्दल मी निकालानंतरच्या माझ्या पहिल्या पोस्टमध्ये सविस्तर लिहिलं आहे. पुन्हा पुन्हा लिहिण्यात अर्थ नाही.

हे त्या तिकडे सांगा. >>> म्हणजे कुठे? हे सगळ्यांनाच लागू आहे. तिरस्कार दोन्हीकडून दिसतो. शब्द वेगवेगळे असतील.

ह्या विषयावर आता इथे थांबते. इलेक्शन रणधुमाळी संपली आहे.

<काही separatists भरघोस मतांनी निवडून आले आहेत ह्याचा अर्थ ती विचारधारा संसदेत असणार आहे>
यापूर्वी नथुराम ची भलमण करणारी प्रग्या ठाकूर लोकसभेत होती की.

मला both sides करणारे लोक ढोंगी वाटतात. शब्द हार्श वाटला तर क्षमा करा.
. तुमचे प्रतिसाद अनेक वर्षे वाचतोय. केव्हा आणि कुठे लिहिता, आणि
केव्हा आणि कुठे लिहीत नाही ते कळतं.

BJP Sarkar was renamed as Modi Sarkar but in doing so, he did not realise that the new name was a four letter word Happy Happy

<अर्थात आपल्याकडे लोकशाही आहे, निवडणुका होतात म्हणून हे शक्य झालं हे नाकारता येत नाही. >

नशीब.. आहे अजून तरी.. किती ग्रेट काम केलंय लोकशाही राहू देऊन..

Pages