खाऊगल्ली - आजचा मेनू - (५)

Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.

क्रमवार पाककृती: 

● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.

वाढणी/प्रमाण: 
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा: 

आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

काल च रुचकर मेजवानी रेसिपी प्रमाणे चिकन अळणी खाऊन झाले, परवा पापलेट फ्राय झाले तरी इथे येउन तोंडाला बदाबदा पाणी सुटले.
ऋ त्या बोंबिल चटणी चा फोटो हवा होता..कशी दिसते बघायचिये.

कोदरा https://g.co/kgs/4uDeo7
हे वर्ष आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष आहे. मा. नरेंद्र मोदींना या. बआयडएनच्यआ घरी मिलेट्सची मेजवानी होती. भारतातही G२० परिषदा झाल्या त्यातही जेवणात मिलेट्सचं होते

ऋ त्या बोंबिल चटणी चा फोटो हवा होता..कशी दिसते बघायचिये
>>>>

पुढच्या वेळी माहेरी गेलो की काढतो. फोन बदलल्याने जुने फोटोही नाहीयेत.
साधारण सुक्या बोंबलापासून बोंबील बटाटा करतात तसेच. फक्त बटाट्याची लुडबूड नसते. आणि पाण्याचे प्रमाण कमी असते. बोंबील बटाटा प्रमाणे रस्सा ठेवत नाही.

घरच्या अळू च्या वड्या
>>>

पानेही घरची होती का?

बाकी बाहेरच्या गुजराती स्टाईल गोडूस अळूवड्या हा मला भयंकर बोअर प्रकार वाटतो. त्यांना अळू वड्या म्हणायलाही आवडतं नाही.

अंडा पराठा
चिकन बिर्याणी आणि लॉलीपॉप
मटण खिमा पाव..
बाकी सगळे घरचे.. पाव बाहेरचे

IMG_20230628_001029.jpg

.

IMG_20230628_001048.jpg

.

IMG_20230628_001107.jpg

आहे की वर कांदा
मटण सोबत आहे म्हणून अपवित्र झाला का Wink

ऋ, हेमा ताई, हो पाने घरची आहेत. आणि त्यामुळे वड्या जमल्यावर आनंद गगनात मावेनासा झाला होता Happy

ऋ, जोरात आहे बेत, सुपर!

5228B31A-6547-414D-9A59-492F0B98EA74.jpegEE1B5337-077D-4C91-861F-0B2FF6C1D3D8.jpeg68BD4074-104E-45FB-A455-45737F895270.jpeg590EABA8-FFA0-411B-8E84-AD9EE97EDB74.jpeg
गुरवार उपवासासाठी थालिपिठ, बटाटा किस
किमान २० एक वर्शाने खरवस केला आणी खाल्ला (खरवस पावडर मिळाली)
उत्तपा चटणी
४जुलैला ग्रिलिन्गचा शुभारभ-व्हेजि,पनिर (सॉसेज पोरासाठी आणी व्हेज मसाला बर्गर पण केले होते)पण फोटो काढायला विसरलो)

खतरनाक!

किती मेहनत आणि वेळ लागला असेल
@ आशू, तो बेत पूर्ण विकेंडचा होता. शुक्र शनी रवी. एकाच वेळी नव्हते केले. Happy

प्राजक्ता, जबरदस्त दिसतंय सगळंच.
मनमोहन, अळूवड्या मस्तच.
ऋ, छान.
IMG-20230614-WA0000.jpg
रसगुल्ले मलई
IMG-20230707-WA0000.jpg
शिळी हरभऱ्याची उसळ भेळेत.
IMG-20230707-WA0004.jpg
पेरी पेरी पास्ता, कमी सॉस घालून. आंबट निघाला.
IMG-20230707-WA0005.jpg
वालाच्या शेंगांची भाजी, अंडा करी, मटर पनीर.
IMG-20230707-WA0001.jpg
भोपळ्याचं थालीपीठ आणि काकडीची कोशिंबीर.
IMG-20230707-WA0002.jpg
ब्लॅक बीन्स चीज रॅप
IMG-20230614-WA0002(1).jpg
फणसाची भाजी, कशाचीतरी उसळ, पोळ्या.
IMG-20230707-WA0003.jpg
झटार नावाचा मेडिटेरेनिअन मसाला आणि तीळ घालून परतलेले बटाटे.

बटाटे मस्त दिसत आहेत..
सोबत ब्रेड ची स्लाइस.. सॉस आणि तिखट चटणी.. आवडीनुसार चहा / कॉफी.. आणि छान गाणी ऐकत खावे

सगळेच फोटो यम्मी दिसताहेत.
उत्तापा कसा बनवला? कांदा वरुन टाकलेला दिसतो आहे(मी बॅटर मधे टाकुन देते). पण मग तो शिजतो कसा? तो पण एकदम क्रिस्पी.. की क्रिस्पी कांदाच वरुन टाकायचा. उत्तपा उअलटतांना कांदा पडत नाही का?
चिकन लॉलीपॉप ची रेसीपी द्या प्लिज..

चिकन लॉलीपॉप ची रेसीपी द्या प्लिज..
>>>>>>>

ते आमच्याकडे स्वयंपाकाला ज्या बाई येतात त्यांनी केले होते. बायकोही करते पण यांनी फार मस्त केले होते. अन्यथा मी बाहेरचे लॉलीपॉप फार आवडीने खात नाही. यांनी बनवलेले खाल्ले.

उत्तापा कसा बनवला? कांदा वरुन टाकलेला दिसतो आहे(मी बॅटर मधे टाकुन देते). पण मग तो शिजतो कसा? तो पण एकदम क्रिस्पी.. की क्रिस्पी कांदाच वरुन टाकायचा. उत्तपा उअलटतांना कांदा पडत नाही का?>>> नाहि पडत कान्दा.
मी डोसा बॅटरचाच बनवते उत्तपा ,डावभर बॅटर तव्यावर टाकायच पण पसरवताना मिडीयमच जाड पसरावयच, वरची लेयर अजुन कच्ची आहे तोवर कान्दा,कोथिबिर्,मिरची वैगरे टाकायच , कालथ्याने थोड दाबायच.तेल टाकून पलटावायच( मेल्टेड अमुल बटर टाकुन भाजला तर अप्रतिम चव येते कॅलरी बघायच्या नाहित)दोन्ही वेळेस मिनिटभर तरी झाकण ठेवायच.

धन्यवाद सर्वांना. Happy
आबा Happy

माझेमन, Happy
ब्लॅक बीन्सची कोरडी उसळ केली म्हणजे पाणी न घालता, फोडणीत कांदा, टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची. रॅपमधे ग्वाकामोले, सावरक्रीम, ऑम्लेटचे तुकडे आणि चीज, थोडं हनी मस्टर्ड घातलं आणि ग्रिलमधे भाजलं. विकतची टॉर्टिया होती, त्यामुळे चटकन झालं. अंडं वगळून चिकनही घालता येते.

सोडा खिचडीची प्लेट आवडली, हे प्रकार मला माबोवरच कळले.

हे या आठवड्यातले.. Happy
बटर चिकन मसाल्यातला चिकन पुलाव .
IMG-20230712-WA0004.jpg
खमन ढोकळा चितळे मिक्स
IMG-20230712-WA0003.jpg
नान पिझ्झा
IMG-20230714-WA0003.jpgIMG-20230714-WA0004.jpg
मेथ्या टोमॅटो वरण, पुदिना कोथिंबीर लसूण ओवा घालून चौकोनी पराठे व खाली पोळ्या, भरली वांगी
IMG-20230714-WA0005.jpg

मुगाच्या डाळीची खिचडी, रसम , आणि वांग्याच्या भाजीचे सारण उरलं होतं त्याचा परतून भुरका (तीळ कूट, दाणे कूट आणि सुकं खोबरं, मिरची, कोथिंबीर)
IMG-20230714-WA0002.jpg

गुलाबजाम आणि आंबागुलाबजाम. आंब्याच्या रसात चितळे मिक्स.
IMG-20230712-WA0002.jpg

Pages