खाऊगल्ली - आजचा मेनू - (५)

Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.

क्रमवार पाककृती: 

● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.

वाढणी/प्रमाण: 
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा: 

आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Use group defaults

माझेमन, भारीच.
हे या दोनतीन दिवसातले.

कोथिंबीर वडी आणि पुदिन्याची चटणी
IMG-20240316-WA0001.jpg

भरली वांगी
IMG-20240316-WA0002.jpg
भजी
IMG-20240316-WA0000.jpg

सामो >> हो. साखर कॅरमलाईज्ड केल्याने कलर तसा येतो. पण यात पाणी नाहीच. दूधाचा इफेक्ट असा होता की साबांना वाटले मिल्कपावडर वापरली आहे.

@सान्वी>>>>
माखंडी हलवा

साहित्यः
ऑलमोस्ट सत्यनारायणाचा प्रसादाचेच. प्रमाण वेगळे.
1. १ वाटी बारीक कच्चा रवा
2. २ वाटी दूध
3. १ वाटी तूप
4. १ वाटी साखर
5. १ चिमूट मीठ (मी वापरले नाही)
6. आवडीनुसार ड्रायफ्रुटस, केशर, वेलची इ.

पाककृतीः

1. बारीक कच्चा रवा ६ तास दुधात भिजवून ठेवायचा.
2. तूप गरम करून त्यात ड्राय फ्रुटस तळून घ्यायची व बाजूला ठेवायची.
3. नंतर तूपात सर्व साखर घालायची.
साखर थोडी कॅरमलाईझ्ड होईल व वितळेल.
4. मग त्यात रवा-दूधाचे मिश्रण घालायचे व दणदणित वाफ येऊ द्यायची.
5. त्यानंतर वेलची, ड्रायफ्रुटस् घालायची.
6. अप्रतिम लुसलुशित हलवा तयार

अधिक टीपाः
1. मी रवा दूध भिजवतानाच थोडे केशर घातले. हलवा झाल्यावर अप्रतिम सुवास पसरला होता.
2. कच्चा रवा नसेल तरी हरकत नाही, भाजलेलाही चालेल. टेक्स्चरमध्ये फरक पडेल. ओरिजिनल रेसिपीमध्ये कच्चा वापरलेला म्हणून मीही तसाच वापरला.
3. मी मीठ वापरले नाही. तुम्ही वापरत असाल तर कोणत्या स्टेजला घालायचे याचा अंदाज तुम्हाला असेल.
4. माझी साखर जाड होती. कॅरमलाईज्ड झाल्यावर ती घट्ट होऊ लागली. त्यामुळे मी वितळायची वाट न पाहता रव्याचे मिश्रण घातले. व सेफ साईड म्हणून वरून अर्धा वाटी दूध एक्स्ट्रा घातले.
5. काहींचा अनुभव असा होता की साखर जास्त कॅरमलाईझ्ड झाल्यास चव कडसर येते.
6. तूप/साखरेचे प्रमाण तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. पण तूप फार कमी पडले तर हवे तसे टेक्स्चर येणार नाही.
7. काहींनी रवा १.५ तासच भिजवून रेसिपी केली. त्याचा परीणाम मज ठाऊक नाही.

सोपी कृती आहे. सध्या बॉर्डरलाईन डायबेटिसची धास्ती घेतलेली आहे. त्यामुळे पुढे कधी धीर आल्यास हा हलवा करेन.

माखंडी हलवा छान दिसतोय पण फेसबुक वर उठलेला एकंदर गदारोळ आणि त्याला उत्तर म्हणुन गेल्या २-३ दिवसात माखंडी हलव्याच्या सुमारे ५० एक रेसिपी फोटोसकट पाहिल्या त्यामुळे करुन बघयची इच्छा संपली आहे सध्यातरी.
काल घरी उपमा केला तेव्हा सुद्धा खायला नको वाटले.
एकुणात रव्याच्या कोणत्याच रेसिपी सध्या नको वाटत आहेत Wink
पण करेन एकदा नक्कीच जरा वादळ शमलं की.
रेसिपी हवीच होती. धन्यवाद माझेमन

काल मलाही हा माखंडी हलवा आयता खायला मिळाला. किंचित कडसर चव. टेक्स्चर पोत मूगडाळीच्या हलव्यासारखा. तूप दोन्हीला भरपूर लागतं.

इथल्या दोन्ही फोटोतले हलवेही मस्त दिसताहेत.

कोथिंबीर वड्यांना झब्बू. kothimbeer vadi1.jpgkothimbeer vadi2_0.jpg

आई उंडा करून कापडात गुंडाळून वाफवायची. अगदी गोळा होईल इतपत गरजेपुरती पिठं घालायची. मी मायक्रोवेव्ह केलं. (पिठात हात बरबटावयला अजूनही जमत + आवडत नाही). तरी तिच्यासारख्याच खुटखुटीत आणि कुरकुरीत वड्या जमल्या. वास तसाच आला. ती चवीला काय काय घालायची ते आठवत नाही. त्यामुळे ती नेमकी चव आली नाही.

भरत >>> कोथिंबीर वडी मस्त...किती वेळ मावे केलंत? मावे केल्याने शॅलो फ्राय करायला फार वेळ लागला नसेल ना?

साबा बनवतात त्याही नेमकेच बेसन घालतात त्यामुळे बेसन वडी न वाटता कोथिंबीर वडीच लागते.

स्मिता श्रीपाद Lol

मला हा 'माखंडी हलवा' माहितीच नाही, मी दगडाखाली राहते बहुतेक..! 'माखंडी हलवा' म्हणजे 'पाखंडी शिरा' आहे एवढं कळलं. दिसतोय भारी. कृतीसाठी धन्यवाद माझेमन, सोपा वाटतोय.

तूप भरपूर लागतं कारण रवा कच्चा/ न भाजता घ्यायचा आहे. तूप कमी आणि आच मोठी केली की घात होतो.

छान दिसते आहे को व .
कोथिंबीर वडीला मी उंडा केला नाही, थालीपीठाच्या उंड्यापेक्षाही पातळ लादी थोडे फेटून सरळ कुकरच्या डब्यात वाफवली. नंतर तुकडे करून तळली. तीळ संपले आहेत समजून घातले नाहीत पण नंतर सापडले. साक्षी तंवरची 'त्योहार की थाली' मधली कृती सोपी वाटते. तीच करते. अतिशय कमी बेसन, जेमतेम मिळून येण्याइतपत. मावेत कधी केली नाही, करून बघेन.

स्मिता श्रीपाद +१ about माखंडी का मखंडी हलवा. सगळ्यांची स्वयंपाकघर आणि सोमी त्या हलव्याच्या फोटोनी उतू गेलीत पार. ते बघून करण्याची चवच गेली माझी.
त्यात परत तूप कमी/जास्त झाल, साखरे खालचा गॅस कमी/जास्त झाला, रवा कमी /जास्त भिजला अशा अनेक कारणाने हा बिघडू शकतो असे अनुभव वाचल्यावर म्हणलं मरो तो शिरो Lol
कोथिंबीर वड्या क्लासिक दिसतायेत

अस्मिता,हा माखंडी हलवा रमजानच्या पहिल्या दिवसापासून फे.बु.वर गाजतोय.पहिल्या लिहिणारीला म्हणे बरेच ट्रोल केले गेले.प्रकरण इतके वाढले की लोकसत्तेत अग्रलेख लिहिला गेला.
मीही आज pitukala करून पाहिला.तूप फारच जास्त झाले.1 वाटी रव्याला पाऊण वाटी ठीक होते.चांगला लागला.

माझे मन, दोन दोन मिनिटे तीनदा केल्यावर knife test पास झाली. बाउलला नीट ग्रीजिंग करायला हवं होतं.
हो. परतायला फार वेळ लागला नाही.

अस्मिता Happy

अस्मिता , इथे लिहू शकणार नाही इतक्या खालच्या पातळीवर त्या महिलेला ट्रोल केले गेले . फॉर अ चेंज , लोकसत्तेने दखल घेतली हे पाहून बरे वाटले .
मलाही करुन पाहायचा आहे माखंडी हलवा .

भरतजी , कोथिंबीर वड्या छान दिसत आहेत .

ओह हे ट्रॉलिंग चे माहित नव्हते, फक्त खूप जणांच्या व्हाट्स अँप स्टेटस,fb पोस्ट वर photos पाहिले आहेंत या हलव्याच्या प्रयोगाचे

@mazeman खूप धन्यवाद....फुरसतीत करून बघण्यात येईल हे प्रकरण. सध्या घरात एकामागोमाग एक सगळ्यांचे घसे आऊट ऑफ वर्क आहेत. यातील तुपाचे प्रमाण भरपूर दिसते.

>>>>>>>>> 'माखंडी हलवा' म्हणजे 'पाखंडी शिरा' आहे एवढं कळलं.
हाहाहा

२ अंडी, अर्धा कप वरसर भरून साखर, one third कप ऑइल हे खूप फेटून घ्यायचं आधी. एकदम foamy दिसेपर्यंत फेटायचं.त्यात दालचिनी पावडर, व्हनीला इसेन्स एक एक चमचा, खिसलेलं गाजर १ कप, मनुका, काजू हे सगळं घालून मिक्स करायचं. मग एक कप मैदा,एक छोटा चमचा बेकिंग पावडर,अर्धा चमचा बेकिंग सोडा हे सगळं चाळून घालायचं. सगळं मिक्स करायचं आणि मग consistancy नीट होईतपत दूध घालायचं (मला अर्धा कप पेक्षा थोडं कमी लागलं )मग सगळं मिक्स करून, भांड जरा टॅप करून preheated ओव्हन मध्ये टाकायच.मी ३०मिनिट. ठेवलं पण पांढरट वाटला म्हणून अजून दहा बारा मिनिट ठेवलं

Pages