मला चुकीची ऐकू आलेली गाणी -३

Submitted by परदेसाई on 5 December, 2022 - 08:33

पहिली दोन पाने २०००+ पोष्टीनी पूर्ण झाल्यामुळे हे तिसरे पान सुरू करतोय.

आधीची पाने इथे पहायला मिळतील..

http://www.maayboli.com/node/2660
https://www.maayboli.com/node/52599

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मला ते गाणं

तेरी झलक शर्फी श्रीवल्ली
नैना लगाये ठर्की

असं वाटायचं.

श्याम रंग मेरे कायनात हो यार मेरा छ य्या छय्या. >> मेरी शाम रात मेरी क़ायनात असे आहे ते . माझी संध्याकाळ/रात्र, माझे सगळे विश्वच तू आहेस.

परवा मुलीच्या शाळेत इयत्ता पहिली व दुसरीच्या मुलांचा
स्पोर्ट्स डे झाला. आपापल्या टीमला चिअर अप करण्यासाठी काही मुले शकीराचं
वाका वाका गाणं म्हणत होती त्यात शेवटचं tango ae ae चं पोरांनी शंभो ए ए केलं होतं..
Proud Lol

शकीराला बघताना शब्दांकडे लक्ष देणं, म्हणजे बॉण्ड चित्रपटाचे टायटल्स बघताना नामावली वाचण्यासारखे आहे.. Happy
त्यामुळे झाले असेल..

याराना मधले तेरे जैसा यार कहा गाणे.
यातली एक ओळ नेहमी मी अशी ऐकायचो.

मेरी ज़िन्दगी सवारी
मुझको गले लगाके
बैठा दिया पलंग पे
मुझे खाक से उठाके

परवा दिवशी एम एम वर ऐकताना उलगडा झाला

बैठा दिया पलंग पे
मुझे खाट से उठाके...

हे जरा सुसंगत असल्याने आम्ही असंच म्हणायचो !

>>>>>>>>>>पलंगावर एवढे वर्ष भलतीच जिंदगी सवारत होतात म्हणजे Lol
Lol Lol
>>>>>>>बैठा दिया पलंग पे
मुझे खाट से उठाके...
Lol Lol

बैठा दिया पलंग पे
मुझे खाक से उठाके >>>
मुझे खाट से उठाके.. >>>
पलंगावर एवढे वर्ष भलतीच जिंदगी सवारत होतात म्हणजे >>> Lol

माझा वर्गमित्र गुलजार च्या 'दो दिवाने शहर में'

दो दिवाने शहर में साबुदाणा .... हां साबुदाणा ढुंढते है... असे गायचा Happy

एक कझिन क्रांतीमधले 'जिंदगी की ना टूटे लडी, प्यार कर ले घडी दो घडी' हे गाणे तालासुरात 'प्यार कर ले बडी हो गयी' असे गात असे, तेंव्हा तिचे वय १० वर्ष वगैरे असेल Lol

चौदवी का चांद ला सर्रास 'चौधरी का चांद' , तोहफा हा शब्द हमखास 'तोफा', वर आलेले 'बैठा दिया पलंग पे खाट से उठा के' हे तर होतेच.

एकादशी असेल त्यांना
म्हणून ढुंढत असतील साबुदाणा
.
मीही असंच ऐकायचे पूर्वी Lol

बैठा दिया पलंग पे <<< याच गाण्याचे सुमारे १५/२० वर्षांपूर्वी या बा. फ. ची सुरूवात झाली होती.. Happy

याच गाण्याचे सुमारे १५/२० वर्षांपूर्वी या बा. फ. ची सुरूवात झाली होती>> एक वर्तुळ पूर्ण झाले.
.
पुण्यात actually भोपळे चौक आहे. मला माहिती नव्हतं

याच गाण्याचे सुमारे १५/२० वर्षांपूर्वी या बा. फ. ची सुरूवात झाली होती >> जुन्या मायबोलीवर आहे का ?

प्यार तुम मुझसे करती हो डोन्ट से नो हे मला लहानपणी प्यार तुम मुझसे करती हो डॉन सेनो ऐकू यायचे. आणि बरेच मित्र तसेच म्हणायचे ते गाणे.

नंतर एक तेलुगू डॉन सेनू म्हणून पिक्चर आल्यावर मला वाटले की या गाण्यावर आधारीत पिक्चर काढला का Lol

प्यार कर ले बडी हो गयी' >>> हे खूपच सायंटिफिक आणि अर्थपूर्ण आहे.
काश आपले गीतकार बडे होते..

आमचा एक हैदराबादी मित्र “चौधरी का चाँद” न म्हणता नीट “चौदहवीं” का असे बरोबर म्हणतो पण पुढची ओळ मात्र (मुद्दाम) असे गातो:

चौदहवीं का चाँद हो, या “फ़साद” हो

त्याची बायको सोबत असेल तर नक्की असेच गातो Proud

खूप किस्से आहेत, लिहितो नंतर.

Pages