निवडणूक रोखे योजना: असंवैधानिक, अपारदर्शी

Submitted by उदय on 26 February, 2024 - 01:16

गेल्या आठवड्यांत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निकाल दिला. २०१७ मधे जाहिर झालेली आणि पुढे २०१८ मधे प्रत्यक्षांत आणलेली "निवडणूक रोखे योजना “ ( Electoral Bond Scheme EBC) घटनाबाह्य (unconstitutional, arbitrary, and violative of article 14) ठरवून रद्द केली. भाषण स्वातांत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, तसेच माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन होते असे सर्वोच्च न्यायालयाने निकालपत्रांत म्हटले आहे.

निवडणूक रोखे State Bank of India (SBI) माध्यमातून विकले जात होते.
https://retail.onlinesbi.sbi/documents/Operating_Guidelines_for_Donors.pdf
रोख्यांचे मुल्य १ हजार, १० हजार, १ लाख, १० लाख, १ कोटी रुपये आणि त्यांच्या पटीमधे विकत मिळायचे. कोणत्याही भारतीय नागरिकाला/ समूहाला /कंपनीला निवडणूक रोखे विकत घेता येत होती. रोखे किती विकत घ्यायचे याला मर्यादा नव्हती. रोखे विकत घेतल्यावर, आपल्या पसंतीच्या राजकीय पक्षांना मदत म्हणून देणगी दिल्या जायच्या. रोखे वटविण्यासाठी राजकीय पक्षांना १५ दिवसांची मुदत होती. निवडणूक रोखे विकत घेणार्‍याचे नाव रोख्यांवर कुठेही नसायचे, त्यामुळे देणागिदाराचे नाव गोपनीय रहायची सोय होती अपवाद SBI (आणि म्हणून केंद्रातले सरकार).

२०१७ मधे निवडणूक रोखे योजनेला निवडणूक आयोगाने तसेच रिझर्व बँकेने तिव्र आक्षेप घेतला होता. त्या संबंधातले पत्रे उपलब्द आहेत. नंतर विरोध मावळला किंवा तो मोडून काढला गेला आणि लोकशाहीस बाधक, अपारदर्शी, पक्षपाती योजना आहे तशी पुढे रेटली गेली. निवडणूकीत वापरला जाणारा काळा पैसा उघडा करणे, आणि राजकीय पक्षांना मिळणार्‍या देणग्यांमधे पारदर्शकता आणणे मुख्य उद्देश होता (म्हणे). पण हे करतांना कुठेही रोखे खरेदी करणार्‍याचे आणि संबंधित लाभार्थी पक्षाबद्दल माहिती / आकडेवारी सार्वजनीक स्वरुपांत उपल्ब्द नव्हती.

निवडणूक रोखे प्रकर हा “unconstitutional and arbitrary” आहे असा स्पष्ट उल्लेख निकालपत्रात करतांना त्याला quid pro quo ( "something that is given to a person in return for something they have done" - केंब्रिज शब्दकोशातला अर्थ) असे पण संबोधले आहे. निकाल पत्र सर्वोच्च न्यायालयाच्या संकेत स्थळावर उपलब्द आहे.
https://main.sci.gov.in/supremecourt/2017/27935/27935_2017_1_1501_50573_...

योजना किती पक्षपाती आहे आणि योजनेचा एकाच पक्षाला ( सत्ताधारी भाजपाला ) किती फायदा झाला याची आकडेवारी निवडणूक आयोगाकडे आहे. आजपर्यंत १६,५१८ कोटी रुपयांचे रोखे विकल्या गेले आहेत, पैकी भाजपाला ६५६६ कोटी रुपये तर काँग्रेसला ११२३ कोटी रुपये मिळाले आहेत.
EBS_Donations_26Feb2024.png

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रामधे पुढील आदेश आहेत (अ) SBI ला निवडणूक आयोगाकडे रोख्यासंदर्भातली माहिती (रोखे विकत घेतल्याची तारिख, किती रकमेचा, विकत घेणार्‍याचे , लाभार्थी पक्षाचे नांव , किती रक्कम, तारिख) उघड करण्यासंबंधात आदेश आहेत. यासाठी ६ मार्च, २०२४ मुदत आहे.
(ब) निवडणूक आयोगाने वरिल मिळालेली माहिती त्यांच्या संकेत स्थळावर १३ मार्च २०२४ पर्यंत प्रकाशीत करावी.

लोकशाहीमधे मुक्त आणि निष्पक्ष ( free and fair ) निवडणूकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, नव्हे तोच लोकशाहीचा गाभा आहे. सर्व पक्षांना समान संधी मिळायला हवी तरच कष्टाने मिळविलेली लोकशाही टिकेल, बळकट बनेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोखे महाघोटाळ्या प्रकरणी प्रथमच प्रधान चौकीदारांनी आपले मौन व्रत सोडले आहे.

१५ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाने निवडणून रोख्यांना घटनाबाह्य, आणि असंवैधानिक घोषित केले. ५४०+ खासदार, त्यांच्या मदतीला निष्णांत वकिलांची तसेच घटना तज्ञांची मोठी फौज असतांनाही संसदेचा / देशाचा बहुमोल वेळ वाया घालविला.

जबाबदारी / accountability कुणीतरी स्विकारायचे धाडस दाखवायला हवे.

पारदर्शकता कशाला म्हणायचे? कोण, कुणाला, कधी, किती पैसे देत आहे हे केवळ आणि केवळ सत्तेत असणार्‍या पक्षाला कळायचे. पुढे पक्षाच्या ED/ CBI शाखेला आदेश सुटायचे आणि पक्ष विकासांत ED/ CBI च्या कार्याचा नवा अध्याय सुरु होतो.

पक्षाचा विकास होतो पण एक एक करत केंद्रिय संस्था निकामी ठरत आहेत.

चुनावी बांड का विरोध करने वालों को जल्द ही पछतावा होगा: PM मोदी ने कहा

सगळे पक्ष सारखेच चोर आहेत गं बाई

<< चुनावी बांड का विरोध करने वालों को जल्द ही पछतावा होगा: PM मोदी ने कहा
सगळे पक्ष सारखेच चोर आहेत गं बाई >>

------ चुनावी बांड का विरोध हे कुणासाठी आहे?

सर्वोच्च न्यायालयाने रोख्यांना असंवैधानिक आणि अपारदर्शक ठरविले आहे. त्यांना पण पछतावा होणार असे सुचवायचे असेल. आता ४०० खासदार येणार म्हटल्यावर राजाची लहर म्हणजे कायदाच.

https://twitter.com/sandeep_PT/status/1774669944912760915

खरं आणि खोटं यांचे अर्थच बदलून टाकले.

ये तो मोदीने इलेक्टोरल बाँड बनाया है, इस के कारण आप ढूंढ पा रहे हो कि पैसा - बाँड किसने लिया, कहाँ दिया, कैसे दिया.

हेच शोधता यायला नको अशी कागदावरची योजना होती. पण बहुतेक मोदीलाच या माहितीची गरज होती (मी सांगितलं ते लोक पैसे देताहेत की नही? विरोधकांना कोण पैसे देतोय?) त्यामुळे स्टेट बँकेला तो रेकॉर्ड ठेवायला लावून माती खायला लावली, ती सर्वोच्च न्यायालयात जाऊन मातीवर माती खाते आहे. सोबत साळवेसुद्धा माती खाताहेत.

इंडियन एक्सप्रेसचे पत्रकार मोदींगेट ची छाननी करून रंजक माहिती समोर आणत आहेत. तोट्यात असणाऱ्या कंपन्यांनी रोखे खरेदी करून मोदीच्या पार्टीला दिले.

भ्रमर हो मीही हे एका मैत्रिणीला लिहिलेलं. अडखळत + तोंडातल्या तोंडात- शब्द एकमेकांत अडकत, अस्पष्ट उच्चार

खूप झाले फेकून. आता बास! शरीराने शेवटी बंड केले. टेलेप्रॉम्प्टरलाही विश्रांतीची गरज आहे.

रोखे महाभ्रष्टाचारावर खासदार संजय सिंग यांनी छान मुद्दे मांडले.
https://www.youtube.com/watch?v=Vxi_K3lj1ME

या आधी पण संसदेत त्यांनी जनतेचे प्रश्न छान प्रकारे मांडलेले बघितले. ED च्या कोठडीत काही काळ होते म्हणजे प्रामाणिकपणे जनसेवा करत होते याचा सज्जड पुरावाच आहे.

रोखे व्यावहारातून, एका शेतकरी कुटुंबाची मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे. अशी अनेक उदाहरणे असतील, माहित नाही.

शेतकरी कुटुंबाला तब्बल ११ कोटी रुपयाचे रोखे खरेदी करण्यास सांगितले, पैकी १० कोटी रु, भाजपाला तर १ कोटी रु सेनेच्या घटकाला, बहुधा सत्ताधारी शिंदे असावी.
(अ) दिड पटीने पैसे " परत " मिळतील असे सांगितले होते.
(ब) आयकर खात्याची वक्र नजर टाळण्यासाठी.

रोखे खरेदी शेतकर्‍याच्या कुटुंबा च्या "नावाने " झाली असली तरी पुढची पक्ष कार्यालयांत जाईपयंतची चेन माहित नाही. ११ कोटीचे रोखे.... त्याच्याहीपेक्षा फार मोठ्या किंमतीला विकले गेले असण्याची शक्यता असतेच.

https://www.thequint.com/news/politics/electoral-bonds-scam-dalit-farmer...

भयंकर आहे हे! : राग :
सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून उघड्या कानांनी एका पूर्ण व्हिडीओ, निदान कुठली औषधें/ कंपनी यापासून जागरूक रहावे या करता तरी.

१४ एप्रिल.
आज डॉ. भीमराव आंबेडकर जयंति. एकदा शेवटचे सार्वजनिक स्मरण करून घेऊया. कारण पुढच्या वर्षीपासून
ना रहेगी घटना,
ना रहेगा भीमा!

सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून उघड्या कानांनी एका पूर्ण व्हिडीओ, निदान कुठली औषधें/ कंपनी यापासून जागरूक रहावे या करता तरी.>>> शेर पाला है तो खर्चे के साथ थोड़ा खतरा भी होगा.... Biggrin

Pages