Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आलं,मिरची,दुधी व गाजर घालून
आलं,मिरची,दुधी व गाजर घालून अजून रिच केलेला हांडवो
लाल मिरचीचा ठेचा: पाव किलो
लाल मिरचीचा ठेचा: पाव किलो मिरची, थोड्या लसूण पाकळ्या, मिठ, लिंबाचा रस. आणि मिरचीलोणच्याचा मसाला थोडासा . मिक्सर मधून काढलं .
१)
२)
३)
रंग मस्त आलाय!! किती दिवस
रंग मस्त आलाय!! किती दिवस टिकतो ? वरून फोडणी वगैरे ? आमच्याकडे तर मिरचीला पास आहे पण बहिणीकडे आवडते , तिला सांगेन रेसिपी.
हांडवो.. ठेचा.. मस्त झणझणीत..
हांडवो.. ठेचा.. मस्त झणझणीत..
ठेचा झणझणीत. पण आम्ही फक्त
ठेचा झणझणीत. पण आम्ही फक्त नेत्रसुख घेणार. चाखायची हिंमत नाही त्यामुळे ठेचा बनवणं इल्लै…
मंजूताई,हांडवो एकदम भारी!
मंजूताई,हांडवो एकदम भारी!
मंजुताई हाण्डवो पाकृ द्या ना.
मंजुताई हाण्डवो पाकृ द्या ना.
धन्यवाद सगळ्यांना, अश्विनी मी
धन्यवाद सगळ्यांना, अश्विनी मी नाही दिली फोडणी. फ्रिजमध्ये ठेवते मग टिकेल. फोडणी दिली तर अजून जास्त टिकेल. पण आमच्या कडे तो संपतोच पटपटा.
मंजूताई हांडवो कसा केला सांगा.छानच दिसतोय.
प्रोटीन रिच दोसापीठ दोसे
प्रोटीन रिच दोसापीठ दोसे केले तेव्हा आंबवलं नव्हतं. उरलेलं फ्रीजमध्ये ठेवलं. नंतर ते आंबवायला बाहेर ठेवलं त्यात गाजर,दुधी, आलं किसून व हिमिचे तुकडे घातले चुटकीभर सोडा घातले. कुकरच्या डब्यात फोडणी केली त्यात कढीपत्ता,हिंग , व भरपूर तीळ घातले त्यावर पीठ ओतले. मोठ्या कढईत डबा ठेवून ५० मी. बेक केलं.
माझापण प्रोटीन रिच डोसा.
माझापण प्रोटीन रिच डोसा.
प्रज्ञाने सांगितलेलं एक्झॅक्ट प्रमाण. पीठ न फुगल्यामुळे ऐनवेळी डोश्याच्या भाजीबरोबर पोळी खाऊ घालण्यात हातखंडा असला तरीही जित्याची खोड म्हणून पीठ रात्रभर आंबवायला ठेवलं. नेहमीच्या कॉन्फिडन्समुळे फार मोठं भांडं वापरलं नव्हतं तर यावेळी चक्क पीठ नीट फर्मेंट होऊन झाकणी भांड्यावर तरंगत होती. त्यात ऐनवेळी मीठ, आलं, कोथिंबिरीचं वाटण व काळीमिरी ठेचून घातली (चटणी करायचा कंटाळा, बाकी काही नाही) पहिल्या डोश्याने बिडाच्या तव्याला मिठी मारली. त्यामुळे तव्याचा नाद सोडून हातात सापडेल ते नॉनस्टिक पॅन उचलून डोसे बनवले.
चव फर्मास होती.
लोकहो बिनधास्त प्रज्ञाची ‘नो फेल’ रेसिपी वापरा व ‘टेस्टी भी, हेल्दी भी’ डोसे खा.
आज फ्लॉवर + मिर्च्या +
आज फ्लॉवर + मिर्च्या + आलेलसूण पेस्ट + धणेजीरे पावडर सगळं मिक्सीतून काढुन त्यात गव्हाचे पीठ व बेडगी पुरीचे पीठ मळले व पराठे केले. हॉट & सावर सॉस बरोबर काय मस्त लागले.
(No subject)
डोस्याच्या रान्गेत अजुन एक डोसा!

उपवास डोसा,चटणी,आमटी
उपवास डोसा मस्त..
उपवास डोसा मस्त दिसतोय.. चटणी, काकडी, आमटी टेम्पटींग..
मला रेसिपी सांगा ना उपास डोश्याची..
मृ, भगर / वरई च्या पीठाचा
मृ, भगर / वरई च्या पीठाचा केलेला आम्ही. सविस्तर पाकृ लिहून सांगते
डोसा आणि आमटी अगदी टेमटिंग
डोसा आणि आमटी अगदी टेमटिंग आहे
मी नेहमी चटणी किवा दह्याशि
मी नेहमी चटणी किवा दह्याशि खाते यावेळेला जरा आमटी वैगरे करुन घेतली, डोसे आणी आमटी ए वन लागतात करुन बघा.
माझी क्रुति
१ वाटी साबुदाणा-१ वाटी भगर-अर्धी वाटी शेन्गदाणे अस एकत्र करुन पाण्यात भिजवुन घ्या.. रात्रभर किवा किमान ४ तास तरी भिजायला हव...मग निथळुन मिक्सर मधे थोड आल-मिरची-चविप्रमाणे मिठ वैगरे सहीत बारीक वाटून घ्या...सुरवातिला चमचा चमचाच पाणी घाला नाहितर अगदी छान बारी़क होत नाही...चटणीच्या भान्ड्यात निट बारिक होत.
नेहमिच्या डोस्याच्या पिठाचि कन्स्टीटन्सी ठेवा...तुमच्या खात्रिच्य डोसा तव्यावरच करा.
किल्ली तुमची रेसिपी पण येवु द्या!
वरचा प्र९चा रेसिपीचा डोसा पण ट्राय करणार.
मीठ नाही का घालायचं या
मीठ नाही का घालायचं या डोस्यात?
उप्स! मिठ लिहायच राहिल..
उप्स! मिठ लिहायच राहिल...घालायच आहे मिठ
छान दिसतोय उपासाचा डोसा.
छान दिसतोय उपासाचा डोसा. नक्की करून बघेन. डोसा बॅटर मध्ये दाणे घातले नाही तर चालेल का ?
हो चालेल.
हो चालेल.
(No subject)
Corn पराठा (गरम तव्यावर ठेवून
Corn पराठा (गरम तव्यावर ठेवून कडक केला, मला आवडतो )
बीटची चटणी, कोथिंबीर चटणी
मक्के की रोटी दिसतोय कॉर्न
मक्के की रोटी दिसतोय कॉर्न पराठा..रंगीत चटण्या मस्त...
भाकरी आणि चिकन करी..... मस्तच..
भाकरी आणि चिकन .......जबरी
भाकरी आणि चिकन .......जबरी दिसतंय
कॉर्न पराठा आणि चटण्या मस्त दिसतायेत
वाह किल्ली , एकदम रंगीबेरंगी
वाह किल्ली , एकदम रंगीबेरंगी दिसतेय ताट !!!
आज गजानन महाराज प्रकटदिन .
आज गजानन महाराज प्रकटदिन . झुणका भाकरी , कणकेचा शिरा , खिचडी , कोशिंबीर

आज गजानन महाराज प्रकटदिन.
आज गजानन महाराज प्रकटदिन. झुणका भाकरी , कणकेचा शिरा , खिचडी , कोशिंबीर>>> प्रसाद छान दिसतोय! सुंदर!
गण गण गणात बोते _/\_
मस्त! आवडीचा मेनू
मस्त! आवडीचा मेनू
आताच केला चिवडा
आताच केला चिवडा.
काम करता करता खायला
मस्त!
मस्त!
पण कांदा टमाटर काय चावून खायचा का? बारीक चिरला नाहीस का?
हे माझे आवडीचे खाद्य आहे. भेळ फरसाण घरात असतेच. आणि चिरलेला कांदा टमाटर सुद्धा फ्रीजमध्ये असते. मिक्स करून खातो.
कधी खारीचा चुरा शिल्लक ऊरतो तो सुद्धा मी या भेलमध्ये मिक्स करून संपवतो. वाया जात नाही
Pages