Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11
सध्या फ्लिपकार्ट , अॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.
**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अनुच्या पार्सल मध्ये कुणाचे
अनुच्या पार्सल मध्ये कुणाचे मोजे कुणाचे मोजे
कुरियरच्या माणसाला मोज्याचे ओझे मोज्याचे ओझे
सगळे
सगळे
अनु, कठीण आहे. तुझ्या
अनु, कठीण आहे. तुझ्या चिकाटीला दंडवत. माझा अॅमेझॉन, बिगबास्केट, मिंत्रा आणि फर्स्टक्राय सोडून इतर कुणावरही विश्वास नाही. फ्लिपकार्ट कधीतरी नाईलाजास्तव करते. बरेचदा कुठल्या ब्रँड्सच्या जाहिराती बघितल्या, चांगल्या वाटल्या तर अॅमेझॉनवर जाऊन तिथे मिळतंय का बघते. एकदाच फक्त विनोदच्या भांड्यांचा सेट त्यांच्या साईटवरून मागवला तर काय नोटिफिकेशन नाही, ट्रॅकिंग डीटेल्स नाहीत काही नाही. सगळं सुमसाम. मी मनोमन अक्कलखाती जमा केले पैसे तर बरोब्बर पाचव्या दिवशी मोडक्या खोक्यात पॅक केलेला माल घरी आला. आतलं खोकं आणि भांडी व्यवस्थित होती. पण त्यानंतर असलं धाडस परत केलं नाहीये.
हो, आणि स्विगी इन्स्टामार्ट आणि ब्लिंकिट पण वापरते. तिथे ऑर्डर चुकली तर लगेच इशू सोडवला जातो असा अनुभव आहे.
<< लै भारी इनोदी. म्हणून
<< लै भारी इनोदी. म्हणून परफ्युम दुकानातून वास घेउन घ्यावेत. >>
परफ्युम वापरायचा कशाला? रोज नियमित आंघोळ करावी सकाळ संध्याकाळ
पूर्ण अनुभव नुसता वाचूनच धाप लागली. तुमच्या संयमाला दंडवत. शेवटी पैसे परत मिळाले ते महत्त्वाचे, हुश्श !!
अनुच्या मांजर जी कुत्री आहे
अनुच्या मांजर जी कुत्री आहे आणि पार्सल डोर यांच्या अपार यशानंतर सादर आहे अनुचे मोजे
सहभावना, सहानुभूती बद्दल
सहभावना, सहानुभूती बद्दल धन्यवाद मंडळी
)
(यात अजून एक गंमत अशी की मानी कुरियर वाला सॉक्स पार्सल डोअर मधून आत टाकून गेला आम्ही घरी नसताना(घ्या मेल्यानो तुमचे मोजे आणि चुलीत घाला परफ्युम
मग संध्याकाळी तो परत आला होता त्याला म्हटलं की आता जाऊदे रिटर्न पिकप करणे.रिफंड मिळालाय.हा गोंधळ चालू राहील.ते लोक काही रिटर्न बिलावर मोजे लिहिणार नाहीत.तुम्ही काही मोजे घेणार नाही.आपण हे मोजे विसरून जाऊ(जरा विसावू या वळणावर.टॅन टॅन टॅन टॅ टॅ टॅ).मग तो पण म्हणाला की फक्त कोणी विचारलं तर तुम्ही पिकप रद्द केला आणि मोजे दिले नाहीत असं सांगा.)
पण हे मोजे आम्ही न वापरता तसेच ठेवणार आहे अजून 6 महिने.
अनु , अनुभव फारच तापदायक की
अनु , अनुभव फारच तापदायक की
तुम्ही लिहिलाय विनोदी पद्धतीने
लोकडाउन काळात फ्लिपकार्ट किराणा वाण सामान फ्रूटस विकत होते, तेव्हा किरकोळ ब्रेड वै सोबत केळी घेतली होती तर ती अतिपिकलेली आलेली.
फोटो काढून upload करून तिकीट रेज करून फॉलोअप घेऊन घेऊन त्यांना तुम्ही काळपट पडलेली केळी विकताच कशाला वै बडबड करून झालेंली
पैसे refund मिळाले आणि त्यांचा return पिकअप येणार असा मेसेज म्हणून आधीच काळपट साल होऊन5 बिलबिलीत झालेली केळी 4 दिवस बाल्कनीत ठेवलेली.
ते सगळं आठवलं.
मग, किमान झाडांना पौष्टिक
मग, किमान झाडांना पौष्टिक केळामृत तरी मिळालं की नाही?
अमेझॉन, फ्लिपकार्ट यात जास्त
अमेझॉन, फ्लिपकार्ट यात जास्त करून फ्लिपकार्ट वापरते कारण return सोपे वाटते.Refund लगेच मिळते.अमेझॉन
वरून एक वस्तू मोडक्या अवस्थेत मिळाली returnla खूप त्रास झाला.
बिग बा,blinkit,zepto चांगले आहेत.
एकदा blinkit वरून वेगवेगळ्या स्वादानुसार कुल्फी मागवल्या होत्या.पण एकाच स्वादानुसार मिळाल्या.त्यांच्याकडे रिटर्न साठी लिहिले असता,तुम्हाला अमुक इतक्या कुल्फी मिळाली आहेच हा हेका चालू होता.शेवटी कंटाळून आहे त्या कुल्फी स्वीकारल्या.
मी अनुच्या संयमाबद्दल कौतुक!
मानी कुरियर वाला सॉक्स पार्सल
मानी कुरियर वाला सॉक्स पार्सल डोअर मधून आत टाकून गेला आम्ही घरी नसताना>>
माझं आणि बिग बास्केटचं कोविड
माझं आणि बिग बास्केटचं कोविड पासून जमत नाही. कोणतीही ऑर्डर ते जास्तीत जास्त अर्धीच पाठवतात. मग फोनाफोनी करा, फोटो काढून पाठवा, असले उद्योग करावे लागतात. ते अगदी नको होतं.
अनु, खरंच पार्टी पाहिजे
अनु, खरंच पार्टी पाहिजे
कोविड काळात सुपरडेली हे ॲप
कोविड काळात सुपरडेली हे ॲप मस्त होते.2 वेळा मला तेलाची पाकिटे फुकट मिळाली होती.कस्टमर केयरला फोन करून नाहीतर चॅटिंग करून ती पाकिटे परत न्यायला सांगून थकले.बिचाऱ्या डिलिव्हरी बॉयचे पैसे कापायला नको.
शेवटी आता ते सामान तुम्हीच वापरा म्हणून मेसेज आले.
सुपरडेली मस्त होते.बहुतेक
सुपरडेली मस्त होते.बहुतेक सुपरडेली स्वीगी इंस्टामार्ट बनले, कारण सर्व यु आय सुपरडेली सारखाच दिसतो आहे.
कोविड काळात सुरुवातीला मी
कोविड काळात सुरुवातीला मी बिग बास्केट वरुन ५ किलो तेल मागवलेले ते कोणीतरी बाहेरच उचलून नेले. बाकी सर्व मिळाले. त्याला जास्त गरज असेल म्हणून मी काहीही फॉलो अप केले नाही
बिग बास्केट उगीचच फ्री आय्टे म देते ते मला फार वैताग येतो. दोन दोन किलो जास्तीचे कांदे, उगीचच सेंपल पॅक्स हे ते.
उ बो तुम मेरी दुकान बंद करके रहोगे. ( दिवे घ्या)
इंस्टा मार्ट वर ख्रिसम6
इंस्टा मार्ट वर ख्रिसमस दरम्यान लायटिंग फ्री मिळत होते अमुक एक रकमेच्या वर.नेमकी त्या काळात हे संपलं ते संपलं म्हणून जास्त खरेदी होऊन 3 लायटिंग माळा आल्या.मग काय, या खोलीत त्या खोलीत करून सगळीकडे लाईट.
या खोलीत त्या खोलीत करून
या खोलीत त्या खोलीत करून सगळीकडे लाईट.>> मी पण घेतलेल्या बिग बास्केट वरुन. आता फुलांची बास्केट, काचीची बरणी, काचेचा मोठा ग्लास म्हणजे लांबोडका ह्यात त्या माळा ठेवल्या आहेत. रात्री फार छान दिसतात. फोटो टाकीन.
हो हो फोटो टाका.
हो हो
फोटो टाका.
हायला हे लायटिंग मिसलं मी.
हायला हे लायटिंग मिसलं मी. पुढच्या नाताळात लक्ष ठेवीन
आता 1 किलो साखर मिळतेय बहुतेक
आता 1 किलो साखर मिळतेय बहुतेक इंस्टामार्ट वर 1000 च्या वर ला,मध्ये एक दोन वेळा सोलफुल चे बार मिळाले.(अर्थात आधी भाज्यांच्या किमती वाढवून ठेवल्या असतील.)
हो हो अनू. आजच एक किलो साखर
हो हो अनू. आजच एक किलो साखर आली सामान मागवलं त्याबरोबर.
लायटिंग मी मिसलं. श्या! मी पण लक्ष ठेवून राहीन यंदाच्या वर्षी.
यंदा सुमिथ चा मिक्सर भारतातून
बापरे! काय तो फॉलोअप!
यंदा एका कुरिअर कंपनीच्या हापिसात जायचा योग आला. तिकडचे विखुरलेले पार्सल, आणि एकूणच गोंधळ बघता आपलं पार्सल मिळणे हे आपल्या नशिबात असेल तरच काही होईल. डोकं उडवलेल्या कोंबडी सारखी त्या कुरिअर लोकांची गत होती. भयंकर प्रकार आहे तो.
यंदा सुमिथ चा मिक्सर भारतातून घेऊन यायचा होता. अमेझॉन वर योग्य व्होल्टेज वाला दिसला. तो मागवला. मी काही उघडून बघितला नाही. दोन दिवस आधी पॅकिंग करताना का कोणास ठावूक उघडून बघायची इच्छा झाली आणि त्यांनी २६० volt भारतीय पाठवलेला. तो रिटर्न घेतो, आणि बरोबर पाठवतो म्हणाले पण तो वेळेत येणं अशक्य आहे हे मला दिसत होतं.
मग जवळ पास क्रोमा, विजय सेल्स, कोहिनूर आणि एक दोन हाय फाय दुकानाच्या वेबसाईट वर योग्य व्होल्टेज चे उपलब्ध आहेत दिसलं आणि ठाणे/ मुलुंड अनेक दुकानं पालथी घातली. तिकडचे सेल्स पर्सन मंद मठ्ठ आहेत. एक से एक. त्यांना सांगून काहीही कळत नव्हतं. आणि ह्यात कशी जास्त भांडी आणि पॉवर आहे हेच आणि हेच. मला काय हवंय याच्याशी घेणं देणं नाहीच. मी बाहेर पडलो .. शेवटी गावदेवी मार्केटला बघा हा मातोश्रीचा फारसा सिरीयसली न घेतलेला सल्ला आठवून तिकडे गेलो. पण पहिल्याच दुकानातल्या गुज्जूभाय ने... काका सध्या बुष्कोटात होते, जेमतेम शिकलेले, हायफाय इंग्रजीचा खून करणारे न्हवते... पण काय हवंय सांगितल्यावर माळ्यावर जाऊन बरोब्बर मिक्सर अर्ध्या मिनिटात आणून दिला. ओपन करून घुरर करून दाखवला आणि मी न मागता ५०० रू. कमी करून खरेदी आटपून आम्ही दोन मिनिटात बाहेर पडलो.
अमेझॉन ने चुकीचा मिक्सर परत नेऊन विना कटकट पैसे परत केले.
वा, हा चांगला अनुभव आहे.
वा, हा चांगला अनुभव आहे.
anu तुमच्या follow up ला
anu तुमच्या follow up ला सलाम बाबा ! मी मागे एकदा ऐकले होते कि एका मित्राने फ्लिपकार्ट वरून mobile मागवला तर त्याला साबण पाठवला होता खोक्यातून..!!! ख खो दे जा.
अमितव >>वाह चांगला अनुभव ! सुमित मिक्सर कसा आहे ? मी यंदा सुजाथाचा आणलाय चांगला आहे , मस्त आहे , सुंदरच आहे ..! हा हा !!
(No subject)
(No subject)
अनु, त्या खराब केळी रिटर्न
अनु, त्या खराब केळी रिटर्न द्यायचे आहेत राहुदेत , ह्यापायी घरात तू क सहन केलेले त्यामुळे केळ्यामृत वै विषयच नाही
अमा, छान दिसत आहेत lights
बापरे अनू वाचूनच दम लागला.
बापरे अनू वाचूनच दम लागला. तुझ्या चिकाटीला सलाम. आणि पैसे परत मिळाल्याबद्दल अभिनंदन.
अमा बरणी छान दिसतेय लाइटिंग ची.
छान ग्लास!
छान ग्लास!
असे लाईट बघितले की स्ट्रेंजर थिंग्ज आठवतं.
फिटबीट:
फिटबीट:
(स्वगत: आधी हे फिटबीट वाले महान नकचढे.भारतात लोक 1000 ची साधी घड्याळं वापरत असताना 13000 चे बँड आणले.मग सर्वांनी बँड आणल्यावर महागाची घड्याळं आणली.आम्हीच साले xxx, त्याच्या ऍक्युरेटपणामुळे घेतो.)
1. तर नवऱ्याचं जुनं फिटबीट 3 वर्षां वापरलं.नंतर एकदा हात आपटून त्याची हाडं बाहेर निघाल्यावर त्याला निरोप आणि मूठमाती दिली.
2. व्हर्सा2 ला सेल होता, ते क्रोमा मधून विकत घेतलं.अतिशय तळहात फोडाप्रमाणे जपलं.पण 10 महिन्यात हळूहळू त्याचा डिस्प्ले बिघडला.आधी त्याने स्क्रोल होणं सोडलं.तरी मी ऍप वर बघत त्याला जिवंत ठेवलं. मग त्याने हळूहळू आपला एक एक भाग निकामी करून आत्महत्या करायला चालू केली.डिस्प्ले आणि चार्जिंग दोन्ही बंद पडलं.
3. मग एका मलेशिया बाईंशी सपोर्ट नंबरवर कॉल केला.बाईंनी नेहमीप्रमाणे 'हां, घड्याळाचे बटन दाबून बघा, चार्जर लावून बघा, पिना प्रेमाने पुसून बटन दाबून बघा' मध्ये 5 मिनिट घालवली.मग तिला पटलं की खरंच खराब आहे.तिने मेल आयडी विचारला फिटबीट चा(आता नेमका हा मेल आयडी मराठीतला एक कठीण शब्द होता.बाईला झेपेचना.मग स्पेलिंग सांगितलं.तर तिला सगळे बी व्ही ऐकू यायला लागले.मग आय फॉर इंडिया, डी फॉर डॉनकी करून पूर्ण मेल आयडी ची फोड सांगितली.तिने रिप्लेसमेंट तिकीट टाकलं.
4. तीन आठवडे त्यावर काहीच हालचाल नाही.मग त्यांना मेलवर हलवलं ते म्हणाले भारतात वेअरहाऊस मध्ये डिव्हाइस नाहीये.थांबा.थांबले.मग त्यांनी यंत्रमेल करून 'आम्ही इश्यू कसा सोडवला सांगा, खुश असाल तर रेटिंग द्या' कळवून टाकलं(tat संपल्यावर आपोआप बंद होत असेल.)
5. मग त्यावर सात्विक संतापाने 'मेल्यानो, इश्यू सोडवला नाहीत, रिप्लेसमेंट दिली नाही शाबासकी कसली मागता?' वाली चिडचिड लिहिली.
6. ऍपवरून चॅट केलं तर 'फिटबीट चं आता गुगल शी लग्न झालं आहे' म्हणून चॅट गुगल ला गेलं.गुगल चॅट वाली बाई किंवा यंत्र मानवीण म्हणाली आम्ही घेतलंय फिटबीट पण त्यांचे इश्यू त्यांच्या साईटवर जाऊनच सोडवा.
7. मग साईटवर गेले.अजून एक चॅट बाई आली.तिला इश्यू नंबर,'आम्ही रिप्लेसमेंट देतो' लिहिलेल्या मेल चा स्क्रीनशॉट, सर्व महाभारत, कुंडली,मंगळ, देश,शहर,आकाशगंगा असा डिटेल पत्ता दिला.बाई म्हणाली तुमची रिप्लेसमेंट झाली नाही हे खरं आहे.पण मी फक्त माहिती मिळवते.रिप्लेसमेंट रेज करायचं काम दुसरी टीम करते. मी त्यांचा चॅट चॅनल देते.
8. हा दुसरा चॅट चॅनल उघडलाच नाही.
9. मग आज एका जेनिफर बाईला चॅट वर परत हाक घातली.तिला सर्व कुंडली सांगितली.बाई म्हणाली हे करणारी टीम इंटर्नल आहे.मी त्याला हाक घातली आहे आणि दुसरा तिकीट नंबर लॉग केला आहे.बाईला म्हटलं की बाई दुसऱ्या तिकिटावर मला हे सर्व परत सांगायला लावू नकोस.त्यांना कंटेक्स्ट दे कमेंट मध्ये.हो म्हणाली.
आता बघू.जुलै मध्ये वॉरंटी संपेल.तोवर ते आहेत आणि मी आहेत.एकतर डिव्हाईस मिळवेन.नाही मिळाला तर त्यांच्याकडून 'रिप्लेसमेंट मिळणार नाही' ची लेखी कबुली मिळवून फिटबीट कम्युनिटी वर आरडाओरडा करेन.
यावरून आठवलं: एक्सटेंडेड वॉरंटी: गॅजेट च्या दुकानात प्रेमळ आग्रह होतो ही घ्यायचा.पण परदेशी डिव्हाइसेस ना घेऊ नका.फॉलोअप चा ताप व्हायचा तोच होतो.स्टोअर मध्ये त्यांना काहीही करण्याचा अधिकार नसतो.ते परत 'त्यांच्या मुख्य कस्टमर सपोर्ट ला फोन करा' सांगतात स्टोअर मध्ये गेल्यावर पण.इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस हा एक जुगार आहे.लाभला तर लाभला.(या डिव्हाईस ला घेतली नव्हती.)
Pages